My Authors
Read all threads
इंदिरा गांधींनी लादलेल्या आणीबाणीचा मोठा इशू करून ठेवलाय आपण. इंदिरा गांधींच्या करिअरमध्ये 'आणीबाणी' हे काळ्या अक्षरात लिहिलं गेलंय. पण इंदिरा गांधींचं नाव निघताच तेच अक्षर पुन्हा जोर लावून गिरवतो आपण. आता तर इंदिरा गांधी म्हटलं कि "आणीबाणी" एवढंच आपल्या डोळ्यासमोर येत .
कोणत्याही Evolving Nation साठी इतिहासाचं , दिवंगत नेत्यांचं मूल्यांकन होणं गरजेचंच आहे , पण ते अर्धवट, एकांगी , पूर्वग्रहातून झालेलं नसावं .
जवळपास ४०-४५ वर्षांची राजकीय कारकीर्द असणाऱ्या १५ वर्षे पंतप्रधान , ४ वर्षे परराष्ट्र मंत्री, २ वर्षे संरक्षण मंत्री ३ वर्षे गृहमंत्री, १ वर्ष अर्थमंत्री, २ वर्षे माहिती प्रसारण मंत्री असणाऱ्या व्यक्तीच मूल्यमापन केवळ एकाच मुद्यावर होणं योग्य नाही असं मला वाटतं .
जवाहरलाल नेहरूंच्या नंतर पक्षावर आपली पकड मजबूत राहावी या हेतूने 'कमजोर' इंदिरा गांधींना पुढे करणारे त्यावेळचे काँग्रेसजन नंतर इंदिरा गांधींच्या कणखरपणामुळे तोंडावर आपटले . 'कमजोर' ते 'कणखर' यादरम्यानच इंदिराजींचा प्रवास कधीतरी बघितला गेला पाहिजे.
१४ बँकांचं राष्ट्रीयीकरण ते संस्थानिकांचे तनखे बंद करणे असे निर्णय त्यांनी पक्षांतर्गत विरोध पत्करून घेतले . बांगलादेश लिबरलायझेशन मध्ये इंदिरागांधींचा सिंहाचा वाटा चारचौघात चर्चिला गेला पाहिजे.
स्वतंत्र बांग्लादेशच्या निर्मितीनंतर विरोधीपक्ष नेते वाजपेयींनी इंदिराजींना 'मॉं दुर्गा ' म्हणून संबोधलं . गुंगी गुडिया ते मॉं दुर्गा हे ट्रान्सफॉर्मेशन कळूद्या लोकांना.
सोवियत युनियन सोबत केलेला मैत्री करार, त्यानंतर दक्षिण पूर्व आशियात भारताचा "डॉमिनंट पॉवर" म्हणून झालेला उदय, सिक्कीमचा भारतात समावेश, नेपाळ आणि भूतान भारताच्या छत्रछायेखाली येणं या घटना इंदिरा गांधींच्या कुशल परराष्ट्र धोरणच ( इंदिरा डॉक्ट्रीन ) फलित आहे .
जागतिक दबाव झुगारून पोखरण मध्ये झालेल्या अणुचाचण्या , पाकिस्तानी सैन्यावर हल्ला करून संपूर्ण सियाचीन ग्लेशियर ताब्यात घेण्यासाठी राबवलेलं 'ऑपरेशन मेघदूत ' हे इंदिरा गांधींच्या कणखर नेतृत्वाचा अजून एक उदाहरण.
सोवियत रशिया आणि अमेरिकेला दक्षिण आशियातून बाहेर ठेवण्यासाठी सार्क ( सारक) ही संघटना उदयास आली त्यातही इंदिरा गांधींचं मोठं योगदान आहे. इंदिराजींनी केलेल्या भारत ईराण तेल करारामुळे आपल्या एकूण गरजेपैकी ७५ % क्रूड ऑइल आपल्याला इराणकडून मिळू लागलं .
अनेक आफ्रिकन देशांतल्या स्वातंत्र्य चळवळींना इंदिरा गांधींनी रशिया च्या मदतीने पाठिंबा जाहीर केला त्यामुळे आफ्रिकन देशांमध्ये भारताचा प्रभाव वाढला जिथे आधी चीनचा बोलबाला होता.
आज रशिया अनेक महत्वाच्या मुद्यांवर भारताच्या बाजूने 'व्हेटो पॉवर ' वारपताना आपल्याला दिसतो त्याच मूळ इंदिरा गांधींनी रशिया सोबत प्रस्थापित केलेल्या संबंधात आहे . रशिया भारताला शस्त्रास्त्रे पुरवणारा मुख्य देश होता तेही स्वस्तात आणि रुपयात ( डॉलर मध्ये नाही ).
इंदिरा गांधींच्या आर्थिक धोरणांमुळे भारत सलग दोन पंचवार्षिक योजनांचे उद्दिष्ट गाठण्यात यशस्वी झाला होता . इंदिरा गांधींच्याच काळात पूर्वी अमेरिकेकडून धान्य आयात करणारा भारत जगभरात धान्य निर्यात करणारा भारत बनला .
1979-1980 या एकाच वर्षात मोरारजी देसाईंच्या जनता दल सरकारने अर्थव्यवस्थेची वाट लावली होती ( GDP = -5.2% , Inflation = 18.2% ). 1980 साली इंदिरा गांधींनी पुन्हा सत्तेत येताच काही महिन्यांत अर्थव्यवस्था रुळावर आणली ( GDP= +6.7% , Inflation= 5% ).
आधी भारतात बँका या खासगी बँक चालकांकडून चालवल्या जात त्यातून त्यांच्या स्वतःच्या कंपन्यांना किंवा त्यांच्या मार्जीतल्याच लोकांना कर्जपुरवठा होत . हा 'class banking' चा प्रकार बंद करण्यासाठी इंदिरा गांधींनी 14 बँकांचं राष्ट्रीयीकरण केलं.
त्याचा परिणाम म्हणून बँकांच्या शाखांमध्ये 800% तर ठेवीनमध्ये 11000% वाढ झाली . खेड्यात राहणार्यांना बँकेचं दर्शन झालं . शेतीला, उद्योगांना कर्ज मिळू लागलं . इंदिरा गांधींचे सगळ्यात मोठे विरोधक जयप्रकाश नारायणसुद्धा यांनीसुद्धा या बाबतीत इंदिरा गांधींचं नेहमी कौतुक केलंय .
1971 च्या युद्धाच्यावेळेस खासगी इंधन कंपन्यांनी ऐनवेळी भारतीय युद्धनौकांना आणि विमानांना इंधन पुरवण्यास नकार दिला होता . इंदिरा गांधींनी इंधन हे 'राष्ट्रीय संपत्ती' आहे असं सांगून इंधन कंपन्यांचं राष्ट्रीयीकरण केलं
त्याचप्रमाणे इंधन कंपन्यांनी युद्धासारख्या प्रसंगी वापरण्यासाठी Minimum Stok नेहेमी ठेवण्याचे आदेश दिले . स्टील , कॉपर , कोळसा , वस्त्रोद्योग , इन्शुरन्स या उद्योगातही काही प्रमाणात राष्ट्रीयीकरण केलं . ( हेच मोदीजी विकायला काढताय )
पुरुष व महिलांना 'समान कामासाठी समान वेतन' हे धोरण इंदिरा गांधींनी अंमलात आणलं . राजा महाराजांचे तनखे पेन्शन रद्द केले, राजा महाराजा नवाब इत्यादी पदव्या रद्द केल्या ( जनसंघाने याचा निषेध केला होता ) . इंदिरा गांधींचा विषय निघाला तर या गोष्टीसुद्धा चर्चेत आल्या पाहिजेत .
राहता राहिला विषय आणीबाणीचा तर आणीबाणी ही काही घटनाबाह्य गोष्ट नाही . असामान्य परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी असलेली ती एक 'घटनात्मक' तरतूद आहे .
आणीबाणी बद्दल जास्त काही सांगत नाही कारण या विषयावर आधीच खूप लोकांना खूप काही माहिती आहे .
एकच सांगतो की आणीबाणी जरी प्रमाण म्हणून घेतलं तरीही मोदींची तुलना इंदिरा गांधींसोबत होऊ शकत नाही. कारण स्वतःची लोकप्रियता खंड पावेल हा धोका पत्करून एखादी अप्रिय घटनात्मक तरतूद वापरणं आणि स्वतःच्या प्रतिमासंवर्धनेत गुंग होऊन घटनाबाह्य आणीबाणी सुरु ठेवणं यात जमीन अस्मानाचा फरक आहे
एवढा खटाटोप करण्यामागे इंदिरा गांधी किती महान होत्या आणीबाणी किती छान होती हे सांगण्याचा हेतू नसून इंदिरा गांधींचं मूल्यांकन करताना त्यांची संपूर्ण कारकीर्द विचारात घेतली गेली पाहिजे हे सांगण्याचा हेतू आहे .
आणीबाणी हे इंदिरा गांधी नावाच्या भल्यामोठ्या पुस्तकातलं केवळ एक पान आहे या पानालाच मुखपुष्ठ समजून इंदिरा गांधींकडे बघणं हा इंदिराजींवर आणि एकूणच इतिहासावर आपल्याकडून होणारा अन्याय आहे .
हा अन्याय दूर केल्यास आणीबाणीमुळे काहींच्या मनात खलनायक ठरलेल्या इंदिराजी तरुण पिढीतल्या अनेकांच्या मनात 'रोल मॉडेल' , 'नायिका' ठरतील.
Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh.

Enjoying this thread?

Keep Current with Nikhil Pawar

Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

Twitter may remove this content at anytime, convert it as a PDF, save and print for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video

1) Follow Thread Reader App on Twitter so you can easily mention us!

2) Go to a Twitter thread (series of Tweets by the same owner) and mention us with a keyword "unroll" @threadreaderapp unroll

You can practice here first or read more on our help page!

Follow Us on Twitter!

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just three indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!