नोटबंदी, जीएसटी, सर्जिकल स्ट्राईक, एअर स्ट्राईक, ३७०, CAA...असे एकामागे एक कारनामे करतो...त्यांचा आम्ही पाळीव कुत्र्याप्रमाणे भुंकून भुंकून विरोध करतो - पण - +
हे सगळं सहन होत नाही फॅसिस्ट हुकूमशहांना.
जळजळ तिथे आहे. दुखणं तिथेच आहे.
नोटबंदी आठवून पहा. इनफॅक्ट, २०१४च्या सत्तांतरानंतर या लोकांचं रोजचं वर्तन तपासून पहा. +
नोटबंदीच्या वेळी स्वतःला गांधीवादी-लोकशाहीवादी-संविधानवादी म्हणवणाऱ्या या लोकांनी केलेली विधानं यांचं खरं रूप दाखवणारी होती. +
३७० च्यावेळी तेच. CAA च्या ही वेळी तेच.
पण एका नरेंद्र मोदी नावाच्या माणसावर विश्वास ठेवलेल्या लोकांनी तसं काहीच घडू दिलं नाही. स्वतःला त्रास करून घेतला... +
राग याचाच आहे.
महात्मा गांधी, पंडित नेहरू, इंदिरा गांधी यांचं प्रचंड मार्केटिंग केलं आहे या गॅंगने. महात्मा गांधींचं माहात्म्य पटवणाऱ्या कित्येक संस्था, प्रकाशनं सतत कार्यरत आहेत. पंडित नेहरूंच्या आठवणी तर सतत काढल्या जातात. +
हे असं काहीही नं करता एक माणूस उदयास येतो...सतत १८ वर्षं त्याच्या विरोधात प्रचार करूनही हा जनतेच्या मनात घर करतो...विश्वास संपादन करतो... +
हे अर्थातच सहन होत नाही.
म्हणून मग जमिनीत तोंड खुपसून जगाला आपली नको ती बाजू उपडी करून दाखवतात हे लोक.
म्हणूनच जगभरात भारताच्या प्रयत्नांचं कौतुक होत असताना --- +
आणि म्हणूनच आज संध्याकाळी ५ वाजता तुम्ही आम्ही जेव्हा कृतज्ञेतेचा गजर करू - तेव्हा या मानवतावादी, जय जगतवादी, पीडित-शोषितांच्या काळजी वाटणाऱ्या लोकांना त्या "गोंगाटा"चा भयंकर त्रास होणार आहे. +
खरं दुखणं तिथे आहे....!
रडत रहा बाबानो.
पब्लिक सब जानती है.
सो...सी यू अॅट फाईव्ह पीएम...!
: ओंकार दाभाडकर
d.omkar1@gmail.com