My Authors
Read all threads
#काश्मीरमधील_आतंकवाद_हा_स्वातंत्र्यलढा_नव्हे_तर_जिहाद !

काश्मीरमधील मुसलमानांची चळवळ म्हणजे जिहाद आहे. ज्या मोहिमेने ऑगस्ट १९४७ मध्ये भारताचे विभाजन केले, त्याच मोहिमेचा हा एक भाग आहे. इस्लाम धर्मीय कोणत्याही राष्ट्रीय सीमा, कोणतेही राज्य प्राधीकरण,
तसेच कोणतीही अतिरिक्त धार्मिक जबाबदारी ओळखत नाहीत. मुसलमानांची राजकीय कर्तव्ये धार्मिक आहेत आणि त्याची प्रेरणा त्यांना धर्मग्रंथातून मिळते. मुसलमानांना काश्मीरचे इस्लामीकरण करायचे आहे. हे सत्य असून या संकटाकडे दुर्लक्ष केले जाऊ शकते.
काश्मीरमधील जिहादचे स्वरूप आणि त्याची भयाणता न ओळखणारे राजकारणी !

राजघराण्यांकडे असलेली राज्ये वर्ष १९४७ च्या विभाजन योजनेमध्ये येत नव्हती. विभाजन योजना ब्रिटिशांच्या कह्यात असलेल्या भारतापुरती मर्यादित होती. वर्ष १९४७ च्या भारतीय स्वतंत्रता कायद्यानुसार सार्वभौम राज्यांना
किंवा रियासत करणार्‍या राजांना सान्निध्याचा विचार करून स्वतंत्रपणे भारत किंवा पाकिस्तान या देशांत विलीन होण्याची अनुमती दिली. जम्मू-काश्मीरच्या सार्वभौम राजाने निर्णय घेण्यापूर्वी इस्लामी जिहादने राज्याला विळखा घातलेला होता आणि तो हैद्राबाद अन् जुनागढ ही राज्ये गिळंकृत करणार होता
भारतीय राजकीय वर्गाला ब्रिटिशांकडून सत्ता मिळाली आणि त्यांनी राज्य केले, त्या वेळी तीनही राज्यांतील लोकांनी जिहादींचा कृती आराखडा नष्ट केला. ही तीनही राज्ये संविधानानुसार भारतामध्ये विलीन झाली. हैद्राबाद आणि जम्मू-काश्मीर या प्रांतांवर दक्षिण पाकिस्तान आणि उत्तर पाकिस्तान म्हणून
कब्जा करण्यात जिहाद्यांना अपयश आल्यानंतर त्यांनी मुसलमानबहुल भाग म्हणून जम्मू-काश्मीरवर दावा करण्यास आरंभ केला. जम्मू-काश्मीर समाविष्ट करून उत्तर पाकिस्तान निर्माण करण्यासाठी जिहादींनी गेली सत्तर वर्षे संघर्ष केला, लढले, युद्ध केले, तसेच आतंकवाद्यांचे साहाय्य घेतले.
भारतीय राजकारण्यांनी काश्मीरमधील जिहादचे स्वरूप आणि त्याची भयाणता ओळखली नाही किंवा त्याला तोंड देण्याची अथवा त्याच्या विरोधात लढण्यासाठी त्यांची सिद्धता नव्हती.

▶️ काश्मीरमधील फुटीरतावादी चळवळीला स्वातंत्र्यासाठी चाललेला संघर्ष, असे म्हणणे चुकीचे !
पाकिस्तान हा भारतापासून वेगळा झालेला भूभाग असून तो दोनशे न्यूक्लिअर बॉम्ब सिद्ध करून भारताच्या डोक्यावर उभा आहे आणि तोच काश्मीरमध्ये जिहादला प्रोत्साहन देत आहे. सध्या काश्मीरमध्ये चालू असलेला कट्टरतावादाचा संघर्ष हा जिहादच आहे.
ते विध्वंसक कारवाया करून जम्मू-काश्मीर बळकावण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यासाठी ते जम्मू-काश्मीरमधील मुसलमान विभक्तवादी शक्ती, जिहादींप्रती सहानभूती असलेले भारतातील घटक आणि जागतिक मुसलमान समुदाय यांचा पाठिंबा घेत आहेत. भारतीय राजकारण्यांनी जाणूनबुजून जिहादला स्वातंत्र्यासाठी संघर्ष
किंवा स्वयंनिर्णयासाठी संघर्ष, असे म्हटले आहे आणि जिहादी लढाऊ लोक त्यांचा उद्देश सफल होण्यासाठी, त्याच्याशी निगडीत काश्मीरियतसाठी संघर्ष, असे म्हणत असले, तरी काश्मीरमधील जिहादकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. स्वयंनिर्धार हा केवळ वसाहतवाद संपुष्टात आणण्यासाठीच होता
आणि संयुक्त
राष्ट्रसंघाच्या निर्मितीनंतर तो संपुष्टात आला. त्यामुळे काश्मीरमध्ये सध्या चालू असलेल्या चळवळीला स्वातंत्र्यासाठी चाललेला संघर्ष, असे म्हणणे चुकीचे आहे. हा एक प्रकारचा विरोधाभास ठरेल, कारण कोणताही देश अथवा राज्य अल्पसंख्यांकांना वेगळे व्हायचे आहे, म्हणून विभाजन करणार नाही.
▶️ काश्मीरमधील संघर्ष स्वातंत्र्यासाठी नसून इस्लामिक स्टेटसाठी !

काश्मीरमधील जिहादचे स्वरूप पहाता वर्ष १९४७ मध्ये भारताचे विभाजन करण्याच्या इस्लामी चलवळीचाच तो एक भाग असल्याचे लक्षात येते. भारताचे पुन्हा एकदा लबाडीने विभाजन करण्यासाठी ते कृती करत आहेत.
पाकिस्तानचे इस्लामी राज्य हिमाचल प्रदेशच्या सीमावर्ती भागापर्यंत नेण्याचा आणि दुसर्‍या बाजूला संस्कृत हिमालयाचा विस्तार करण्याचा त्यांचा मानस आहे. संस्कृत हिमालयाच्या विस्तारामुळे चीन-पाकिस्तान या अ‍ॅक्सिसची (आसाची) ताकद वाढेल आणि त्यामुळे आशियातील
शक्तीचा समतोल पूर्णपणे बिघडेल. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे ते भारताच्या संपूर्ण उत्तर सीमारेषेचा नाश करतील आणि उत्तरेकडून संपूर्ण उत्तर भारत पादाक्रांत करतील.

काश्मीरचा पुष्कळसा प्रदेश जिहादींनी कह्यात घेतलेला आहे. त्यांचा नेता झाकीर मुसा उघडपणे सांगत आहे की,
त्यांचा संघर्ष हा आझादीसाठी नसून इस्लामी राज्य, अल्लाह आणि खिलाफत यांसाठी आहे, जी इराक आणि सिरियाच्या इस्लामिक स्टेटची घोषणा आणि रणगर्जना आहे. त्यांचा जिहाद हा खिलाफतसाठी आहे, असे हिजबुलचा मारला गेलेला कमांडर बुरहान वाणी आणि त्याच्या अगोदरचा कमांडर, वारंवार सांगत होते.
▶️ माघार घेण्याच्या धोरणामुळे जिहादींना प्रोत्साहन !

दु:खाची गोष्ट म्हणजे येथील सुरक्षा दलाच्या अधिकार्‍यांनी, वाईट गोष्टी डोके वर काढण्यापूर्वीच नष्ट केल्या नाहीत. जम्मू-काश्मीर पोलीस दलातील माजी पोलीस महासंचालक एम्.एम्. खजुरिया यांच्या म्हणण्याप्रमाणे,
हे झेंडे म्हणजे सर्वांत विषारी, क्रूर आणि धोकादायक असलेल्या वहाबी/सलाफी विचारधारेचे, तसेच अबू बागडीच्या नेतृत्वाखालील पॅन इस्लामिक खिलाफतने त्याच्या क्रूरतेने मुसलमान युवकांचे शोषण करून जगभर प्रसार केला त्याचे प्रतिक आहे. असे असूनही इस्लामिक स्टेटचे झेंडे फडकवण्याला मान्यता दिली.
मागील दोन वर्षे जम्मू-काश्मीरमधील अधिकार्‍यांनी माघार घेतली आहे. माघार घेण्याच्या धोरणामुळे जिहादींना प्रोत्साहन मिळाले आणि त्याच्या परिणामस्वरूप सैन्य शिबिरे, काफिले, पोलीस ठाणे आणि सीआर्पीएफ् कॅम्प यांच्यावर मोठ्या प्रमाणात आक्रमण झाले. माघार घेण्याच्या धोरणामुळे जिहादींना
साहाय्य करणार्‍यांना बळ मिळाले व त्यामुळे अतिरेक्यांच्या विरोधातील कारवाईला विरोध करत आहेत.
#MoralOfTheStory
▶️ भारताने अमेरिका, इस्रायल आदी देशांप्रमाणे कृती करावी !

भारताच्या स्वातंत्र्यापासून राजकारण्यांनी स्वयंविरोधी, विसंगत, अवैज्ञानिक आणि विध्वंसक स्वरूपाच्या
काल्पनिक रचनांचा आधार घेतला. संयुक्त चर्चा, भागधारक, बॅक चॅनेल कूटनीती, शांतताप्रक्रिया, अशा अर्थहीन संकल्पनांनी शेजार्‍यांमध्ये पालट होणे अशक्यच. दक्षिण आशियाई शांती क्षेत्र आणि भारत-पाकिस्तान मैत्री, अशा संकल्पना राजकीय वर्तुळाने राबवल्या, कारण काश्मीरमधील वाढत्या जिहादचा सामना
करण्याचे धैर्य नव्हते. तसेच त्यांच्याशी लढा देण्याचा निर्धारही त्यांनी दाखवला नाही.

जम्मू-काश्मीरमध्ये हिंदु, शिख, बौद्ध आणि जैन यांची एकत्रित लोकसंख्या ४३ टक्के असून त्यांच्या कह्यात ८८ टक्के भूमी आहे. त्यांनी जिहादींचे जाळे काश्मीर खोर्‍याबाहेर पसरू दिले नाही, ही एक
आनंदाची गोष्ट आहे. त्यांची जिहादशी लढण्याची मानसिकता आहे आणि वेळ पडल्यास असभ्य अन् भेकड राजकारण्यांशी लढण्याचीदेखील त्यांची सिद्धता आहे; परंतु ते पुरेसे नाही. भारताने अमेरिका, इस्रायल, श्रीलंका, म्यानमार आणि बांगलादेश यांच्याप्रमाणे कृती केली पाहिजे.
तरच इतर देशांनी भारताच्या बाजूने लढण्याची अपेक्षा करता येईल.

संदर्भ: – हरि ओम महाजन (dailypioneer.com/columnists/big…)

अशा अनेक नवीन विषयांवर छोटे छोटे थ्रेड आमच्या अनेक बांधवांच्या प्रेरणेने तयार करण्याचा प्रयत्न करेन. तूर्तास हा लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया अवश्य द्याव्या ही विनंती
Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh.

Keep Current with शिवपाईक

Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

Twitter may remove this content at anytime, convert it as a PDF, save and print for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video

1) Follow Thread Reader App on Twitter so you can easily mention us!

2) Go to a Twitter thread (series of Tweets by the same owner) and mention us with a keyword "unroll" @threadreaderapp unroll

You can practice here first or read more on our help page!

Follow Us on Twitter!

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!