Discover and read the best of Twitter Threads about #गडवारी

Most recents (5)

#THREAD
विषय :किल्ले सज्जनगड
सातारा,मराठ्यांची राजधानी,या शहराबद्दल एक वेगळीच आपुलकी आहे,इथे आलो कि ऐतिहासिक ठिकाणी आल्याचा भास काही क्षणातच होतो,याच शहरात परळी गावाच्या जवळ एक सुंदर किल्ला निसर्गाच्या सानिध्यात वसला आहे,तो किल्ला म्हणजे 'सज्जनगड' आज याच किल्ल्याची गडवारी
(1/26)
पुण्यापासून अंदाजे १३८ किलोमीटर अंतरावर हा किल्ला आहे,साताऱ्या शहरापासून १६ किलोमीटर अंतरावर.शहराच्या मध्यभागातून जात आपण अजिंक्यताऱ्याजवळचा बोगदा ओलांडला कि सज्जगडाच्या मार्गाला लागतो
(2/26)
.बोगदा ओलांडला कि चहू बाजूला फक्त डोंगर आणि डोंगराचं दिसतात.निसर्गाने ओतप्रोत भरलेला हा रस्ता म्हणजे भटक्यांसाठी एक पर्वणीच.या रस्त्याने जाता जाता आपण एका फाट्यावरून येऊन थांबतो,एक रस्ता परळी गावाला जातो तर दुसरा ठोसेघर धबधब्याला,
(3/26)
Read 29 tweets
#THREAD :

विषय:- किल्ले राजमाची

राजमाची हा किल्ला बऱ्याच उंच असलेल्या डोंगरावर अर्थात सह्याद्रीच्या एका फाट्यावर बांधलेला असून,ह्या किल्ल्यावर दोन किल्ले आहेत ते म्हणजे श्रीवर्धन आणि मनरंजन,तर अश्या ह्या किल्ल्याची आज #गडवारी
(1/16)
राजमाची हा किल्ला लोणावळ्या पासून अंदाजे २० किलोमीटर अंतरावर असून,उधेवाडी गावापर्यंत गाड्या जातात,तिथून पुढे चालू होतो तो ट्रेकिंग चा रस्ता.राजमाची वर दोन किल्ले आहेत,एक श्रीवर्धन आणि दुसरा मनरंजन,या पैकी श्रीवर्धन हा उंचावर आहे आणि मनरंजन हा राजमाचीच्या पश्चिमेस आहे.
(2/16)
राजमाचीच्या पायथ्यापासून ते टोकापर्यंत हा अंदाजे ३००० फूट उंच आहे.ट्रेकर्स साठी राजमाची म्हणजे खर्यार्थाने पर्वणीच.सुरवातीला श्रीवर्धन ला जाऊयात आणि मग मनरंजन ला.श्रीवर्धन च्या दिशेने जाऊ लागलो कि मुख्य किल्ला यायच्या आधी आपल्याला एक तट दिसतो.
(3/16)
Read 18 tweets
#Thread
किल्ले:- पुरंदर
नं:3
पुरंदर हा किल्ला अनेक अनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार आहे.
छत्रपती संभाजी महाराजांच्या जन्माचा साक्षीदार पण हाच किल्ला अन 1665 च्या तहाचा पण साक्षीदार हाच...
आज आपण या किल्ल्याची कहाणी वाचूयात आणि याची सैर करूयात....

#मल्हारवारी
(1/24)
पुरंदर का पुण्यापासून अंदाजे 40 किलोमीटर अंतरावर आहे.पुण्याहून निघून,दिवेघाट मार्गे आपण इतिहास संपन्न सासवड शहरात येऊन पोहोचतो आणि एक फाट्यावर येऊन पोहोचतो.
एक फाटा जेजुरीच्या दिशेने आपल्याला नेतो तर दुसरा आपल्याला नारायण पुराच्या दिशेने नेतो!
(2/24)
आपण नारायणपुराला जाणारा रस्ता पकडला की आपण पुरंदरच्या दिशेने निघतो.या रस्त्यावर प्राचीन मंदिरं आहेत,त्यातील एक म्हणजे 'संगमेश्वर'.
याच मंदिराच्या समोर,पाहिले पेशवे बाळाजी विश्वनाथ भट्ट यांची समाधी आहे.
(3/24)
Read 26 tweets
#Thread
2.
किल्ले:-शिवजन्मभूमी शिवनेरी.

'आणि भिमाशंकराच्या जटात,
अन नाणेघाटाच्या ओठात वसलेल्या किल्ले शिवनेरीवर उशक्काल झाला.
शिवरायांचा जन्म झाला
पुत्र जिजाऊ साहेबांना झाला,
पुत्र शहाजी राज्यांना झाला.
पुत्र सह्याद्रीला झाला.
पुत्र महाराष्ट्राला झाला'
(1/20)
#मल्हारवारी
ज्या ज्या वेळीस शिवनेरी च्या पायऱ्या चढत असतो,त्या त्या वेळीस मला हे बाबासाहेब पुरंदरेंचे शब्द आठवतात आणि डोळ्यात हळूच पाणी येते.

आपण किती भाग्यवान आहोत ही भावना मनी जागृत होते आणि महाराजांचा पाळणा पाहणार या उत्सुकतेने पाऊले झट झट पुढे पडत राहतात.
(2/20)
स्वारगेट पासून 96 किलोमीटर अंतरावर शिवनेरी किल्ला आहे. भोसरी,मोशी,राजगुरूनगर असे करत आपण नारायणगाव पोलीस चौकी पर्यंत पोहोचतो आणि तिथून डावीकडे वळलो की आपण जुन्नर रोड ला लागतो.मीना नदी चा पूल ओलांडला की आपण जुन्नर च्या मार्गाला लागतो.
(3/20)
Read 21 tweets
#THREAD
१.
किल्ले -राजगड

स्वराज्य म्हटलं कि अनेक किल्ले येतात,स्वराज्याची शपथ घेतलेला रायरेश्वर समोर येतो तर स्वराज्याचे तोरण जिथून चालू झाले असा 'तोरणा'आपल्या नजरे समोर येतो ! हे सगळे कितीही महत्वाचे किल्ले असले तर 'किल्ले राजगड' याचे स्थान वेगळेच !
(1/19)

#मल्हारवारी
स्वारगेट पासून राजगड गावापर्यंत साधारण ६१ किमी चे अंतर आहे ! स्वारगेट,नर्हे,खेड असे करत गाडी नसरापुरास पोहोचते आणि नसरापूर फाट्यापासून गाडी वळवली कि आपण वेल्ह्याच्या मार्गाला लागतो !
नयनरम्य असा हा रास्ता पाहत पाहत आपण दिडघर,आंबवणे अश्या छोट्या वाड्या आपण पार करून येतो !
(2/19)
मार्गासनी फाट्यावरून गाडी डावी कडे वळवून आपण साखर,चिमोडी आणि गुंजवणे ह्या गावात येऊन पोहोचतो ! आणि आपल्या समोर दिसतो तो आकाशात अभिमानाने उभा असलेला 'राजगड'.
राजगड साधारण समुद्र पातळी पासून १३७६ मी उंचीवर आहे.तसा चढायला अवघड आहे परंतु ट्रेकर साठी पर्वणी !
(3/19)
Read 20 tweets

Related hashtags

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!