पंतप्रधान @narendramodi मन की बात कार्यक्रमाद्वारे थोड्याच वेळेत जनतेशी संवाद साधतील
@mannkibaat
11 वाजता लाईव्ह पहा 📹
#TokyoOlympics मध्ये भारतीय खेळाडूंना तिरंगा घेऊन चालतांना बघून केवळ मीच नाही, तर संपूर्ण देश रोमांचित झाला होता. त्याक्षणी, संपूर्ण देशाने जणू एकत्र येत, आपल्या या योद्ध्यांना म्हटले -
विजयी भव ! विजयी भव ! - @narendramodi @mannkibaat
चला, आपण सगळे मिळून आपल्या या सर्व खेळाडूंना शुभेच्छा देऊया, त्यांचा उत्साह वाढवूया. सोशल मीडियावर देखील ऑलिंपिक खेळाडूंना पाठिंबा देण्यासाठी आता #HumaraVictoryPunch कॅम्पेन सुरु झाले आहे. - @narendramodi @mannkibaat #TokyoOlympics #Cheer4India
26 जुलै रोजी, ‘कारगिल विजय दिवस’ही आहे. कारगिलचे युद्ध भारतीय सैन्याच्या शौर्य आणि संयमाचे असे प्रतीक आहे, जे संपूर्ण जगाने पहिले आहे. यावर्षी हा गौरवास्पद दिवस देखील अमृत महोत्सवाच्या दरम्यान साजरा केला जाणार आहे- @narendramodi @mannkibaat @DefenceMinIndia
सात ऑगस्ट रोजी येणारा ‘राष्ट्रीय हातमाग दिवस’ आपल्यासाठी अशी एक संधी आहे ज्यावेळी आपण प्रयत्नपूर्वक हे काम करु शकतो. राष्ट्रीय हातमाग दिनामागेही खूप मोठी ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे.याच दिवशी, 1905 साली स्वदेशी आंदोलनाची सुरुवात झाली होती- @narendramodi @mannkibaat #TokyoOlympics
खादीची खरेदी करणे एकप्रकारे लोकसेवाही आहे आणि देशसेवाही आहे. माझी आपल्याला आग्रही विनंती आहे, की आपण सर्व, माझे प्रिय बंधू-भगिनी, ग्रामीण भागात तयार होणाऱ्या हातमागाच्या वस्तू जरूर खरेदी करा. आणि त्या वस्तू #MyHandloomMyPride वर शेयर करा- @narendramodi @mannkibaat
मला संदेश आणि सूचना पाठवणाऱ्या लोकांमध्ये ~75% लोक 35 वर्षांपेक्षा कमी वयाचे आहेत. म्हणजेच, भारताच्या युवा शक्तिच्या सूचना @mannkibaat ला दिशा देत आहेत. मी हा खूप चांगला संकेत आहे, असे मानतो. ‘मन की बात’ हे एक असे माध्यम आहे, जिथे सकारात्मकता आहे, संवेदनशीलता आहे. - @narendramodi
क्वीन केटेवान जॉर्जियाच्या राज परिवारातील मुलगी होती. दहा वर्षांच्या तुरुंगवासानंतर १६२४ मध्ये ती शहीद झाली होती. एका प्राचीन पोर्तुगाल दस्तावेनुसार सेंट क्वीन केटेवानच्या अस्थी जुन्या गोव्याच्या सेंट ऑगस्टीन कॉन्व्हेंट मध्ये ठेवण्यात आल्या होत्या. - @narendramodi 1/3
मात्र दीर्घकाळ असे मानले जात होते की गोव्यामध्ये दफन करण्यात आलेले तिचे अवशेष 1930 च्या भूकंपात गायब झाले होते
भारत सरकार आणि जॉर्जियाचे संशोधक आणि जॉर्जियन चर्चच्या अनेक दशकांच्या अथक प्रयत्नानंतर 2005 मध्ये ते पवित्र अवशेष शोधण्यात यश मिळाले होते. - @narendramodi 2/3
भारत आणि जॉर्जियाचा सामायिक इतिहासातील या बाबी जपून ठेवल्याबद्दल मी आज गोव्याच्या जनतेचे मनः पूर्वक आभार मानतो. गोवा अनेक महान आध्यात्मिक वारसांची भूमी आहे. सेंट ऑगस्टीन चर्च युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ (गोव्याचे चर्चेस आणि कॉन्व्हेंट )चा एक भाग आहे - @narendramodi 3/3
पाण्याचा एक एक थेंब वाचवणे. आपल्या संस्कारांचा एक भाग बनला आहे. पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवणे आणि पाणी कुठल्याही प्रकारे वाया जाणार नाही याची काळजी घेणे हा आपल्या जीवनशैलीचा एक सहज भाग असायला हवा- @narendramodi
@mannkibaat
Share this Scrolly Tale with your friends.
A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.