1/5. पंतप्रधान मोदी वारंवार सांगतायत अ) ते किमान हमीभाव संपुष्टात येऊ देणार नाहीत आणि ब) २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न ते दुप्पट करतील. उत्तम. मग ही हमी देणारं ५ मुद्द्यांचं विधेयक ते का आणत नाहीत? आधीसारखा विरोध न होता ते विधेयक बिनविरोध पारित होईल.
#FarmBill2020
2/5. या विधेयकात - किमान हमीभावाची (स्वामीनाथन सूत्राप्रमाणे – ज्याचं वचन भाजपने २०१४ साली दिलंय) हमी असेल. कोणताही बडा व्यापारी, कंपनी किंवा ‘नव ग्राहक’ हमीभावाहून कमी किंमतीत शेतमाल उचलणार नाही. तसंच खरेदीची हमी असेल, जेणेकरून हमीभावाची थट्टा होणार नाही.
#FarmBill2020
3/5. आणि, हे विधेयक शेतकरी आणि शेतमजुरांवरचं कर्ज रद्द करेल. कर्जाचा बोजा असताना त्यांचं उत्पन्न २०२२ काय, २०३२ मध्येही दुप्पट होणं शक्य नाही. किमान हमीभाव व शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करणं पंतप्रधानांचं स्वतःचं वचन असताना विरोध कोण करेल?
#FarmBill2020
4/5. आधीची तीन विधेयकं बळाने रेटली तरी किमान हमीभाव आणि शेतकरी कर्ज रद्द करण्याचं हे विधेयक (दोन्ही स्वतःचीच वचनं असल्याने) पंतप्रधान मोदी स्वतःच लावून धरतील. धाकदपटशाने संसदेतली टीका-टिप्पणीही चिरडून टाकण्याची वेळच येणार नाही – कारण फारसा विरोध नसेलच.
#FarmBill2020
5/5. तसंही या सरकारने राज्याच्या अखत्यारीत असणाऱ्या कृषी विषयात ढवळाढवळ केलीये मग असं विधेयक आणायला त्यांचे हात कुणी बांधलेत? संघराज्य प्रणाली आणि राज्यांच्या अधिकारांची तमा आहे हे कारण यामागे नक्कीच नाही. तसंही यासाठी लागणारा पैसाही केवळ केंद्राकडेच आहे.
#FarmBill2020
Share this Scrolly Tale with your friends.
A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.
