अरे शीला आंटी आल्यात तुम्ही ?
पाच वर्षांनंतर भेटतोय आपण.
मला तर तुमचा चेहरा जो आठवतोय त्या मानाने तुम्ही किती तरी तरुण दिसताय.
कुठं होता एवढी वर्ष?
काय प्लास्टिक सर्जरी केलीत की काय ?

अरे हो हो !!
थांबशील जरा. किती प्रश्न विचारतोस?
जरा दम धर.
असे म्हणत शीलाने सौरभला थांबवले.
शीला जवळपास चाळिशीच्या आसपास वर्षांची घटस्फोटित बाई पण दिसायला मात्र अगदी ३० वयाची.
काल सकाळीच इंग्लडहून परत आली होती.
सोसायटी मध्ये मात्र तिच्याबद्दल बरीच कुजबुज चालली होती कारण शीलामध्ये आमूलाग्र बदल झाला होता.
जाण्यापूर्वीची शीला आता बऱ्यापैकी तरुण दिसत होती.
शीलाच्या घटस्फोटाला कारण म्हणजे नवरा बायकोच काहीही पटत नव्हते.
शेवटी नवरा सोडून गेला मन शीला मात्र एकटीच राहिली पण तिला याची खंत नव्हती.तिच्या आयुष्यात ती सुखी होती.
सौरभ तिच्या शेजारी राहणारा १७ वर्षाचा मुलगा.

सौरभ १ वर्षाचा असताना शीला त्यांच्या शेजारी राहायला आली होती.
तेव्हापासून सौरभ वर शीलाचा खूप जीव होता.
शीला जेव्हा ५ वर्षांपूर्वी इंग्लडला गेली होती तेव्हा सौरभ २ दिवस जेवला नव्हता.
बर झाल शीला आंटी तू आलीस.
मला तुझी खूप आठवण आली.
तुझ्यासोबाबत खूप खूप गप्पा मारायच्या आहेत. सौरभ म्हणाला.

हो बोलू आपण पण आता मला कॉलेजवर जाऊदे.
कारण मला आता इंटरव्यूसाठी जायच आहे.
आपण निवांत बोलूया.
अस शिलाने उत्तर दिल्यावर ठीक आहे असं म्हणत सौरभ तेथून निघाला.
संध्याकाळी शीला घरी आली अन तिने सौरभला सांगितले कि तिला सौरभच्याच कॉलेजवर लेक्चरर म्हणून जॉब लागला.
सौरभ सुद्धा खुश झाला.
आता शीलाचा रोजचा दिनक्रम सुरु झाला.
सौरभ शीलाच छान जमत होत पण सौरभला शीलाच काही वागणं विचित्र वाटत होत.
त्याला तीच असबंध बडबडन खटकत असे.
मुळात सौरभला गोष्टींच्या खोलात जाण्याची सवयच होती म्हणून तो शीलाला तिच्या बोलण्यावर विचारत असे पण शीला उत्तर देत नसे.
शीला कडे कधी कधी काही मुले अभ्यासाचे डाउट विचारायला घरी येत.
त्यात सौरभचे २ मित्र जयेश आणि अमित जे त्याला सिनियर होते.
पण का कुणास ठाऊक ते दोघेही ३-३ महिन्याच्या अंतराने वारले.
आजार अन मृत्यूचे कारणही कुणाला समजले नाही.

साधा ताप येऊन आणि अंगावरच सगळं मांस जाऊन खंगलेल्या अवस्थेत जाऊन दोघांचा मृत्यू झाला होता.

शीला मात्र निवांत होती.
जणू तिला काही फरकच पडला नाही पण तिच्या चेहरेपट्टीत फरक पडला होता जणू ती अजून तरुण झाली होती.
सौरभ मात्र आतून पूर्ण खचला होता कारण ते दोघेही त्याचे चांगले मित्र होते अन जयेश सोबत त्याचे घरी येणे जाणे होते.
सौरभने शीला मधील हा बदल ओळखला होता.त्याने शीलाला याचा जाब विचारायचे ठरवले.
संध्याकाळी शीला घरी आली तसा सौरभ घरात घुसला
शीला आंटी मला तुला काही विचारायचे आहे आणि मला त्याचे उत्तर हवे आहे. टाळू नकोस.
सौरभने विचारले.

शीला: बोल ना सौरभ काय विचारायचे आहे ?

सौरभ: तू इंग्लडला जाण्याआधी आमच्यासोबाबत फोटो काढला होतास.तो फोटो अन आज तू जशी दिसतेस यात फरक आहे.
आता तू पूर्वीपेक्षा जास्त तरुण दिसतेस.

शीला:अच्छा हे विचारायचे होते.
अरे मी इंग्लडला गेल्यावर तिथे प्लास्टिक सर्जरी केली त्यामुळे मी एवढी सुंदर दिसते.

सौरभ: झूट ! साफ झूट.
मग तू सहा महिन्यापूर्वी आली होतीस ती आणि आज दिसणारी तू यात बराच बदल आहे .

आज तू अजून तरुण दिसतेस.
हे बघ माझ्या इंस्टाग्रामचे फोटो जे तू
इंग्लंडवरून आल्यावर काढले होते आणि आजचा तुझा चेहरा बघ.

आता शीलाला समजलं होत कि पुढं आपला काही निभाव लागत नाही.

हे बघ सौरभ मी जर तुला काही सांगितले तर तुझा विश्वास बसणार नाही. शीला म्हणाली.

पण मला ऐकायचं आहे असं म्हणत सौरभ हट्टाला पेटला.
शीला:ठीक आहे.
ऐक मग.
मी ५ वर्षांपूर्वी इंग्लडला गेले होते तिथे असताना कॉलेजवर शिकवत होते.
तिथे माझी ओळख एका आफ्रिकन प्रोफेसर सोबत झाली जिने मला आफ्रिकन काळी विद्या शिकवली ज्याने मी तरुण होऊ शकत होते.
त्यासाठी मी आफ्रिकेत १ वर्ष जाऊन तिथल्या एका आदिवासी जमातीकडून मी हि कला शिकली.
ते लोक या कलेने जवळपास १०० वर्ष सहज जगतात आणि स्वेच्छने देहत्याग करतात.
पण यात एक अडचण अशी असते कि तुम्हाला यासाठी कोणाचातरी बळी द्यावा लागतो जो वयाची १८ वर्ष पूर्ण केलेला असतो.
प्रत्येक बळीने मी एक वर्ष अजून तरुण दिसते पण जर हि जादू काही कारणास्तव फसली तर माझा बळी जाईल.
हि सुद्धा सक्त ताकीद मला दिली होती.
माझं वय भले ४३ असेल पण आज मी २८-३० वर्षाची दिसते कि नाही.

मी इकडे येण्याचं कारण तिथे इंग्लडला परत आल्यावर माझ्यावर लोकांना संशय येऊ लागला अन काही होण्याआधीच मी इथे आले.

सौरभ: अरे काय बोलतेस तू आंटी ?
विश्वास पटेल असं बोल जरा.
शीला: मला माहीत होतं तुझा विश्वास बसणार नाही बर मला सांग मग तुझे २ मित्र अचानक कसे गेले? आणि त्यानंतरच तुला माझ्यात झालेला बदल जाणवला ना?
सौरभ: माझा विश्वासच नाहीये कारण तुला कित्येकदा अशी बडबड करताना पहिली मी.
बर ठीक आहे मला दाखव हि तुझी काळी जादू.
मला बघायचीय.
अजिबात नाही सौरभ.
मी असलं काहीही करणार नाही कारण मला तू महत्वाचा आहेस माझ्या आयुष्यात आणि तू माझ्या मुलासारखा आहेस.
असे म्हणत शीला तेथून जाऊ लागली.

सौरभ: मला काही ऐकायचं नाहीये अन मी इथून जाणार नाही.
मला बघायचच आहे हे जादू वैगेरे काय असते.

सौरभ अस हट्टाला पेटलेला बघितल्यावर शीलाचा नाईलाज झाला.
पण तेवढ्यात शीला म्हणाली कि अरे तू अजून १७ वर्षाचा आहेस मग कस दाखवणार ?

या साठी १८ वर्ष पूर्ण झालेली हवीत.

असे म्हणत तिने टाळण्याचा प्रयत्न केला पण जिद्दीला पेटलेला सौरभ म्हणाला.

शीला आंटी हरकत नाही २ महिन्यांवर माझा वाढदिवस आहे १ जूनला तेव्हा त्यानंतर आपण लगेच हि जादू करूया.
पण तू वचन दे कि हि जादू पुढचे दोन महिने कोणावरही करणार नाही.
असे म्हणत सौरभ निघाला.

शीलाने सुद्धा हे वचन पाळले आणि शांत राहिली.

बऱ्याच वर्षानंतर शीला आल्याने तिने सौरभचा वाढदिवस धुमधडाक्यात साजरा करण्याचे ठरवले.
तिनेच स्वतः यासाठी बराच खर्चही केला.
कारण तिला ठाऊक होत कि जादू दाखवल्यानंतर सौरभ पुढचा वाढदिवस साजरा करायला नसेल.

पण सौरभ खुश होता कारण त्याला ती जादू कशी असते काय असते हे जाणून घेण्याची उत्सुकता होती.

२ दिवसानंतर रविवार होता अन सकाळीच सौरभ शीलाच्या घरी गेला अन त्याने शीलाला आठवण करून दिली.
शीलाला सर्व लक्षात होत अन त्यासाठी तिने सगळी तयारी करून ठेवली होती.

सौरभ मात्र हसत होता कारण त्याला सगळं एखाद्या हॉरर चित्रपटासारखं वाटतं होत.

शीलाने ३ बाहुल्या बाहेर काढल्या आणि आदिवासी लोक घालतात तसा एक मुखवटा बाहेर काढला.

एक रिंगण आखून त्यात ते दोघेही बसले.
समोर एका जुन्या आफ्रिकी भाषेतले पुस्तक होते त्यातले मंत्र उच्चारायला सुरवात केली.

जवळपास एक तास पूजा सुरु होती मात्र तिथे सुरु केलेल्या अगरबत्तीच्या वासाने सौरभ खोकू लागला.
त्याला असं जाणवत होत कि जणू कोणीतरी त्याचा गळा दाबतोय.

पण तो काही जागचा हलला नाही शेवटी पूजा आटोपली.
पण सौरभ मात्र अर्धमेला झाला होता कारण त्या अगरबत्तीचा उग्र वास त्याला सहन झाला नाही.
थोडावेळ निपचित पडून तो घरी गेला आणि अनपेक्षितपणे आजारी पडला.
३ दिवस तो बिछान्यातुन उठला नाही अन नंतर बरेच दिवस अशक्तपणा जाणवत असल्याने कॉलेजला सुद्धा गेला नाही.
३ महिन्यांनी*

"सौरभ संध्याकाळी लवकर ये, ओवाळायचंय."

सौरभ: ओवाळायला काय माझा वाढदिवस आहे आज?

आई : हो आहेच तुझा वाढदिवस. शाळेत टाकायचं म्हणून १ जून तारीख लावली होती,पण आजच तुझा खरा वाढदिवस!
१५ दिवसच झाले शीलाला देवाघरी जाऊन नाहीतर पुन्हा जोरदार साजरा केला असता तुझा वाढदिवस….

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with राक्या

राक्या Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @RakyaDadoos_

9 Oct
“अहो सर, उठा आता. डॉक्टर आले आहेत आणि इंजेक्शन द्यायचे आहे”, असं म्हणत नर्सने जनकला उठवले. जनक एक चाळिशीतला युवक. कोरोनाने ग्रस्त झालेला तो गेले ४ दिवस हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होता.

६ फूट उंच अन थोडा लठ्ठ असलेला जनक आधीच हृदयविकाराच्या त्रासाने त्रस्त होता.
त्यात त्याला कोरोना झाल्यामुळे अजूनच त्याच्या चिंतेत भर पडली.

डॉक्टर:काय जनक कस वाटतंय?
जनक:ठीक आहे पण अजूनही श्वास घेण्यास त्रास होतोय.
डॉक्टर:हरकत नाही. होशील हळूहळू बरा.आपण आता हे नवीन इंजेक्शनचा डोस सुरु करतोय त्याने बघूया किती फरक पडतोय ते.
जनक: ठीक आहे डॉक्टर.
"नर्स द्या ते इंजेक्शन" असं म्हणत डॉक्टरांनी जनकला इंजेक्शन दिले. इंजेक्शनच्या गुंगीने जनकाला झोप लागली पण अर्ध्या तासाने अचानक अस्वस्थ वाटू लागले,दरदरून घाम फुटला. अन छातीत एक तीव्र कळ आली जीची कळ अगदी मेंदूपर्यंत पोहचून मेंदू बधिर करून गेली. पण लगेच जनकला मोकळं मोकळं वाटू लागल.
Read 11 tweets
26 Sep
हे बघ सुयश!!
घर मला हवं तसच सजवणार आणि मी सांगेन ती वस्तू तुला घ्यायला लागेल.घरातल्या वस्तू सगळ्या मी सांगेन तिथेच लागल्या पाहिजेत.
तितक्यात किचनमध्ये ग्लास फुटल्याचा आवाज आला अन नैना आणि सुयश किचनकडे धावलॆ.
बहुदा वारा असावा. हवा खेळती आहे ना इथे त्यामुळे पडला असेल.
रामलाल पटकन बोलून गेला.
रामलाल म्हणजे लोकांना घरे भाड्याने मिळवून देणारा इस्टेट एजंट.
सुयश आणि नैना नुकतेच नाशिकला बदली होऊन आले होते. राहण्यासाठी सुयशने रामलालला गाठून एका चांगल्या बिल्डिंगमध्ये घर बघितलं. अर्थात घाई होती म्हणून त्याने रामलालच्या मागे लागून घर भाड्याने घेतलं.
घरमालक परदेशी वास्तव्यास असल्याने सगळे व्यवहार रामलाल बघत असे त्यानुसारच त्याने सगळे व्यवहार पार पाडले अन घराची चावी सुयशला दिली.

ठरल्याप्रमाणे सुयश नैना राहावयास आले. घर आधीच बऱ्यापैकी फर्निश होतं कारण मालक पूर्वी इथेच रहात असे आणि त्याने स्वतःला हवे तसे घर करून घेतले होते
Read 18 tweets
18 Sep
तुषार कोल्हापूरला निघाला होता.
बसचा संप चालू होता अन ट्रेन जमत नसल्याने जे वाहन भेटेल त्याने तो कळंबोलीवरून कोल्हापूरला निघाला.
एका MNC मध्ये मॅनेजर असलेला तो विकेंड आला की कुठेतरी मनात येईल तिथं भटकंती करायची एक दिवस मुक्काम करून दुसऱ्या दिवशी परत असा त्याचा प्रोग्रॅम असे.
एकदा विकेंडच्या आधीच 2 दिवस जास्तीची सुट्टी आली त्यामुळे त्याने कोल्हापूरचा प्लॅन बनवला.
कोल्हापूर आधी असलेल्या एका गावातील डोंगरावर जाऊन मस्त रात्रीचा आभाळ न्याहाळायच.
एकट ट्रेकिंगची आवड असल्याने तुषारला डोंगरदऱ्यातुन भटकणे नवीन नव्हते अन त्याला त्याचीच आवड जास्त होती.
यावेळी काहीतरी जणू त्याला जाण्यापासून थांबवत होत पण जायचंच असा निश्चय बांधलेल्या तुषारने कळंबोलीवरून पुण्यापर्यंत प्रायव्हेट गाडी पकडली.
तिथून पुढे जाण्यास काही भेटत नव्हतं पण सुदैवाने सांगलीला जाणारा द्राक्षाचा टेम्पो भेटला.
थोडा वळसा होईल पण तेवढंच भटकंती म्हणून तो निघाला.
Read 15 tweets
14 Sep
सुजय एक स्केच आर्टिस्ट.
फ्री लान्सिंग करणारा तो नुकताच आई वडिलांच्या निधनामुळे मुंबईहुन पनवेलला शिफ्ट झाला होता.
इथे आल्यापासून त्याला वेगळच जाणीव व्हायची. एकटं असूनही त्याला वाटे कि कोणीतरी आहे, काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतंय.कित्येकदा घरातल्या वस्तूंच्या जागा बदललेल्याही वाटे
पण त्याच्या मनात कसलीच भीती नसे.त्याच्या खिडकीतून एक स्मशान दिसे तेव्हा त्याला असे वाटे कि कोणीतरी हात करून बोलावतय.

शनिवार संध्याकाळ होती.घरात कंटाळा आला म्हणून तो बाहेर पडला.पावसाळ्याचे दिवस अन हवेत छान गारठा होता.समोर स्मशानावर नजर गेली तर तिथे नुकतीच एक चिता राख झालेली होती.
बहुदा दुपारीच कोणीतरी मयत झाल होत.समोर कोणीतरी बसलेलंही दिसलं.बहुतेक मृताचे नातेवाईक असणार.
सुजयने जवळ जाऊन विचारले
काय झालं बाबा? कोण गेल तुमच?
त्या साठीतल्या व्यक्तीने अचानक मान फिरवली अन आश्चर्याने सुजयकडे बघू लागला.
सुजयने परत प्रश्न केला.
मोहन:माझं नाव मोहन,पण तुला मी दिसतो?
Read 10 tweets
14 Sep
प्रेम

राजेश!!
आयटीत इंजिनियर म्हणून काम करणारा अवघा तीस वर्षाचा तरुण.पगार गल्लेलठ्ठ अन फर्ग्युसन रोडला स्वतःचा २ BHK फ्लॅट असलेला राजेश तरीही नेहमी निराश अन जीवनाला कंटाळलेला असायचा.सोशल मीडियावर खासकरून ट्विटरवर ऍक्टिव्ह असलेला राजेश सगळ्यांना हसवत असे पण उराशी एक दुःख होत.
त्याच्या दुःखाच कारण म्हणजे पल्लवी त्याची गल्फ्रेंड.
गेले दोन वर्ष एकत्र "लिव्ह इन रिलेशनशिप" मध्ये राहणारे ते लग्न करणार होते पण पल्लवीच्या घरच्यांनी नकार दिल्याने ती त्याला सोडून गेली.
तीच लग्नही लॉकडाऊनमध्ये मे महिन्यात घरच्यांनी उरकून टाकल्याने राजेश मात्र पुरता निराश झाला.
पण ऑफिसमधल्या जवळच्या मित्रांनी सांभाळून घेतल्याने तो ठीक होता पण नैराश्येने राजेश दारूच्या आहारी गेला होता.
दर शुक्रवारी मित्रांची मेहफिल जमवून स्वतःच दुःख हलकं करत असे कारण विकेंड म्हंटल कि एकट्या घरात त्याला पल्लवी आठवे.मित्रही आंनदाने जमत कारण राजेश एक उत्तम कुक सुद्धा होता.
Read 12 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!

Follow Us on Twitter!