पंतप्रधान @narendramodi यांच्या हस्ते आज 7 नव्या संरक्षण उत्पादन कंपन्या देशाप्रती समर्पत करण्यात येणार.
प्रसारण - 12:10 वाजेपासून
📹
@DefPROMumbai| @DefenceMinIndia| @airnews_mumbai| @DDSahyadri
आज माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. A. P. J. अब्दुल कलाम जी यांची जयंती आहे.
कलाम साहेबांनी ज्यापद्धतीने आपले आयुष्य सामर्थ्यशाली भारताच्या निर्माणासाठी समर्पित केले, ते प्रेरणादायी आहे: पंतप्रधान @narendramodi
41 आयुध निर्माण कारखान्यांना नवे रुप देण्याचा निर्णय, 7 नव्या कंपन्यांची सुरुवात, देशाच्या याच संकल्पयात्रेचा भाग आहे.
हा निर्णय गेली 15-20 वर्षे प्रलंबित होता.
मला पूर्ण विश्वास आहे की, या सर्व सात कंपन्या आगामी काळात भारतीय सैन्याची मोठी ताकद ठरतील: पंतप्रधान @narendramodi
जागतिक महायुद्धावेळी भारताच्या आयुध कारखान्यांची ताकद जगाने पाहिली आहे
आपल्याकडे उत्तम संसाधने होती, जागतिक दर्जाचे कौशल्य होते
स्वातंत्र्यानंतर या कारखान्यांना अद्ययावत करण्याची, नवे तंत्रज्ञान आत्मसात करण्याची आवश्यकता होती!
मात्र, याकडे लक्ष दिले नाही: पंतप्रधान
आत्मनिर्भर भारत अभियानांतर्गत संपूर्ण देशाचे लक्ष्य जगातील सर्वात मोठी सैन्य ताकद बनवण्याचे आहे, भारतात आधुनिक सैन्य विकासाचे आहे.
गेल्या सात वर्षांत देशाने ‘मेक इन इंडिया’ च्या मंत्रासह हा संकल्प पुढे नेण्याचे काम केले आहे: पंतप्रधान @narendramodi
आज देशाच्या संरक्षण क्षेत्रात जेवढी पारदर्शकता, विश्वास आणि तंत्रज्ञानाचा वापर आहे, तो पूर्वी कधी नव्हता.
स्वातंत्र्यानंतर प्रथमच संरक्षण क्षेत्रात व्यापक सुधारणा होत आहेत. एकल खिडकी प्रणालीची व्यवस्था केली आहे: पंतप्रधान @narendramodi
काही वेळापूर्वीच संरक्षणमंत्रालयाने अशा 100 पेक्षा अधिक सामरिक उपकरणांची यादी जाहीर केली, ज्यांची आता आयात करावी लागणार नाही.
नव्या कंपन्यांसाठी देशाने आतापासूनच 65 हजार कोटी रुपयांची ऑर्डर दिली आहे
यातून संरक्षण उद्योगांवर असलेला देशाचा विश्वास दिसून येतो.
मी देशातील स्टार्टअप्सना सांगतो की, या 7 कंपन्यांच्या माध्यमातून देशाने नवी सुरुवात केली आहे, तुम्हीसुद्धा यात सहभाग घ्या;
तुमचे संशोधन, तुमचे उत्पादन कशाप्रकारे या कंपन्यांसमवेत एकमेकांना लाभदायक ठरेल यावर विचार केला पाहिजे: पंतप्रधान
@narendramodi
विजया दशमीच्या शुभमुहूर्तावर 7 नव्या संरक्षण कंपन्यांच्या लोकार्पण समारंभातील पंतप्रधानांनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून केले संबोधित
“या सात कंपन्यांच्या निर्मितीमुळे डॉ कलाम यांच्या सक्षम भारताच्या स्वप्नाला पाठबळ मिळेल”
📙pib.gov.in/PressReleseDet…
Share this Scrolly Tale with your friends.
A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.