#चिपळूणच्या_गोविंदगडावरची #चित्तथरारक_ऐतिहासिक_घनघोर_लढाई
#सरनोबत_नरवीर_पिलाजी_गोळे

🚩५ ऑक्टोबर १७३३🚩

शब्दांकन: सरनौबत नरवीर पिलाजी गोळे यांचा वंशज,
आग्रावीर अँड मारुती बबन गोळे

सर्व दुर्ग मित्रांना, दुर्ग अभ्यासकांना, दुर्ग भटक्यांना नमस्कार Image
मित्रांनो इतिहासाची पाने जेवढी उलगडून पहिली जातात, वाचली जातात तेवढा इतिहास हा जगासमोर आणता येतो,
इतिहासाचा अभ्यास करत असताना, नवनवीन संशोधन करताना कधी कधी आपल्याच घराण्याचे जर मूळ पत्र सापडले तर जो आनंद मिळतो त्याला जोड नाही,
इतिहासात छत्रपती शिवराय, यांनी जवळपास 350 गड, दुर्ग स्वराज्यत समाविष्ट केले, काही नवीन बांधले, अन त्याच गडांमुळे नंतरच्या कालखंडात हिंदवी स्वराज्य हे अटकेपार झेंडा लावण्यात यशस्वी झाले, प्रत्येक गडावर रणसंग्राम झाला आहे, प्रत्येक दुर्गावर घनघोर युद्ध झाले आहे,
अन प्रत्येक लढाईत आपला मराठा मावळा सरदार हा निकराने झुंज देऊन गडावर भगवा झेंडा फडकवला आहे,
अशीच एक घनघोर, चित्तथरारक लढाई रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील गोवळकोट गिरिदुर्ग वर झाली,
साधारण पणे इसवी सन 1660 साली छत्रपती शिवरायांनी गोवळकोट व अंजनवेल हे दोन किनारी दुर्ग स्वराज्यात समाविष्ट केले त्यांची नावे अनुक्रमे गोविंदगड अन गोपाळगड अशी ठेवली

पुढे छत्रपती संभाजी महाराज यांच्या व छत्रपती राजाराम महाराज यांच्या कालखंडात गोवळकोट हा सिद्दीच्या ताब्यात गेला,
हा सिद्दी म्हणजे याचे नाव सिद्दीसात असे आहे, जंजिरे उर्फ मेहरुब चे सिद्दी याचे पूर्वज होते
आफ्रिका मधून आलेली ही लढाऊ मुसलमान ,हशबी नावाने ओळखले जातात,
कोणाशीही हातमिळवणी करून फक्त किनाऱ्यावर राज्य टिकावे हीच यांची इच्छा आहे
पोर्तुगीज, डच, इंग्रज, आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही, मोगलांच्या बरोबर कधी ही तह करण्यास तयार असे मात्र मराठ्यांच्या बरोबर नेहमीच लढाई कारण त्यांना माहिती होते मराठे एकदा का घुसले तर आपल्याला आफ्रिकेत जावं लागेल,
अनेक लढाया आपण सिद्दी बराबर केल्या त्यात मुरुड च्या जंजिरे मेहरुब साठी लय लढाया झाल्या,
दुर्दैवाने तिथं आपल्याला कधीच यश मिळाले नाही याच्या उलट
गोवळकोट ला 2 लढाया झाल्या अन दुसऱ्या लढाईत तह नुसार गड आपल्या स्वराज्यत आला

अशीच दोन लढाई पैकी पहिली लढाई तुमच्या समोर लिहीत आहे
दिवसामागून दिवस गेले, छत्रपती शिवराय, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज, छत्रपती शाहू महाराज यांच्या कारकिर्दीत गोवळकोट हा किनारी दुर्ग आपल्या ताब्यात ठेवण अतिशय महत्वाचे होते,
भौगोलिकदृष्ट्या या किनारी, गिरिदुर्ग ला फार महत्त्वाचे होते, चिपळूण पासून हाकेच्या अंतरावर,
3 बाजूनी वाशिष्ठी नदीचे महाकाय पात्र तर एका बाजूला खंदक, असा अभेद्य गिरिदुर्ग आहे,समुद्रकिनारी दुर्ग सुद्धा म्हणतात, आकाराने छोटा आहे पण गडावर मुबलक पाणी, अन समुद्र किनारा जवळ असल्याने पाहिजे ती रसद या हरामी सिद्दी ला मिळत असे,
1733 साल उजाडले होते छत्रपती शाहू महाराज यांनी
मराठा साम्राज्य विस्तार हा पार दूरपर्यंत नेला होता, वेळोवेळी तह, प्रसंगी लढाई, कडवे धोरण स्वीकारले होते त्यामुळे मराठ्यांच्या ताकदीपुढे कोणाचा टिकाव लागत नव्हता पण अजूनही किनारपट्टीवर म्हणावे तसे आपले राज्य निर्माण झाले नव्हते त्याला कारण म्हणजे हे सिद्दी लोक,
मांडूळ प्रमाणे बदलणारे हे सिद्दी,
1730 नंतर ते 1740 पर्यन्त संबंद कोकणपट्टी ताब्यात घेण्यासाठी मराठेशाही एकवटली होती

गोवळकोट च्या सिद्दी ला अनेक निरोप धाडले होते पण मग्रूर सिद्दी सात काय जुमानत नव्हता

मग साताऱ्याहून छत्रपती शाहू महाराज यांनी पुणेत महान पराक्रमी
श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांना सांगून त्यांनी राजश्री यामाजी पंत अण्णा अन हिम्मत बहाद्दर सरकार यांच्याकडे गोवळकोट जिंकून ताब्यात आणण्याची जबाबदारी दिली गेली ,

सरदार,मावळे निवडीच काम चालू होते, आता खासी कोकणावर चालून जायचं म्हणजे कोकण अन घाटमाथा यावर मर्दुमकी
गाजवणारा मराठा सोबत पाहिजे ,

मग पुन्हा एकदा अतिशय महत्वची जबाबदारी #गोळे_घराण्यावर आली

हिंदवी स्वराज्यासाठी प्राणांची आहुती, बलिदान देणारे घराणे म्हणजे पराक्रमी गोळे घराणे,
4 छत्रपती सोबत इमानाने देईल ती जबाबदारी पार पडणारे घराणे,
यावेळी पिलाजी गोळे हयातीत नव्हते पण सुभानजी पुत्र तरणाबन गडी एन जवानित प्रवेश केलेला सरनौबत वंशज म्हणजे आंनदराव गोळे
वय 24, पैलवान गडी, पिळदार शरीर, उंच पुरा, देखणा,गोळे घराणे सदैव पायदळी काम केलेले घराणे, तलवार बाजी साठी तर आंनद राव प्रसिद्ध होते,5000 जोर मारणारा हा हुकमी मल्ल
अन तेवढाच लढवय्या गडी,

सरनौबत घराण्यात जन्म घेतला अन त्याच वेळी स्वराज्यसाठी जीवाची पर्वा न करता कधीपण लढण्याची तयारी म्हणजे गोळे,

पुणेतून लाखोटा तोपर्यंत वाड्यावर आला होता
आनंदराव नुकताच तालमीतून वाड्यावर आला होता
लाखोटा वाचून लगेचच तयारीला लागला , बंधू मंडळींना एकत्र जमवले,
कामगिरी, मोहिमेचे महत्व सांगून ताबडतोब निघायच्या सूचना दिल्या,घरात पवित्र नवरात्रीच्या घट बसवले होते मनोमन दर्शन घेऊन,
आजोबा सरनौबत नरवीर पिलाजी गोळे यांच्या समाधी जवळ सर्व जण गेले अन आशीर्वाद घेऊन नतमस्तक होऊन,शेजारी जगदीश्वर मंदिरत अभिषेक घातला,
मग गोळे घराण्यातील हे मर्द मराठे सरदार ,11 जण सातारा कडे प्रस्थान केले,विचार फक्त स्वराज्याची तळमळ,

तोपर्यंत राजश्री यामाजी पंत अण्णा अन बाकी वरीष्ठ मंडळी तयार होतीच
ताबडतोब सर्व सैन्य हे उंब्रज मार्गे कुंभार्ली घाटातून खाली उतरले,बऱ्यापैकी थंडी होती,
मजल दरमजल करत चिपळूण शहर गाठले,

तारीख उजाडली होती 4 ऑक्टोबर 1733 ,वार गुरुवार होता संध्याकाळी
सर्व नियोजन सुरू होते सरदार महादजी घाटगे, सरदार सायजीपंत, रायाजीपंत मुख्य नियोजन पाहत होते
कासी बंदर बाजूने कोणी पुढं जायचं, घोडदळ हिराबाराव दळवी कडे होते
तर राजश्री गंगाबाराव, राजश्री दादा हे मोपा बाजूने सिद्दी ला बाहेर काढणार, तर कलेश्वर डोंगराच्या बाजूने येसाजी गायकवाड, धनाजी थोरात, सिदोजी वरगे, अन त्यांच्यासोबत 50 बंदूकधारी अन परदेशी अशी मंडळी होती

खाडी उतरून डाव्या बाजूने खडकावर येऊन एकच हल्ला सगळीकडून करायचं ठरवलं होतं,
एव्हाना पहाट व्हायला आली होती

आनंदराव अन येसाजी यांनी खंदक वर चालून थेट बुरुजाकडे जायचं अन मुख्य महादरवाजा वर हल्ला करायचं होतं,

रात्रीच्या अंधारात सर्व जणांनी मिळेल ते खाऊन कमरेला तलवारी लावल्या, पागोटे गुंडाळून, ढाल पाठीवर चढवली,
गरम रक्ताचे हे मावळे, शिवबाने घडवलेल्या स्वराज्यत, सह्याद्रीच्या कुशीत वाढलेले हे सेनानी असल्या सिद्दी ला काय घाबरणार
चिपळूण पासून 2 किलोमीटर अंतरावर हा गिरिदुर्ग पण रात्रीची वेळ अन शत्रू ला सावध न करता अचानक हल्ला करायचं होतं,
करकर झाडी तुडवत दरमजल करत ठरल्याप्रमाणे सगळं करायला
पहाट उजाडली,

अन तो ऐतिहासिक दिवसाची पहाट उजाडली
#शुक्रवार_5_ऑक्टोबर_1733
हो हो ऐतिहासिक दिवस उजाडला होता
कोंबडा अरवयला लागला होता, तांबडे सूर्यकिरण गडावर येण्याच्या आत एकच गदारोळ उठला, हर हर महादेवच्या आवाजांनी संबंद चिपळूण जाग झालं होतं

चोहोबाजूंनी एकच हल्ला,
जय भवानी जय शिवाजी, हर हर महादेव एकच आवाज,

धुवाधार कापाकापी सुरू होती, सगळे सरदार मावळे त्वेषाने लढत होते, नुसती धुमचक्री सुरू होती,
गडावरून सुद्धा तोफांचा मारा सुरू होता, गोफण, सरकी, जेंजल्यांचा मारा शत्रूकडून होत होता, आपल्या पैकी कोणच तरी डोकं फुटत होत तर कोणाला गंभीर जखमा
होत होत्या,

पण मराठे काय थांबायला तयार नव्हते नुसती कापाकापी अन हर हर महादेव,जय भवानी जय शिवाजी, एवढंच सुरू होत

आंनदराव अन त्याचे भाऊ तुफानी लढत होते,
आनंद राव ची तलवार तर अफलातून सुरू होती, ए रपाक ,ए धूप, खाचाकच दाणादाण उडवली होती आनंदरावने, त्याची तलवार बाजी पाहुन जुने सोबत
असलेले सरदार तर म्हणत होते अरे हा तर दुसरा पिलाजी आहे,

किती माणसे कापली असेल गिणती नाही,
सिद्दीच आज काय खरं नव्हतं, पण आपल्याकडची पण माणसे जायबंदी, हुतात्मा होत होती, पहाटे 6 घटका लढाई रणसंग्राम सुरू होता,
6 घटका सिद्दी ला सुधारत नव्हते, स्वतः सिद्दीसात आतून त्याच्या माणसांना
प्रेरणा देत होता पण आता त्यांची गय नाय,
आनंदरावाने तर आता डोक्यावर असलेले पागोटे काढले होते, 5 चुलत भाऊ स्वराज्यसाठी त्याच्या डोळ्यासमोर कामी आले होते यामुळे तर त्याचे डोके नुसते गरम झाले होते,
ऐन धुमळीत आत घुसून त्याने अनेक सिद्दी मुसलमानांशी एकटा लढत होता
अरे काय तलवार चालत होती बापरे
सपासप कापाकापी अन रक्ताचा सडा निर्माण केला होता,

मग बाप्पू कराडकर पायदळ ला येऊन मिळाले , सरदार मायाजी फडतरे, प्रतपजी जावरे, जनबा नाईक, रायाजी हडदरे, हणगोजी अन कबजी गोलंडे यांनी निकराची झुंज दिली,
आता लढाई आरपार सुरू होती,कासीबंदर जोपर्यंत आपण हाणून पाडत नाही तोपर्यंत लढाई जिंकता येन अवघड होते कारण बंदर कडून सिद्दी ला मदत मिळणार होती अन तेच झालं अचानक कासी बंदर कडून 5 गलबते भरून सिद्दी आले अन तिथं निकाराची लढाई झाली त्यांच्याकडे असलेल्या तत्कालीन अत्याधुनिक बंदुकीच्या
जोरावर कासी बंदर ला आपण मागे हटत गेलो त्यामुळे गलबते मधून सिद्दी लोक दारुगोळा अन बंदुका घेऊन गडात आले आता सिद्दी डबल झाला होता
तरीपण खंदक पर्यंत आपण गेलो होतो पण पहाटे च्या वेळी नेमकं चरावर सुळ होते त्या अंधारात न समजल्याने तिथं आपले गायकवाड यांचे 2 शिपाई, दीपजी, कान्हाजी,
राजाराम जयसिंग गंभीर जखमी झाले

आता बुरुजाकडे अन दरवाजा जवळ जी लढाई सुरू होती ती तलवार ने लढाई सुरू होती पण 5 गलबते मधील सिद्दी गडावर पोहोचले त्यामुळे त्यांच्याकडे बंदुका होत्या

गडावरून बंदूक मधून आता मावळ्यांना टिपण त्यांना सोपं जाऊ लागलं,
आनंदरावचे उर्वरित 5 भाऊ सुद्धालढता लढता ,
सिद्दीच्या गोळ्या लागून ,
स्वराज्यसाठी कामी आले,
गोळे घराण्यातील एकूण 10 भाऊ कामी आले होते,
पण हा पिलाजी चा नातू काय ऐकायला तयार नव्हता त्याने त्याची तलवार तर आता लय जोमाने चालवत होता एका एका तलवारीच्या घावात गनीम ठार करत होता,
डोक्यात तलवार घातली तर कमरेपर्यंत तलवार येत होती आशा महान ताकदीचा हा सरदार आनंदराव होता,एका एका तलवारीच्या घावात 4 ,4 सिद्दी ला यमनसदनी पाठवत होता,
कपडे रक्ताने माखले होते,6 घटका तलवार चालू होती,
स्वतः बुरुजवरून सिद्दीसात अन त्याचा वजीर आनंदरावचा पराक्रम पाहत होता
मग सिद्दी ने त्याचे खास परदेशी नेमबाज बोलवले होते इकडे सूर्य उगवत होता, सूर्यकिरण गडावर पडत होते अन सिद्दीच्या एक तरबेज बंदूकधाऱ्याने एक गोळी झाडली अन ती गोळी थेट येऊन आनंदरावच्या हृदययात घुसली,
छातीत गोळी घुसली ,
एक ढाण्या वाघाला जांभुर्याच्या गोळीने टिपलं होत,तरीपण या पठ्ठे ची
तलवार थांबत नव्हती, वाहणारे रक्त थांबत नव्हते,

पण नजरेतून सिद्दीला चावून खायची हिम्मत दाखवत होता, त्याच्या डोळ्याच्या धारेतून सुद्धा बुरुज वरचा सिद्दीला घाम फुटला होता, त्याच्या जवळपास यायला गनीम घाबरत होता,

अरे लढवय्या धर्म आमचा, स्वराज्य साठी अखेरपर्यंत लढणार हीच एक जिद्द
उराशी बाळगून हा पिलाजीचा नातू लढत होता,
शेजारी लढत असलेला खंडोजी जाधव, बाप्पू कराडकर यांनाही गोळ्या लागल्या होत्या ते पण स्वराज्यसाठी कामी आले होते

अखेर 6 घटका तलवार चालून आपली घराण्याची लढवय्या ओळख कायम ठेवत सरदार आनंदराव गोळे यांनी देह ठेवला,एक पराक्रमी वादळ कायमच शांत झालं,
इकडे गावाला देवघरात असलेला दिवा अचानक विझला,
ऐन तारुण्यात असलेला ढाण्या वाघ स्वराज्यसाठी प्राणांची आहुती देऊन गेला,

पराक्रमची शर्थ केली होती गोळे घराण्यातील या लढाईत 11 जण हुतात्मा झाले होते, स्वराज्यसाठी हुतात्मा होणं काय सरनौबत गोळे मंडळी ना नवीन नव्हता,घरण्याचं नाव काढलं,
स्वराज्यसाठी रक्त सांडवल होत,

तिकडे राजश्री गंगाधरराव घाटगे, अंजनवेल पर्यत घुसले होते, दोन्ही ठिकाणी घमासान असल्याने अण्णाजी पंत ने तात्पुरती माघार घेऊन आपले सैन्य चिपळूण कडे वळवले अन नवीन रणनीती करू लागले

अशा प्रकारे 5 ऑक्टोबर 1733 ला एक अपरिचित रणसंग्राम झाला अन
गोळे घराण्यातील सरनौबत पुन्हा एकदा हिंदवी स्वराज्याच्या साठी कामी आले,

#संदर्भ ::
ऐतिहासिक पेशवे खंड 33 ,
मधील पत्रसार नंबर 115 ,
इतिहास संशोधक मंडळ,
सदाशिव पेठ ,
पुणे

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with मी पण बोलतोच

मी पण बोलतोच Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @KKW_NH66

9 Jan
#इतिहास_शिवरायांचा
#शिवकालीन_दिनविशेष
#जय_शिवराय
#जय_शंभूराजे
#Threadकर

🚩९ जानेवारी १६३३🚩
पहांटे भंडाऱ्याच्या होंगरावर प्रसिद्ध सत्पुरुष तुकारामबोवा यांना स्वप्नांत गुरुपदेश झाला.
हा गुरुपदेश होण्यापूर्वी तुकारामाची मानसिक व्यथा पाहण्यासारखी आहे. शके १५२० मध्ये Image
एकनाथमहाराज समाधिस्थ झाल्यावर दहाच वर्षांनी तुकोबांचा जन्म देहू येथे झाला. त्यांच्या घरामध्ये भगवद्भक्ति पहिल्यापासूनच असून वडील बोल्होबा यांची पंढरीची वारी अखंडपणे चालू होती. घरी थोडी शेती, व्यापारधंदा व सावकारी होती. या कुटुंबांत वयाची तेरा वर्षे तुकोबांनी आनंदांत घालवली.
त्यानंतर त्यांचे लग्न झाले. पहिली बायको दमेकरी निघाली म्हणून दुसरे लग्न केले. बोल्होबांनी सर्व संप्तार तुकोबांच्या गळ्यांत टाकला. तुकाराम- बोवांनीहि आरंभाच्या काळांत चोखपणे संसार केला. पण त्यानंतर एका- मागून एक दुःखाचे डोंगर कोसळले. वयाच्या सतराव्या वर्षी वडील निवर्तले.
Read 27 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!

Follow Us on Twitter!