PIB in Maharashtra 🇮🇳 Profile picture
Zonal Office of Press Information Bureau @PIB_India, M/o Information & Broadcasting @MIB_India, Government of India, Mumbai, Maharashtra.

Feb 11, 2022, 17 tweets

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते राजभवन, मुंबई येथील नवीन दरबार हॉलचे आज उद्घाटन.

थेट प्रसारण, सकाळी 11 वाजेपासून

📹

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते राजभवन, मुंबई येथील नवीन दरबार हॉलचे आज उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि इतर मान्यवरांची उपस्थिती होती.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते राजभवन, मुंबई येथील नवीन दरबार हॉलचे आज उद्घाटन करण्यात आले.

राजभवनातील नवीन दरबार हॉल हा जुन्या दरबार हॉलच्या जागेवरच बांधण्यात आला असून त्याची आसन क्षमता 750 इतकी आहे. जुन्या हॉलची आसन क्षमता 225 इतकी होती.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते राजभवन, मुंबई येथील नवीन दरबार हॉलचे आज उद्घाटन करण्यात आले.

उद्घाटन सोहळ्याप्रसंगी दीपप्रज्वलन करताना राष्ट्रपती रामनाथ कोविंद.

राजभवनात ऐतिहासिक बंकर आहे. या बंकरमधून महाराष्ट्रातील क्रांतीकारांची छायाचित्रांच्या माध्यमातून माहिती देणार. यामुळे आगामी पिढ्यांना प्रेरणा मिळेल. लवकरच या कामाला सुरुवात करणार-राज्यपाल भगत सिंग कोश्यारी

राजभवनातील दरबार हॉल राजा पंचम जॉर्ज यांच्या भारत भेटीवेळी बांधण्यात आला होता. तर, नवीन दरबाल हॉलचे उद्घाटन देशाच्या 'स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी' वर्षात होत आहे.

मुंबई राजभवनातील नवीन दरबाल हॉलच्या उद्घाटनाप्रसंगी मी राज्याची जनता आणि सरकारचे अभिनंदन करतो.

महाराष्ट्राची जनता आणि या भूमीचे नक्कीच खास वैशिष्ट्ये जे मला वारंवार याठिकाणी खेचून आणते. गेल्या साडेचार वर्षात मी 12 वेळा महाराष्ट्रात आलो आहे-राष्ट्रपती रामनाथ कोविंद

जर महाराष्ट्राच्या जनतेला राज्याच्या नावाची उत्पत्ती किंवा अर्थ विचारला तर भाषाशास्त्र किंवा इतिहासाच्या संदर्भाची आवश्यकता नाही.

थेट तुमच्या ह्रदयातून उत्तर द्याल. आमचा महाराष्ट्र म्हणजेच भारतातील एक महान राज्य-राष्ट्रपती रामनाथ कोविंद

छत्रपती शिवाजी महाराज, संत एकनाथ, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, महात्मा ज्योतीबा फुले, बाळ गंगाधर टिळक, गोपाळ कृष्ण गोखले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि डॉ. केशव बळीराम हेडगेवार यासारख्या अनेक महान व्यक्तींमध्ये राज्याच्या महानतेचा विशाल प्रवाह दिसून येतो-राष्ट्रपती

महाराष्ट्र अध्यात्मिक भूमी आहे तसेच अन्यायाविरुद्ध शौर्याने लढणारी आहे. देशभक्तांची भूमी आहे तसेच भागवत भक्तांची भूमी आहे.

महाराष्ट्र राज्य देशाचे प्रमुख आर्थिक आणि सांस्कृतिक केंद्र आहे- राष्ट्रपती रामनाथ कोविंद

अजिंठा-वेरुळ लेण्यांतील कला असेल वा पश्चिम घाटाचे नैसर्गिक सौंदर्य. महाराष्ट्राला प्रतिभा आणि निसर्गाचे वरदान लाभले आहे. येथील आदरातिथ्य प्रसिद्ध आहे.

यामुळे केवळ मलाच नाही तर देश-विदेशातील असंख्य लोकांना पुन्हा-पुन्हा महाराष्ट्रात यावे वाटते-राष्ट्रपती

यावेळच्या दौऱ्यात माझ्या मनात शून्यतेची भावना निर्माण झाली आहे. गेल्या आठवड्यात आपल्या प्रिय लता दीदी यांचे निधन झाले. त्यांच्यासारखी महान प्रतिभा शतकात एकदाच जन्म घेत असते.

लतादिदींचे निधन माझ्यासाठी वैयक्तिक नूकसान आहे-राष्ट्रपती

देशाच्या स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षात साजऱ्या करण्यात येणाऱ्या 'स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात' या राजभवनाच्या नूतन दरबार हॉलचे उद्घाटन करताना मला आनंद होत आहे-राष्ट्रपती रामनाथ कोविंद

दरबार हॉल हे आयताकृती सभागृह 1911 साली बांधण्यात आले होते.

इंग्लंडचे महाराजे पंचम जॉर्ज व राणी मेरी यांच्या 1911 साली झालेल्या भारत भेटीच्या वेळी दरबार हॉल बांधण्यात आला होता. त्याची वास्तू रचना तत्कालीन वास्तुरचनाकार जॉर्ज विटेट यांची होती.

नव्या दरबार हॉलचे बांधकाम 2019 साली सुरु झाले. मात्र कोविडच्या उद्रेकामुळे बांधकामाची गती मंदावली कालांतराने बांधकाम पुनश्च सुरु झाले व डिसेंबर 2021 मध्ये हॉल बांधून पूर्ण झाला.

राजभवनातील नवीन दरबार हॉल हा जुन्या दरबार हॉलच्या जागेवरच बांधण्यात आला असून त्याची आसन क्षमता 750 इतकी आहे. जुन्या हॉलची आसन क्षमता 225 इतकी होती.

जुन्या दरबार हॉलची हेरिटेज वैशिष्ट्ये कायम ठेवताना नव्या सभागृहाला बाल्कनी तसेच समुद्र दर्शन घडविणारी गॅलरी ही अतिरिक्त वैशिष्ट्ये देण्यात आली आहे.

Share this Scrolly Tale with your friends.

A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.

Keep scrolling