Mustafa 🇮🇳♥️ Profile picture
INC | RAGA 💯🔥 |SARKIAN | KOLHAPURKAR | SUFISM ♥️

Aug 31, 2020, 7 tweets

मोहरम...
सुरुवातीला काय लिहू तेच समजलं नाही,पण थोडा प्रयत्न करूया म्हटलं....
#करबला हे युद्ध का घडले कश्यासाठी घडले अजूनही ह्यापासून लोक वंचित आहेत...
मोहंमद पैगंबर यांचे पूर्ण कुटुंब ह्या युद्धात यजीद नामी गद्दार ने शहीद केले..हे युद्ध स्पष्ट करण्या इतपत माझी योग्यता नाही....

म्हणून मी ज्या करबला युद्धात वेदनादायक घटना घडल्या त्या स्पष्ट करण्यासाठी मराठी काव्यप्रकार रिवायत याची मदत घ्यायची ठरवली...
रिवायत म्हणजे शोकगीत जे करबला युद्धात घडले त्याची घटना सांगितली जाते...
ह्यासाठी मराठी रिवायत मी आपल्या समोर मांडणार आहे...👍
सुरुवातीला हूर पैलवान बद्दल..

हूर हा यजीद सैन्याचा एक सेनापती होता त्याला यजीदाने इमाम हुसेन अ. स.याना मारण्यासाठी सैन्य घेऊन लावून दिले होते पण इमाम हुसेन यांचे रूप बघून हूर पैलवान इमाम हुसेन यांच्या सैन्यात दाखल झाले पुढील रिवायत त्यांच्या बद्दलच आहे...

हूर बद्दल रिवायतकार काय लिहतात पहा...
बंधुनो ऐका जरा घरीभर हूर पैलवान बहाद्दर
दौडत घोडा वीर निघाले करबल रणावर...!!

यजीद कपटी होता ऐसा ,लबाड कोल्हा बघा जैसा,
मनी केला विचार,गाजवू सत्ता सर्वावर..१

जाणुनी काबा हूर पैलवान,करी विचार मनी बलवान
सावध करूया शाहे हुसेना,जाऊनिया सत्वर..२

ऐका हो त्याग त्यांचा महान ,राखिले हुसेनशी इमान
सांगती धोका आहे इथे ,जावे परत लवकर...३

होऊनि वीर बघा बेभान ,शत्रूशी केली ऐसी धूळधाण
भयभीत होऊन पळू लागले,शत्रू रणावर..४

शत्रूशी वीर पहा भिडला ,रक्तामध्ये न्हाऊनिया गेला
म्हणे दिलावर विजय मिळवला आपल्या मृत्यूवर...५
~दिलावर मुल्ला

इमाम हुसेन यांनी माणुसकीसाठी आपल्या प्राणाची आहुती दिली...💐
मोहरम महिनाच्या 9 दिवशी त्यांना शहीद करण्यात आले... करबला युद्धात घडलेली प्रत्येक घटना ही माणसाच्या काळजाला चिरणारी आहे..
इमाम हुसेन यांच्या परिवारातील सदस्य सोडून अन्य 72 जण शाहिद झाले..

काही त्रुटी असतील तर नक्की कळवा...
@SahilVastad @Rutuja0304 @LetsReadIndia @Sid_at_his_pace @anil010374 @santosh_shindey @NavidHMushrif @Sangharshspeaks

Share this Scrolly Tale with your friends.

A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.

Keep scrolling