Youth for Democracy Profile picture
Group of youths from all corners of Maharashtra working together to uphold & strengthen the democratic values of each & every person with Nation first as agenda

May 20, 2021, 20 tweets

Thread

लसीकरणाचा बट्ट्याबोळ - सूत्रधार पंप्र नरेंद्र मोदी

सप्टेंबर २०२० ला संयुक्त राष्ट्रांच्या परिषदेमध्ये भारत आपल्या लस निर्मिती व निर्यात क्षमतेच्या माध्यमातून ह्या संकटकाळात जगाचे लसीकरण करण्यासाठी भारत कशी मदत करेल या बाबत पंप्र मोदी यांनी भाष्य केले.

या पूर्वीच सिरम इन्स्टिटयूट इंडिया यांनी अ‍ॅस्ट्रॅजेनेका व नोवावाक्स सोबत मध्यम व कमी उत्पन्न असलेल्या देशांसाठी (यात भारताचा देखील समावेश आहे) १ अब्ज डोस प्रत्येकी देण्याचा करार केला. याचवेळी भारतातील इतर कंपन्या देशी लस निर्मिती करण्यात महत्वाच्या टप्प्यावर होत्या.

सत्ताधीशांचा उदोउदो करण्यात मश्गुल असलेल्या आपल्या चियरलिडर्स रुपी माध्यमांनी एव्हाना पंप्र यांचा व्हॅक्सिन गुरु म्हणून गवगवा करायला सुरुवात केली होती. याला जोड म्हणून की काय मोदींनी लस निर्मिती करणाऱ्या कंपन्याना भेटी देखील दिल्या.

Whatsapp ग्रुप्सवर व्यक्तीपूजेत रममाण झालेल्या अंधभक्त,दासींनीं जगाला लस देणारा भारत याचे रसभरीत वर्णनपर लेख लिहायला सुरुवात केली मात्र हे सगळं करत असताना भारत देश स्वतःच्या नागरिकांचे लसीकरण कसे करणार याबाबत माध्यमांनी सत्तेला प्रश्न विचारले नाही.

जागतिक स्तरावर आपण प्रतिनिधित्व करत असलेल्या देशाचे वजन वापरून उपलब्ध असलेल्या अनेक स्रोतांकडून जास्तीत जास्त लस आपल्या पदरात पाडून घेण्याची ही वेळ होती. अमेरिका, कॅनडा, ब्रिटन हे देश यात अग्रेसर होते.

अमेरिकेने तर आपल्या लोकसंख्येचे व हव्या असलेल्या लसीच्या डोसांचे गणित एकदम अचूक बसवले. कॅनडा,ब्रिटनने प्रति माणसी पेक्षा जास्त डोस आपल्या पदरात पाडून घेतले. GAVI ही संस्था कमी व मध्यम उत्पन्न असणाऱ्या देशांना लसीचा समान पुरवठा करण्यासाठी कटिबद्ध असलेली एक जागतिक संस्था आहे.

GAVIने covid१९च्या लसीकरणासाठी सिरम इन्स्टिटयूट इंडिया(SII)सोबत २०कोटी डोस साठीचा करार केला,ह्या कराराला अनुसरून SIIला भांडवल प्रदान केले जेणेकरून लस वितरणाच्या आवश्यक सर्व बाबी पूर्ण होऊन मंजुरी मिळेल तेव्हा भारत सरकारच्या बांधिलकी व्यतिरिक्त SII GAVI साठी लसींचा पुरवठा करू शकेल

SIIच्या कोविशील्ड आणि भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन ह्या २ लसींसोबत भारत सरकारने १६जानेवारी रोजी लसीकरण कार्यक्रम सुरु केला.यानंतर काही दिवसांतच जगाला मदत करून विश्वगुरूचे दिवास्वप्न पाहून हर्षभरित झालेल्या पंप्रनी #vaccinemaitri ची घोषणा केली.

पुढील काही महिन्यात SIIने एकूण ६.६४कोटी डोस ९५देशांना निर्यात केले. ह्या ६.६४कोटी पैकी १.९९कोटी GAVI सोबत झालेल्या करार अंतर्गत ३.५८कोटी डोसची व्यावसायिक करार अंतर्गत विक्री केली तर १.०७कोटी डोस भारत देशाच्या #vaccinemaitri मार्फत आपल्या शेजारील राष्ट्रांना,गरीब राष्ट्रांना दिले

वरील आकडेवारीत निर्यात झालेल्या लसीपैकी ८४%लस ही व्यावसायिक व GAVI सोबत झालेल्या करारापोटी होती तर उर्वरित १६% लस ही भारत सरकारच्या अनुदानावर पाठवण्यात आली,पण यात आश्चर्य म्हणजे प्रसिद्धीसाठी हपापलेल्या पंप्रनी निर्यात झालेल्या सर्व लसीचा समावेश #vaccinemaitri च्या छत्राखाली केला

भारतातून परदेशात गेलेल्या लसीची शिपमेंट मग ती सिरम च्या व्यावसायिक करारानुसार असो की भारत सरकारच्या अनुदानावर पाठवलेली असो भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने प्रत्येक शिपमेंटचा मोठा इव्हेंट साजरा करत जल्लोष केला.vaccine diplomacy बद्दल आपला देश एवढा महत्वकांक्षी होता की...

संयुक्त राष्ट्रसंघाच्या सभेमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या अधिकाऱ्यांनी अभिमानाने सांगितले की आम्ही स्वतःच्या नागरिकांना जेवढ्या लसी दिल्या आहेत त्यापेक्षा जास्त लसी आम्ही निर्यात केल्या आहेत.ज्या गोष्टीची लाज वाटायला हवी होती ती गोष्ट आपण अभिमानाने सांगत होतो... ☹️

मग आपल्या देशात विनाशकारी दुसऱ्या लाटेचा शिरकाव झाला.आपली काहीच तयारी नव्हती,आपल्या लोकसंख्येच्या २%नागरिकांचे देखील लसीकरण झालेले नव्हते,पहिल्या लाटेनंतर आपण वैद्यकीय सुविधा वाढवण्याकडे साफ दुर्लक्ष केले होते आपण चक्रव्यूहात अडकत चाललो होतो किंबहुना...

आपल्या कुटुंबप्रमुखांनी आपल्याला ह्या चक्रव्यूहात आणून सोडले होते.आता लसीकरणा बाबतीत आपली परिस्थिती काय आहे? मे महिन्याच्या सुरुवातीपर्यंत भारत सरकारने सिरमकडे २६कोटी आणि भारत बायोटेककडे ८कोटी डोसची मागणी नोंदवली आहे.लसनिर्मिती क्षमतेत रातोरात वाढ करता येत नाही असे आदर पुनावाला..

यांनी प्रसिद्धीपत्रक काढून स्पष्ट केले आहे. मे महिन्याच्या मध्यापर्यंत १७ कोटी डोस भारताच्या नागरिकांना देण्यात आलेले आहेत.आपल्या एकूण लोकसंख्येच्या १०%लोकांना एक डोस आणि ३%लोकांना २ डोस मिळालेले आहेत. या मांडणीनंतर एक गोष्ट आपल्या लक्षात आली असेलच...

एवढी मोठी लोकसंख्या असलेला आपला देश लसीकरणासाठी फक्त दोन कंपन्यावर अवलंबून राहिला,त्यांच्याकडे मागणी नोंदवताना प्रचंड दिरंगाई झाली.सरकारने ह्या कंपन्यांना लस निर्मिती क्षमतेच्या वाढीच्या यंत्रणा उभारणीसाठी वेळेत मदत केली नाही,vaccineगुरू बनण्याचा मोह कित्येक नागरिकांच्या

मृत्यूस जबाबदार आहे.ह्या सगळ्यानंतर सरकारला जाग आली आणि आताशी कुठं त्यांनी लस निर्यातीला बंदी घालत #vaccinemaitri बासनात गुंडाळली आहे.भारत सरकार आता लस निर्मिती वाढीसाठी प्रयत्न करत आहे जे की त्यांनी ५-६ महिन्यांपूर्वी करायला हवे होते. SII,भारत बायोटेक यांना वित्त पुरवठा करणे

इतर देशातील लस आयातीस परवानगी देणे ह्या गोष्टी सरकार आता करताना दिसत आहे.हे सगळं होईलही पण ही बुद्धी येण्यापूर्वी आपण वाया घालवलेला वेळ आणि त्या पाई नाहक गेलेले जीव यांचं मूल्यमापन आपण कोणत्या तराजूत करणार आहोत?याचे उत्तर तुम्हा आम्हा नागरिकांना शोधावे लागणार आहे.

इतर देशांच्या राष्ट्रप्रमुख जेव्हा आपल्या देशाचे जागतिक पटलावरील वजन वापरून जास्तीत जास्त लस स्वतःच्या राष्ट्राच्या खात्यात जमा करत होते तेव्हा आपले पंप्र मोदी vaccine guru बनण्याच्या मोहापाई आयत्या पिठावर स्वकर्तृत्वाच्या रेघोट्या मारत होते परिणामी तुमच्या माझ्या सारख्या...

..कित्येकांनी आपल्या आप्तस्वकीयांना गमावले आहे नाही त्यांना भेटता आले नाही त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या दुःखात सहभागी होता आले नाही.जीवाशी ही हुरहूर घेऊन आपल्याला उर्वरित आयुष्य जगायचे आहे हे क्लेशदायक आहे आणि याला सर्वस्वी कारणीभूत पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत.

Share this Scrolly Tale with your friends.

A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.

Keep scrolling