प्रो. धोंड Profile picture
आपने भिड तो देखी होगी ना, उस भिड मे से कोई भी एक बावळट, गबाळा माणूस निवडिये, वो मैं हू. मुंबई इंडियन्स शाखा प्रमुख तळेगाव दाभाडे
May 4 13 tweets 3 min read
एक आटपाट जंगल होतं. जंगलात एक सुंदर कॉलेज होतं. जंगलाच्या सगळ्या प्राण्यांच graduation तिथूनच व्हायचं. तिथं जंबो नावाचा हत्ती आणि कोमल नावाची मुंगी शिकायला होती. जंबो पैलवान होता, कुस्त्या मारायचा. Mat वरची, मातीतली. तुम्ही नाव घ्या, त्या त्या कुस्त्या मारायचा. कॉलेजात एकदम फेमस. कोमल ब्युटी क्वीन होती. तिने कॉलेजात ऍडमिशन घेतल्यापासून सगळीकड तिचीच चर्चा. तिने एकदा तरी आपल्याकडं बघावं, आपल्याशी बोलावं म्हणून सगळेजण जीवाचा आटापिटा करायचे. एकदा कॉलेज सुटल्यावर घरी जाताना उंदरांची एक गँग तिचा पाठलाग करत होती, तिला त्रास देत होती तितक्यात तिथं आपला जंबो
Apr 20 20 tweets 4 min read
गोष्टीचं नाव: धोंड आणि रहस्यमयी बंगला
उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या. आयपीएल बघून बघून आणि त्याच्याआधी परीक्षेचा अभ्यास करुन करुन मला जाड भिंगाचा चष्मा लागला. त्यात मॅची बघता बघता रोज जागरण व्हायला लागली. घरच्यांनी कितीही सांगितलं तरी मी ऐकत नव्हतो. माझी केस पार हाताबाहेर नको जायला म्हणून मग मला पार लांब मावळात जिथं लाईट बिइट अजिबात नसते अशा आमच्या एका नातेवाईकांच्या घरी सोडण्याचा गुप्त निर्णय माझ्या नकळत त्यांनी घेतला. मला म्हणाले "चल आपल्याला फिरायला जायचं आहे. तुझी मॅच सुरू व्हायच्या आत परत येऊ" मी पण भाबडा. लगेच तयार झालो. आमची गाडी लांब
Dec 9, 2023 12 tweets 3 min read
अभ्या त्याच्या बारा वर्षांच्या कॉर्पोरेट लाईफला अक्षरशः वैतागला होता. सारख्या deadlines, जॉब बदलला तरी थोड्या फार दिवसांनी तसाच येणारा अनुभव यामुळं हे सगळं सोडून गावाला ओढ्याच्या बाजूच्या आपल्या हक्काच्या जमिनीवर कायतरी करावं, दोन पैसे कमी मिळाले तरी आपल्या मर्जीचे आपण मालक व्हावं असं त्याला सारखं वाटायचं. सात आठ महिने हा विचार केल्यावर त्याने हा विषय एकेदिवशी जेवताना आपल्या आईसमोर मांडला. आपल्या गावच्या जमिनीवर आत्तापर्यंत साठलेल्या पैशातून कशी फुल शेती करणार. अमुक तमुक कॉन्टॅक्ट वापरून ती फुलं कशी बाहेर देशात निर्यात करणार, सुरुवातीला किती,
Nov 18, 2023 8 tweets 2 min read
बारावा खेळाडू
प्रत्येक क्रिकेट संघाचा एक बारावा खेळाडू असतो. त्याला क्रिकेटची प्रचंड आवड असते. आपल्या संघाची इत्यंभूत माहिती असते.आपल्या पुढे कोणते अकरा खेळाडू खेळले पाहिजे याबद्दल त्याचं ठाम मत असतं. कोच कुठं चुकतोय हेही तो अधिकाराने सांगू शकतो. याने हळू खेळलं पाहिजे, त्याने जरा फास्ट खेळलं पाहिजे, याची running between the wickets खराब आहे याला रोज सकाळी पळवलं पाहिजे. त्याने line length वर control ठेवला पाहिजे. हे असे सल्ले तो खाता पिता उठता बसता सहज देऊ शकतो.आपल्या संघाची तो कोणतीही मॅच सहसा चुकवत नाही. एकदा मॅच सुरू झाली की टीव्ही समोरून
Aug 11, 2023 4 tweets 1 min read
बाकीचे आजार दोन तीन वर्षांतून एकदा येतात पण सर्दी ही माहेरवाशिणी सारखे असते. वर्षातून दोनदा तरी येणार,हक्काने तीन चार दिवस राहणार.लाड करून घेणार आणि मग जाणार. "बंधू येईल माहेरी न्यायला" सारखं आपण कुठतरी पावसात भिजायला गेल्याचं, पाणी बदलल्याच किंवा नाजूक शरीर असेल तर फक्त ऋतू बदलल्याच निमित्त होऊन हिला पद्धतशीर आमंत्रण जातं. येताना ही कधी एकटी येते तर कधी डोकेदुखी आणि घसादुखी ही व्रात्य मुलं घेऊन येते. फार त्रास देतात ती. आल्यावर विक्स काय, त्या हिरव्या गोळ्यांची वाफ काय, बेचव गरम पाणी काय,तिच्या मुलांसाठी त्या strepsils च्या गोळ्या काय फार लाड
May 28, 2023 7 tweets 2 min read
सचिन, युवी नंतर धोनी माझा सगळ्यात आवडता क्रिकेटर. तो ही कदाचित आज रिटायर होईल.💔 काही वर्षांपूर्वी त्याच्यावर काहीतरी लिहिलं होतं. वेळ मिळाला तर नक्की वाचा.
"धोनी"
बऱ्याच वेळा पिक्चर मधे बघतो तसं एखादी सिस्टम बदलायला, त्या मधल्या लोकांची मानसिकता बदलायला एखादा बाहेरचा माणूस लागतो तसच २००७ विश्वचषकात झालेल्या नामुष्की नंतर जेव्हा सचिन त्याच्या उत्तरायणात होता, गांगुली, द्रविड, लक्ष्मण जवळपास संपले होते, सेहवागवर कधी भरोसाच ठेवता येत नव्हता तेव्हा आपल्याकडे लीडर म्हणून धोनी उदयाला आला. धोनी तसा भारतीय क्रिकेट साठी बाहेरचाच. आपले बहुतेक क्रिकेटपटू मेट्रो
May 25, 2023 8 tweets 2 min read
परवाचा ढींग टांग थोडा एडिट करून.
"या गोजिरवाण्या वाड्यात"
आटपाट नगर होते. तिथे तीन भावंडे गुण्यागोविंदाने नांदत असत.तिन्ही भाऊ कर्तबगार होते. लहाना रवी, मधला सुरेश, आणि सर्वात थोरला महेंद्र उर्फ थाला.
थालाचा रुबाब मोठा. कर्त्या पुरुषासारखा तो सुपारी कातरत एका खुर्चीत बंगल्यावर बसायचा. आल्यागेल्याचा मुजरा घ्यायचा. चहापाणी विचारायचा. सुरेश आणि रवीला त्याचा धाक वाटे. थालाचा खडुसपणा त्यांना पसंत नव्हता, पण मुकाट सहन करत होते. का? तर थाला थोरली पाती ना!!मधला सुरेश महाबिलंदर होता. बरेच उद्योग करुन त्याने घर बरकतीला आणले होते. तो मनाशी म्हणत, माझ्यामुळे या
Apr 29, 2023 5 tweets 1 min read
इतिहासात डोकावताना "न्यूयॉर्क मँगो पल्प पार्टी"
एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीला आपल्यायेथील काही होतकरू तरुणांनी अमेरिकेतील बाजारपेठेत आमरस निर्यात करायचा ठरवला होता. त्या लोकांसाठी नवीन असणारा हा पदार्थ तिकडे हातोहात खपेल आणि आपल्या पदरी चार पैसे पडतील अशी त्यांची अपेक्षा होती. आपल्या येथील तेव्हाची सुप्त बाजारपेठ आणि भरघोस येणारे आंबे बघता त्यांची अपेक्षा काही चुकीची नव्हती.त्याकाळी अमेरिकेत आपल्या व्यवसाय स्थिरस्थावर करण्याच्या प्रयत्नात असणारे श्री. नानासाहेब जवळकर यांनी त्या रसाचे वितरण अमेरिकेत करण्याची जबाबदारी स्वीकारली होती. भारतातून पाठवलेले
Apr 24, 2023 15 tweets 3 min read
मागच्या वर्षी सचिन बद्दल काही लिहिलं होतं
"सचिन"
नव्वदच्या दशकाच्या पूर्वार्धात जन्मलेल्या पिढीच भाग्य थोर होतं. आमच्या बरोबर हॅरी पॉटर मोठा झाला,लॉर्ड ऑफ द रिंग्ज चित्रपटांच्या सिरीज ने घडवलेला इतिहास याची देही याचि डोळा अनुभवला. स्पायडर मॅन चा जलवा मोठ्या पडद्यावर बघितला. Image शक्तिमान ने रविवारच्या मनोरंजनाची सोय केली होती,एखादा सुपरस्टार जन्माला येतो म्हणजे काय हे कहो ना प्यार च्या वेळी अनुभवता आलं. पण या आठवणींच्या अल्बम मधली सगळ्यात आवडती पानं कोणती असतील तर ती सचिन तेंडुलकरची!पिक्चर मधले हिरो नाही का स्टाईल मध्ये सगळ्या विलन विरुद्ध एकटाच लढतो तसा
Jan 1, 2023 10 tweets 2 min read
ड्रायव्हिंग
सकाळी ऑफिसला जायच्या धांदलीत असताना नुकतीच बारावीची परीक्षा दिलेली चिऊ आली आणि जरा लाडातच तिने मला विचारलं "डॅडी मला गाडी शिकायचीय. कधी शिकवणार?"
"मला वेळ नसतो ग,घरी आल्यावर पण ऑफिसची कामं करत असतो मी. बघतेस ना. ड्रायव्हिंग चा क्लास लाव तू. चौकशी कर आणि पैसे घेऊन जा." ती जरा नाखुशीनेच बाहेर गेली.बुधवार एकदम सुस्त असतो. सोमवारची आलेली नवीन कामं उरकत आलेली असतात. पुढेही दोन दिवस असल्याने फारशी आग लागलेली नसते. लंच नंतर थोडं निवांत बसलो होतो. वॉलपेपर ला असणारा कॉलेजच्या शेवटच्या वर्षातला बाबांच्या RX100 सोबतचा माझा फोटो पाहिला.
Oct 24, 2022 5 tweets 1 min read
साधारण सात आठ वर्षांपूर्वीची गोष्ट...अशीच दिवाळीची एक संध्याकाळ होती. UK based क्लाएंट असल्यामुळे मला ऑफिसला सुट्टी नव्हती. पण पहिलाच जॉब असल्याने आणि नामांकित कंपनी मध्ये असल्याने कुरकुर करून आणि दांडी मारून चालणार नव्हतं. मन मारून कामाला गेलो होतो. काम करताना माझ्यासह माझ्या सहकाऱ्यांचा सुद्धा mood थोडा ऑफ होता. काम चालू होतं पण नेहमी असते तशी energy नव्हती. तितक्यात फ्लोअर वर बरीच धांदल चालू झालेली जाणवली. कोण बरं आलं ऐन दिवाळीत असा विचार डोक्यात आणि एक उंच, तगडा माणूस सोबत दोन सहाय्यक त्यांच्याकडे sweets च्या पिशव्या आणि फ्लोअर