सामनातील अग्रलेखात ठाकरे ब्रॅन्ड ची साद देऊन राज ठाकरेंना स्वतःकडे आकर्षित करायचा प्रयत्न बरेच काही सांगून जातो. सेनेची सध्याचे नेतृत्व या पक्षाची ठासळलेली प्रतिमा सावरायला पुर्णपणे अपयशी ठरले आहे. महाविकासआघाडी सरकार किती काळ टिकेल हे सांगता येणार नाही पण पुढील निवडणुकीत सेना
कोणत्या तोंडाने मतदारांना सामोरे जाणार काय माहित. महाराष्ट्रातील न्यायव्यवस्थेचे तीनतेरा वाजले आहेत. हे सरकार विकासकामे करण्यापेक्षा स्थगितीवर जास्त जोर देते आहे. कोरोना परिस्थितीचे नियोजन कसे करायचे हे कळतच नाही या सरकारला. लोकांचे हकनाक बळी जात आहे. सर्वांत प्रगतीशील राज्य
म्हणुन बहूमान मिरवणारा महाराष्ट्र सध्या ॲाक्सिजन सिलेंडर, रुग्णवाहिका, शववाहिका, स्मशानभुमी यासारख्या मुलभूत गोष्टींची कमतरता असल्यामुळे झगडतो आहे. ज्यांच्यावर सगळे अवलंबून असते असे मुख्यमंत्री घरातून बाहेर पडेनात. हे सगळे अपशय स्वीकारून त्यावर काम करायचे सोडून पीआर एजन्सी आणि
न्युज मिडियाला हाताशी धरुन स्वताचा उधोउधो करुन घेत आहेत. आता तर मराठी अस्मिता, मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करायचे षड्यंत्र, मराठी माणूस जागा हो असले कालबाह्य विषय बाहेर काढून भावना भडकविण्याचा प्रयत्न चालू झाला आहे. पण आता जनता सुज्ञ झाली आहे. आता जर सेनेची प्रतिमा सावरायची असेल
तर ठाकरे सरकार नैतिक जवाबदारी स्वीकारुन स्वत पायउतार व्हावे. काही दिवस पुन्हा जनसंपर्क वाढवून मग भविष्यातील राजकीय दिशा ठरवावी. केवळ सुडाचे राजकारण न करता फडणवीस सरकारने जी उत्तम कामे केली होती त्याचा अभ्यास करुन स्वतामध्ये सुधारणा घडवून आणाव्यात तरच सेना नावाचा पक्ष टिकेल.

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with अमोल कडू-देशमुख

अमोल कडू-देशमुख Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @KaduAmol

28 Aug
संघटन व सक्रिय व्यक्ती
एक कार्यकर्ता होता, तो नेहमी त्याच्या संघटनेत सक्रिय होता. तो सर्वांना परिचित आणि आदरणीय होता. अचानक तो काही कारणास्तव निष्क्रीय झाला, संबद्ध राहिला आणि संघटनेपासून दूर गेला. काही आठवड्यांनंतर अत्यंत थंडीच्या रात्री त्या संघटनेच्या प्रमुखांनी त्याला भेटायचं
ठरवलं. प्रमुख त्या कार्यकर्त्यांच्या घरी गेले आणि तो कार्यकर्ता घरात एकटाच आढळला. शेकोटीत जळलेल्या लाकडाच्या ज्वाळासमोर बसून तो शेक घेत होता. अग्निही गरम होत होती. त्या कार्यकर्त्याने प्रमुखांचे फार शांतपणे स्वागत केले. दोघे शांतपणे बसले होते. कोणीही एकमेकांशी बोलत नव्हते. फक्त
शेकोटीतील अग्नि पेटत होता. थोड्या वेळाने प्रमुख काहीच न बोलता त्यांनी शेकोटीतील एक पेटते लाकूड उचलून बाजूला ठेवले आणि पुन्हा जागेवर बसले. कार्यकर्ता सर्व गोष्टींकडे लक्ष देत होता. बर्‍याच दिवसांपासून एकटे राहिल्यामुळे त्याच्या मनालाही आनंद होत होता की, आज तो आपल्या संस्थेच्या
Read 7 tweets
27 Aug
छत्रपती शिवरायांची गारद आणि तिचा पुर्ण अर्थ

शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक ६ जुन १६७४ रोजी झाला. शिवराय “छत्रपती” झाले. रयतेला आनंद झाला. सनई चौघडे वाजले. नगारे, नौबती वाजल्या. तोफा झडल्या. इकडे महाराजांची स्वारी दरबाराकडे निघाली. द्वारपालांचे इशारे झाले. गारदी पुढे सरसावले आणि
महाराजांची गारद देण्यात आली.

आस्ते कदम
आस्ते कदम
आस्ते कदम
महाराज
गडपती
गजअश्वपती
भूपती
प्रजापती
सुवर्णरत्नश्रीपती
अष्टवधानजागृत
अष्टप्रधानवेष्टित
न्यायालंकारमंडित
शस्त्रास्त्रशास्त्रपारंगत
राजनितिधुरंधर
प्रौढप्रतापपुरंदर
गोब्राम्हणप्रतिपालक
क्षत्रियकुलावतंस
सिंहासनाधिश्वर
महाराजाधिराज
राजाशिवछत्रपती
महाराजांचा विजय असो.

गारद म्हणजे काय?
महाराज दरबारात प्रवेश करत असताना जी घोषणा किंवा ललकारी दिली जात होती तिला मराठीत ‘गारद’ असे म्हटले जाते. गारदेला संस्कृतमध्ये बिरुद किंवा बिरुदावली तर ऊर्दु भाषेत अल्काब असे म्हणतात.

गारद कोण देतात?
गारद
Read 12 tweets
24 Aug
आपण सगळे दर वर्षी गणपती बसवतो,
पण का बसवतो याचे कारण कोणालाही माहीत नाही.
आपल्या धर्म ग्रंथानुसार भगवान वेद व्यास ऋषि यांनी महाभारत हे महाकाव्य रचले, परंतु त्यांना त्याचे लिखाण करणे शक्य होत नव्हते म्हणून त्यांनी श्री गणेशाची आराधना केली आणि गणपती ला महाभारत लिहिण्याची विनंती
केली. त्या वेळी गणपती ने होकार दिला. हे लिखाण दिवस रात्र चालले आणि त्या मुळे गणपतीला थकवा आला, आणि शरीरातील पाणि ही वर्ज्य झाले अशा वेळी गणपतीच्या शरीराचे तापमान वाढू नये म्हणून व्यास यांनी श्री गणपती ला मृत्तिकेचे म्हणजे मातीचे लेपन केले आणि भाद्रपद शुक्ल चतुर्थीला गणपतीची
यथासांग पूजा केली. माती चे लेपन केले म्हणून गणपती आखडून गेला म्हणून याला पार्थिव गणेश असे नाव पडले. हे लिखाण दहा दिवस चालले. अनंत चतुर्दशीला हे लिखाण संपल्यावर व्यास यांनी गणपती कड़े पाहिले असता त्याच्या शरीराचे तापमान खुप वाढले होते. हे तापमान कमी व्हावे आणि गणपती च्या अंगावरची
Read 4 tweets
18 Aug
मदुराईचे प्रसिद्ध मीनाक्षी मंदिर

तमिळना़डूच्या मध्यावर मदुराई वसले आहे. या मदुराईतच आहे, प्रसिद्ध मीनाक्षी मंदिर. हिरवीगार शेती, उंच डोलणारी नारळाची झाडं नि त्याच्याशी स्पर्धा करत आकाशाकडे हात फैलावत गेलेली गोपूरे. मदुराईची ही ठळक वैशिष्ट्ये म्हणता येतील. शहराच्या बरोबर मध्ये ImageImageImage
मध्ये मीनाक्षी मंदिर वसले आहे.

मदुराईचा इतिहास फार मोठा आहे. अगदी ख्रिस्तपूर्व काळापासून तो सुरू होतो. मदुराईवर राज्य करणाऱ्या पांड्य घराण्याएवढे राज्य दुसऱ्या कोणत्याही भारतीय राजघराण्याने केले नाही. इसवी सनापूर्वी चारशे ते पाचशे वर्षे ते अकदी चौदाव्या शतकापर्यंत या घराण्याने Image
मदुराईवर एकछत्रीपणाने अंमल गाजवला.

मात्र, त्यानंतर अल्लाउद्दीन खिलजीचा सेनापती मलिक काफूरने पांड्यांचा पराभव करून मदुराईचा ताबा घेतला. काफूरने मीनाक्षी मंदिर, सुंदरेश्वरम मंदिराचे बाहेरचे दरवाजे व बुरूजही तोडले होते. सुदैव म्हणून आतले मंदिर वाचले. नंतर बाहेरचे गोपूर पुन्हा एकदा Image
Read 13 tweets
15 Aug
माहिती असावे असे काही.

१५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन आणि २६ जानेवारी प्रजासत्ताक दिन या दोन दिवशी झेंडा फडकावण्या मध्ये फरक काय असतो?

१५ ऑगस्ट या स्वातंत्र्यदिनी झेंड्याला दोरीद्वारे खालून वर नेले जाते आणी त्यानंतर उघडून झेंडा फडकवला जातो. याला 'ध्वजारोहण' ( Flag Hoisting) असे
म्हटले जाते. १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी देशाचे पंतप्रधान लाल किल्ल्यावरून 'ध्वजारोहण' करतात कारण स्वातंत्र्य दिनी भारतीय संविधान लागू झाले नव्हते आणि राष्ट्रपती यांनी पदभार ग्रहण केला नव्हता. या दिवशी पंतप्रधान आपला संदेश भारतवासीयांना देतात.

२६ जानेवारी प्रजासत्ताक दिनी झेंडा हा
हा वरच बांधलेला असतो नंतर दोरीद्वारे उघडून फडकवला जातो. याला झेंडा फडकावणे (Flag Unfurling) असे म्हणतात. या दिवशीच भारतीय संविधान लागू झाले होते म्हणून या दिवशी राष्ट्रपती राजपथ येथे झेंडा फडकवतात.
Read 4 tweets
14 Aug
हिंदुत्व म्हणजे काय? हिंदु कोण?

‘छत्रपती शिवाजी महाराज कि’ असे बोलले कि ज्यांच्या तोंडून आपसुक ‘जय’ निघते तो हिंदु!

देवगिरी किल्ला आणि हंम्पीतील भग्न मुर्ती पाहून ज्यांचे मन विचलित होते तो हिंदु!

रस्त्यातून जाताना मंदिर दिसले कि ज्याचे हात जोडले जातात तो हिंदु!
श्रीक्षेत्र वढू ला गेल्या नंतर ज्यांचे डोळे पाण्याने भरुन येतात तो हिंदु!

चित्तौडगड वर गेल्यावर अंगावर शहारे येतात तो हिंदु!

अयोध्या, काशी, मथुरा मध्ये जाऊन नतमस्तक होतो आणि सगळं ठिक होईल हि आशा बाळगतो तो हिंदु!

जेवणाचे ताट आले कि हात जोडून अन्नदाताबद्दल आभार मानतो तो हिंदु!
पहाटे सुर्याेद्यावेळी सुर्याच्या पायी पडून कृतज्ञता व्यक्त करतो तो हिंदु!

वाटेत गौमाता दिसली तर तिला हात लावुन तिचे आशिर्वाद घेतो तो हिंदु!

गर्दीत चुकून कोणाला पाय लागला तर नम्रपणे पाया पडून माफी मागतो तो हिंदु!

तुकोबांच्या अभंगात मग्न होतो, माऊलींच्या पसायदानात रंगतो तो हिंदु
Read 8 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!

Follow Us on Twitter!