Shekhar📖शेखर Profile picture
गप्पा पुस्तकांच्या आणि जगण्याच्या📚👨‍🔬! पुस्तकप्रेमी📚! निसर्गप्रेमी🍃! 50% child. 50% old soul ! माझा ब्लॉग - https://t.co/UkQnDag5qJ !

Aug 27, 2022, 10 tweets

प्रतिथयश लेखक त्याच्या सर्वोत्तम लिखाणानंतर काही लिहिताना तो त्याचं यश, अहंभाव, भीती कशी हाताळतो?

आणि त्यातून आपण काही शिकू शकतो का? ह्या विषयावर 'ईट, प्रे, लव्ह' ह्या पुस्तकाची लेखिका एलिझाबेथ गिल्बर्टने "यश, अपयश आणि नवनिर्मितीची प्रेरणा" हे TED Talk दिले आहे.
#TedTalk_मराठी

एलिजाबेथचे 'ईट प्रे लव्ह' हे पुस्तक न्यूयॉर्क टाईम्सच्या सर्वोत्तम पुस्तकांपैकी एक आहे, त्याच नावाने सिनेमा पण आलेला आहे.

एवढ्या प्रसिद्धी नंतर, लोकांना आवडलेल्या पुस्तकानंतर आपण दुसरे कोणतेही पुस्तक लिहिले तर ते लोकांना आवडणार नाही, कारण ते तिच्या पहिल्या पुस्तकांसारखे नसणार!👇

तर मग आता वाचकांची मने जिंकणे जवळपास अशक्य आहे असे समजून गावाकडे पाळीव प्राण्यांसोबत उर्वरित आयुष्य घालवावे असा तिने विचार केला.

..पण जर सगळ्यात जास्त आवडणारी गोष्ट म्हणजे लिहिणं सोडून दिलं तर आपण आपलं स्वत्व, किंवा आयुष्यातला राम सोडून दिला असेच होईल हे तिला मनोमन जाणवले!👇

मग आता लोकांना आवडेल की नाही, हा विचार बाजूला ठेवून पुन्हा एकदा तिचा आत्मविश्वास आणि प्रेरणा परत मिळवायची असं एलिजाबेथने ठरवले.

आपली लिहिण्याची प्रेरणा आणि त्याच यश हे त्याच्या व्यक्त होण्यातच आहे हे ठरवून पुढचा प्रवास सुरु झाला. प्रेरणा मिळाली ती पण एकदम अनपेक्षित ठिकाणी!👇

सर्जनशीलता (क्रिएटिव्हिटी) स्वतःच्या अपयशातून कशी टिकून राहू शकते याबद्दल तिने जीवनात पूर्वी शिकलेल्या धड्यांमध्ये तिला ती प्रेरणा मिळाली! तिचं एकच ध्येय होतं ते म्हणजे 'लेखक व्हायचं' आणि त्यासाठी ती बालपणापासून काही ना काही लिहीत होती..👇

कॉलेज संपल्यावर, वेटर म्हणून काम करत असताना पण ती लिहीत राहिली, काहीतरी छापून यावं म्हणून खूप प्रयत्न करत राहिली आणि त्यात सलग सहा वर्षे अपयश आले

- कोणीच तिचे लिखाण छापले नाही. त्यामुळे जवळजवळ सहा वर्षे, प्रत्येक दिवशी, तिच्याकडे फक्त नकार देणारी पत्रच येत होती..👇

आता ह्या अयशस्वी आणि यशस्वी अशा दोन्ही प्रकारच्या जगण्यात एक साम्य आहे - तुमचं तुमच्या ध्येयापासून दूर जाणं, तुमचं स्वत्व हरवणं. तर मग ह्यापासून पुन्हा तुमच्या मूळ स्वभावाकडे, ध्येयाकडे येणं म्हणजे तुमच्या घरी परत येणं.👇

तुमचं घर म्हणजे तुमचं उद्दिष्ट/ध्येय जे तुम्हाला स्वतःपेक्षा जास्त आवडतं!

मग ते तुमचं लेखक होणं, चांगला इंजिनीअर होणं, कलाकार किंवा सृजनशील व्यक्ती असणं, तुमचं रुग्णांच सेवा करणं, गाणं गाणं, एक उत्तम प्रशासकीय अधिकारी असणं किंवा समाजसेवा करणं ह्या पैकी काहीही असू शकतं!👇

एलिजाबेथच्या बोलण्यातून मला तर बऱ्याच गोष्टींचा उलगडा झाला -  एक म्हणजे की मेधा पाटकर किंवा तुकाराम मुंढे सारखे अधिकारी हे हार न मानता एवढ्या कठीण, अपयशी परिस्थितीमध्ये सुद्धा कसे लढत राहू शकतात आणि आपण पण आपलं ध्येय शोधून तसं एकनिष्ठ कसं राहू शकतो..👇

हे सात मिनिटांचं Ted Talk नक्की ऐका मित्रानो.🙏



संपूर्ण सारांश मराठीत वाचण्यासाठी माझ्या नवीन ब्लॉगला नक्की भेट द्या - shekharconcepts.blogspot.com/2022/08/ted-ta…

Share this Scrolly Tale with your friends.

A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.

Keep scrolling