मागच्या नोव्हेंबर मध्ये सबंध महाराष्ट्राची दिवाळी कडवट केलेल्या सरकारचा वाढदिवस येतोय. या वर्षीची दिवाळी शेतकऱ्यांनी साजरी कशी करायची..?

एकाही शिवसैनिकाची शेती पाण्याखाली गेली नसेल..? आणि गेली असेल तरीही जर ते शांत बसुन पोवाडे म्हणत असतील तर हे गुलामीचं लक्षण आहे.
शेतकऱ्यांना 'उखाड दिया' शिर्षकासह एखादा अग्रलेख आलाय का आज..? का अमृता फडणवीसांना उपदेशाचे डोस पाजण्यात वैचारिक दिवाळखोरी जगजाहीर करणार आहात..? पर्यावरण मंत्र्यांनी शुद्ध आणि अस्सलखित इंग्रजीत कांजुरमार्गसाठी जमिन हस्तांतरीत केल्याचं ऐकलं आणि पाहीलंय..
पर्यावरणमंत्र्यांंनी इंग्रजीत का असेना पाण्याखाली गेलेल्या जमीनीचे आणि पिकांचे नुकसानीचे आकडे सांगितले तर मदत होईल समजायला आणि 'मराठी अस्मिता' ही सुखावेल काही काळासाठी.

पंचनामे करण्याचे आदेश देणारे कृषीमंत्री यांनी पंचनाम्यात काय काय बघायचं सांगितलंय..? पिक- जमीन पाण्याखाली..
आहे.. सोयाबीन तर वाहुनच गेलंय..मग भिजलेल्या मातीच्या ढेकळांतली आर्द्रता मोजणार का..? काय निकष असतील पंचनामे करतांना.. यापेक्षा सरसकट मदत केली तर तुम्हां सर्वांची प्रॉपर्टी संपणार नाही.

शपथपत्रात कोटीचे आकडे भरणारांनी लक्षात ठेवावं की अन्नदात्याकडे आज 'कोटीभर' धान्य शिल्लक नाही.
साहेब.. तुमचा पावसात भिजल्याचा व्हिडीओ व्हॉट्सअप च्या स्टेटस रा ठेवला होता सबंध महाराष्ट्राने. मी सुद्धा.. तुम्ही सिद्ध केलं होतं लढवय्या आहात म्हणून. धनुभाऊंनी पण सांगितलं होतं "नाद करा...पण पवार साहेबांचा कुठं?" तुमच्या स्टेटस ला ठेवलीत का फोटो.. उर बडवून रडणाऱ्या..
शेतकरी बांधवाची. म्हणून तर तुम्ही विश्वासाला पात्र रहात नाहीत.

इतरांना राजकारण करू नका सांगतांना... आज आम्ही सांगतोय राजकारण करा..आणि राज्यातल्या अन्नदात्याला मदत करा.

बॉलिवूड कुठे जाणार नाही मुख्यमंत्री महोदय. आम्ही आणखी एक वर्ष चित्रपट बघणार नाहीत.. पण शेतकऱ्यांना..
मदतीसाठी तयार आहोत. सिएम रिलीफ फंड वापरा आता तरी.. मेट्रो नकोय आम्हांला कारण विना अन्न रिकाम्या पोटी मेट्रोचा प्रवास कोणालाच नको असेल.

विनंती आहे.. घराबाहेर या.. अस्मानी संकटात आज तुमची गरज आहे महाराष्ट्राला.

जय महाराष्ट्र..! 🙏
शेवटी दोन ओळी सांगतो...

रूसवे- फुगवे, भांडण-तंटा लाख कळा,
आपला तुपला हिशोब आहे हा सगळा.
रोख पावती इथेच द्यावी अन घ्यावी,
'गगनासी' नेणे गा-हाणे #नामंजूर.

- संदिप खरे

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with Ganesh Swami.

Ganesh Swami. Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @swami_vachan

10 Oct
हम कथा सुनातें हैं..
प्रभु श्रीरामचंद्र-सुग्रीव, कृष्ण-अर्जुन, कृष्ण-सुदामा, कर्ण-दुर्योधन, छत्रपती शिवाजी महाराज-तानाजी मालुसरे, छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलशजी..किती तरी जोड्यांची नांवे घेऊ शकतो आपण ज्यांनी 'मैत्री' या शब्दाची व्याप्ती हिमालयापेक्षा उत्तुंग केली.👇
सबकुछ शेअर करण्याचा हक्काचा कोपरा. सुख दुखाःतल्या अश्रुंची वाट आणि हक्काचा खांदा. नो फॉर्मलिटीज आणि दिखाऊपणा. यशाच्या शिखरावर असतांना 'माझा मित्र' आहे हे छातीठोकपणे सांगणारं आणि संकटात 'मी आहे' म्हणत तोफेच्या तोंडी जाणारं नातं म्हणजे मैत्री. एक में दो चाय..मैत्री.👇
दोन डोळ्यांनी बघितलेलं आणि सत्यात आणलेलं एक स्वप्नं आणि एका मैत्रीची गोष्ट.
मैत्री ज्याची बॉण्डींग 37 वर्षांची आहे. मैत्री जी निरपेक्ष आहे..फक्त अमर्याद विश्वास आणि प्रचंड आदर हे एकमेव ज्या मैत्रीचं आधारमुल्य आहे अश्या मैत्रीची गोष्ट.
गोष्टीचे नायक..👇
Read 24 tweets
7 Oct
हम कथा सुनाते है...
गोष्ट आहे एका खासदाराची जो तिसऱ्या वेळेस दिड लाख मतांनी निवडून येतो. भारतीय लोकशाहीच्या मंदिरात स्वतःच्या सन्मानासाठी तो तत्कालीन लोकसभा अध्यक्ष सोमनाथ चटर्जी यांना एक प्रश्न विचारतो की, 'हे सदन माझा स्विकार करायला तयार आहे का? अन्यथा मी बाहेर पडतो.' 👇
दि.12 मार्च 2007 स्थळ संसदेतील लोकसभा सदन.. गोरखपुर, उत्तर प्रदेशचे खासदार योगी आदित्यनाथ यांचे अश्रु समस्त देशाने पाहिले. कारण थ्रेडमध्ये योग्य क्रमाने देणारच आहे.

मराठी भैय्या म्हणतील, उथळ म्हणतील किंवा भक्त म्हणतील. या सर्व टिप्पणींना गृहित धरूनच थ्रेड लिहायला घेतलाय. 👇
5 जुन 1972 साली फॉरेस्ट रेंजर असणाऱ्या मोहनसिंग बिश्त यांच्या घरी सात अपत्यांपैकी क्रमांक दोनचे अपत्य जन्माला आले. पाच वर्ष मोठ्या बहिणीच्या पाठीवर जन्माला आलेल्या मुलाचे नाव अजय मोहन बिश्त. चार भाऊ तीन बहिणी. सध्या उत्तराखंड मध्ये असणाऱ्या गढ़वाल जिल्हयात राहणारे हे कुटूंब.👇
Read 27 tweets
2 Oct
मोहनदास करमचंद गांधी उर्फ बापु उर्फ महात्मा गांधी. आज जयंती आहे तुमची. लहानपणी शाळेत असतांंना 1 ऑक्टोबरला च शाळेत वक्तृत्व स्पर्धा असायची. कधी भाग घेतला नाही. श्रोता म्हणून ऐकत राहिलो. खरं सांगू का..? गुजरात मधील पोरबंदर या गावी झालेला तुमचा जन्म या वाक्याने सुरू होणारे भाषण..👇
तुमचा रेल्वेप्रवासातला धक्का, साऊथ अफ्रिकेतला लढा,भारतातलं आगमन, कपड्यांना तिलांजली, उपोषणं, चळवळी, आंदोलनं, आपल्या भारत देशाचं स्वातंत्र्य, अहिंसेचा मार्ग आणि नथुराम गोडसे इथपर्यंतचा प्रवास सगळेजण रट्टा मारून येत आणि सांगत. त्यांंना बक्षीसंही मिळायची. त्यापैकी बरेचसे...👇
शालेयमित्र ज्यांंना बक्षिसे मिळालीत ते आज तुम्हांला काहिही बोलतात.म्हणजे माझं मत काही वेगळं आहे असं नाही.तुम्ही केलेला त्याग, प्रयत्न, लढा, तुमची तत्वं सत्याचे प्रयोग, स्वच्छता,स्वयंसेवी वृत्ती याबद्दल मला काहीही शंका नाही पण ती तुम्हांला महात्मा पदी बसवावीत एवढीही मोठी नव्हती👇
Read 12 tweets
30 Sep
😶😶 हसावं की रडावं हाच एकमेव प्रश्न आहे. भारतात न्याय अन्यायापेक्षा स्वतःच्या नावापुढे असणाऱ्या पोकळ इज्जतीचा प्रश्न असतो. बदनामीचा कलंक नको म्हणून प्रभु रामचंद्रांनी सिता मातेलाही अग्निपरीक्षा देण्यास भाग पाडले होते. यात कोणताही मुख्यमंत्री,पंतप्रधान काहीही करू शकत नाही.
पत्रकारांना फक्त फीड्स पाहिजेत टिआरपीचे. लचके तोडण्यासाठी. त्या बापाला रात्रीच अंत्यसंस्कार करून पुण्य कमवायचे नव्हते तर त्या भगिनीच्या मृतदेहाचे कैन्डीड फोटो काढून बाजार होण्यापासुन तिची सुटका करायची होती. योगीजींना नसेल मुलगी.. तुम्हांला असेल तर विचार करून बघा..का टिआरपी करणार?
प्रश्न विचारणं किती सोप्पं झालंय नाही का..? असेच प्रश्न विचारतांना भेदभाव होतो त्याला विरोध आहे शिंदे साहेब.

हे मी कोणाचा भक्त, गुलाम,चमचा म्हणून नाही तर एका मुलीचा बाप म्हणून लिहलंय.

चुकभूल क्षमस्व... @ramraje_shinde साहेब.
Read 4 tweets
28 Sep
भगत चा भगतसिंग आणि..
28 सप्टेंबर 10907 रोजी आजच्या पाकिस्तानातील बंग गावात किशनसिंग आणि विद्यादेवीच्या घरी जन्मलेला भगत इनमिन 14 वर्षाचा असतांना अमृतसर ला गेला होता. निमीत्त होते बैसाखी सणानिमीत्त आयोजित एका छोट्याश्या सभेसाठी. सभा जालियानवाला बागेमध्ये आयोजीत केलेली होती. 👇 Image
जमावबंदीचा आदेश असतांनाही सत्यपाल आणि सैफुद्दिन किचलू या राष्ट्रिय नेत्यांनी बोलावलेली एक छोटी सभा. अगदिच अरूंद रस्त्याने प्रवेश करून बागेतल्या मैदानावर सभा अहिंसात्मक पद्धतीने सुरु होती. सायंकाळी 5.37 ला अचानक गोळीबार सुरू झाला. चौफेर गोळ्या चालत असतांना प्रत्येकजण जीव वाचवत..👇 Image
पळत होता..टप्प्यात येणारा गोळीचा शिकार होत होता. 1650 राऊंड फायर करून 1000 पेक्षा जास्त भारतीयांच्या रक्ताने चिखल झालेली माती जनरल डायरच्या क्रुरतेची साक्ष देत होता. मैदानापेक्षा बागेत असणाऱ्या विहरीत उडी मारून जीव वाचवणारे मृतदेह मोजले गेले नाहीत. जे वाचले त्यापैकी एका..👇
Read 8 tweets
26 Sep
#भाजपा_का..?
28 मे 1996. मी इयत्ता सहावीमध्ये असेल. दुपारच्या सत्रातील शाळा.12 ते 5 अशी वेळ.सकाळच्या रिकाम्या वेळेत ऐकमेव असणाऱ्या दुरदर्शन वरती लोकसभेचं थेट प्रसारण सुरू होते. भारतीय जनता पक्षाचे पहिले पंतप्रधान श्रद्धेय अटलजींचं भाषण सुरू होते.👇
Image
सत्तास्थापनेनंतर अवघ्या 13 दिवसांनी बहुमत सिद्ध करण्यासाठी चे विशेष अधिवेशन. अटलजींचे भाषणातील काही मुद्दे लक्षात राहण्यासारखे. पण विशेष लक्षात राहिलेले दोन चेहरे. 1) अटलजींच्या मागे बसलेले प्रमोदजी महाजन जे अटलजींच्या प्रत्येक वाक्य बरहुकूम मान डोलवत होते. 👇
2) अटलजींच्या थेट समोर बसलेले शरद पवार.

लोकसभेच्या सदनात अटलजींनी मराठीतील एक वाक्प्रचार वापरला होता 'निंदकाचे घर असावे शेजारी.' त्यावर पवारांची उस्फूर्त प्रतिक्रिया प्रमोदजींना मिळालेली.
संपुर्ण भाषण ऐकले आणि शेवटी जेव्हा अटलजींनी सांगितले की..👇
Read 13 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!

Follow Us on Twitter!