सकाळी सकाळी उठून जरा घराबाहेर पडून काय चाललंय बघूया म्हणून दार उघडलं तर काय आश्चर्य दारात छत्रपती शिवाजी महाराज उभे.त्यांनी माझ्यावर तलवार रोखली आणि म्हणाले खबरदार जर घराबाहेर पडलास तर शत्रू महाभयंकर आहे . सध्या फक्त गनिमी कावा.मी घाबरून महाराजांना मुजरा करून दार लावून घेतलं..
रोगाच्या भयाने त्रस्त झालो अस्वस्थ झालो . तितक्यात बाबा आमटे आले. माझ्याबाजूला सोफ्यावर बसले.त्यांनी मायेने हाथ फिरवला आणि म्हणाले अरे रोगाला घाबरून काय होणार आहे . फक्त त्याला नीट जाणून घेता आलं म्हणजे मिळवलं. मला थोडं हायसं वाटलं . मी म्हटलं तुम्ही असायला हवे होतात बाबा आता .
ते म्हणाले मी नसलो तरी माझ्या विचारांनी प्रेरित झालेली माणसं आहेत कि डॉक्टर आणि सेवकाच्या रूपात. तू बिनधास्त रहा . फक्तं त्यांच्यावरचा भार वाढणार नाही याची तुम्ही काळजी घ्या . असं म्हणून बाबा आमटे गुप्त झाले......
आता २१ दिवस घरी बसून काय करायचं याचा मी विचार करत होतो तोच गाडगे महाराजांनी मला झाडू ने झोड झोडलं . म्हणाले अरे मी ओरडून ओरडून सांगितलं रे कचरा साफ करा मनाचा आणि परिसराचा .. केलीत ना घाण . आता निदान तू तुझ्या घरातला तरी कचरा काढ .
बाहेरचा कचरा काढणारी माणसं राबतायत तुमच्या साठी तुम्ही कचरा केला नाहीत तरी पुष्कळ ..गुमान झाडू घेतली आणि कचरा काढायला लागलो.
तितक्यात सावरकर आले म्हणाले आता कळलं कैद म्हणजे काय असते . पण घाबरू नकोस या कठीण काळात तू तुझ्यातल्या लेखणीला आणि विचारांना खतपाणी घाल ..
२१ काय ५० दिवस पण सहज जातील . मी त्यांना विचारलं पण खाण्याचं काय तितक्यात गांधीजी आले म्हणाले गरजा कमी कर आवश्यक तेवढंच खा आणि सावरकर गांधीजी एकत्र हसत हसत निघून गेले...... .
मला कळलं नाही मग आम्ही का भांडतोय आजही यांच्या नावाने .मला कळलं हाच तो काळ शहाणं होण्याचा.मी खिडकीत जाऊन त्यांचे आभार मानावे म्हटलं तर.
दाभोळकर खिडकीत उभे त्यांनी मला बंदुकीची गोळी काढून दाखवली म्हणाले हीच ती अविवेकाची गोळी.तू विवेक घालवून बसू नकोस विज्ञानावर विश्वास ठेव एक दिवस नकीच यातून मार्ग काढशील .
मी म्हटलं चला आता या एकवीस दिवसात यांच्या विचारांची सोबत मला नकीच साथ देईल …
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
माणसं कमावण्याची जबरदस्त नशा असते वयाच्या एका टप्प्यापर्यंत. आपल्यापैकी अनेकांना ती असते. माणसं जोडणं ही छानच गोष्ट, अनेकांसाठी ती एक अभिमानाची बाब असते. जरूर असावी. चांगला स्वभाव आणि उत्तम चारित्र्य याच्या जोरावर अनेक माणसं जोडावीत, जपावीत.
पण हे करताना ही जपलेली माणसं आपल्यालाही 'जपत' आहेत ना हे बघणं फार महत्त्वाचं असतं. अनेकदा आपल्याला वाटून जातं, अरे बापरे...! ही अमुक इतकी 'भारी' व्यक्ती आपल्यासोबत संपर्क ठेवून आहे. म्हणजे किती छान!
त्या संपर्कामागे विशुद्ध भाव आहे ना, की पुढे जाऊन आपला 'स्टेपणी' म्हणून उपयोग केला जाणार आहे हे बघायला हवं. अशा अनेक अनुभवांतून आपण जात असतो, त्यामुळे 'हुरळून' जाणं टाळायला हवं.