Rahul kale 🇮🇳 Profile picture
Jun 2, 2020 25 tweets 4 min read Read on X
छत्रपती शिवरायांच्या सुवर्ण सिंहासन व राज्याभिषेकेचा जाज्वल्य इतिहास.......!!!
महाराष्ट्रात हिंदवी स्वराज्याचे सोनेरी स्वप्न साकार करणारे महाप्रतापी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या रायगडावर केलेल्या राज्याभिषेकाने विजयपताका फडकत राहिली...संपुर्ण लेख👇1/25 @The_Lion_10_ Image
हिंदुस्थानातल्या तमाम यवन बादशहांची गुर्मी उतरवल्यानंतर महाराजांनी स्वतःस राज्यभिषेक
करवून घ्यावा असे मनात आणले. अन्य पातशाह्या आपणाला हवा तो मान देणार नाहीत, आपल्याला वचकून राहणार नाहीत, हे जर व्हावयाचे असेल तर 2/25
छत्रसिंहासन आणि राजचिन्हे धारण करावी लागतील हे महाराज ओळखून होते. आपण परकीय राजांचे प्रजाजन आहोत आपल्याला कोणी एतद्देशीय छत्र नाही. जाणता राजा नाही. असे जनतेला वाटत होते हे महाराजांना माहित होते.3/25
सप्त नद्यांची पुण्योदके, समुद्रजल, सुलक्षणी अश्व आणि हत्ती आणले गेल. हरीण आणि वाघाची कातडी आणली गेली. सोन्याचे कलश व इतर भांडी तयार करण्यात आली. जेष्ठ शुद्ध त्रयोदशी (आनंदनाम संवत्सर) पहाटे ५ वाजताचा मुहूर्त 4/25
ठरला. विद्वान, मांडलिक, राजे, हितसंबंधी, स्वराज्यातील जनता इत्यादींना आमंत्रणे धाडली. राजधानी कोणती असावी यावर विचार करून सर्वबाजूनी म्हणजेच अवघड, जवळ तीर्थक्षेत्रे असणारा, सर्वप्रकारचे धान्य जवळपास पिकत 5/25
असणारा, पाण्याची सोय असलेला, जवळ पवित्र नद्या असलेला असा देखणा गडम्हणजेच दुर्गदुर्गेश्वर रायगड ही राजधानी करण्याचे ठरले., जिथे सिंहासन स्थापन करण्याचे आहे, त्या सदरेस उंची वस्त्रांचे चांदवे भारी किमतीचे पडदे लावले. 6/25
सिंहासन जेथे ठेवायचे आहे तिथे सोन्याचे चार खांब लावून त्याला किमती जरीचा चांदवा लावला. त्यालामुक्ताफळांच्या गेंदाचे घोस लटकवले सारा गड रंगवून साफ केला. प्रशासकीय व्यवस्था उत्तम तयार केली अधिकारी, देशाधिकारी, नगराधिकारी 7/25
यांच्या नेमणूका केल्या राज्यभिषेकाच्या दिवशी त्या सर्वांना स्नान करण्याचे सांगून, महाराजांनी स्वतः मंगलस्नान, पंचगव्यस्नान, पवित्र नद्यांच्या उदकाने तसेच पंचामृताने विधिवत स्नान केले. सर्वांनी शुभ्र वस्त्रें परिधान केली होती. क्षीर वृक्षाच्या 8/25
सोन्याने मढवलेल्या आसनावर महाराज बसले. पट्टराणी सोयराबाई व युवराज संभाजी त्यांच्याजवळ बसले मुख्यप्रधान मोरोपंत, सेनापती हंबीरराव मोहिते,रामचंद्र पंडित, अमात्य, छंदोगामात्य प्रधान रघुनाथ पंडितराव हे अनुक्रमे 9/25
पूर्वेस तुपाने भरलेला सोन्याचा कलश, दक्षिणेस दुधाने भरलेला चांदीचा कलश, पश्चिमेस दह्याने भरलेला तांब्याचा कलश, तर उत्तरेस मधाने भरलेला सोन्याचा कलश घेऊन उभे होते.
कलशातील असलेल्या द्रव्यांचा महाराजांना 10/25
विधिपूर्वक मंत्रोच्चारात अभिषेक झाला. आरती झाली. कास्याचे भांडे तुपाने भरूनत्यात स्वमुख पाहायला सांगितले. त्यानंतर महाराज सिंहासन आरोहनासाठी मुहूर्ताची वाट पाहत बसले. श्री रामाजी दत्तो यांनी चार महिने कष्ट करून भारतीय 11/25
शास्त्रानुसार राजसिंहासन तयार केले होते. वड, औदुंबर, क्षीर या झाडांच्या लाकडाच्या वेदी करून, ती सोन्याच्या तगटाने मढवुन त्याच्यावर मौल्यवान रत्ने लावली होती. त्या तगटावर बैल, मार्जार, तरस, सिंह, वाघ यांची चित्रे अनुक्रमाणे एकावर 12/25
एक अशी चारी बाजूना कोरली होती, त्याला सोन्याचे आठ स्तंभ होते. प्रत्येकस्तंभावर एक असे आठ सोन्याचे सिंहबसवले होते. त्यावर वेगवेगळी झाडे, फळे, फुले, मासे इत्यादींची चित्रे होती. नर्तकी तंतूंवाद्य घेऊन नाच करत असलेली चित्रे 13/25
होती. अशा या शास्त्रानुसार सिद्ध केलेल्या भव्य सिंहासनावर पहिल्यांदा हरिणाची चामडी अंथरली होती. त्यांनतर त्याच्यावर दुवर्णद्रव्य घालून परत त्यावर वाघाची कातडी अंथरली होती. त्यावर शुद्ध कापसापासून तयार केलेल्या वस्त्राचे मऊ आसन 14/25
घातले होते. ते मखमलीने मढवले होते. त्यावर लोड, तक्के ठेवले होते. त्यांना बादली जरीवस्त्रांची आच्छादने घातली होती. ते सिंहासन 32 मण वजनाचे होते. सिंहासनाच्या मागे प्रभावळ करून जडवाचे छत्र लावले होते. त्याला मोत्यांच्या झालरी 15/25
होत्या त्यावर मंडप होता. त्याला सुवर्णमय वस्त्रांचा चांदवा लावलेला होता. त्याला मुक्ताफळाचे घोस अडकवले होते. चांगल्या गुणांचे हत्ती व घोडे सिंहासनासमोर सोन्याच्या दागिन्यांनी मढवुन सभांडपासमोर उभे केले होते.
16/25
मुहूर्त वेळ भरताच महाराजांनी आऊसाहेबांना नमस्कार केला व सिंहासनाला पाय न लावता, नमस्कार करून पूर्वेकडे तोंड करून आरोहण केले. पाठीमागे अष्ठप्रधान मंडळ उभे राहिले. मुख्यप्रधान मोरोपंत पिंगळे व गागाभट्ट सिंहासनाच्या शेजारी 17/25
उच्च आसनावर बसले. निमंत्रित मंडळी दर्जानुसार नेमलेल्या जागी उभे राहिले. नौबतीझडू लागल्या. सनई-चौघडे वाजू लागले. मंगल वाद्यांच्या गाजेने सह्याद्री तृप्त झाला. सोन्यामोत्यांच्या झालरी लावलेले छत्र उचलून गागाभट्टाने महाराजांच्या 18/25
मस्तकावर धरले. त्यावेळी महाराजांनी मस्तकावर शिरपेच घातला होता, लाल वस्त्रे परिधान केली होती. चौकडे, कंठ्या, माळा, तुरा, झगा, पोंच्या इत्यादी अलंकार अंगावर घातलेले होते. त्यांच्या हातात पूजन करून घेतलेला धनुष्यबाण होता, 19/25
खडग होते. त्यावेळी लोकांनी सोन्या-चांदीच्या फुलांची वृष्टी केली. छत्र धरून गागाभट्ट दीर्घस्वराने म्हणाला,
🚩राजा श्री शिवछत्रपती सदा विजयी होवो…
तोफांची सरबत्ती सुरु झाली. प्रत्येक किल्याला
20/25
अशी सूचना होती की एका किल्ल्यावरील तोफेचा आवाज दुसऱ्या गडावर ऐकू आला, की तेथेही तोफांची सरबत्ती सुरु करायची. ह्या प्रमाणे एकापाठोपाठ एक अशी तोफांची शिवगर्जना सुरु झाली. अवघ्या महाराष्ट्रभर तोफा गरजल्या एकदम 21/25
तोफांच्या सरबत्तीने सह्याद्री गर्जून उठला गेल्या. तीस वर्षातील धर्मासाठी अन्यायाविरुद्ध केलेल्या घोडदौडीचे सार्थक झाले. चार पातशाह्या घरचे शत्रू आणि बाकीचे विरोधक उरावर भाले रोखून असतानादेखील, त्यांना पराभूत करून सह्याद्रीचा
22/25
छावा मराठा राजा छत्रपती झाला ही गोष्ट सामान्य जाहली नाही.सुलतानांची मिरास संपली देवगिरी, वारंगले, द्वारसमुद्र, कर्णावती, विजयनगर आणि खुद्द इंद्रप्रस्थ येथील चिरफाळलेली सिंहासने परत रायगडावर सांधली गेली. 23/25
पाची पातशाह्यांना घाम सुटला. यावनी, परकीय सत्तेविरुद्ध, हिंदुस्तानात आदिलशाही, मुघलशाही, कुतुबशाही, डच, फ्रेंच, पोर्तुगीज, सिद्दी, हबशी, इंग्रज यांच्या छाताडावर पाय रोवून शिवसिंहासन मोठ्या दिमाखात उभे राहिले. आता सर्वजण 24/25
मराठ्यांच्या सत्तेला वचकून राहणार होते आणि राहिले देखील.प्रौढ प्रताप पुरंदर,महापराक्रमी रणधुरंदरक्षत्रिय कुलावतंस् सिंहासनाधीश्वर”
महाराजाधिराज श्रीमंत,श्री.श्री.श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय..🚩25/25🙏
#श्रीशिवराजाभिषेक२०२०

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with Rahul kale 🇮🇳

Rahul kale 🇮🇳 Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @rahulkale9663

Sep 26, 2020
छायाचित्र - करवीरनिवासिनी अंबाबाईच्या मूर्तीचे शंभर वर्षांपूर्वी टिपलेले ऐतिहासिक छायाचित्र...
आदिलशाही राज्यात लपविलेली करवीरनिवासिनी अंबाबाईची मूर्ती छत्रपतींनी पुन्हा मूळ मंदिरात स्थापन केली, तो आजचा ऐतिहासिक दिनविशेष....!!!संपुर्ण लेख👇 Image
पातशाह्यांच्या काळात कोल्हापूर प्रांतावर आदिलशहाचा ताबा होता. या काळात सर्वत्र धामधूम माजलेली असायची. राज्यव्यवस्था स्थिर नव्हती. युद्धप्रसंगी मंदिरांची नासधूस केली जायची. अशावेळी देवीच्या मूर्तीस काही अपाय पोहोचू नये
या हेतूने करवीरनिवासिनी अंबाबाईच्या पुजाऱ्यांनी देवीची मूळ मूर्ती मंदिरातून काढून नेऊन कपीलतीर्थाजवळ गुप्त ठेवली होती. पुढील काळात कोल्हापूर प्रांत स्वराज्यात आला. छत्रपतींचे स्थिरस्थावर राज्य स्थापन झाले, तेव्हा
Read 10 tweets
Jul 23, 2020
तुम्हाला माहीत आहे का??
जगातल्या अर्ध्या लोकसंख्येला टोचली जाणारी लस पुण्यात बनते.
लस बनवणारे अर्थातच पूनावाला.....!!!
संपुर्ण माहिती 👇👇👇
हे सायरस पूनावाला म्हणजे मॅड पारशी. आज जगातल्या सर्वोत्तम चित्रांचा खासगी खजिना जोपासणारा, उत्तमोत्तम स्पोर्ट्सकारचा आणि प्रायव्हेट जेटचे मालक सायरस पूनावाला हे मूळचे घोडेवाले.स्टड फार्म हा त्यांचा मूळ धंदा.
घोड्यांच्या शर्यती हा त्यांचा छंद आणि घोड्यांची पैदास हा व्यवसाय. ब्रिटिश गेले आणि भारतीयांना घोड्याच्या शर्यतीत फारसं स्वारस्य उरलं नाही. धंदा डबघाईला आला. लोणावळ्यापासून पुण्यापर्यंत पसरलेल्या जमिनी टिकवायच्या,
Read 12 tweets
May 31, 2020
“चेन्नकेशवा मंदीर”
आयुष्यात एकदातरी नक्की पहाण्यासारखे,
खरोखर मनाला सुखावनारे.....
पुरातन भारतीय वास्तुकलेचा अप्रतिम,मनमोहक उदाहरण.....!!! संपुर्ण लेख.....👇 ImageImage
बेलूर हे कर्नाटकातील हासन जिल्ह्यातील एक गाव आहे. हे यगाची नदीच्या तीरावर वसले आहे. हे नगर ऐतिहासिक काळातील होयसाळ राज्याचे राजधानीचे शहर होते. येथे चेन्नकेशवा मंदिर नावाचे पुरातन व प्रसिद्ध मंदिर आहे. Image
इ.स. १११७ साली राजा विष्णुवर्धन याने हे मंदिर बांधवले.हासन शहरापासून ४० कि.मी. आणि बंगळूर शहरापासून २२० कि.मी. अंतरावर असलेले हे मंदिर सुंदर शिल्पकलेसाठी प्रसिद्ध आहे Image
Read 9 tweets
May 26, 2020
स्कंद पुराण,ब्रम्ह पुराणात उल्लेख असणारे.... राजा भीमदेव पहिला यांनी इ.स.१०२६ मध्ये
बांधलेलं मोढेराचे भव्यदिव्य “सुर्य मंदीर “🚩
..........संपुर्ण माहिती 👇👇१/१० Image
गुजरात राज्यातील पाटना येथून दक्षिण दिशेने ३० किलोमीटरच्या अंतरावर वसलेले मोढेरा हे गावं येथील पुष्पावती नदीच्या तीरावर असलेल्या सूर्य मंदिराकरिता जगप्रसिद्ध आहे.हे सूर्य मंदिरविलक्षण वास्तुकला आणि शिल्पकलेचएक उत्कृष्टउदाहरण आहे. Image
या मंदिराच्या बांधकामात कुठेही चुन्याचा उपयोग केलेला आढळत नाही. इराणी शैलीचा वापर करून बनविण्यात आलेल्या या मंदिराला सोलंकी वंशाच्या राजा भीमदेव पहिला यांनी इ.स. १०२६ मध्ये बनविले होते. Image
Read 10 tweets
May 18, 2020
महाराष्ट्राचे कुलदैवत मानली जाणारी तुळजाभवानी ही आपला शेजारी देश असलेल्या नेपाळच्या राजघराण्याचीही कुलदेवता आहे.
नेपाळची तुळजाभवानी....!!!🚩🚩
.............संपुर्ण लेख👇👇👇(1/11) ImageImage
नेपाळी भाषेत देगू तलेजूभवानी नावाने ओळखल्या जाणाऱ्या नेपाळमधली तुळजाभवानीची परंपरा वैशिष्टय़पूर्ण आहे.
छत्रपती शिवराय आणि आई तुळजाभवानी हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत.
प्राचीन काळापासून तुळजाभवानीचे अस्तित्व हे फक्त भारतापुरते मर्यादित नसून तिचा महिमा उत्तर भारतापासून तो थेट नेपाळपर्यंत पसरलेला होता. त्यानुसार इ. स. १३२४ ला कर्नाटवंशयीय राजा हरिसिंगाने प्रथम
Read 12 tweets
May 12, 2020
फुटबॉलची तब्बल अडीचशे मैदाने सहज मावतील, एवढे प्रचंड मोठे क्षेत्रफळ असलेले,
जगातील सर्वात मोठे "अंगकोर वाट” विष्णुमंदिर....!!!🚩🚩🚩
संपुर्ण माहिती ....👇👇१/१६
संपूर्णत: वैज्ञानिक दृष्टिकोनातून बांधण्यात आले आहे. जगभरातील पर्यटक या मंदिराचे स्थापत्यशास्त्र पाहून थक्क होतात! जगातील सर्वांत मोठी धार्मिक वस्तू आणि तेदेखील विष्णूचे मंदिर भारतात नव्हे; तर कंबोडिया देशात आहे,
हे फारच थोड्या भारतीयांना माहीत असेल! बाराव्या शतकात सूर्यवर्मन (द्वितीय) राजाच्या कारकिर्दीत हे मंदिर बांधले गेले. वयाच्या पंधराव्या वर्षी सूर्यवर्मनचे राज्यारोहण झाल्यावर त्याने लगेचच या मंदिराचे बांधकाम सुरू केले.
Read 16 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Don't want to be a Premium member but still want to support us?

Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal

Or Donate anonymously using crypto!

Ethereum

0xfe58350B80634f60Fa6Dc149a72b4DFbc17D341E copy

Bitcoin

3ATGMxNzCUFzxpMCHL5sWSt4DVtS8UqXpi copy

Thank you for your support!

Follow Us!

:(