PIB in Maharashtra 🇮🇳 Profile picture
Zonal Office of Press Information Bureau @PIB_India, M/o Information & Broadcasting @MIB_India, Government of India, Mumbai, Maharashtra.

Jul 13, 2021, 17 tweets

पंतप्रधान @narendramodi यांचा #TokyoOlympics स्पर्धेत सहभागी होणाऱ्या क्रीडापटूंच्या चमूशी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद

प्रसारण-

#Cheer4India #Tokyo2020

@Anurag_Office @YASMinistry

@IndiaSports @Media_SAI

कोरोना महामारीतसुद्धा पंतप्रधानांनी खेळाडूंचे मनोबल कमी होऊ दिले नाही.

खेळाडूंसाठी विविध उपक्रम हाती घेतले, त्याचा खेळाडूंना चांगला लाभ मिळाला आहे.

देश तुमच्यासोबत आहे, पदकं जिंकून या- क्रीडा व युवा व्यवहार मंत्री @ianuragthakur

#Cheer4India #Tokyo2020

पंतप्रधान @narendramodi यांचा तिरंदाज दीपिका कुमार हिच्याशी संवाद.

देशाला पूर्ण विश्वास आहे की, तुम्ही ऑलिम्पिकमध्ये नक्कीच देशाचा गौरव वाढवणार

-पंतप्रधान

#Cheer4India #Tokyo2020

@WeAreTeamIndia

पंतप्रधान @narendramodi यांचा तिरंदाज प्रवीण जाधवशी संवाद.

अतिशय कठीण परिस्थितीतून देशाचे प्रतिनिधीत्व करत असलेल्या प्रवीण जाधवला पंतप्रधानांकडून ऑलिम्पिकसाठी शुभेच्छा.

आयुष्यात आलेल्या खडतर अनुभवातून देशाचे प्रतिनिधीत्व करण्याची प्रेरणा मिळाली- प्रवीण जाधव

#Cheer4India

महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यातील प्रवीण जाधवच्या कुटुंबियांशी पंतप्रधानांनी साधला मराठीतून संवाद.

प्रवीण जाधवच्या आई-वडिलांच्या कष्टाचे कौतुक करत प्रवीणला टोकियो ऑलिम्पिकसाठी दिल्या शुभेच्छा.

#Cheer4India #Tokyo2020

पंतप्रधान @narendramodi यांनी अ‍ॅथलिट @Neeraj_chopra1 चे दुखापतीतून सावरत #TokyoOlympics साठी तयारी केल्याबद्दल विशेष कौतुक केले.

दुखापती हा खेळाडूच्या आयुष्यात अविभाज्य भाग असल्याचे नीरज चोप्राने सांगितले.

#Cheer4India #Tokyo2020

खेळाचा वारसा लाभलेल्या कुटुंबातून आलेल्या #AshishKumar ला बॉक्सिंगच्या आवडीविषयी पंतप्रधानांनी विचारले.

अशिषने कोरोना विरोधात दिलेला लढा आणि या कठीण काळामध्ये वडिलांना गमावण्याचे दुःख पचवून देखील आपली तयारी चालू ठेवण्याच्या जिद्दीचे पंतप्रधानांनी कौतुक केले.

#Cheer4India

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धावपटू द्युती चंद हिला #TokyoOlympics मध्ये पदकासाठी दिल्या शुभेच्छा.

#Cheer4India #Tokyo2020

#Cheer4India #Tokyo2020

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बॅडमिंटनपटू @Pvsindhu1 साधला संवाद.

अतिशय मेहनतीने सराव करत असलेल्या पी.व्ही. सिंधुला पंतप्रधानांनी #TokyoOlympics मध्ये पदक जिंकण्यासाठी शुभेच्छा दिल्या.

@ianuragthakur @NisithPramanik

@KirenRijiju @BAI_Media

#Cheer4India #Tokyo2020

बॉक्सर @MangteC हिच्याशी पंतप्रधान @narendramodi यांनी संवाद साधला

#TokyoOlympics साठी दिल्या शुभेच्छा

मोहम्मद अली यांच्यापासून बॉक्सिंगची प्रेरणा मिळाल्याचे मेरी कोम यांनी सांगितले

@NisithPramanik @KirenRijiju
@BFI_official

सध्याच्या दिवसात #Cheer4Indiaची अनेक चित्रे मी पाहिली आहेत

समाज माध्यमांपासून देशाच्या विविध कानाकोपऱ्यांपर्यंत देश तुमच्या पाठिशी उभा ठाकला आहे

135 कोटी भारतीयांच्या या शुभेच्छा खेळाच्या मैदानात उतरण्यापूर्वी तुम्हा सर्वांसाठी देशाचा आशीर्वाद आहेत

- पंतप्रधान @narendramodi

तुमच्या सोबत देशभरातील भावना जुळलेल्या आहेत आणि ज्यावेळी तुम्हा सर्वांना एकत्र पाहात आहे, तेव्हा मला तुमच्यात काही साम्य दिसत आहे, हे साम्य आहे - साहस, आत्मविश्वास आणि सकारात्मकता

- पंतप्रधान @narendramodi

#Cheer4India #Tokyo2020

@Anurag_Office @YASMinistry

खेळाडूंना उत्तम प्रशिक्षण शिबिरे मिळावीत, चांगली साधने मिळावीत म्हणून आम्ही प्रयत्न केले, खेळाडूंना जास्तीत जास्त आंतरराष्ट्रीय वातावरणाचा अनुभव देखील दिला जात आहे. खेळांशी संबंधित संघटनांनी तुम्ही केलेल्या सूचनांचा प्राधान्याने विचार केल्यामुळेच कमी काळात बदल होऊ शकले- पंतप्रधान

तुमच्यामध्ये एक सामाईक बाब आहे- शिस्त, समर्पण आणि निर्धार

तुमच्यामध्ये बांधिलकी देखील आहे, स्पर्धात्मकता देखील आहे

हीच गुणवैशिष्ट्ये न्यू इंडियाची देखील आहेत

म्हणूनच तुम्ही सर्व न्यू इंडियाचे प्रतिबिंब आहात, देशाच्या भवितव्याचे प्रतीक आहात

- पंतप्रधान

#Cheer4India

देश कशा प्रकारे नव्या विचाराने नव्या दृष्टीकोनाने आपल्या खेळाडूच्या पाठिशी आहे, याचे तुम्ही साक्षीदार आहात

तुम्ही मोकळेपणाने खेळू शकाल, आपल्या पूर्ण ताकदीनिशी खेळू शकाल, आपल्या खेळाला, तंत्राला आणखी चांगले करू शकाल, याला प्राधान्य देण्यात आले आहे

- पंतप्रधान

#Cheer4India

पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात खेळाडू ऑलिंपिकसाठी पात्र ठरले आहेत

पहिल्यांदाच इतक्या मोठ्या संख्येने भारतीय खेळाडू सहभागी होत आहेत

असे अनेक खेळ आहेत ज्यामध्ये भारत पहिल्यांदाच पात्र ठरला आहे.

- पंतप्रधान @narendramodi

#Cheer4India #Tokyo2020

@threader_app Unroll

Share this Scrolly Tale with your friends.

A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.

Keep scrolling