Nation first🇮🇳🚩 Profile picture
राष्ट्रहित सर्वतोपरी🙏🇮🇳

Sep 27, 2020, 7 tweets

Daughters day....!
जेव्हा लोकांना प्रेग्नेंट आहे ही बातमी समजते, तेव्हा Mostly (सगळेच नाहीत) पाहिलं वाक्य असतं,"पहिला मुलगा होउदे बाई", "हे कर मुलगा होईल-ते कर मुलगा होईल" "मुलगा झाला म्हणजे सुटलीस" कीव येते ह्या लोकांची खरंच.

अजून एक जीव जन्माला पण नाही आलेला तर आतापासूनच त्याच्यावर अन्याय करत आहात. अजून किती मुलींनी स्वतःला सिद्ध करायचं? तुम्हाला भावनिक, मानसिक, शारीरिक आधार द्यायचा, नेहमी दुय्यम वागणूक सहन करायची, समाजाच्या अटी-नियम,वेळा, मानसिक गुलामगिरी, हुंडा, सासरजाच, शिवशिवनाऱ्या नजरा,

असुरक्षितता सगळ्या गोष्टी मुकाट सहन करायच्या, शिक्षण, स्पर्धा-परीक्षा,IT, राजकारण, स्पेस, आर्मी, नेव्ही, स्पोर्ट्स प्रत्येक क्षेत्रात वेळोवेळी पोरींनी स्वतःला सिद्ध केल आहे तरीही तुम्हाला मुलगाच हवा? पोरींच्या अजून किती पिढ्यानी स्वतःला सिद्ध करण्यामध्ये व्यतीथ करायच्या?

कधी बदलणार तुमचा दृष्टिकोन? कधीपर्यंत डोहाळेजेवणा वेळेस पेढा आला की जोरात ओरडायचं आणि बर्फी आली की खोटे नाटे आनंद झालेल्याचा आव आणायचा? सरकारनी अजून किती कडक नियम लागू करायचे? अजून किती प्रबोधन करायचं?

हे तेच लोक आहेत जे गाय जन्माला आली की आनंद साजरा करतात आणि बैल जन्माला आली की आता ह्याच काय करायचं🤦🏻‍♀️ ह्या विचारात पडतात. जसे गायीच्या बाबतीत वंश वाढवणारी ही मादी(गाय) असते त्याचप्रमाणे माणसांच्या बाबतीत पण वंश वाढवणारी ही स्त्री असते पुरुष नाही हे कधी लक्षात येणार तुमच्या?

माहिती नाही हे सर्व कधी थांबेल पण मी माझ्या भविष्यातील बाळाला सांगू इच्छिते, आम्हाला तुझ्या gender वरून काही एक फरक पडत नाही. एव्हाना आम्हाला विचारपण नाही शिवत की मुलगा असेल की मुलगी, इतकीच अपेक्षा आहे की तुझा उपयोग मानवी कल्याणासाठी व्हावा. देशाला आणि जगाला उपयोगी पडावेस.

We both love you😘 #SmashPatriarchy
We don't want gender equality all we want gender neutrality🙏
#GenderNuetrality
#DaughtersDay
#ProudtoBeWoman
#DaughtersAreGodGift

Share this Scrolly Tale with your friends.

A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.

Keep scrolling