#कला माध्यमामध्ये रंगभूषा (Make-up) हा एक खूप महत्त्वाचा भाग असतो हे आपल्याला माहीतच आहे. तसे पाहिले तर खूपवेळा तर या रंगभूषेच्या जोरावर केवळ चित्रपटाला लोकप्रियता मिळते. याच्या मागे असतो तो रंगभूषाकार (Make-up Artist).आपल्या हातामधल्या कलेने समोरच्या कलाकाराचे रूप पालटून टाकायची
असलेली किमया काही जादूगारापेक्षा कमी नाहीये. आपल्याकडे आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजलेले हे #विक्रमगायकवाड यांचे नाव खूप प्रसिद्ध आहे. या जादूगारा बद्दल वेगळे लिहिणार आहेच.
पण रंगभूषेच्या बाबतीत आपल्या पेक्षा खूप पुढे हॉलिवूड चित्रपटसृष्टी आहे यात शंकाच नाही. अशाच काही गाजलेल्या
व्यक्तीरेखांचे रंगभूषा करायच्या अगोदर आणि नंतरचे एक कलेक्शन मिळाले आहे ते आपल्या गलीकरांबरोबर share करतोय. एकदा नक्की बघा या विविध किमयागारांच्या अदभुत किमया.
#ओझम
मल्याळम क्राइम थ्रिलर चित्रपट ओझम
एक हसतं खेळतं कुटुंब, मुलगा (पृथ्वीराज सुकुमारन) परदेशात असतो.
आई वडील बहिण आणि जवळच रहाणारा एक अनाथ मित्र, व प्रेयसी बस एवढंच आनंदी जग.
एक दिवस बहीण वीडियो कॉलिंग द्वारे भावाशी बोलत असता अचानक घरात गुंड येतात आणि आई,वडील व बहिणीचा
खून करतात,मुलगा हे सर्व कैमेरातून पहात असतो पण परदेशात असल्याने काहीच करू शकत नाही,अचानक घड़लेल्या हत्याकांडा मुळे सुन्न झालेला तो जेव्हा त्याला कळत की यात पोलिस डिपार्टमेंट मधील ही व्यक्ती सामिल आहे तेव्हा तो बदला घ्यायच ठरवतो, it प्रोफेशन असलेला मित्र व
प्रेयसी याना सोबत घेऊन या मागील खरे सूत्रधार कोण शोधून काढतो,आणि जे जे या मधे सामिल असतात त्याना संपवत असतो.
एक सामान्य माणूस त्याच्यावर झालेल्या अन्यायाचा बदला मारधाड़ न करता टेक्नोलॉजी च्या सहाय्याने कसा घेऊ शकतो आणि त्यातून सहीसलामत सुटतो,हे फ़िल्म मधून पहायला मिळते.
शेती उत्पादन मार्केटिंग विषय पहिल्यांदाच मांडलेला दिसतो. दलाल पद्धतीमध्ये अडकली भारतीय शेती हा विषय शॉर्ट फिल्ममध्ये मांडला आहे.एका शेतकऱ्याने कांदा उत्पादन करण्यापासून ते मार्केटला विकायला पर्यंतचा प्रवास यामधून मांडला आहे
शेतकरी दलालाच्या कात्रीमध्ये कसा असतो आणि त्याला
शेतकऱ्यांना बघण्यासाठी कशी करतात याची सुंदर रुपये देऊन लेखकाने पटकथा लिहिली आहे. "ज्यांना पिकवता येतं त्यांना घेता येत नाही " आणि "ज्यांना विकता येते त्यांना पिकवता येत नाही."असा सर्व समाजातील सर्वसामान्य व खोलवर जाणारा संदेश यातून दिला आहे. " कोणा हाती देऊ देवा काळजाची कळी,
बळी चाच बळी गेला, बळी चाच बळी. " या गाण्यामध्ये कवी शंकर कसबे यांनी जीव गुंतलेला दिसतो. शेतकऱ्याने पगाराबरोबर मार्केटिंग वरही भर दिला पाहिजे...
फिल्मच्या तंत्रज्ञाना वरून असं वाटते की दिग्दर्शकाचा फिल्ममेकिंग 0 अभ्यास असताना या फिल्मला हात घातला. एकही अँगल बरोबर नाही. फिल्म चालू