🔥वसुसेन🔥 Profile picture
विविध विषयांवर व्यक्त होण्यास आवडतं. #वसुसेन #threadकर #study_iq fan of महारथी कर्ण, विविध ब्लाॅगची लिंक 👉 https://t.co/0PWzn4WAaU

Mar 14, 2023, 16 tweets

परवा आपण 'SVB bank' कशी कोसळली आणि त्याचे परिणाम याबद्दल वाचलं, जर वाचला नसेल तर तो थ्रेड मी शेवटी जोडलाच आहे. आज आपण डोनाल्ड ट्रंपचा विशेष जीव असणारी 'Signature Bank' बद्दल जाणुन घेऊ.
१)बॅंकची स्थापना
२) कार्यक्षेत्र, ठेवी रक्कम
३)नक्की काय घडले इ.
#वसुसेन #threadकर #CryptoNews

Signature Bank कोसळलीय म्हणजेच अमेरिकेच्या इतिहासातील ३री बॅंक बंद करण्याची वेळ आली आणि ते पण अस तस नाही तर रविवारच्या दिवशी(ज्या दिवशी सुट्टी असते) तातडीने बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.यावरून तुम्हाला लक्षात येत असेल की अमेरिकेत बॅंकिंग सेक्टर नेमकं कोणत्या दिशेला चाललय!

Signature bank ही न्युयाॅर्कमध्ये असुन या बॅंकेचे जवळपास ४० क्लाईंट्स आहेत.या बॅंकेचे वय जास्त नाहीय. बॅंकची मे, २००१ रोजी स्थापन करण्यात आलीय. इथे बर्याच जणांना माहिती नसेल की SVB Bank बंद करण्यात आली त्यादिवशी Silvergate bank पण‌ बंद झाली. ही Silver gate bank #Cryptocurency

साठी ओळखली जायची. Silvergate bank सारखीच Signature bank Cryptocurrency मध्ये काम करते.या बॅंकेची एकुण मालमत्ता 110.36 बिलियन डॉलर्स आहे तर डिपाॅजिट रक्कम 82.59 बिलियन डॉलर्स एव्हढी आहे. ही बॅंक क्रिप्टोसोबत, रिएल इस्टेट इ. ना पैसे पुरवण्याचे काम करत होती. ट्रंपच्या फ्लोरिडामधील

गोल्फ कोर्सला याच बॅंकने पैसे दिले. थोडक्यात ट्रंप या बॅंकेचा आपल्या सोयीसाठी चांगलाच वापर करायचे. या बॅंकेच्या बोर्डवर मुलगी इवांका ट्रंप, जावयाला पैसे उपलब्ध करुन देणे इ. अनेक उद्योग ट्रंप यांनी करून ठेवलेत. Signature bank ने 2018 सालापासून क्रिप्टोकरंसी संदर्भातले डिपाॅजिट

घेण्यास सुरुवात केली. बॅकचा क्रिप्टोकरंसी संदर्भातील डिपाॅजिट चा एकुणच आकडा हा 16.52 बिलियन डॉलर्स होता.
आतापर्यंत आपण बॅंकबद्दलची माहिती आणि ढोबळमान ठेवी तसेच ट्रंपच बॅंकसोबतच नातं याबद्दल माहिती घेतली. आता आपण बॅंकसोबत नक्की काय घडल

हे पाहुया.
१)तर Signature bank बंद पडण्यास मुख्य कारण अस की ज्यावेळी SVB bank दिवाळखोरीत निघाली त्यावेळी बर्याच लोकांनी Signature च्या मागे तगादा लावला आणि आपापले पैसे मागण्यास सुरूवात केली. थोडक्यात मी मागच्या थ्रेडमध्ये FDIC(Insurance) बद्दल सांगितले होते ज्यात अमेरिकेतील

बॅंका बुडाल्या तरी तेथील लोकांना 2.5 लाख डॉलर्स(2 कोटी रू.) पर्यंत रक्कम FDIC अंतर्गत माघारी मिळणार. पण ज्या लोकांची ठेवच 2.5 लाख डॉलर्सच्या वर आहे त्यांना टेंशन आल आणि एकामागे एक फोन करून बॅंकच्या मागे 'पैसै द्या' म्हणुन तगादाच लावला.😅
2)Bank ने क्रिप्टोकरंसीमध्ये 2018 साली

प्रवेश केला आणि ज्या लोकांना बिटकाॅईन अथवा अन्य करंसी देऊन पैसे हवेत त्यांना पैसे वाटले. त्यावेळी क्रिप्टोकरंसी जोमात होती परंतु तुम्हाला सर्वांना माहिती असेलच की मागील २ वर्षात क्रिप्टोकरंसी पण घाईकुतीला आलीय. #FTX (Future Exchange) जे क्रिप्टोचे एक्चेंज आहे ते नेस्तनाबूत झालय

आणि त्याचाच जोरदार परिणाम Signature bank वर पडलाय.
3)मागील आठवड्यात ज्याप्रकारे क्रिप्टोकरंसी मध्ये काम करणारी आणखी एक बॅंक Silvergate Bank दिवाळखोरीत निघाली ते पाहुन पण Signature Bank मध्ये ठेवी ठेवलेल्या लोकांना घाम फुटायला चालु झाला कारण signature बॅंकचा Digital asset हा 16.52

बिलियन डॉलर्स एव्हढा मोठा आहे आणि FTX डबघाईला आलेल्या बातमीसोबत Silvergate bank बंद पडलेली बातमी आल्याने लोकांना आपल्या ठेवींची चिंता वाटणारच!!
म्हणुन लोकांनी Signature Bank कडे आपल्या ठेवी मागण्याचा सपाटाच लावला! बर बॅंकेने पण लोकांशी संवाद साधुन विश्वास देण्याचा प्रयत्न केला

त्यांच्या पैश्यांची हमी दिली तरीपण रेग्युलेटर्सनी रविवारी बॅंक बंद केली. हा निर्णय एव्हढा जलदगतीने घेतला गेला की स्वता बॅंकेच्या मॅनेजरला पण या निर्णयाबद्दल कल्पना नव्हती😄🙌
FDIC ने Signature Bank च सगळं कामकाज Signature Bridge Bank कडे सुपुर्द केल आहे.

ज्याप्रकारे आपले अर्थमंत्री आहेत त्याप्रकारे अमेरिकेचे Secretary Of Finance असतात त्यांचे नाव 'Janet Yellen' असुन त्यांना पत्रकारांनी 'Bail Out' बद्दल विचारले. (बेल आऊट म्हणजे बॅंक बुडाल्या तर सरकार आपल्याकडचे पैसे वापरून हा मॅटर सेटल करतं) तेव्हा Yellen यांनी बेल आऊट देणार

नसल्याचे स्पष्टपणे सांगितले आहे.
आता एकामागे एक बॅंक्स‌ बुडणे असो किंवा बाकीचे आर्थिक संकटं असो अमेरिका सध्या भयंकर तणावग्रस्त परिस्थितीतुन चाललाय आणि याचाच ताण डाॅलर इंडेक्सवर पडत आहे.
Dollar index म्हणजे अमेरिकेच्या डाॅलरची जगभरातील ६ चलनांसोबत तुलना होते त्यात

Japanese Yen, Euro, British Pound, Canadian Dollar, Swedish Krona आणि Swiss Franc यांचा समावेश होतो. थोडक्यात काय तर अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर ताण आल्यामुळे डाॅलर दिवसेंदिवस कमकुवत होत चालला आहे.
खाली Silicon Valley Bank वर लिहिलेल्या विस्तृत थ्रेडची लिंक जोडली आहे नक्की वाचा👇

Share this Scrolly Tale with your friends.

A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.

Keep scrolling