PIB in Maharashtra 🇮🇳 Profile picture
Zonal Office of Press Information Bureau @PIB_India, M/o Information & Broadcasting @MIB_India, Government of India, Mumbai, Maharashtra.

Feb 18, 2022, 12 tweets

📡थेट प्रसारण 4:30 वाजेपासून📡

पंतप्रधान @narendramodi यांच्या हस्ते ठाणे आणि दिवा दरम्यान दोन अतिरिक्त रेल्वे मार्गांचे लोकार्पण

दोन रेल्वे मार्गांच्या निर्मितीसाठी सुमारे ₹620 कोटी खर्च

📒

@Central_Railway

रेल्वे पायाभूत सुविधांच्या प्रगतीमुळे वाढणार मुंबई लोकलची गती

ठाणे-दिवा दरम्यान 6 प्लॅटफार्म, 8 एफओबी, 1.4 किमी लांब रेल्वे उड्डाणपूल, 3 मोठे पूल, 21 लहान पूल आणि 170 मी. लांब बोगदा निर्माण करण्यात आला आहे. यामुळे उपनगरीय रेल्वे वाहतूकीला वेग येईल.

@Central_Railway

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली रेल्वेसह सर्व पायाभूत क्षेत्रांचा विकास जोमाने होत आहे.

पूर्णपणे स्वदेशी संकल्पनेतून निर्मित 'वंदे भारत' रेल्वेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. लवकरच आम्ही वंदे भारत जगाला निर्यात करु- रेल्वेमंत्री @AshwiniVaishnaw

@Central_Railway

पंतप्रधान @narendramodi यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून ठाणे आणि दिवा दरम्यान दोन अतिरिक्त रेल्वे मार्गांचे लोकार्पण करण्यात आले.

कुर्ला-लोकमान्य टिळक टर्मिनस आणि कल्याण दरम्यान आता सहा रेल्वे मार्गांवर वाहतूक

@Central_Railway

छत्रपती शिवाजी महाराज यांची उद्या जयंती आहे.

सर्वप्रथम मी भारताचे गौरव, भारताची ओळख आणि संस्कृती रक्षक, देशाचे महानायक शिवरायांच्या चरणी वंदन करतो: पंतप्रधान @narendramodi

ठाणे-दिवा दरम्यान 5 वी आणि 6 व्या रेल्वे मार्गाच्या शुभारंभाप्रसंगी मुंबईकरांना शुभेच्छा

नव्या रेल्वे मार्गामुळे, मुंबईकरांच्या आयुष्यात मोठे परिवर्तन घडेल, त्यांचे जीवन सुखकर होईल

नवा रेल्वेमार्ग, मुंबईच्या कधी न थांबणाऱ्या आयुष्याला आणखी गती देईल: पंतप्रधान @narendramodi

आजपासून @Central_Railway मार्गावर 36 नवीन लोकल रेल्वे धावणार आहेत

यातील बहुतांश रेल्वे AC आहेत

लोकल सुविधेचा विस्तार, लोकल सेवेला आधुनिक करणे केंद्र सरकारच्या वचनबद्धतेचा भाग आहे: पंतप्रधान @narendramodi

मुंबई महानगराचे स्वतंत्र भारताच्या प्रगतीत मोठे योगदान आहे

आता आमचा प्रयत्न आहे की, आत्मनिर्भर भारत निर्मितीतही मुंबईचे सामर्थ्य अनेक पटीने वाढवण्याचा आहे.

म्हणून मुंबईसाठी 21 व्या शतकातील पायाभूत सुविधा देण्यावर आमचा भर आहे: पंतप्रधान @narendramodi

अहमदाबाद-मुंबई हायस्पीड रेल्वे आज मुंबईसाठी, देशासाठी आवश्यक आहे.

यामुळे मुंबईची 'स्वप्नांचे शहर' अशी असलेली ओळख आणखी मजबूत होईल,

हा प्रकल्प लवकर पूर्ण व्हावा, याला आम्हा सर्वांचे प्राधान्य आहे: पंतप्रधान @narendramodi

पूर्वी पायाभूत सुविधा प्रकल्प वर्षानुर्षे पूर्ण होत नसत, नियोजनापासून अंमलबजावणीपर्यंत समन्वय नव्हता

हा दृष्टीकोन बाळगून 21 व्या शतकातील इंफ्रास्ट्रक्चर निर्मिती शक्य नाही

म्हणून आम्ही #PMGatiShakti राष्ट्रीय मास्टरप्लान तयार केला आहे-पंतप्रधान @narendramodi

गांधीनगर & भोपाळची रेल्वे स्थानके रेल्वेची नवी ओळख निर्माण करत आहेत

6000 पेक्षा अधिक रेल्वे स्थानकांवर WiFi सुविधा आहे

'वंदे भारत' रेल्वेला गती आणि आधुनिक सुविधा प्रदान करत आहे

आगामी काळात 400 नव्या वंदे भारत रेल्वे देशवासियांच्या सेवेत येतील: पंतप्रधान @narendramodi

कुर्ला,लोकमान्य टिळक टर्मिनस/ कल्याण दरम्यानच्या 6 मार्गिकांचा प्रभावी उपयोग

उपनगरीय & लांब पल्ल्याच्या रेल्वे वेगवेगळ्या मार्गांवर धावतील

नवीन सेवांमुळे प्रवाशांना सुविधा

कळवा आणि मुंब्रा दरम्यान देखभालीसाठी ब्लॉक दरम्यानही उपनगरीय सेवा सुरु राहिल

twitter.com/i/broadcasts/1…

Share this Scrolly Tale with your friends.

A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.

Keep scrolling