#विधवा_प्रथा_बंदी
काही ठिकाणी #विधवा_प्रथा बंद करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांनी ठराव केले. ते पाहून #महाराष्ट्र शासनानं परिपत्रक काढलंय. शासकीय परिपत्रकात वैज्ञानिक दृष्टिकोन वगैरे सांगितलं आहे, पण सध्या "नाव बदलायला कशाला पाहिजे #संभाजीनगर च आहे ते, मी सांगतोय ना!"
असा शासनाचा #वैज्ञानिक #दृष्टिकोन आहे. हे सगळं पाहून मला काही प्रश्न पडले. आपल्या परिचित लोकांमध्ये कुणीही विधवा स्त्रीचा #विधवा म्हणून अपमान केला आहे काय किंवा ऐकिवात आहे काय? माझ्यातरी माहितीत असं प्रकरण अजूनतरी नाही. उलट वयस्कर विधवा स्त्रियांकडं आपला समाज आदरानंच पाहतो.
आता तरुण वयात विधवा होणाऱ्या स्त्रियांबद्दल. मुळात आजकाल लग्न करणाऱ्या किती मुली #मंगळसूत्र घालतात, #कुंकू लावतात, #बांगड्या घालतात? अश्या घटनांमुळं विवाहित स्त्रियांनी कुंकू लावावे की नको हा वैचारिक #गोंधळ जन्माला घातला आहे. म्हणजे एकीकडे न घालणे म्हणजे पुरोगामीत्व
आणि आता विधवेनं घालावं हेही #पुरोगामीत्व. 🤔 मोजकी खेडी सोडली तर बाकी सर्व ठिकाणी विधवांना सन्मान मिळतोच, फक्त #हळदीकुंकू वगैरे किंवा मंगल कार्यात मध्ये बोलवलं जात नाही. कारण कुंकू लावणं ही नवऱ्याची #आठवण असते, त्यामुळं दुःख होऊ नये असं अपेक्षित असावं. कुंकू, चुडा, मंगळसूत्र
या गोष्टी सौभाग्याचं #प्रतीक आहेत आणि लग्नातच त्या गोष्टी स्त्रीच्या वेषभूषेत समाविष्ट होतात. विधवा पुनर्विवाहाला बहुतेक मूळ धर्मशास्त्रात (कदाचित #मनुस्मृती मध्ये) संमती आहे. जाणकार लोक यावर बोलू शकतात. #शहाजीराजे गेल्यानंतर #जिजाऊ सती जाण्याच्या मनस्थितीत होत्या, पण छत्रपतींनी
त्यांना जाऊ दिलं नाही, अस ऐकलं आहे. त्यामुळं हा फार वैयक्तिक आणि कौटुंबिक जिव्हाळ्याचा मुद्दा आहे. कुठल्याही प्रथेमुळं कुणाचंही मानसिक खच्चीकरण होऊ नये इतकं समजलं तरी बरं. शासनानं परिपत्रक काढलं, आता #सुसू ताई लोकसभेत याची मागणी करून पुरोगामीत्वचे #ढोल वाजवणार आहेत. ते सर्वांनी
ऐकावे ही विनंती. तरीही काही प्रश्न माझ्या मनात अजूनही आहेत: #मांड्या आणि #छाती दाखवत फिरणाऱ्या आधुनिक स्त्रियांनी नेमकं विधवा प्रथे संबंधात काय करावं? म्हणजे सध्या प्रथा पाळणाऱ्यानी कुंकू वगैरे तसंच ठेवावं. तसं आततायी आधुनिक स्त्रियांनी #ब्रेकअप पार्टी सारखी डेथ पार्टी वगैरे ठेऊन
#आनंदोत्सव साजरा करावा का? कारण बांगड्या तोडणे हा दुःख व्यक्त करायचा प्रकार आहे.
२) तसंच इंद्राणी मुखर्जी सारख्या तीन लग्न झालेल्या बाईनं नेमकं कुणाची #जोडवी ठेवावीत की काढावीत हेही समजलं नाही.
🤔🤔🤔
Share this Scrolly Tale with your friends.
A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.
