#सरसेनापती_संताजीराजे_घोरपडे
भाग-१

राष्ट्र परचक्राचा सामना करत असता संभाजीराजेंसारखा मोहरा कालपटलावरुन नाहिसा होणे हि मरांठ्यांच्या दृष्टिने हानीकारक बाब होती.
राजांच्या बलिदानानंतर ६महिन्यात मरांठ्यांचे राज्य मोडले
बादशहास वाटले मराठे संपले.
तो दिल्लीकडे परतायच्या तयारीला लागला
आणि अचानक एक वादळ घोंगावु लागले. त्या वादळाने मुगल साम्राज्यरुपी जहाजाची छत्रचामरे चिरफाळली, डोलकाठ्या मोडल्या. आणि त्याला परत अपयशाच्या सागराच्या मध्यभागी नेवून ठेवले व यशाचा किनारा कधीही दिसु दिला नाही.
दख्खनच्या धर्तीवर उसळलेल्या या वादळाचे नाव होते "संताजीराजे घोरपडे."
शंभु राज्यांच्या तालमीत तयार झालेले हे वादळ होते....ह्या वादळाला मग कशाची तमा असायला हवी...??
अगदी शंभूराजांप्रमाणेच निर्भिड,लाखोंच्या पटीत असलेल्या सैन्यात मुठभर सैन्य घेऊन घुसण्याचं काळीज फक्त मराठाच बाळगु शकतो....त्याला एक वेडेपण लागते.. ध्येयाने वेडे व्हावे लागते.
सामान्य स्वार राऊतापासुन कारकिर्दिला सुरवात करनार्या संताजींनी पराक्रमाच्या जोरावर सेनापतीपद मिळवले.शिवबांच्या गनीमी काव्याचे तंत्र संताजींनी आधिक विकसीत केले व रणगाझी सेनानींना धुळ चारली.

चिटणीस बखरीनुसार हंबिररावांच्या हाताखाली जे अनेक वीर होते त्यात एक संताजी घोरपडे होते.
संभाजीराजांच्या मृत्यूनंतर छत्रपती राजाराम यांनी राज्याची धुरा वाहिली. त्याच काळात संताजी घोरपडे यांचे नाव धनाजी जाधव यांच्यासोबत घेतले जाई.
या दोघांनी मिळून दीर्घ काळ (१७ वर्षे) औरंगजेबच्या बलाढ्य सेनेचा सामना केला. मोगल सैन्यामध्ये संताजी आणि धनाजी यांची प्रंचड दहशत होती.
अत्यंत नाजूक पडत्या काळात मराठ्यांचे स्वराज्य नष्ट होण्यापासून वाचवले व नंतर स्वराज्य पसरवण्याचे धोरण अवलंबले.
१७०७ मध्ये औरंगजेबच्या मृत्यूसमयी मराठ्यांनी मध्य भारतापर्यंतचा भूभाग स्वराज्यात आणला.
शिवाजी महाराजांनी स्थापिलेल्या स्वराज्याला संताजी व धनाजी यांनी वाचवले व पसरवले.
शंभुराजांच्या मृत्यु नंतर मोघलंनी कोकणात मुसंडी मारली. खुद्द रायगडाला विळखा पडला, जुल्फिकार खान याने रायगड आणि परिसर जिंकण्यासाठी पराकाष्टा केली.
याच दरम्यान संताजी एक नेता म्हणुन उदयास आले. त्यांनी राजाराम, ताराराणी, राजसबाई यांस धनाजीसोबत सुखरूप विळख्यातुन बाहेर काढले.
शंभुराजांच्या मृत्यु, मराठ्यांचे राज्य संपणार या धुंधित मोघल गाफिल असता, याचा बरोबर फायदा संताजिने घेत खुद्द औरंगजेबाच्या तंबूचे कळस कापून नेले.
संताजी ने अवघ्या २००० सैन्यानिशी तुलापुर येथील मोघल छावणीवर हल्ला करुन त्यांची बहुत हानीकरुन सिंहगडावर पसार झाले.
संताजीच्या कारकिर्दीतील सर्वात मोठा विजय म्हणजे दोड्डरी ची लढाई.
संताजीस नेस्तनाबूत करण्यासाठी औरंगजेबाने कासिम खाना बरोबर अनेक नामवंत सरदार जसे खानाजाद खान, असालत खान, मुराद खान पाठवले होते. सोबत मोठा तोफखाना व भरपूर धन-दौलत.
संताजी मोगल सैन्याच्या हालचाली वर लक्ष ठेउन होते.
कासिम खानाने आपले सामान रवाना केल्याची खबर संताजीस मिळाली. संताजिने गनिमी काव्याप्रमाणे आपल्या सैन्याच्या ३ तुकड्या केल्या. पहिल्या तुकडीने कासिम खानाच्या सामानावर हल्ला केला. तो हल्ला परतावण्यासाठी कासिम खानने आपले बरेच सैन्य खानाजाद खाना बरोबर तिथे पाठवून दिले.
दुसर्या तुकडीने खानाजाद खानाला वाटेत गाठला आणि लढाई सुरु केली.
खानाच्या छावणीत शुकशुकाट होता,तिसर्या तुकडीने छावणीवर हल्ला केला व मोगली सैन्याची पूरी वाताहात केली. मोगली सैन्य रणंगण सोडून पळाले व दोडेरीच्या गढ़ीचा आश्रय घेतला. संताजीने या गढ़ीला वेढा घातला आणि मोगलांची रसद मारली.
दोडेरीच्या किल्लेदाराने किल्ल्याचे दरवाजे बंद केले आणि बाहेर असलेल्या कासिम खानाच्या सैन्यास संताजीच्या तावडीत मोकळे सोडले. कासिम खान आणि त्याचे सरदार दोरखंड लाउन एक रात्री किल्ल्यात निघून गेले, फौजेला संताजीच्या तोंडी देऊन. जसे दिवस जाऊ लागले तशी किल्ल्यातली रसद सुद्धा संपत आली.
खानाचे सैन्यतर उपाशी मरू लागले. शेवटी मोग्लंनी संताजीकड़े जीवदानाची याचना केली. संताजीने मोग्लांचे अनेक हत्ती, घोडे, तोफा, नगद, आणि सोबत दोन लाख होनाची खंडणी घेतली. ही नामुष्की सहन न होउन कासिम खानाने विष पिउन आत्महत्या केली. या लढाईचे दाखले मोगल इतिहासकार देतात.

क्रमशः
संताजी घोरपडे या शुरविराबद्दल असे किती जरी धागे लिहिले तरी कमी पडतील., त्यांच्या संपूर्ण कारकीर्दीस न्याय देता येणे एका धाग्यात तरी शक्य नाही.......
त्यामुळेच,
#सरसेनापती_संताजीराजे_घोरपडे
भाग-२ पुढील धाग्यात पुर्ण करुयात.🙏

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with Dr.Nilesh Zalte Patil

Dr.Nilesh Zalte Patil Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @Nilesh_P_Z

16 Sep
#सरसेनापती_धनाजीराव_जाधवराव

औरंगजेबाच्या दिर्घ आणि प्रखर लढ्यानंतर,
शंभूराजांच्या रक्तमय लाल ढगात मराठ्यांचा स्वराज्यसुर्य मावळला व रयतेचा लढा सुरु झाला
तोच २दैदिप्यमान तार्यांनी दख्खनचे नभोमंडप भरून टाकले आणि परकिय आक्रमकांस मातीत मिळवले.
हे तारे होते धनाजी जाधव व संताजी घोरपडे
इ.स.१६८९ ते १७०० या काळातील दख्खनचा इतिहास म्हणजे या दोघांचे जीवनचरित्रच

सिंदखेडच्या जाधवरावांच्या घराण्यात धनाजी जाधव यांचा जन्म झाला.
सेनापती प्रतापराव गुजरांच्या दलात धनाजी यांनी १२व्या वर्षांपासून लष्करी शिक्षण घेतले. पुढे सैन्यात दाखल होऊन हिंदवी स्वराज्याचे सच्चे पाईक बनले
धनाजी जाधव (१६५० ते २७/७/१७०८) हे मराठा साम्राज्याचे सन १६९७ ते १७०८ या काळात सरसेनापती होते.

त्यांनी संभाजी राजांच्या तसेच राजाराम राजांच्या मृत्यूनंतरही मराठ्यांच्या स्वातंत्र्यलढ्याची धुरा वाहिली.
सरसेनापती संताजी घोरपडे यांच्यानंतर धनाजींनी सरसेनापती पदाची सूत्रे हाती घेतली.
Read 13 tweets
11 Sep
#दर्यासारंग_दौलतखान

शिवछत्रपतींनी स्वराज्य स्थापनेत केलेल्या अनेक आमुलाग्र बदलांमधे एक महत्वाची घटना म्हणजे आरमाराची केलेली स्थापना.या आरमारात महाराजांनी अनेक मोठे अधिकारी नेमले आणि स्वपराक्रमाने त्यांनी इतिहासात आपले नाव अजरामर केले,त्यापैकीच एक म्हणजे ‘दर्यासारंग दौलतखान’.
ज्याचा आरमार, त्याचा समुद्र
राजांनी हे सुत्र चांगलंच जाणलं.
स्वतंत्र, सामर्थ्यवान आरमार बांधल्याशिवाय स्वराज्याला पुर्णत्व येणार नाही हे त्यांनी ओळखलं.
१६५७ला राजे कोकणात उतरले,समुद्र जवळुन बघितला,तेव्हा जंजिऱ्याचा सिद्धी, इंग्रज, पोर्तुगीज यांचा पश्चिम किनाऱ्यावर मोठा धाक होता.,
यांना कर दिल्याशिवाय कुठलीच नौका समुद्रात उतरू सुद्धा शकत नसे.
आरमारनिर्मितीचा विचार करुन, कल्याण, ठाणे येथील खाडींमध्ये काम सुरू झाले.
पोर्तुगीज खलाशी लुई व्होगास च्या निगराणी खाली मराठी कारागीर काम करत, उद्देश म्हणजे व्होगास कडुन आपले कारागीर काम शिकुन पारंगत व्हावेत हा होता.
Read 15 tweets
8 Sep
#राजांचा_निष्ठावंत_सिद्धी_हिलाल

शिवाजी महाराजांची लढाई कोणत्याही जातीधर्माविरुद्ध नव्हती, तर सज्जनांचे रक्षण आणि दुर्जनांचा नायनाट यासाठी शिवरायांची तलवार तळपत होती. यावर समाजात अधिक प्रबोधन व्हावे, चर्चा व्हावी यासाठी एका गितकाराने लिहिलेली ही कवाली...
"धर्मविरोधी शिवाजी राजा नका रंगवू आज रे  
मानवतेचे स्वराज्य आपले तोच आपला साज रे
जानो शिवाजी मानो शिवाजी दिखा दो शिवाजी
विचारो का इस जहाँ जो सीखा दो शिवाजी"
-अजय देहाडे, गायक- संगीतकार

वर उल्लेखिलेल्या प्रमाणे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात अनेक मुस्लिम सरदार होते.
पैकी, एक होते महाराजांच्या विश्वासातले, निष्ठावंत., सिद्धी हिलाल...

सिद्धी हिलाल हे आधी शहाजीराजांच्या पदरी होते.
शहाजीराजांनी कोंढाण्याची सुभेदारी आणि परगण्याची जहांगिरी दादोजी कोंडदेवांवर सोपवली व त्यांच्या रक्षणार्थ सिद्धी हिलाल या तरुण- तडफदार शुरवीरास १००० सैन्य दिले.
Read 18 tweets
7 Sep
#अंगरक्षक_सिद्धी_इब्राहीम_खान

ही बारा बलुती जाती अठरा पगड सोबत चालती,
मावळे खंबीर शूरवीर गडकिल्ले हे जिंकती..
हिंदू-मुस्लिम भेदभावाचा गेला पुसुनी ठसा,
कल्याणकारी समतेचा जपला त्यांनी वारसा..
सांगा बरं शिवाजी राजा मुस्लिमविरोधी कसा.. 
असा सडेतोड सवाल करीत या कवालीतून.,
शिवाजी महाराजांची धर्मनिरपेक्ष प्रतिमा आपल्या समोर येते.
पनवेल येथील गीतकार अमोल कदम यांनी हृदयस्पर्शी शब्दांत कवालीमधून राजांची प्रतिमा मांडली.
आज समाजात जातीपातीवरून द्वेष पसरविला जातो., यामुळे राजांच्या मुस्लिम मावळ्यांनी गाजवलेले शौर्य पुन्हा एकदा सांगण्याची आवश्यकता आहे.
या मुस्लिम मावळ्यांचे वर्णन करताना गीतकार म्हणतात, 
महाराजांच्या सेवेला मदारी मेहतर
आरमार प्रमुख दर्यासारंग खंबीर तत्पर
सेनापती नूरखान बेग सारे जागले इमाना
सिद्धी इब्राहिम सांभाळतो महाराजांचा तोफखाना
वकील काझी हैदर पराक्रमी सिद्धी हिलाल 
वाघ नखांचा कारागीर रुस्तमे जमाल...
Read 16 tweets
6 Sep
#गुप्तहेरांचेही_हेर_बहिर्जी_नाईक

५जाने१६६४,
मुघलांचे प्रमुख शहर, सुरत ला बदसुरत करण्यासाठी राजे फौजेसह सुरतेत उतरले, जॉर्ज ओग्झेन्डन हा इंग्रज आपली वखार वाचवण्यासाठी राजांची विनवणी करत होता. तेव्हा महाराजांच्या बाजूस उभा इसम आणि आपल्या वखारीसमोरच्या भिकाऱ्यात त्याला साम्य आढळले.
त्याचे संशयी भाव राजांच्या लक्षात आले, त्यांनी शेजारी त्या इसमाकडे बघितलं, त्याच्या चेहर्यावरील मिश्कील हास्य राजांना सर्व काही सांगत होतं.
हा इसम म्हणजे स्वराज्याच्या गुप्तचर विभागाचे प्रमुख बहिर्जी नाईक.
या घटनेचा उल्लेख त्या इंग्रजाने ईस्ट इंडिया कंपनी अहवालातही केलेला आहे.
बहिर्जींच्या उभ्या आयुष्यात कुणी त्यांना ओळखलं असेल तर तो एकमेव हा इंग्रज.(शिवराज्याभिषेकाच्या चित्रात महाराजांना लवून मुजरा करताना दिसतो त्या हेन्‍री ओग्झेन्डनचा हा भाऊ). 
सुरतच्या वेशीवरून राजांनी इनायतखानास (सुरतचा सुभेदार) निर्वाणीचे पत्र दिले
Read 17 tweets
5 Sep
#महाराणी_सईबाईसाहेब_भोसले
छत्रपती शिवाजी महाराजांच्या एकूण पत्नींपैकी सईबाई या महाराजांच्या अतिशय निकट आणि महाराजांचं स्फूर्तीस्थान.

निंबाळकर घराण्यातील माधोजीराव निंबाळकरांची कन्या सईबाई वयाच्या अवघ्या ७ व्या वर्षी महाराजांच्या पत्नी बनून भोसले घराण्यात आल्या.
सईबाईंचा आणि शिवरायांचा विवाह पुणे येथे १६मे१६४१ साली लालमहालात मोठ्या दिमाखात संपन्न झाला. त्या वेळी महाराज अवघे ११वर्षांचे होते. बालवयात विवाह झाल्याने आपसूकच दोघांच्यात घट्ट ऋणानुबंध निर्माण झाले. सोबत खेळणे…गप्पा…गोष्टी…यामुळे महाराजांचा सईबाईंवर अधिकचा स्नेह होता.
नाव: सई निंबाळकर
जन्म: १६३३फलटण, महाराष्ट्र
वडील:माधोजीराजे निंबाळकर
आई:रेऊबाई निंबाळकर
पती: छत्रपती शिवाजी महाराज
मृत्यू: ५सप्टेंबर१६५९ (२६वर्ष) राजगड,पुणे.

सावळ्या गव्हाळी रंगाच्या सईबाई देखण्या, करारी, रुबाबदार, तलवारबाजीत पारंगत,  महाराजांना शोभणाऱ्या अश्याच होत्या.
Read 12 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!

Follow Us on Twitter!