केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शाह यांच्या हस्ते आज गोव्यात धारबांदोडा इथे राष्ट्रीय न्यायवैद्यक शास्त्र विद्यापीठाच्या तिसऱ्या परिसराचा कोनशिला समारंभ
📕 pib.gov.in/PressReleasePa…
गोव्याच्या नागरिकांनी स्वातंत्र्यासाठी कठोर संघर्ष केला, अनेकांनी गोवामुक्तीसाठी हौतात्म्य पत्करले आणि या बलिदानामुळेच स्वतंत्र गोवा आज भारताचा भाग - @AmitShah
गोवा मुक्ती संग्रामासाठी संघर्ष करणाऱ्या सर्व स्वातंत्र्यसैनिकांना विनम्र श्रद्धांजली- अमित शाह
यावेळी अमित शाह यांनी गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि माजी संरक्षण मंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांचे स्मरण केले.
"पर्रीकर यांनी गोव्याचे मुख्यमंत्री म्हणून, या प्रदेशाचा कायापालट करण्याची सुरुवात केली": @AmitShah
संरक्षण मंत्री म्हणून मनोहर पर्रीकर यांनी दोन खूप महत्वाची कामे केलीत, ज्यासाठी देश कायम त्यांचे स्मरण ठेवेल, त्यापैकी एक म्हणजे, देशातल्या तिन्ही सैन्य दलांच्या सेवानिवृत्त सैनिकांसाठी ‘वन रँक, वन पेन्शन’ व्यवस्था - @AmitShah
दुसरे म्हणजे जेव्हा काश्मीरच्या पुंछमध्ये दहशतवादी हल्ला झाला आणि आपले जवान हुतात्मा झाले, तेव्हा संरक्षण मंत्री श्री मनोहर पर्रीकर यांच्या नेतृत्वाखाली प्रथमच सर्जिकल स्ट्राईक करून भारताने जगाला संदेश दिला की, भारताच्या सीमेवर छेडछाड करणे इतके सोपे नाही -@AmitShah
Share this Scrolly Tale with your friends.
A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.