Mustafa 🇮🇳♥️ Profile picture
INC | RAGA 💯🔥 |SARKIAN | KOLHAPURKAR | SUFISM ♥️

Aug 22, 2020, 5 tweets

डॉ बाबासाहेबांनी भारतीय संविधान लिहिले जी एक महान गोष्ट आहे. संविधानात डॉ. बाबासाहेबांनी ज्या कायदेशीर तरतुदी केल्यात त्या संपूर्ण भारतीय समाजासाठी आहेत, त्याचाच हा घेतलेला आढावा. बाबासाहेबांचे वरील बहुमूल्य योगदान पाहतां आज कामगारांची जी सुस्थिती दिसत आहे,

त्यात बाबासाहेबांचा निश्चितच सिंहाचा वाटा आहे. म्हणून बाबासाहेब हे सर्व कामगारांचे आदर्श आहेत. ही बाब सर्वांनी लक्षात घेणे आवश्यक आहे.
आज तर काही कामगारांची स्थिती वाईट आहे. नव्या कामगार धोरणाचा फारसा लाभ नाही. साम्राज्यवाद फोफावत आहे. जागतिकीकरण आले. यांत्रिकीकरण सुरू झाले.

त्यामुळे सामान्य माणूस भरडला जात आहे. साम्राज्यवाद, नव वसाहतवाद, सांस्कृतिक दहशतवाद, बहुराष्ट्रीय कंपन्या इत्यादीमुळे माणसाच्या घामाचा दाम कमी आणि भांडवलदाराला जास्त नफा या दोहोंच्या फरकामुळे गरीब हा दिवसें दिवस गरीब तर श्रीमंत हा अधिकाधिक श्रीमंत होत आहे.

सामाजिक आणि सांस्कृतिक मूल्यांची घसरण होत आहे. माणसाचे अवमूल्यन होत आहे.
माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटना घडत आहेत. अशा बुर्ज्वा व्यवस्थे विरुद्ध तसेच शासक समाज व्यवस्थे विरूद्ध आपण प्रतिरोध केला तरच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातला भारत घडवू शकू.

तेव्हाच प्रत्येकाचे जीवन सुंदर होईल. प्रगती करता येईल आणि चळवळ ही पुढे नेता येईल….
@SahilVastad @be_rose_gaar @Prksh_Ambedkar @MissionAmbedkar
#ambedkarism

Share this Scrolly Tale with your friends.

A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.

Keep scrolling