आपल्या रथाचं चाक खड्ड्यात रुतलं, कि प्रत्येक कर्णाला धर्म आठवतो !
3000 नागरिकांचा जीव धोक्यात आणून बेलगाम उधळणाऱ्या कोरोनाच्या वारूला आवरणं तुमच्या आवाक्यात नाही,म्हणून आम्ही काही बोलूच नये ?
#UddhavResign #SaveMaharashtra
राजकारणातून मिळणारी मलई फक्त हवी ! मलई पुढे वाढलेलं राजकारण नको ? Benifits हवेत, Side effects नको ?
तुमचे मंत्री, तुमच्याच मतदारांना बंगल्यावर नेऊन मारतात, आम्ही गप्प सहन करावं !
धार्मिक स्थळांच्या नावाखाली लपून बसलेल्या कोरोनाग्रस्तांवर तुमचा वचक नाही, तरी आम्ही तोंड उघडू नये !
तुमच्या मित्रपक्षाकडे बहूमत नसतांना मतदारांचा विश्वासघात करून तुम्ही केलेलं स्वार्थी राजकारण,ते धार्मिक,आणि वैयक्तिक लागेबांधे जपणारं तुमचं घराणेशाहीचं सरकार,आमच्या जीवावर आल्यावर..
वा रे संधीसाधू स्वार्थ्यांनो !
खबरदार ! मी तुमचा मतदार आहे, आणि माझ्या आयुष्याशी निगडित प्रत्येक समस्येचा जाब मी विचारणारच ! तुम्हाला काय वाटायचं ते वाटो ! तुमच्या सोयीच्या वेळी तुम्ही मला काय वाटलं, ते विचारलं का ?