🚩jay.anant.kal🚩जय श्रीराम🙏🏻🌸🚩 Profile picture
🚩हिंदुत्व हेच सर्वस्व🚩 🙏🚩भारतरत्न🙏स्वा.वीर. श्री विनायक दामोदर सावरकर🙏🏻🌸🚩जय श्रीराम🙏🏻🚩🌸🚩🌸🚩🌸🚩🌸🚩🌸🌺🚩🙏🏻

Sep 23, 2020, 13 tweets

पबजी आणि युवाशक्ती

नमस्कार.
एक बातमी तुम्ही सर्वांनी ऐकली असेल की भारत सरकारने चीनचे ११८ अॅप बॅन केले, ज्यामध्ये पबजी अॅप देखील शामील आहे. पबजीचे सर्वात जास्त अॅक्टिव्ह युजर्स भारतात होते आणि आतापर्यंत २२००० करोडपेक्षा जास्त पैसे ह्या अॅपच्या मालकाने पबजीमधून कमावलेले आहेत.

याआधीही भारत सरकारने चीनचे ५९ अॅप बॅन केले होते, ज्यामध्ये टिकटॉक सारखा फेमस अॅप देखील शामील होता.

या बातमीवरून एक वैतागलेला पुणेकर म्हणतो, ‘अख्खा भारत चीनचे अॅप वापरतोय..! मग भारतातील पंधरा वीस कोटी आणि पुण्यातले पन्नास लाख जे सॉफ्टवेअर डेव्हलपर आहेत ते काय करताय? का यांचा

जन्म फक्त नुसता हिंजेवाडीला जाऊन वाकड ब्रिजला ट्रॅफिक जाम करायला झालाय?’ या माणसाचं बोलणं सर्वजण हसण्यावारी घेताहेत; परंतु खरंच हा विषय हसण्यावारी नेण्यासारखा आहे का? आपल्या देशात जगातील सर्वात जास्त इंजिनीअरर्स आहेत. जगातील सर्वात तरुण युवक आपल्या देशात आहेत त्यामुळे साहजिकच

सर्वात जास्त क्रिएटिव्हिटी आपल्या देशात हवी होती.परंतू तसे अजिबात दिसत नाही.आपला देश आणि आपण आपल्या पुर्वजांनी केलेल्या कामावरच आजही अभिमान बाळगण्यात धन्यता मानतो.जगात कुठेही काहिही घडले की म्हणायचे हे सर्व आमच्या पूर्वजांनी वेदांमध्ये लिहून ठेवलल आहे.इतिहासाबद्दल अभिमान जरूर

बाळगावा,तो असायलाच पाहिजे.पण आज आपण काय करतोय त्याच आत्मपरीक्षण झालच पाहिजे.या नविन जगात नुसत्या इतिहासाचा गर्व असून चालत नाही.गेल्या ४०ते ५० वर्षात आपण भारतीयांनी किती शोध लावले?ज्याचा जगावर परिणाम होईल.एकही नाही.हेच तर आपले पंतप्रधान आपल्या तरुणांना समजावत आहेत.आम्ही भलत्याच

विषयांमध्ये अडकून पडतोय.बर त्या गोष्टींच राजकारण काही उच्च विचारांनी करतोय का?तर नाही.नुसता जातीवाद,धर्मवाद बास.गलीच्छ भाषा आणि स्वार्थी विचार बास...ह्यामध्ये देशाचा विचार कुठे आहे?कट्टरते बरोबर त्याला अधुनिकतेची जोड हवीच.श्रध्देबरोबर प्रयत्नांची जोड हवीच.नेमके हिथेच आपला तरूण

मार खातो.लाँकडाऊन चा काळ ८५% पेक्षा जास्त युवकांनी टाइमपास करण्यात घालवला.स्वामी विवेकानंद, मा.एपीजे अब्दुल कलाम,स्वा.सावरकर याची चरित्र आणि विचार अंगीकारले असते तर ही वेळ नसती आली.युवक देशाची शक्ती आहे.भविष्य आहे.युवाशक्ती आपली सद्यघडीची आपली संपदा आहे.तीचा योग्य वापर झालाच

पाहिजे.ह्या सगळ्याला आपला पालकवर्ग ही जबाबदार आहेच.आपल्या महाराष्ट्रात जवळजवळ ५ कोटीपेक्षा जास्त लोकांनी ह्या टाळेबंदी मध्ये केक बनवायची रेसिपी बघितली किंवा बनवले.अजून काय काय बघितल असेल त्याची कल्पनाच न केलेली बरी.ह्यातल्या ५लाख पालकांनी सुध्दा मुलांमध्ये वेळ देऊन मुलांची

कल्पनाशक्ती वाढावी,स्किल्स डेव्हलप व्हावेत,नविन काहीतरी शिकावे यासाठी प्रयत्न केले नसतील.आपण फक्त शासनव्यवस्था,शिक्षणव्यवस्था यांना दोष देत राहिलो.आपली मुल फक्त मार्कांमध्ये अडकून पडली.देशात लाखो करोडो इंजिनिअर, साँफ्टवेअर डेव्हलपर असले तरी जगावर प्रभाव पाडू शकेल अशी

निर्माणक्षमता आपण तयार करु शकलो नाही.आणि हाच आपला खरा दोष आहे.नुसता युवादेश असून चालत नाही,तर जगाशी सामना करेल अश्या वस्तु तयार करणे,नविन टेक्नॉलॉजी तयार करणे,हे तरुणांनी करायचय.आपल्या देशाला आज अशा युवकांची जरूर आहे.पब्जी,टिकटाँक वर वेळ घालवणार्या युवकांची नाही.

जातीभेद,धर्मभेद,इतिहासातील महनीय व्यक्तिंबद्दल काहितरी अर्धवट ज्ञानाने अचरट वाद करणे.अत्यंत स्वार्थी नीच दर्जाच राजकारण करणे,ह्या सगळ्यात जीव घालण्या पेक्षा माझा देश,शहर,तालुका,गाव,पाडा कसा प्रगतीशील होईल,आत्मनिर्भर कसा होईल याकडे लक्ष द्या.समाजधुरीणांनी सुध्दा युवकांना

या गोष्टीकडे वळवले पाहिजे.तर आणि तरच स्वतःच आणि देशाच भवितव्य घडवता येईल.

संकल्पनाः प्रा.मिलींद नाईक,
ज्ञानप्रबोधिनी पुणे...
काही बदल माझे स्वतःचे आहेत.🙏🚩🙏🚩🙏

Share this Scrolly Tale with your friends.

A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.

Keep scrolling