#थ्रेड

मराठा साम्राज्याचे झेंडे अटकेपार रघुनाथरावाने, बाळाजी बाजीराव (नानासाहेब पेशवे) पेशवा असताना लावले, बाजीरावांनी म्हणजेच राऊंनी नाही. रघुनाथराव हे याच बाजीरावांचे चिरंजीव. बाजीरावांबद्दल काही सांगायचं असेल तर खूप काही आहे.
सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे 'बाजीरावांच' अस्तित्व फक्त 'बाजीराव-मस्तानी' या गोष्टीसाठी नसून 'हिंदवी स्वराज्याला ' महत्वाकांक्षाचे पंख लावून नर्मदेपार नेणारा हा पेशवा होता. ४२ लढाया लढून एकही लढाई न हरणारा हा पेशवा होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या साठी स्वराज्य यज्ञ सुरु केला
आणि छत्रपती संभाजी महाराजांनी ज्यासाठी आपल्या प्राणच बलिदान केलं त्याच चीज करणारा हा पेशवा होता. बंगश, निझाम यांच्यासारख्यांना मराठ्यांच्या तलवारीचं पाणी चाखवणारा हा पेशवा होता.
बाजीरावाचा जन्म १८ ऑगस्ट १७०० ला झाला. त्यांचे खरे नाव विश्वनाथ' होते. अशी आख्यायिका आहे कि १८ ऑगस्टला
बाळाजीपंत 'बाजी' नावाचे जितके वीरपुरुष होऊन गेले त्यांच्याबद्दल माहिती वाचत होते त्याचवेळी हे पुत्ररत्न झाल्याने याचेही नाव बाजीराव ठेवण्यात आले. परंतु या आख्यायिकेला कोणतेच लिखित संदर्भ नाहीत. याच बाजीरावांना घर 'राऊ' असं संबोधत असत.
१७२० साली बालाजी विश्वनाथ कैलासवासी झाले.
यापुढे #साताऱ्याला बरीच राजकारण सुरु झाली. चिमणाजी मोघेंना आता पेशवाई द्यावी असं म्हणणारा एक गट उभा राहिला आणि बाजीरावांस पेशवाई द्यावी असं म्हणणारा दुसरा. पुरंदरे, पवार, जाधवराव हे सगळे बाजीरावांच्या बाजूने उभे राहिले. अखेर छत्रपती शाहूंनी त्यांचे गुरु ब्रह्मेंद्रस्वामी यांची
भेट घेतली आणि नंतर 'बाजीरावांना' पेशवा म्हणून घोषित केले. बाजीरावांचा दिल्लीतील पराक्रम, त्यांची सैन्यावरची पकड हे सर्व छत्रपतींना ज्ञात होतेच. दिल्लीतून बाळाजी विश्वनाथ यांनी ज्यावेळी सनदा आणल्या त्याही वेळी बाजीराव त्यांच्यासोबत होते, हा सर्व इतिहास छत्रपतींना माहित होता
त्यामुळे तसेही छत्रपती स्वतःही हे पद बाजीरावांनाच द्यावे या पक्षाचे होते.
अवघ्या विसाव्या वर्षी बाजीराव पेशवा झाले. छत्रपतींना बाजीरावांबद्दल जो विश्वास होता तो त्यांनी कधीच खोटा ठरू दिला नाही. १७२१ ते १७२५ बाजीरावांनी नाशिक, गोंडवन, खान्देश, माळवा, औरंगाबाद, गुजरात या प्रांतातून
छत्रपतींना सरदेशमुखी आणि चौथाई वसूल करून दिली. दिल्लीतून सनदा मिळाल्या होत्या पण प्रत्यक्षात वसुली कोण देतो? ती वसुली मिळवावी लागते ती बाजीरावांनी सैन्यबळावर प्रथम मिळवून दिली.
नोव्हेंबर १७२५ ते एप्रिल १७२७ बाजीरावांच्या सेनेने कृष्णा नदी ओलांडली आणि दक्षिणेतील गुत्तीचे मुरारराव
घोरपडे, म्हैसूरचा वाडियार, अर्काट, गदग, कनकगिरी, चित्रदुर्ग, सुरपूर, लक्ष्मेश्वर, श्रीरंगपट्टण, बिदनूर येथील सर्व राजांना छत्रपतींचे मंडलिक राजे बनवले. या सर्वांना सरदेशमुखी आणि चौथाई देण्यास भाग पाडले. पुढे तंजावर आणि मदुरै पर्यंत जायचा बाजीरावांचा विचार होता पण त्यांच्या
हितशत्रूंनी केलेल्या कारस्थानांमुळे त्यांना परत फिरावे लागले.
पुढे १७२७-२८ ला निजामाबरोबर झालेल्या युद्धात तर बाजीरावांनी फारच मोठा पराक्रम केला. या 'पालखेडच्या' लढाईवर तर एक अख्ख वेगळं उत्तर लिहावं लागेल. 'स्ट्रॅटेजिक वॉरफेर'चा एक उत्तम नमुना होतं हे युद्ध.
या युद्धामुळे निजामसारख्या मुरब्बी राजकारण्याने बाजीरावांसमोर सपशेल शरणांगती पत्करली. तारण्याताठ्या बाजीरावांनी औरंगजेबाकडून धडे घेतलेल्या निजामाला लोळवलं. हा बाजीरावांच्या आयुष्यातील परमोच्च बिंदू होता.
आता बाजीरावांनी आपली नजर उत्तरेकडे वळवली.
राजा छत्रसाल हे छत्रपती शिवाजी महाराजांना दैवतच मानायचे. याच छत्रसाल राजांनी दिल्लीवर हल्ला करायची तयारी केली. हे समजल्यावर दिल्लीच्या बादशहाने आपला सरदार बंगश याला राजा छत्रसाल यांच्यावर पाठवलं. बंगशची फौज मोठी होती. यावेळी छत्रसालांनी बाजीरावाकडे मदत मागितली. बाजीराव वायुवेगाने
बुंदेलखंडात पोहोचले आणि त्यांनी बंगशचा पराभव केला. इथे मराठ्यांना झाशी आणि सागर हे दोन आणखीन सुभे मिळाले. बाजीरावांनी गोविंदपंत बुंदेले (हे तेच गोविंदपंत जे पुढे पानिपतच्या आधी पडले) यांना सागर आणि नेवाळकर (हेच झाशीच्या राणीचे पूर्वज (सासरकडून) यांना नेमले.
बाजीरावांच पुढच एक वर्ष आपल्याच माणसांशी लढण्यात गेल. १७३१ हे वर्ष निजामाने चिथावल्यामुळे बाजीराव आणि छत्रपती शाहूंविरुद्ध जाणाऱ्या त्र्यंबकराव दाभाड्यांशी लढण्यात गेलं. १७३३ मध्ये बाजीरावांनी कोकणावर मोहीम काढली. नागोठणे, पेण, पनवेल, दंडा-राजपुरी, महाड, पाचाड, बिरवाडी, दाभोळ,
गुहागर, श्रीवर्धन वगैरे ठाणी जिंकून घेतली.
आता पाळी दिल्लीची. हीच मग्रूर दिल्ली जिने पदोपदी आपल्या छत्रपतिंचा शिवाजी महाराजांचा अपमान केला होता. १७३७ मध्ये बाजीरावाने थेट दिल्लीवरच हल्ला केला. आज छत्रपतींचे स्वप्न बाजीरावांनी पूर्ण केले. याचा बदला घेण्यासाठी बादशहाने निजामाला
चिथावले. १७३७ च्या अखेरीस निजामाने युद्धाची तयारी केली. पुन्हा एकदा आपल्या युद्धकौशल्याने बाजीरावांनी निजामाला पाणी पाजले. जो निजाम 'काफर बाजीरावला नर्मदेवर कधीच पाऊल ठेऊ देणार नाही असं म्हणत होता' त्याने स्वतःच बाजीरावांशी नाक मुठीत धरून तह केला आणि "नर्मदा आणि चंबळ नद्यांमधला
प्रदेश आणि पन्नास लक्ष रुपये युद्धखर्च बादशाहाकडून द्यायचे कबुल केले.
या आणि अश्या कित्येक लढाया या मराठी वाघाने आपल्या बुद्धिकौशल्यावर आणि युद्धकौशल्यावर जिंकल्या. या सर्व लढायांवर एक एक असे वेगळे उत्तर होऊ शकेल यांचे संदर्भसुद्धा मी खाली देतो आहे. पण बाजीरावांच्या पराक्रमाची
आणि दराऱ्याची प्रचिती यावी म्हणून खाली २ प्रसंग देतो आहे.

राधाबाईंची काशी यात्रा:

१४ फेब्रुवारी १७३५ ला बाजीरावांच्या माता राधाबाई या कशी यात्रेला निघाल्या. सोबत दीडशेची फौज, जावई आबाजी नाईक आणि महादजीपंत पुरंदरे एव्हढेच होते. पण बाजीरावांचा दरारा पहा कि उदयपूरच्या राण्याने
राधाबाईंना आठवडाभर थांबवून घेऊन त्यांचा आदरसत्कार केला. जयपूरचा राजा सवाई जयसिंग यांनी तर राधाबाईंना दोन महिने आपल्याकडे पाहुणचारासाठी ठेवले. पुढे बादशहाने स्वतः आपल्या सरदारांना राधाबाई आपल्या मुलुखातून जातील तर त्यांना जराही तोशिष पोहोचवू नये अशी तंबी दिली. १७ ऑक्टोबर १७३५ ला
राधाबाई काशीला पोहोचल्या जे त्यावेळी बंगशच्या ताब्यात होते. हा तोच बंगश ज्याने छत्रसालांवर हल्ला केला म्हणून बाजीरावांनी त्याला हरवले होते. बाजीरावांचा पराक्रम त्याच्या इतका लक्षात होता कि त्याने आपल्या दिवाणाबरोबर (हरिप्रसाद) राधाबाईंना नजराणा पाठवला आणि त्यांच्या यात्रेचा खर्च
उचलला. पुढे राधाबाई गया, सागर येथे जाऊन अखेर तब्बल दीड वर्षांनी मे १७३६ ला पुण्यात पोहोचल्या. राधाबाईंना मुघलांकडून मिळालेली हि वागणूक म्हणजे त्यांचा चांगुलपणा नसून बाजीरावांची जरब हेच त्याचे कारण होते.

बाजीरावांची राजपुतान्यात भेट:

बाजीराव १७३५ मध्ये राजपुतान्याकडे निघाले.
उद्देश सोपा होता राजपुतांना मुघलांविरुद्ध एकत्र करणं. यावेळी जयपूर,उदयपूर, बिकानेर अश्या राजपुतांकडे बाजीराव जाऊन आले. उदयपूरच्या राण्याने बाजीरावांच्या स्वागतासाठी दोन सोन्याची सिंहासन ठेवली होती राण्याने बाजीरावांना बसण्याची विनंती केली परंतु तिथे न बसता बाजीराव चक्क खाली जाऊन
चांदीच्या स्थानावर बसले. राणा आश्चर्यचकित झाला यावेळी बाजीराव म्हणाले' महापराक्रमी महाराणाप्रताप यांची हि गादी आहे, मी सातारकर छत्रपतींचा सेवक मी या सिंहासनावर बसू शकत नाही'. हे ऐकून जयपूरच्या जयसिंगानेही अशीच दोन सोन्याची आसन ठेवली. यावेळी बाजीराव सरळ जाऊन त्या सिंहासनावर बसले.
जयसिंगाला हे थोडे अपमानास्पद वाटले परंतु यावेळी बाजीरावांनी त्यांना सांगितले कि 'ती उदयपूरची गाडी महाराणा प्रतापांची होती त्यांनी अकबराच्या कुठल्याही आमिषांना आणि धमक्यांना न जुमानता मुघलांचा विरोध केला. आपल्या पूर्वजांनी तर स्वतःच्या मुली मुगलांना देऊन त्यांची गुलामगिरी पत्करली
या गादीचा काय त मान?" या पुढे राणा जयसिंगांची समजूत काढून बाजीरावांनी त्यांना आपल्या आगमनाचे उद्दिष्ट सांगितले. असो पण एका पेशव्याला एव्हढा मान राजपुतान्यांतील राण्यांनी देणं हे बाजीरावांच्या पराक्रमच प्रशस्तिपत्रकच आहे.

बाजीरावांना काशीबाईंपासून बाळाजी (नानासाहेब), जनार्दनपंत
आणि रघुनाथराव हि तीन अपत्ये होती. तर मस्तानीबाईंकडून समशेरबहाद्दर हा मुलगा. याशिवाय काशीबाईंना आणि बाजीरावांना 'रामचंद्र' हा मुलगा होता परंतु तो लहानपणीच वाराला आणि दुसरा मुलगा जन्मताच वारला. या बाजीरावाने ज्या मराठ्यांनी २७ वर्ष औरंगजेबाला' या महाराष्ट्रात खिळवून ठेऊन इथेच गाडलं
त्या सर्व मराठ्यांची ताकद दिल्लीला आणि समस्त भारताला दाखवून दिली. एकही लढाई न हरणारा हा मराठा 'मराठ्यांच्याच' नाही तर भारताच्या इतिहासात अमर होऊन गेला. २८ एप्रिल १७४० रोजी हा अपराजित सेनानी जीवनाची लढाई हरला. या अश्या वीरश्रीने भरलेल्या पेशव्याचा बॉलीवूडने केलेला देवदास पाहून
याचा हा पराक्रमाने भरलेला इतिहास जगासमोर यावा हीच माझी इच्छा आहे. ज्याप्रमाणे मराठी माणसाला छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे स्वराज्य स्थापना करणारे थोर संकल्पक लाभले, या स्वराज्यासाठी बलिदान देणारे छत्रपती संभाजी महाराज लाभले त्याचप्रमाणे याच स्वराज्याला गरुडभरारी देणारा या उमदा
पेशवा लाभला हे आपलं भाग्यच.

माहिती चा स्त्रोत्र

१. पेशवाई: कौस्तुभ कस्तुरे

२. बाजीराव पेशवे यांची छोटी बखर

३. मराठ्यांच्या इतिहासाची साधने: राजवाडे

४. पेशवे घराण्याचा इतिहास: प्रमोद ओक

लेखक:- सुयोग शेंबेकर

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with ShreeRaj Tripute (Shree)

ShreeRaj Tripute (Shree) Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @ShriRajTripute_

22 Sep
थ्रेड

#FarmersBill:-

नरेंद्र मोदी सरकारने आणलेला नवीन कायदा आणि त्यामुळे होणारा परिणाम

या कायद्याला समजून घेण्याच्या पूर्वी आपण सध्याची परिस्थिती समजून घेऊया.

१) उसाचे पिक नगद मानले जाते. महाराष्ट्रात उसाला दर जास्तीत जास्त ३४०० मिळतो. रिलायंस उत्तर प्रदेशात पाच हजार आणि साडे
पाच हजार मिळतो. आपल्याकडे बाजूच्या कारखान्याला शेतकरी उस टाकू शकत नाही कारण झोनबंदी आहे. ( हे नाटक नवीन कायद्याने कायमचे बंद होईल. म्हणून सगळे उससम्राट पिसाळले आहेत. )

२) कापसाच्या बाबतीत कापूस एकाधिकार योजना आहे अर्थात शेतकरी फेडरेशन ला कापूस टाकण्यास बाध्य आहे.
आज या योजनेचा फास बराच मोकळा झाला आहे परंतु १९८० पासून आजवर या योजनेने शेतकरी अक्षरशः भिकेला लावला आहे. विदर्भातील आत्महत्यांचे एक मुख्य कारण कापूस एकाधिकार आहे. सरकारी फेडरेशन कापूस विकत घेणार. कापसाची ग्रेड , ग्रेडर ठरवणार. ग्रेडर कोण राजकीय हितसंबंध बघून लावलेले कार्यकर्ते जे
Read 17 tweets
22 Sep
ज्या कालखंडातील काळाला भारतातून सोन्याचा धूर निघायचा किंवा सोने की चिडिया अस ओळखतात तो कालखंड म्हणाजे गुप्त घराण्याचा इतिहास. त्याची सुरुवात केली समुद्र गुप्त ने.

भारतवर्षात महाभारत आणि रामायण काल्पनिक की सत्य यावर मतभेद आहे. हा कालखंड सोडल तर गेल्या 2500 वर्षात समुद्र्गुप्ता
सारखा लढवय्या आणि पराक्रमी राजा झाला नाही. या राजाने एक सुद्धा लढाई हरले नाही.पण आपल्या इतिहासात याला स्थान का मिळाले नाही याचेच नवल वाटते.याच वंशातील चंद्रगुप्त द्वितीय कालखंडाला भारताचा सुवर्णयुग म्हणतात.

भारतात सातव्या शतकापासून अरब लोकांचे हल्ले होते आहे. अकराव्या शतकापासून
भारतात 700 वर्ष मुस्लिम राजवटीचे वर्चस्वाखाली होते तरीसुद्धा तिसऱ्या शतकातील समुद्रगुप्ता च्या पराक्रमाचे अनेक पुरावे आहेत.आज सुद्धा अनेक ठिकाणी हे पुरावे सापडतात.

प्रयाग (अलाहाबाद) इथे एक मोठा शिलालेख आहे ज्यात कवी हरिसेन यांनी समुद्रगुप्त ने जिंकलेले देशाची यादीच लिहली आहे.
Read 19 tweets
21 Sep
विरोधकांनो, मला एक छोटीशी मदत हवी आहे,
कराल का प्लिज?🙏

काल मोदी सरकारने ऐतिहासिक शेती उत्पन्न व्यापार आणि वाणिज्य (प्रोत्साहन व सुलभता) विधेयक, २०२०, शेतमाल हमी भाव आणि शेती सेवा करार (सबलीकरण आणि संरक्षण) विधेयक, २०२० आणि अत्यावश्यक वस्तू (दुरुस्ती) विधेयक, २०२० ही विधेयके 👇
लोकसभेत पास केली आहेत. ही विधेयके शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने दलाल आणि इतर सर्व अडथळ्यांपासून मुक्त करेल. या कृषी सुधारणांमुळे शेतकऱ्यांना त्यांचा शेतमाल विकायला नवीन संधी मिळतील. यामुळे त्यांचा नफा वाढेल. याद्वारे कृषी क्षेत्राला आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ मिळेल आणि शेतकरी सक्षम 👇
होईल! शेतकरी स्वतःच्या मर्जीचा मालक असेल. शेतकऱ्याला आपला शेतमाल थेट विकण्याचे स्वातंत्र्य असेल. कर न लावल्यामुळे शेतकर्‍यांना अधिक भाव मिळेल आणि नागरिकांनाही कमी किंमतीत माल मिळेल. खासगी गुंतवणूकीमुळे शेतीला गती येईल, रोजगार वाढेल आणि अर्थव्यवस्था बळकट होईल. 👇
Read 9 tweets
21 Sep
#थ्रेड

#गारदी:- काही लोकांच्या मते गारदी हा इंग्रजांच्या गार्ड चा अपभ्रंश आहे, म्हणजे पगारावर चालणारी सेना आहे.

प्रत्येक शासक मराठा किंवा निझाम एक विशेष फौज बाळगून असे, जे गुंडगिरीसाठी आणि युद्धात कामी येत असे. उत्तर च्या भागात पेंढारी आणि दक्षिणेकडे गारदी प्रसिद्ध होते.
पेंढारी नावाची एक जमात त्यावेळी पेशवे ,होळकर, शिंदे कडे असत. तर पेशव्याकडे गारदी शत्रूवर हल्ला न करता ते शत्रूच्या प्रदेशात धुडघूस घालत. गोंधळ माजवत त्यांची रसद लुटत. त्य्यांची इतर ठाण्यावरची लोकांना त्रास देत. कारण शाहू / पेशव्याने असा नियम केला की स्वारीने पैसा स्वारीतूनच उभा
करावा व आपली गरज भागवावी. पर्यायाने मग ही लुटालुट सुरू झाली. ह्यामुळे झाले काय की मराठ्यांबद्दलचा विश्वास राजपुतां आणि उत्तराकडे मधून कमी झाला. त्यांना ते लुटारू संबोधू लागले. व म्हणून जेंव्हा अब्दाली आला तेंव्हा ही ब्याद परस्पर गेली तर बरी असा विचार उत्तरेत सुरू झाला.
Read 14 tweets
20 Sep
#Thread

जगातील गूढ देशांमध्ये चीनचा वरचा क्रमांक आहे. विसाव्या शतकात सर्वाधिक उलथापालथ झालेला हा देश. एकविसाव्या शतकावरही याचा मोठा प्रभाव असणार हे पहिल्या वीस वर्षांमध्ये स्पष्ट झालंय. साम्यवादी क्रांती, माओंचे प्रयोग, डेंग झ्याव पिंग यांचे आर्थिक उदारीकरण, सीमा विस्तारवाद,
आर्थिक साम्राज्यवाद, वैयक्तिक स्वातंत्र्याची दडपशाही आणि जगभरात पसरणाऱ्या वेगवेगळ्या व्हायरसचे माहेरघर असा चीनचा प्रवास आहे.

हा थ्रेड अधिक आटोपशीर असावा म्हणून साम्यवादी क्रांती ( १९४९ ) नंतरच्याच चीनची काळी बाजू दाखवणाऱ्या प्रमुख घटनांचा आढावा घेतला आहे.
चिनी कम्यून : माओंचे साम्यवादी मॉडेल हे रशियापेक्षा वेगळे होते. माओंच्या साम्यवादी मॉडेलचा शेतकरी हा गाभा होता. रशियातील साम्यवादी मॉडेल हे मजूरकेंद्रीत होते. माओंनी शेतकऱ्यांच्या विकासासाठी सामुदायीक शेतीचा प्रयोग राबवला होता. त्यामुळे चीनमध्ये १९५० च्या दशकात अनेक कम्यून
Read 22 tweets
20 Sep
#Thread

#शनिवार_वाडा:- पुण्यामध्ये भुताटकीच्या जागांपैकी पहिला क्रमांक लागेल शनिवार वाड्याचा. मध्यवर्ती भागात असून देखील पौर्णिमा च्या रात्री इथे काका मला वाचवा अशी खूप लोकांना हाक ऐकू यायची…नारायणराव ची हत्या पौर्णिमेच्या दिवशीच झाली होती. इतिहासाची अनेक रहस्य या वाड्यात आहेत.
कित्येक अभागी मृत्यू या वाड्याने पाहिले आहेत.नारायण पेशवेचा खून,सवाई माधवराव यांची आत्महत्या, माधवराव चे आजारपण, नानासाहेब ,विश्वासराव ,पाहिले बाजीराव, चिमाजी अप्पा, सदाशिवभाऊ यांच्या मृत्य पण पहिला, पुनाच्या शनीवारवाड्याबद्दल एक दंतकथा सांगितली जाते, पहिल्या बाजीरावाने त्या
ठिकाणी एका सस्याला मोठ्या शिकारी कुत्र्याचा पाठलाग करताना बघितले, त्याला त्याचे आश्चर्य वाटले, त्या जागी मग त्याने भुईकोट किल्लाच बांधूून घेतला हाच तो शनिवारवाडा आणखी एक आख्यायिका आहे की बाजीराव यांच्या पत्नी काशीबाई हिच्या सखीच्या नवऱ्याचा बाजीराव यांनी हत्या केल्यावर त्या सखीने
Read 14 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!

Follow Us on Twitter!