आजकाल जी कट्टर विचारसरणी बहुतांशी दिसतेय ती खरं तर संविधानिक आणि सामाजिक समतेच्या विरूद्ध प्रचंड राग असलेल्या नेतृत्वातून वा सुलाखून निघालेल्या गटातून प्रवाहीत झालेली दिसते. परंतू इतिहास साक्षी आहे की कट्टर विचारसरणीचे मानवतेवर किती भयंकर परिणाम दिसून येतात आणि येत राहतील.+👇#म
कारण कट्टरता हि सामाजिक बंधने आणि मानवतेत भेद करणे हेच शिकवते. कट्टर विचारसरणीच्या विरुद्ध उभ्या राहणाऱ्या नेतृत्वाला बर्‍याच अंशी तिरस्कृत भावनेचा सामना करावा लागतो. कट्टर विचारसरणी समाजातील मूळ प्रश्नांना बाजूला सारून नको त्या अवास्तव धार्मिक आणि हिंसक भावनेत लोकांना अडकवून+👇
ठेवण्याचं काम करते. अशी विचारसरणी संविधानिक सामाजिक समतेचं अस्तित्व संपवण्याची अतोनात धडपड करते; संविधानातील मानवतावादी मुल्ये पायदळी तुडवताना दिसून येते आणि म्हणून हेच कारण आहे की संविधानातील मुल्यांचा पुरस्कार करणारी विचारसणी गरजेची असल्याचं दिसून येतं आणि हिच विचारसणी + 👇
देशहितकारक ठरते. काही दिवसांपूर्वी मला 'डॉ. प्रल्हाद लुलेकर' यांचं 'अनंत पैलुंचा सामाजिक योद्धा' हे पुस्तक खंगाळताना मला याबाबत एक पॅराग्राफ मिळाला त्यात ते म्हणतात... +👇
"समाजातील प्रश्नांचे जंगल दिवसेंदिवस समाजाचा चेहरा विद्रूप करीत निघाले आहे. प्रश्नांच्या जंगलातून वाट काढण्याऐवजी समाजाला चकवा देणारी 'सेल्फ कंटेट' लीडरशिप उभी राहते आहे. जाती जातींचे घोळके जमवले जातात. सगळ्यांचा डोळयांवर अंधाराचे, स्वार्थांधाचे चष्मे चढविले आहेत. +👇
या चष्म्यातून त्यांना त्यांचे रस्ते सापडत जातात. सारा समाज उजेडात यावा, अशा विचारांचा उजेड त्यांच्याजवळ नाही. त्यामुळे त्यांचे जातीकोशातील वर्तन वर्तमानासाठी भयंकर वास्तवाकडे जाणारे आहे तर भविष्यासाठी ते भयसूचक आहे. सामान्य माणसांना प्रश्नांच्या जंगलातून बाहेर काढण्याऐवजी +👇
त्यांची अस्मिता संपवणारी व्यवस्था ते निर्माण करीत आहेत. दररोज दरक्षणी सरड्याचे रंग बदलण्याची त्यांची वृत्ती विध्वंसाकडे घेऊन जाणारी आहे. स्वतःच्या स्वार्थासाठी इतरांचे जगणे हिरावून आपले अस्तित्व टिकवायचे हि पुर्वापार चालत आलेली इथली हरामखोरी आहे. +👇
म्हणून ख्यातनाम कवी अरूण काळे या वास्तवावर भाष्य करताना म्हणतात...
'गांडूळाच्या बनात
अष्टौप्रहर गायली जातात
निष्ठेने बुळबुळीत गाणी
फडकवले जातात सरडयांचे ध्वज
फणे कसे, केव्हा व कोठे उभारावेत?
होतात यांवर भुसभुशीत परिसंवाद'
[ गांडुळाच्या बनात - राॅकगार्डन ७९ ] +👇
अशावेळी आम्ही जागे रहायला पाहिजे. जात आणि जातधर्माचा मुल तत्वाने जगण्याचा आशय नाकारला, तरच उन्नतीच्या दिशेने जाता येईल. प्रश्नांचे जंगल संपवता येईल."

या बाबतीत अजून सोप्या भाषेत सांगायचं झालं तर तुम्हांला शिव-शाहु-फुले-आंबेडकर आणि गांधीवादी विचारसरणी अंगिकारावी लागेल, +👇
आणि अमलात आणण्यासाठी काटोकाट प्रयत्न करावे लागतील. कारण कट्टरवादी विचारसरणीचे नेतृत्व हेच विचार दाबण्याची अतोनात धडपड करत असते. त्यामुळे ज्यांनी डोळयांवर अंधकाराची पट्टी बांधून ठेवली आहे त्यांनी लवकरच सजग व्हा, विविध सामाजिक प्रश्नांवर आवाज उठवा, भविष्य कोणते भयानक वास्तव +👇
तुमच्या समोर आणेल याची तुम्ही आता कल्पना देखील करू शकत नाही.
तूर्तास इतकेच...🙏

तुमच्या प्रतिक्रिया नक्की द्या!
@TUSHARKHARE14 @imsantoshshinde
@Rajegore_SA @ChintuTheJefe
कट्टर विचारसरणी बाबत वसुसेन @realkunal7 ने लिहीलेला thread 👇

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with पक्षीराजा 🦅

पक्षीराजा 🦅 Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @irajratna

14 Oct
आज परमपावन धम्मचक्क पवत्तन दिनानिमित्तानं काही मांडावेसे वाटले... चंद्रशेखर शिखरे यांच्या 'प्रतिइतिहास' या पुस्तकातील काही ओळी...

शिवाजीराजांचे कतृत्व आणि जीवन हे स्त्रिया, शेतकरी व शुद्रातिशुद्र रयत यांच्या उत्थानासाठी होते. त्यांनी धार्मिक दहशतवाद आणि अन्यायाचा कठोर +👇#म #रिम Image
मुकाबला केला. त्यांनी सरंजामदार, वतनदार यांना वठणीवर आणण्याचे काम केले. अस्पृश्यतेची व जातिसंस्थेची बंधने झुगारून शुद्रातिशुद्रांना राज्यात महत्वाचा दर्जा दिला. त्यांना कसण्यास जमिनी देऊन त्यांना इतर उच्चजातींच्या बरोबरीला आणले. करातला जाचकपणा कमी केला आणि सर्वात महत्वाचे +👇
म्हणजे प्रजेच्या भाजीच्या देठाचीही आयुष्यभर काळजी वाहिली. हा योद्धा, पराक्रमी, प्रजाहीतदक्ष, अन्यायनिवारक, परमधर्मसहिष्णू, शुद्रातिशुद्रांचा कैवारी राजा खरोखरच विश्वभूषण होता, युगप्रवर्तक होता. हाच शिवइतिहासाचा शोध आहे.

संदर्भ ~ प्रतिइतिहास - शिवइतिहासाचे सत्यस्वरूप +👇
Read 4 tweets
11 Oct
गोष्टी आणि लहान मुलं ~ बाल्यसंस्कार

खरं तर मला हे सांगायला नको की कथा माणसाला कीती आकर्षित वा प्रभावित करत आल्या आहेत; आणि हे आकर्षण न संपनारचं आहे यात काही संशय नाहीच. पण मानवी जीवनात बाल्यावस्थेत 'कथा सांगणे' हे संस्कार देताना कितकं प्रभावी माध्यम आहे;
+👇#म #रिम #कथा #मराठी
हे प्रत्येकालाच माहीत आहे. कथा अनेक असतात; थोरा मोठ्यांपासून ते आबालवृद्ध सर्वांनाच कथा सांगणे वा ऐकवणे हे आवडतंच मग ती कोणतीही असो. पण सध्या आपण तरी येथे बाल्यावस्थेत कथेचे परिणाम आणि इतर बाबींबद्दल जाणून घेणार आहोत.
+👇
लहान मुले गोष्टींसाठी कीती अधीर असतात हे ठाऊकच असेल. जास्त करून लहान मुलं आजी आजोबांकडेच हा हट्ट करतात 'गोष्ट सांगा, गोष्ट सांगा' आणि या वाक्यावरून अक्षरशः ते वैतागवून सोडतात. त्यामुळेच कि काय मोठी लोकं म्हणतात 'लहान मुलांना गोष्ट ऐकायला खूप आवडतात.' +👇
Read 18 tweets
9 Oct
चारचौघात मालवणी बोलण्याचे फायदे 👇

एक म्हंजे आपलो गाववालो खय आसात तर लवचुंबकासारखो वडान येता आणि दुसरा म्हंजे सगळ्यांका कळता की ह्यो माणूस पृथ्वीवरल्या स्वर्गातलो म्हंजे कोकणातलो माणूस आसा.
मराठी सगळेच बोलतत पण मालवणी फक्त आम्ही नशीबवान कोकणकार बोलतव. #म #मालवणी #रिम +👇 Image
अरे लाजतास कसले अभिमान बाळगा मेल्यानू तुमची ओळख आसा मालवणी भाषा, आपल्यातला येगळेपण जेव्हा राजहंसाक कळला तेव्हा तेचो आनंद गगनातव पुराक नसतलो... तुमच्यातला ह्या भाषिक येगळेपण जगाक दाखया, जग कौतीकान बघतला रे.
मगे फोरेनर टुरिस्टहव म्हणान गेले हत... +👇
"Look He Is #मालवणी.
Heaven On Earth.
It's Not Only A Language
Its The Identity Of #मालवणी Culture
And Nature...
@vaibhavidharne4 @KattarMarathi @Zameerkokani @d_d_dhuri @MrBeardBaba31
Read 4 tweets
5 Oct
मराठी वर्तमानपत्रे - वर्तमान आणि भुतकालीन वास्तव.

अजूनही आणि आजही बर्‍याच जनांचा सकाळचा चहा हा वर्तमानपत्र किंवा पेपर वाचल्याशिवाय जात नाही. खरं तर वर्तमानपत्रांची सुरुवात कुठल्या व्यावसायिक उद्देशाने झाली नव्हतीच. +👇 #म #रिम #मराठी #वर्तमानपत्र Image
भारतामध्ये वर्तमानपत्रांचा उदय हा ब्रिटीशकालीन कालखंडातच झाला होता. भारताला पाश्चिमात्य शिक्षणाबाबत सजग करणे हाच मुख्य उद्देश त्याकाळी वर्तमानपत्रांचा होता. याची सुरुवात कशी झाली याबद्दलच आपण येथे पहाणार आहोत.

महाराष्ट्रात मराठी मध्ये पहीलं 'दर्पण' नावाचं वृत्तपत्र +👇 Image
बाळशास्त्री जांभेकर या माणसाने ६ जानेवारी १८३२ साली काढले. विशेष म्हणजे हे वर्तमानपत्र इंग्रजांमुळे मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषेत होतं, इंग्रजी भाषेत याला 'दि बॉम्बे दर्पण' असं म्हटलं जायचं. पण आर्थिक समस्यामुळे हे वृत्तपत्र १८४० साली बंद पडले. त्यानंतर ४ जुलै १८४० साली +👇
Read 19 tweets
3 Oct
निःस्वार्थ दान - महाभारतातील एक किस्सा.

मला याबाबत इथे कोणी लिहीलय की नाही ते माहीत नाही, तरी देखील मी हा प्रेरक किस्सा येथे मांडत आहे. प्रत्येक युगात दानाची परिभाषा पुनः परिभाषीत करणारे महादानी होऊन गेले. तशीच एक कथा आज येथे पहाणार आहोत. 👇 #म #रिम #मराठी #महाभारत Image
एकदा भगवान श्रीकृष्ण आणि पार्थ रथयात्रा करत एका प्रदेशातून जात असताना, अर्जुनाने माधवाला विचारले हे मधुसुदन! कर्णालाच तुच काय सर्वजनच महादानी का म्हणतात? मी देखील दान करू शकतो, त्या सुतपुत्रापेक्षा जास्त दान देऊ शकतो तर हे माधव तु मला सर्वश्रेष्ठ दानी का नाही म्हणत नेहमी त्या +👇 Image
राधेयचे गोडवे गातोस? त्यावर श्रीकृष्णांनी त्याचा नजरेदेखत आपल्या मायेने दोन सुवर्ण पर्वत उभे केले आणि सांगितले 'हे पार्थ जा आणि हे दोन पर्वत गावकर्‍यांमध्ये दान करून ये' अर्जुन म्हणाला त्यात काय नवीन आहे, आणि तो दान करण्यासाठी गेला, त्याने गावकर्‍यांना बोलावून दोन दिवस पर्वत +👇
Read 9 tweets
28 Sep
काही दिवसांपासून सातत्याने एक गोष्ट मनात घर करून होती ती म्हणजे भारतातील आदिवासी भागातील विकास आणि त्यासाठीच्या तरतुदी. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या राजकीय, आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक विचारांवरील 'अनंत पैलुंचा सामाजिक योद्धा' हे पुस्तक खंगाळताना हा विषय मिळाला. #म #रिम #मराठी 👇
आज याच बाबत मी या पुस्तकातील काही संदर्भ मांडणार आहे, यात माझे काही योगदान नाही या पुस्तकाचे लेखक 'डॉ. प्रल्हाद लुलेकर' यांनी बाबासाहेबांचे हे कार्य पुस्तक रुपात लिहीलय तेच आणि मी इथे मांडत आहे.

जाणीव व जागृती नसल्याने रानटी अवस्थेत राहणार्‍या आदिवासी जमातींना विशेष संरंक्षण
देण्याची गरज आहे. आदिवासींच्या जमीनीचे हस्तांतरण होऊ नये म्हणून प्रांतिक सरकारने कायदे करावेत. त्यांच्या शिक्षण, प्रशिक्षण, तंत्रशिक्षण यासाठी राज्य-केंद्र सरकारांनी स्वतंत्र तरतूद करावी आणि त्यांच्या उत्थापनाची संयुक्त जबाबदारी घ्यावी.
अनुसूचित जमातींच्या शैक्षणिक व आर्थिक
Read 16 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!

Follow Us on Twitter!