परवा एका व्यक्ति मला म्हणाली तुला "अरे तुला छ. शिवाजी महाराज यांच्यात एवढा इंटरेस्ट का आहे ?
जगात इतके पराक्रमी राजे आहेत ?

सारखं आपलं शिवराय शिवराय.... तो थोडीच जगातला सगळ्यात पराक्रमी राजा होता?"
त्याला मी म्हणालो नीट ऐक,
"मी जाणिवपूर्वक विधान करतो की छ. शिवाजी महाराज हे सतराव्या शतकातले आंतरराष्ट्रीय किर्तीचे सेनानी होते. जगात तुलना नाही असे राजे होते..."

माझं बोलणं मध्येच तोडत ती व्यक्ती म्हणाली
"सिध्द करून दाखव"
मी ठीक आहे म्हणलं. तसंही लायब्ररीतील बरीचशी जनता डोकावून पाहत होती

यापेक्षा चांगली संधी नाही, मी म्हंटलं

महाराजांनी त्यांच्या 50 वर्षाच्या कारकिर्दीत जेवढे सेनानी पराभूत केले त्यातले फक्त दोघेच भारतीय होते.
बाकी सगळे परकीय होते. त्यांच्या त्यांच्या देशाचे मानांकित सेनानी होते.
शिवरायांनी पराभूत केलेले सेनानी पाहु -
ज्याची लाल महालात बोटं छाटली तो शाहिस्तेखान
तो अबु-तालिबानचा नबाब, तुर्कस्तानचा नबाब आहे.

तो प्रतिऔरंगजेब या नावाने ओळखला जायचा, औरंगजेबाचा सक्खा मामा आहे तो.
बंगाल प्रांत जिंकुन दिलाय त्याने.. असा बलाढ्य सेनानी महाराजांनी एका रात्रीत तीन बोट छाटली.... पहाट व्हायच्या आत गायब झाला तॊ पुन्हा नाही आला...

तो बहलोलखान पठाण सिकंदर चिडरखान पठाण हे सगळे पठाण अफगाणी आहेत. अफगाणीस्तानचे आहेत हे..
तो दिलेरखान.. मंगोलियन आहे तो, बाबा... मंगोलिया देशाचा सर्वोत्तम योद्धा... महराजांनी त्याचा पराभव केला.

सिद्धि जौहर, सिद्धी सलाबत खान हे सगळे इराणी आहेत. इराण चे आहेत सर्वोत्तम योद्धे आहेत महाराजांनी त्यांचा पराभव केला.
आणि इथं लोणावळ्याच्या उंबरखिंडीत ज्याचा कोंडून पराभव केला...असा की गिनिज बुकला सुद्धा त्याची नोंद घ्यावी लागली की जगातल्या सगळ्यात कमी सैन्याने जास्तित जास्त सैन्याचा पराभव केला
( एक हजार विरुद्ध 30 हजार आणि 30 हजारंचा संपूर्ण पराभव 1000 मधला एकही मावळा न गमावता )
तो कहार्तलब खान तो उझबेकिस्तान म्हणजे आताच्या ताश्कंद रशियाचा आहे त्याचा पराभव केला.

इंग्रज-गवर्नर लिहितो की छ. शिवाजी महाराज जर अजून 10 वर्षे जगले असते तर इंग्रजांना पूर्ण हिंदुस्तानचा नीट चेहरा पाहता सुध्दा आला नसता...
सतराव्या शतकात लंडन मध्ये 3 वृत्तपत्रे प्रकाशीत होत होती. त्यामध्ये लंडन गॅझेट नावाचं वृत्तपत्र होत .छ. शिवाजी महाराज ज्यावेळी आग्र्याहून निसटले त्यावेळी या लंडन गॅझेट मध्ये पहिल्या पानावर ती बातमी छापून आलेली.
त्यात छ. शिवाजी महाराजांचा उल्लेख किंग ऑफ स्वराज्या असा नव्हता, किंग ऑफ मराठा असाही नव्हता.... तर त्यात माझ्या राजांचा उल्लेख
Shivaaji the king of India असा होता...
व्हियेतनाम नावाचे छोटसं राष्ट्र आहे हो राष्ट्रचं, आपल्या पुणे जिल्ह्याएवढेपण नसेल. व्हिएतनामचं आत्ताची महासत्ता अमेरिकेसोबत गेली 35 वर्षे युद्ध सुरू होते. पण या युध्दात अमेरिकेला विजय मिळाला नाही. का माहितीये कारण--

त्या व्हिएतनामच्या चौकात शिवाजी महाराजांचा पुतळा आहे....
त्या व्हिएतनामचा स्वातंत्र्यसेनानी "हू जी मीन" नांव त्याचे. त्याच्या समाधीवर लिहून ठेवलंय छ. शिवाजी महाराजांचा एक मावळा येथे चीरविश्रांती घेतोय....

अमेरिकेच्या बोस्टन विद्यापीठात"शिवाजी द मॅनेजमेंट गुरू" या विषयावर 100 मार्काँचा पेपर घेतला जातो.
जगातली 112 राष्ट्र शिवरायांच्या गोरील्ला warfair (युधतंत्र) चा वापर आपल्या अभ्यासक्रमात करतात.
पाकिस्तानच्या पाठ्यपुस्तकात शिवरायांचा अभ्यासक्रम शिकवला जात.
मी म्हणालो आता तूच सांग सगळं जग शिवरायांचा अभ्यास करतंय तिथं माझ्या देशातल्या अभ्यासक्रमात किती वेळा शिवरायांचा उल्लेख आहे
तुम्ही इतिहास शिकलात त्या CBSC मध्ये 1700 पानांचे पुस्तक काढलंय. त्यात फक्त 4 ओळी आहेत शिवाजी महाराजां बद्दल म्हणून तुला ही माहिती नव्हती... म्हणुन तुम्ही असं म्हणालात...

औरंगजेबाने आयुष्यातीलं ऐन उमेदीची २७ वर्ष तब्बल....
हो २७ वर्ष या महाराष्ट्रात मराठ्यांशी निकाराची झुंज देण्यात वाया घालवली.

त्याने हिच २७ वर्ष इतर कुठल्याही ठिकाणी घालवली असती तर कदाचीत ही अर्धी पृथ्वी त्याच्या अधिपत्याखाली आली असती...
इतक्या प्रचंड शक्तीशाली फौजेचा तो बादशाह होता पण मराठ्यांनी त्याला दिल्लीचे तख्त पुन्हा पाहु दिले नाही...

कारण अख्ख्या जगाला माहिती आहे..की छत्रपती शिवाजी महाराज काय होते.

#जय_शिवराय
#शिवराय_असे_शक्तीदाता
साभार - रोहन आजगावकर सर ❤️🚩

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with मी पण बोलतोच

मी पण बोलतोच Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @KKW_NH66

10 Sep
#इतिहास_शिवरायांचा
#शिवकालीन_दिनविशेष

१० सप्टेंबर इ.स.१६६६
छत्रपती शिवरायांनी कोल्हापूर जवळील "किल्ले रांगणा" जिंकला.
या किल्ल्याचा खूप मोठा इतिहास आहे.
समुद्र सपाटीपासून सुमारे ७७० मीटर उंचीवर असणारा हा किल्ला.
शिलाहार वंशीय राजा महामंडलेश्वर भोज (दुसरा) ने इसवी सन ११८७ च्या आसपास बांधला.
बहामणी राजा महमद गवाण याने इसवी सन १४७० मध्ये जिंकला.
१६५७ पर्यंत आदिलशहाच्या ताब्यात तर,
नंतर शिवाजी महाराजांनी विजापुरांकडून जिंकून घेतला,
१६७०-७१ मध्ये शिवाजी महाराजांनी या गडाची डागडूगी केली.
या डागडूगीसाठी ६००० होन खर्च केल्याची इतिहासात नोंद आहे…
कोल्हापूर वरून थेट ७० कि. मी. अंतरावर असलेले पाटगाव या ठिकाणावरून ७/८ किलोमीटर वर आहे.
Read 14 tweets
27 Aug
#इतिहास_शिवरायांचा
#शिवकालीन_दिनविशेष

🚩२८ ऑगस्ट इ.स.१६६७🚩
औरंगजेब बादशहाच्या आदेशाने मिर्झाराजे जयसिंग यांच्यावर बुऱ्हाणपूर येथे विषप्रयोग करून त्यांना ठार करण्यात आले.

#जय_शिवराय
🚩२८ ऑगस्ट इ.स.१६७९🚩
छत्रपती शिवरायांनी खांदेरी बेट जिंकले.
मुंबई बंदराच्या तोंडावर खांदेरी-उंदेरी बेटावर किल्ला बांधावयाचे योजले.त्यादृष्टीने कारागीर व मालमसाला चौलजवळ ठरवुन महाराजांनी मायनाक भंडारीला सैन्य देऊन रवाना केले.
#जय_शिवराय
मुंबई बेटावर नियंत्रण ठेऊन शत्रूच्या आरमारी हालचालींना जरब बसणे या मागचा उद्देश होता. यातुन मावळ्यांच्या फौजा व इंग्रजामध्ये संघर्ष उडाला.

🚩२८ ऑगस्ट इ.स.१६८२🚩
दंडाराजपुरीचा फौजदार याकुतखान व खैरातखान ह्यास देण्याकरिता उत्तम पोशाख बहरामंदखानाच्या हवाली करण्यात आला.
#जय_शिवराय
Read 4 tweets
26 Aug
#इतिहास_शिवरायांचा
#शिवकालीन_दिनविशेष

🚩२७ऑगस्ट १६५६🚩
रायगड फत्ते करून शिवाजी राजानी चंद्रराव मोर्याची मग्रुर गर्रदन उडवली.
महाजाविरूद्ध कारवाया करणारा यशवंतराव मोरे यांस महाराजांनी ठार मारले व जावळी खोर्यावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले .

#जय_शिवराय
🚩२७ऑगस्ट १६७९🚩
१६७९च्या पावसाळ्यात माजगावच्या बंदराचे काही काम सुरू असल्याने सुरक्षेच्या द्रष्टीने इंग्रांजानी सिध्दीला आरमार सुरतला नागरण्यास सांगितले व सिद्धी आरमारासह सुरतेस गेला. शिवाजी महाराजांचे हेर या सर्व हालचालीकडे अत्यंत बारीक नजर ठेवून होते

#जय_शिवराय
आणि या वेळेचा फायदा उठवायचा असे ठरवून महाराजांनी साहित्य, काही दारु गोळा व आपली माणसे चौलच्या ठाण्यात जमवली.
इंग्रजाच्या पोर्तुगीज आणि काही हिन्दु हेराकडुन ही माहीती इंग्रजाना कळली. हेरानी स्पष्ट कळविले होते की आज शिवाजीला रोखले नाही

#जय_शिवराय
Read 8 tweets
26 Aug
#इतिहास_शिवरायांचा
#शिवकालीन_दिनविशेष

🚩२६ ऑगस्ट इ.स.१६७९🚩
मराठी मुलखात लूटमार करणाऱ्या सिद्दीला मदत करणाऱ्या इंगजाना धडा शिकवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी मुंबई बंदराजवळ खांदेरी उंदेरी बेटावर किल्ला बांधण्याचे ठरवले.
#जय_शिवराय
त्यादृष्टीने त्यांनी चौलजवळ कारागीर आणि बांधकाम साहित्य जमवणे सुरू केले.मराठ्यांचे आरमार खांदेरी बेटावर राहिल्यास इंग्रजांच्या हालचालीवर नियंत्रण येणार होते त्यामुळे घाबरून त्यांनी खांदेरी व उंदेरी बेटे आपल्या मालकीची आहेत असा दावा केला.
#जय_शिवराय
सातासमुद्रापार आलेल्या इंग्रजांना आपल्या बलदंड आरामरावर प्रचंड विश्वास होता त्यामुळे शिवाजी महाराजांना त्यांनी आव्हान दिले. शिवाजी महाराजांनीही न डगमगता इंग्रजांचे हे आव्हान स्वीकारले व मायनाक भंडारीला 150 माणसे व 4 तोफा देऊन खांदेरी बेटावर पाठवले.
#जय_शिवराय
Read 8 tweets
4 Jul
#Threads #threadstorytime
#महाराष्ट्र

"मराठी माणूस आता तरी जागा हो "

पैसा नाही कमवला तर पुढच्या पिढीकडे एक गुंठाही जमीन शिल्लक राहणार नाही...
टप्पा १:- १९५० ते १९७५
या कालावधीत मराठी माणसाकडे गावाकडे भरपूर जमीन होती.
सरासरी प्रत्येक कुटुंब २०-३० एकर जमिनीचे मालक...
मोठे वाडे...
दांडगा रुबाब...
निसर्गावर चालणारी शेती...
अगदी १० वी-१२ वी शिकलेले शिक्षक, मिलिटरी भरती, पोलीस भरती झाले तसेच स्पर्धा परीक्षेत सहज यश मिळायचे
अनेक पदवीधर PSI, Dy. SP , तहसीलदार त्या काळात झाले.
नाही जरी नोकरी लागली तर आहे की 20-30 एकर शेती.
उत्तम शेती, दुय्य्म नोकरी, तृतीय व्यापार अशी म्हण होती.
हा काळ म्हणजे मराठी माणूस राजा होता.
Read 16 tweets
22 Jun
#threadstorytime
🐉 धूर्त चिनी ड्रॅगनची योजनाबद्ध आक्रमकता-

मागील पाच वर्षांचा मागोवा घेत जर निरीक्षण केले, तर चीनच्या आक्रमकते मागे एक खास योजनाबद्ध पॅटर्न दिसून येतो.
जिथे जिथे ही चार महत्वाची ट्राय-जंक्शन्स आहेत, नेमकी तिथेच हा धूर्त चीन भारतात आपले सैन्य घुसवायचा प्रयत्न करतो. ही चारही ट्राय-जंक्शन्स चीनला काहीही करून घशात घालायची आहेत. कारण चीनला माहीत आहे की त्याशिवाय हिमालयीन युद्धक्षेत्रात डॉमीनन्स मिळविणे अशक्य आहे.
नेमक्या याच चार ट्राय-जंक्शन्सवर चीन वारंवार घुसखोरी करून भारताविरुद्ध मनोवैज्ञानिक दबावतंत्राचा वापर करीत असतो. दुसऱ्या शब्दात चीन भारताची लष्करी तयारी आणि मनोबलाची एक चाचणी घेत असतो.
Read 11 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!

Follow Us on Twitter!