PIB in Maharashtra 🇮🇳 Profile picture
Zonal Office of Press Information Bureau @PIB_India, M/o Information & Broadcasting @MIB_India, Government of India, Mumbai, Maharashtra.

Jun 10, 2021, 11 tweets

उच्च शिक्षणविषयक अखिल भारतीय सर्वेक्षण अहवाल 2019-20

वरील अहवालाच्या महाराष्ट्राशी संबंधित मुद्द्यांचे खालील ट्वीट्स आहेत

अहवाल पाहा 👇
📕education.gov.in/sites/upload_f…

सकल नोंदणी गुणोत्तर, म्हणजेच पात्र वयोगटातील एकूण मुलांपैकी उच्च शिक्षणासाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचे प्रमाण, वर्ष 2019-20 मध्ये 27.1% इतके होते. वर्ष 2018-19 मध्ये ते 26.3% आणि 2014-2015 मध्ये 24.3% इतके होते, असे AISHE च्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

उच्च शिक्षणातील लैंगिक समानता निर्देशांक वर्ष 2019-20 मध्ये 1.01 होता,वर्ष 2018-19 मध्ये तो 1.00 होता.

म्हणजेच सध्या महाविद्यालयीन शिक्षण घेण्यात 100 विद्यार्थ्यांमागे, 101 विद्यार्थिनी आहेत

उच्च शिक्षण क्षेत्रात विद्यार्थिनींच्या प्रमाणात गेल्या पाच वर्षात 18.2 टक्के वाढ

AISHE 2019-20 च्या अहवालानुसार, राष्ट्रीय स्तरावरील महत्वाच्या शिक्षणसंस्थांची संस्था वर्ष 2020 मध्ये 135 पर्यंत वाढली आहे, 2015 मध्ये ती 75 इतकी होती

वर्ष 2019-20 मध्ये पीचडी अध्ययन करण्यासाठी 2.03 लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे, वर्ष 2014-15 ही संख्या 1.17 लाख इतकी होती

सध्या भारतात, 49,348 परदेशी विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र त्यापैकी बहुतांश विद्यार्थी शेजारील देशांमधील आहेत, नेपाळचे सर्वाधिक 28.1%, त्याखालोखाल अफगाणिस्तानचे 9.1%, बांग्लादेशचे 4.6% आणि भूतानचे 3.8% विद्यार्थी आहेत.

उत्तर प्रदेशात, 7788 महाविद्यालये असून प्रती एक लाख लोकसंख्येमागे 31 महाविद्यालये आहेत.

त्याचप्रमाणे महाराष्ट्र याबाबत दुसऱ्या क्रमांकावर असून, इथे 4494 महाविद्यालये आणि प्रती एक लाख लोकसंख्येमागे, 34 महाविद्यालये आहेत

विद्यार्थी पटसंख्येतील राज्यांच्या वाट्यानुसार बघायचे झाल्यास, महाराष्ट्रात विद्यापीठात विद्यार्थी नोंदणी संख्या देशात सर्वाधिक (यात विविध उपकेंद्रे आणि विभागांचाही समावेश) म्हणजेच, 9,67,034 इतकी आहे

पॉलिटेक्निक अभ्यासक्रमासाठी 14.2 लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.

महाराष्ट्रात ही संख्या 2.04 लाख विद्यार्थी इतकी असून महाराष्ट्र याबाबत देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे. 3 लाख विद्यार्थ्यांसह तामिळनाडू पहिल्या क्रमांकावर आहे.

AISHE च्या पोर्टलवर 3805 पॉलिटेक्निक्सची नोंद झाली आहे.

त्यापैकी सर्वाधिक म्हणजेच 746 पॉलिटेक्निक्स महाराष्ट्रात आहेत.

AISHE च्या पोर्टलवर अध्यापक प्रशिक्षण संस्थांची एकूण संख्या 3849 इतकी आहे, यापैकी पहिल्या पाच राज्यांत एकूण संस्थापैकी
55.4% विद्यार्थी आहेत.

पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक 37,817 विद्यार्थी आहेत

त्या खालोखाल, महाराष्ट्रात 32,620 विद्यार्थी आहेत.

Share this Scrolly Tale with your friends.

A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.

Keep scrolling