'हिंडनबर्ग..हिंडनबर्ग..हिंडनबर्ग'
नाम तो सुना ही होगा 🧐
आत्ताच ज्यांच्या रिपोर्टने #अदाणी ग्रुपमध्ये हाहाकार उडाला होता त्या संस्थेच्या रडारवर काल #ट्विटर चा संस्थापक जॅक डाॅर्सी आलाय!
या थ्रेडमध्ये
१)हिंडनबर्गचा आरोप
२)ब्लाॅक कंपनीची माहिती
३)परिणाम
पाहु
#threadकर #वसुसेन
तर विषय असा आहे की हिंडनबर्गने जॅक डाॅर्सीच्या 'ब्लाॅक'
1)या कंपनीवर जवळपास १ बिलियन डॉलर्सचा घोटाळा घातल्याचा आरोप केला आहे.
2)या कंपनीमध्ये असंख्य खोटी आणि बनावट खाती उघडण्यात आली असुन कंपनीने या कृत्याला कुठेही विरोध केलेला नाहीय.त्यांना या गोष्टीची माहिती होती तरी त्यांनी
हे होऊन दिलंय.
3)स्वताच्या कंपनीचा नफा वाढवुन दाखवलाय.जेणेकरून या कंपनीचा शेअर वाढेल आणि कंपनीला फायदा होईल.
4)कंपनीच्या पेमेंट ॲपवरून बर्याच अवैध्य कामांसाठी पैश्यांची देवाणघेवाण झालीय उदा. ड्रग्ज डिल्सचे पैसे, क्रिमिनल गोष्टींसाठीचे पेमेंट्स, एखाद्याचा खुनाच्या सुपारीचे पैसे😅
5)स्वता जॅक डाॅर्सी, डोनाल्ड ट्रंप तसेच इलोन मस्क या प्रतिष्ठित लोकांच्या व्यवहारांसाठी खोटे खाती उघडुन व्यवहार केलेत.
6)कोव्हिडमध्ये कागदपत्रांची चाचपणी करणे शक्य नसताना बर्याच मोठ्या संस्थांनी चेतावणी देऊन सुद्धा ब्लाॅकने अनेक बनावट खात्यांना मंजुरी दिलीय.
हे झाले एकंदरित आरोप
आता आपण ब्लाॅक कंपनीची माहिती आणि कंपनी नेमकं काय करते ते पाहुया.
२००९ साली जॅक डाॅर्सी व जीम मॅककेल्वे यांनी ही कंपनी चालु केली. २०१५ साली NYSE New York Stock Exchange (जस भारतात BSE Bombay stock exchange आहे तस अमेरिकेत NYSE आहे) वरती कंपनी रजिस्टर झाली.
या कंपनीला
२००९ ते २०२१ पर्यंत 'स्क्वेअर' या नावाने ओळखले जायचे. २०२१ ला नामांतर होऊन 'ब्लाॅक' हे नाव झाले. जे लघु आणि मध्यम उद्योग असतात त्यांना पेमेंट घेताना (उदा. क्रेडिट कार्ड किंवा इतर पद्धतीने) ही कंपनी मदत करते. थोडक्यात भारतातल्या पेटीएमसारखचं 'ब्लाॅक'च कामकाज चालत.
तर या कंपनीचे आणखी अनेक Business आहेत. त्यात Cash App, Afterpay, Weebly इ. चा समावेश होतो. Cash app मार्फत एकमेकांना पैसे पाठवण्याची सुविधा देण्यात आलीय तर Afterpay मार्फत आधी सर्विस आणि नंतर पेमेंट करा अशी सोय देण्यात आलीय.
मध्यंतरी या कंपनीने Tidal या कंपनीचे समभाग विकत घेतले.
Tidal online songs stream करणारी कंपनी आहे. तर ब्लाॅकचा असा एकंदरीत कारभार आहे.
कोरोना महामारीत या कंपनीच्या समभागांनी प्रचंड उसळी घेतली होती.म्हणजेच ३८ डाॅलर्सला(साधारण ३००० रू.) असणारा एक शेअर कोरोनात २७५ डाॅलर्सच्या(२२००० रू.) आसपास पोचला होता. या वाढीवर हिंडनबर्गने आक्षेप
घेतलाय.
जेव्हा हिंडनबर्गचा रिपोर्ट बाहेर आला तेव्हा या कंपनीच्या एका शेअरची किंमत ७५ डाॅलर्स होती ती घसरून ६० डाॅलर्स पर्यंत आली आहे.
म्हणजेच या हिंडनबर्गच्या फटक्यात जॅक डाॅर्सी हे तब्बल ५२६ मिलियन डॉलर्सला बुडाले आहेत. पुढच्या आठवड्यात आपणास आणखी पडझड पाहायला मिळेल यात
शंकाच नाही.
हिंडनबर्ग संदर्भात थोडस:-
ही संस्था 'Short Seller' म्हणुन काम करते. म्हणजे एखाद्या कंपनीचा शेअर जास्त किमतीला विक्री करणे आणि तोच शेअर पडल्यावर कमी किंमतीला विकत घेणे आणि त्यामधला सगळा पैसा नफा म्हणुन कमवणे अस एकंदरीत यांच गणित आहे.
#threadकर #Hindenburg #JackDorsey
Share this Scrolly Tale with your friends.
A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.