🚩🙏🚩हिंदुह्रदयसम्राट,मराठी ह्रदय सम्राट,मा.श्री.बाळासाहेब ठाकरे यांच्या पवित्र स्मृतीस वंदन करून काही प्रश्न विचारायची इच्छा होते.**************🚩🚩🚩
मा.बाळासाहेबांच्या शिवसेनेला झालय तरी काय?
सुशांत राजपूत प्रकरणात अख्खी सत्ता एवढ्या ताकदीने ते प्रकरण मिटवायला राबली की त्यात
कुणाची नावे आहेत ह्या प्रश्नालाच काही अर्थ उरला नाही.कारण भलतीच घाण जगासमोर आली.सुशांतची प्रतिमा काय होती?हा विषयच गौण ठरतो.कारण आता दिशा सालीयान प्रकरण सुध्दा पुढे आलय.या हत्या की आत्महत्या हे पुढे ठरेलच.पण तुम्ही अख्खी यंत्रणा राबवलीत आत्महत्या साबित करण्यासाठी.काय मिळाल?संशय.
कट्टर शिवसैनिक,जुना शिवसैनिक,धर्मवीर दिघेसाहेबांचा शिवसैनिक सुध्दा या पोरखेळाला वैतागलाय.मा.बाळासाहेबांनी ज्या कर्माला हिजडेगीरी म्हणून जाहिरपणे संबोधले,तेच कर्मकांड तुमच्या नेत्यांनी चालवले.राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या विरोधात संघर्ष करत घडलेल्या शिवसैनिकांना त्याच पक्षाच्या
नेत्यांवर लोटांगण घालणारे नेतृत्व दिसत आहे.
छत्रपतींना अतिशय आदराच्या स्थानी माननारे शिवसैनिक महिलांच्या बाबतीत "हरामखोर"शब्द वापरणारा त्यांचाच खासदार सहन करत आहेत.किंवा सहन करावा लागतोय.अरे काय चाललय काय?
कोकणावर मा.बाळासाहेंबांचा खूप जीव.निसीःम प्रेमच.वादळाच्या प्रसंगात
तुम्ही त्यांना काय दिलत?उपहास,अवहेलना,लुटमार,आणि जीवघेणे कष्ट.अरे नाठाळांनो मा.बाळासाहेबांचा आत्मा अक्षरक्षः तळतळला असेल.
किती बोलायचे?काय काय बोलायचे?बाळासाहेब तुम्ही उभी केलेली शिवसेना आज दीडदमडीच्या लोकांसाठी तुमच्या अंगारासारख्या शिवसैनिकाची मुस्कटदाबी करत आहे.त्याला तुम्ही हिंदुत्ववाद,राष्ट्रवाद शिकवलात.आता त्यालाच शिकवल जातय की मा. बाळासाहेब सेक्युलर होते म्हणून.तुम्हाला रुचतय का बाळासाहेब?
हा कसला विजय आणि सत्ता?सगळाच सावळागोंधळ आणि बेपर्वाई.आणि घिसडघाई.माकड आणि बोक्याची खवावाटपाची तीच जुनी गोष्ट.सगळी तुमची पुण्याई,करारीपणा,जाज्वल्य हिंदुत्व सगळ विकून खाल्ल हो.सत्ता मिळवण्यासाठी.
मा.बाळासाहेब तुमच्या शिवसेनेला झालय तरी काय?...खूप दुरावत चाललीय आमच्या पासून.
अजून सद्बुद्धी द्या.अजूनही वेळ गेली नाही....बाळासाहेब आजच्या शिवसेनेला आवरा.आम्हाला जुना कट्टर हिंदु शिवसैनिक पाहिजे.अन्यायाविरुध्द दाद मागायला आम्हाला परत शिवसेना शाखेत जाऊद्या.बाळासाहेब!!!विनंती करतो.काहीतरी करा.🙏🚩🙏
अविनाश पराडकर.सिंधुदुर्ग...
लेखातले काही बदल माझे आहेत.
Share this Scrolly Tale with your friends.
A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.
