नागा करार - मुईवांची मिजास उतरवणार!
नागा करारावर सह्या होण्याचा अंतिम दिवस,३० सप्टेंबर जसजसा जवळ येत आहे तसतसे राजकीय चित्र ही स्पष्ट होत चालले आहे. थुईंगा लेंग मुईवा वेगळा नागा झेंडा आणि वेगळी नागा घटना यावर अडून बसले असले तरी यापुढे मुईवांच्या अडेलतट्टू पणाला मुळीच भीक न घालता
नागा पाॅलिटीकल ग्रुपसह अन्य नागा सामाजिक संस्था बरोबर नागा करार करायचाच असा ठाम निश्चय करून केंद्र सरकारची पावले पुढे पडत आहेत. त्यामुळेच सप्टेंबरच्या तिसर्या आठवड्यात सर्व प्रमुख नागा राजकीय आणि सामाजिक संस्थांचे नेते नवी दिल्लीत डेरेदाखल होत आहेत. मध्यस्थ आणि नागालँडचे राज्यपाल
असलेले श्री आर.एन.रवी दिल्लीत दाखल होणार आहेत.त्यामुळे घटना चक्राला वेग आला आहे. श्री आर.एन. रवी ह्यांच्याशी बोलणी करणार नाही अशी भूमिका घेतलेले थुईंगा लेंग मुईवा इंटेलिजन्स ब्युरोच्या अधिकार्यांशी स्वतंत्रपणे बोलणी करीत आहेत.थुईंगा लेंग मुईंवांच्या धमक्यांना आणि दडपणाला झुगारून
"याल तर तुमच्या सह नाहितर तुमच्या शिवाय" नागा करार होणारच अशी ठाम भूमिका केंद्र सरकारने घेतली आहे.
जर ह्या करारावर सह्या न करण्याची भूमिका एन.एस.सी.एन(आय एम) चे अध्यक्ष थुईंगा लेंग मुईवा ह्यांनी घेतली तर पुढे काय? त्यातून कोणते नवे प्रश्न पुढे उभे राहतील ह्यांचा विचार केंद्र
सरकारने नक्कीच केलेला असेल आणि त्या दृष्टीने पुढिल व्यूहरचना ही तयार ठेवली असेल ह्यात शंकाच नाही. शक्यता अशी आहे की भारतावर चहुबाजूने दबाव आणण्याच्या चीनच्या योजनेनुसार चीन थुईंगा लेंग मुईवांचा प्याद्याप्रमाणे उपयोग करेल आणि पूर्वीप्रमाणेच शस्त्रे आणि पैसा पुरवून भारताविरोधात
हिंसक संघर्ष करण्याला उद्युक्त करेल. नाहितरी मुईवा १९८०च्या दरम्यान चीनच्या पाठींब्यावरच नागालँडमध्ये हिंसक कृत्य करित होते. पण गेल्या चाळीस वर्षात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. सर्वसामान्य नागा जनता राजकीय दृष्ट्या आता सजग झाली आहे.
एक आऊटसायडर मणिपूर मधील तांखुल नागा नागालँडचे भवितव्य कसेकाय ठरवू शकतो? असा अधिकार त्याला कोणी दिला?असे उघडपणे आज "नागा" माणुस विचार करू लागला आहे. मुईवांच्या कुकृत्याचा जाहीरपणे पाढा वाचला जात आहे.तेथील वर्तमानपत्रातून मुईवाने "नागालिमचे" स्वप्न दाखवून नागांवरच कसे अत्याचार केले
ह्यावर लेखांचा रतीब घातला जात आहे. ह्या सगळ्याचा निष्कर्ष एव्हढाच की मुईवाला आता नागा समाजाच्या विरोधालाच तोंड द्यावे लागणार आहे. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे पाश्चात्यांचे भारतीय उपखंडात हितसंबंध जोपासणार्या चर्चचा, कम्युनिस्टांचा एजंट असलेल्या मुईवांना कडाडून विरोध आहे.
आणि त्यातही आता सर्वात अत्यंत महत्त्वाचे म्हणजे मुईवाला त्याच्याच भाषेत उत्तर देणरे खंबीर आणि धाडसी नेते केंद्रात सत्तेवर आहेत. विरोधात गेल्यास मुईवांच्या एन.एस.सी.एन ची गठडी वळण्यास त्यांना मुळीच वेळ लागणार नाही.
आधी म्हटल्याप्रमाणे तशी तयारी करूनच केंद्राने वाटाघाटींचे फासे टाकले असणार ह्यात शंकाच नाही.
श्री. पुरूषोत्तम रानडे
संपादक, ईशान्य वार्ता
#NagalandDiary
Share this Scrolly Tale with your friends.
A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.
