My Authors
Read all threads
#THREAD

विषय :- कॅप्टन मनोज कुमार पांडे

भारत मातेचे अखंडत्व टिकवण्यासाठी अनेक वीरांनी स्वतःच्या प्राणांची आहुती दिली,तिरंगा कायम असाच दिमाखात फडफडत राहावा यासाठी छातीवर गोळ्या घेतल्या !आज अश्याच एका वीर पुरुषाची ,'हिरो ऑफ बटालिक" PVC कॅप्टन मनोज कुमार पांडे यांची कहाणी.
(1/26)
२५ जून १९७५ ला उत्तरप्रदेशातील सीतापूर या गावात मोहिनी पांडे आणि गोपीचंद पांडे यांच्या पोटी मनोज चा जन्म झाला.मनोज हा त्याच्या सगळ्या भावंडांमध्ये सर्वात थोरला.लहानपणा पासून मनोज अगदी धाडसी आणि याच्या धाडसाने गावातील वडीलधारी मंडळी कैकवेळा अचंबित होत.
(2/26)
लखनौ मधील उत्तर प्रदेश सैनिकी शाळेत मनोज चे शिक्षण पूर्ण झाले आणि त्याचे भारतीय सैन्यात दाखल होण्याचा पाया इथूनच भक्कम होत गेला,शाळेत एक हुशार आणि सर्वगुण संपन्न म्हणून मनोज ची ओळख होती.
(3/26)
क्रीडा क्षेत्रात मनोज ने शालेय जीवनात अनेक अनेक पुरस्कार प्राप्त केले होते.बॉक्सिंग आणि बॉडीबिल्डिंग हे त्याचे आवडीचे क्रीडा क्षेत्र.
१९९० च्या सुरवातीला मनोज चे नॅशनल डिफेन्स ऍकॅडमि मध्ये निवड झाली आणि तिकडे देखील तो एक उत्तम विद्यार्थी म्हणून ओळखला जाऊ लागला
(4/26)
त्याचे शिक्षक सांगतात,जेव्हा त्याची interview च्या वेळेला त्याला विचारलं गेलं कि," तुला भारतीय सैन्यात का जायचं आहे?" त्या वेळेस क्षणाचाही विलंब न करता त्याने उत्तर दिले "मला परमवीर चक्र मिळवायचं आहे म्हणून".....
(5/26)
येत्या काळात त्याला परमवीर चक्र मिळालं खरं पण खूप मोठी किंमत मोजून....NDA मधून उत्तीर्ण होऊन त्याची पहिली पोस्टिंग हि काश्मीर मध्ये झाली, १/११ गोरखा रायफल्स या रेजिमेंट मध्ये.
(6/26)
थोडे दिवस गेले आणि सियाचीन येथे त्याची पोस्टिंग झाली आणि बराच काळ १/११ गोरख रायफल्स हि रेजिमेंट तिकडे तैनात होती.
जून १३ १९९९ ला ७००-८०० पाकिस्तानी सैनिक हे नियंत्रण रेषेच्या(LOC ) च्या आत घुसलेले आहेत हे खलुबर,बटालिक मधल्या मेंढपाळांनी भारतीय सैन्याला सांगितले....
(7/26)
आणि या माहितीची पुष्टी झाल्यावर १/११ गोरखा रायफल्स या रेजिमेंट ला सियाचीन पासून बटालिक ला बोलावले गेले. या रेजिमेंट चे नेतृत्व करत होते कॅप्टन मनोज कुमार पांडे.
(8/26)
इथून पुढे खऱ्या अर्थाने मनोज कुमार पांडे यांच्या अदम्य साहसाची कहाणी चालू होते....अक्षरशः चित्तथरारक अशी कहाणी.ते जे पाकिस्तानी सैनिक घुसले होते ते खूप अवघड ठिकाणी जाऊन बसले होते जिथे कोणत्याही प्रकारचे टॅंक किंवा विमानांनी हल्ला करणे अशक्य होते.
(9/26)
घुसलेल्या सैनिकांच्या नेमक्या पोझिशन कळल्यावर भारतीय सैन्याने 'operation विजय" या नावाखाली एक मिशन लाँच केले आणि मनोज कुमार पांडे यांच्या नेतृत्वाखाली बटालिक हिल पुन्हा काबीज करण्यासाठी १/११ गोरखा रेजिमेंट ची प्लॅटून न.५ ला तिकडे पाठवण्याचा निर्णय घेतला.
(10/26)
२ जुलै च्या रात्री कॅप्टन पांडे आणि त्यांची रेजिमेंट पहेलवान चौकी कडे जाण्यासाठी चालू लागली,पहेलवान चौकी हि १९७०० फूट उंचावर असलेली अत्यंत अवघड चढाई असलेली चौकी होती,
(11/26)
या मिशन चा उद्देश हा होता कि पाकिस्तानी सैनिकांनी काबीज केलेल्या चौक्या आणि आपले महत्वाचे पॉईंट वरून त्यांना पळवून लावणे.ज्या वेळेला हे सगळे लोक पहेलवान चौकी कडे जात होते तेव्हा अचानक मोठ्या प्रमाणावर गोळीबार चालू झाला,
(12/26)
प्रसंगावधान दाखवून कॅप्टन पांडे यांनी त्यांच्या सैनिकांना सुरक्षित जागेवर लपण्यास सांगितले,आणि प्लॅटून च्या एका तुकडी ला उजवी कडून सैनिकांवर हल्ला करण्याचे आदेश दिले आणि स्वतः डाव्या बाजूला जाणाऱ्या तुकडी सोबत वर गेले.
(13/26)
"जय महाकाली,अयो गोरखली' अश्या घोषात कॅप्टन मनोज पांडे हे शत्रूवर तुटून पडले आणि या अहिमाहीच्या लढाईत काही क्षणात या प्लॅटून ने पाकिस्तानी सैनिकांचे तळ उध्वस्त करून टाकले,रात्रीच्या काळोखात पाकिस्तानी सैन्यावर खर्यार्थाने १/११ गोरख रेजिमेंट च्या रूपात काळ चालू आला होता.
(14/26)
पाहता पाहता शत्रूचे तीन तळ उध्वस्त करून जात असताना कॅप्टन पांडेंच्या अंगावर कुठून तरी अनेक अनेक गोळ्यांचा वर्षाव झाला,ते जखमी झाले,त्यांच्या नडगी मध्ये गोळी बसली होती,पण याने त्यांच्या चालीवर काहीही फरक पडला नाही,

(15/26)
त्यांनी त्यांच्या डायरी मध्ये एक वाक्य लिहले होते,"स्वतःला सिद्ध करण्याच्या आधी मी मृत्युमुखी पडलो तर,शपथ घेतो कि मी मृत्यू ला पण मारेन" आणि खरंच तसं झालं,एवढ्या गोळ्या लागून सुद्धा ते मृत्युमुखी पडले नाहीत
(16/26)
डोक्यात फक्त एकच लक्ष होतं,पाकिस्तानी सैनिकांना नष्ट करून बटालिक मध्ये तिरंगा झेंडा फडकविण्याचे लक्ष.
३ तळ उध्वस्त करून झाल्यावर जखमी अवस्थेत कॅप्टन पांडे यांनी चौथे तळ सुद्धा काही क्षणात उध्वस्त करून टाकले,
(17/26)
तिकडे ग्रेनेड फेकून पाकिस्तान्यांना 'जन्नत' चा रास्ता मोकळा करून दिला,जवळ जवळ हि लढाई संपत येत असतानाच कुठून तरी एक गोळी आली आणि कॅप्टन पांडेंच्या कपाळाला येऊन लागली.
(18/26)
आता मात्र कॅप्टन पांडे खूप जखमी झाले होते,आपल्या कॅप्टन चे धाडस बघून आपले सैनिक शत्रूवर तुटून पडले....पण चौथ्या बंकर मध्ये कॅप्टन पांडे त्यांचे शेवटचे श्वास घेत होते.
(19/26)
त्यांच्या सोबत शेवटच्या घटकांमध्ये असलेल्या एका कॅप्टन ने त्यांचे शेवटचे शब्द सांगितले,ते शत्रूंकडे बोट दाखवत नेपाळी मध्ये म्हणाले."ना छोडनू(त्यांना सोडू नका)" आणि काही वेळात कॅप्टन पांडे वैकुंठनिवासी झाले,स्वतःला सिद्ध करून,मृत्यूलाही मारून ते मृत्युमुखी पडले.
(20/26)
कॅप्टन मनोज कुमार पांडेंचे धाडस बघून मृत्यूलाही हेवा वाटला असावा.३ जुलै च्या पहाटे आपण बटालिक पॉईंट पुन्हा काबीज केला आणि आपला तिरंगा तिकडे रोवला गेला,कॅप्टन पांडेच्या अदम्य सहसा साठी त्यांना 'HERO OF BATALIK " हि उपाधी दिली गेली.
(21/26)
१९९९ मध्ये त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या साहसासाठी भारतीय सैन्यातील सर्वोच मानाने अर्थात परमवीर चक्र देऊन गौरव करण्यात आले,येत्या काळात ते ज्या शाळेत शिकले त्या शाळेचे नाव उत्तर प्रदेश सैनिक स्कुल पासून ते कॅप्टन मनोज कुमार पांडे सैनिक स्कुल असे ठेवण्यात आले.
(22/26)
उत्तर प्रदेशात Army Welfare Housing Organization (AWHO) च्या अंतर्गत सेवानिवृत्त सैनिकांच्या अपार्टमेंट चे नाव हे त्यांच्या प्रित्यर्थ 'मनोज विहार' असे ठेवण्यात आले.आणि अश्या अनेक वस्तूंचे जागांचे नाव हे कॅप्टन मनोज कुमार पांडे यांच्या स्मरणार्थ ठेवण्यात आले आहे.
(23/26)
आपण या देशाचे नागरिक म्हणून एवढे तरी निश्चित करून शकतो कि अश्या सगळ्या वीरांच्या कहाण्या वाचून,दुसर्यांना वाचून दाखवून एक देशभक्त आणि प्रखर राष्ट्रवादी पिढी निर्माण करू शकतो !
(24/26)
मला आपल्या सैनिकांकडे पाहून "आनंद" चित्रपटातील वाक्य कायम आठवत,"बाबूमोशाय,जिंदगी बडी होनी चाहिये ,लंबी नही",कॅप्टन पांडेना जेव्हा वीरगती प्राप्त झाली तेव्हा ते फक्त २४ वर्षांचे होते,पण त्यांच्या कर्तृत्वामुळे ते खर्यार्थाने #अमर_सैनिक झाले......
(25/26)
दर रविवारी मी #अमर_सैनिक ह्या हॅशटॅग अंतर्गत अजून अश्या अनेक अनेक वीर योध्यांच्या कहाण्या पोस्ट करत राहीन ! तुम्ही देखील हा हॅशटॅग वापरून आपल्या सैनिकांच्या कहाण्या सगळ्यांना सांगा !
तो पर्यंत जय हिंद ! भारत माता कि जय !
Link to facebook post :
m.facebook.com/story.php?stor…
Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh.

Keep Current with Pandeyji_Speaks

Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

Twitter may remove this content at anytime, convert it as a PDF, save and print for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video

1) Follow Thread Reader App on Twitter so you can easily mention us!

2) Go to a Twitter thread (series of Tweets by the same owner) and mention us with a keyword "unroll" @threadreaderapp unroll

You can practice here first or read more on our help page!

Follow Us on Twitter!

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!