#इतिहास_शिवरायांचा
#शिवकालीन_दिनविशेष
#जय_शिवराय
#जय_शंभूराजे

🚩२० नोव्हेंबर १६३५🚩
शाहजहान त्याच्या दुसऱ्या दख्खन मोहिमेसाठी निघाला. निजामशाही संपवायची ह्या ध्येयाने तो निघाला होता. त्याने हांडियाजवळ ४ जानेवारी १६३६ ला नर्मदा ओलांडली. इथूनच ९ जानेवारीला Image
आदिलशाहला पत्राने तंबी दिली की निजामशाहीमधल्या शाहजी राजा बरोबर असलेल्या सरदारांना पाठिंबा मिळता कामा नये. वर हे सुद्धा लिहीले की त्याने देय असलेली वार्षिक खंडणी १० मार्च १६३६ पर्यंत दौलताबादला पाठवावी. ह्यासाठी शाहजहानने सोलापूर, त्याच्या आसपासचा परिसर व वांगीचा भाग
निजामशाहिकडील भाग आदिलशाहला देऊ केले. ह्या परिसरातून वर्षाला नऊ लक्ष होनाचे उत्पन्न येत होते. १९ जानेवारी १६३६ ला शेख दबीर व इतर काही आदिलशाही वकील शाहजहानला भेटले. त्यानंतर ५ फेब्रुवारीला शाहजहानने खानजमान, खानदौरान व शाहिस्ताखान यांना निजामशाहीचा परिसर जिंकण्यासाठी धाडले.
🚩२० नोव्हेंबर १६६६🚩
९ वर्षांचे बाल शंभूराजे आज(मार्गशीर्श शु.५ शके १५८८) रोजी आग्राहून सुटल्यानंतर सुखरूप "किल्ले राजगड" वर पोचले.

🚩२० नोव्हेंबर १६७०🚩
छत्रपती शिवरायांची आरमारासह सुरतेकडे कूच.
🚩२० नोव्हेंबर १६७९🚩
"छत्रपती संभाजीराजे" दिलेरखानाच्या छावणीतून निसटले आणि त्यांनी "किल्ले पन्हाळा" गाठला.

🚩२० नोव्हेंबर १६८०🚩
रोजी छत्रपती संभाजी महाराजांचे वकील आवजी पंडीत इंग्रजांशी बोलणी करण्यासाठी मुंबईस!
छत्रपती संभाजी महाराजांनी आपले निष्णात आणि धुर्त वकील
आवजी पंडीत इंग्रजांशी बोलणी करण्यासाठी पाठविले.
सिद्दीच्या गुप्त हालचालींवर लक्ष ठेवण्याचेही काम त्यांना देण्यात आले होते.
इंग्रज प्रतिनिधींशी भेट झाल्यावर छत्रपती संभाजी महाराजांचे वकील आवजी पंडीत यांनी रोखठोकपणे सांगितले की,
"छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बरोबर झालेल्या तहाप्रमाणे मुंबईकरांनी सिद्दीचा बंदोबस्त केला नाही तर छत्रपती संभाजी महाराज इंग्रजांविरुद्ध युद्ध पुकारतील".
छत्रपती संभाजी महाराजांचे वकील आलेले पहाताच सिद्दीने आपले आरमार बंदराबाहेरच नांगरले कारण उघडपणे छत्रपती संभाजी महाराजांच्या
आरमाराला तोंड द्यायची त्याची तयारी नव्हती.
मात्र सिद्दीचा कायमचा बंदोबस्त झाला नाही तर त्याच्या अमानुष लुटमारीला तोंड देण्यासाठी किनार्‍यावर १०,०००, दहा हजार फौजेचा खडा पहारा नुसता अडकवून ठेवावा लागेल.
त्यापेक्षा इंग्रजांमार्फत तह करून परस्पर सिद्दीचा हा काटा काढला पाहिजे या
हेतूने छत्रपती संभाजी महाराजांनी आपले वकील आवजी पंडीत यांना पाठवून इंग्रजांवर दडपण आणले.

🚩२० नोव्हेंबर १६८१🚩
च्या सुमारास मराठ्यांच्या सेना अहमदनगर किल्ल्याच्या भोवतीचा प्रदेश उद्ध्वस्त करीत होत्या.
नोव्हेंबर इ. स. १६८१, च्या अखेरीस छत्रपती संभाजी महाराजांनी
आपले सैन्य औरंगाबाद, सोलापूर, पेडगाव या भागात पाठविले.
अहमदनगर येथे छत्रपती संभाजी महाराजांची पत्नी व बहीन इ. अहमदनगर किल्ल्यात ठेवले होते.
त्यांना सोडविण्यासाठी अहमदनगर किल्ल्याच्या भोवती मराठ्यांचे हल्ले होत असत.
त्याच वेळेला मुल्हेर आणि साल्हेर येथे पण मराठ्यांचे
सैन्य मोगली सैन्याशी लढत होते.
पुरंदरावरही मराठ्यांच्या हालचाली चपळ गतीने होत होत्या.
बागलाणातील कोहोज हे मराठ्यांच्या १०, दहा हजार सैन्याने लुटले.
औरंगजेब बुर्हानपुरला पोहोचला होता.

#शिवरायांचे_निष्ठावंत_मावळे_समूह
#Threadकर
#वैचारिक_मंच

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with मी पण बोलतोच

मी पण बोलतोच Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @KKW_NH66

21 Nov
#इतिहास_शिवरायांचा
#शिवकालीन_दिनविशेष
#जय_शिवराय
#जय_शंभूराजे

🚩२१ नोव्हेंबर१६५८🚩
शिवरायांनी तिमाजी उंडेला दिलेले होन पुन्हा स्वराज्यात दाखल करून घेतले.

🚩२१ नोव्हेंबर १७६३🚩
छत्रपति शिवरायांच्या हाताचा ठसा व पायाचा ठसा सिंधुदुर्ग किल्याचे बांधकाम चालू असताना Image
छत्रपति शिवराय स्वत:किल्याची पाहणी करण्यासाठी आले असताना चुकुन त्यांचा पायचूनखडीच्या ओल्या मिश्रणावर पडला. त्यातून बाजूला होताना महाराजांनी भिंतीचा आधार घेतला, पण भिंत नुकतीच बनविली असल्याने ती सुद्धा ओलीचं होती. बांधकाम करणार्या अभियंत्याने त्यांच्या पायाचे व हाताचे निशाण
न मिटविता अत्यंत हुशारीने चुनखडीच्या मिश्रणाचा तेवढाच भाग उचलून हा अनमोल ठेवा जतन करून ठेवला आहे.
प्रवेशद्वाराच्या आत आल्यावर डाव्या बाजूस असलेल्या पायऱ्या चढून गेल्यावर दोन छोट्या घुमट्या दिसतात. त्यातील खालच्या घुमटीत महाराज्यांच्या डाव्या पायाचा ठसा व वरच्या घुमटीत
Read 11 tweets
28 Oct
#थोडक्यात

सवाई माधवराव पेशवा

(१८ एप्रिल १७७४–२७ ऑक्टोबर १७९५).

मराठेशाहीच्या पडत्या काळातील बाल पेशवा, बाळाजी बाजीरावच्या खून झालेल्या नारायणराव या मुलाचा गंगाबाई या पत्नीपासून पुरंदर किल्ल्यावर मरणोत्तर जन्माला आलेला मुलगा.
त्याचे बालपण पुरंदर किल्ल्यावर लष्करी बंदोबस्तात गेले. त्यामुळे राज्यकर्त्यास योग्य असे शिक्षण त्याला मिळाले नाही. पेशव्या लढविण्याची जबाबदारी कारभाऱ्यांवर म्हणजे नाना फडणिसादींवर आली. साहजिकच लिहिणे-वाचणे, हिशेब ठेवणे, घोड्यावर बसणे, कसरत करणे याचे जुजबी शिक्षण त्यास मिळाले;
पण शहाण्यासुरत्या मुत्सद्यी माणसांच्या गाठीभेठी,राजकारण्याच्या वाटाघाटी, लष्करी मोहिम यांपासून पेशवा वंचित राहिला. त्यांच्या वयाच्या तिसऱ्या वर्षी आई गंगाबाई मरण पावली. त्यामुळे त्यास खास मायेचे कोणीच उरले नाही. पेशवाईच्या उत्तरकाळात गृहकलहामुळे निर्माण झालेल्या चमत्कारिक वेळी
Read 15 tweets
27 Oct
#इतिहास_शिवरायांचा
#शिवकालीन_दिनविशेष

🚩२७ ऑक्टोबर १६६७🚩
संभाजीनगर(औरंगाबाद) येथे "छत्रपती संभाजीराजे" आणि "शहजादा मुअज्जम" यांची भेट.
यावेळी शंभूराजेंबरोबर "सरनोबत प्रतापराव गुजर, निराजी पंत, रावजी सोमनाथ, प्रल्हाद निराजी सबनीस" इत्यादी मंडळी होती.
संभाजीनगर(औरंगाबाद) ला गेल्यावर शंभूराजेंनी "महाराजा जसवंतसिंह" यांचीही भेट घेतली होती.

🚩२७ ऑक्टोबर १६७१🚩
"छत्रपती शिवरायांचा" शिवापट्टण येथे मुक्कामी.

सुरतेच्या लुटीनंतर पाठलागावर असलेल्या दाऊदखानाचा विचार न करता छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतः सैन्यासह वन्हाड प्रांतात
लुटीला सुरुवात केली तर मोरोपंतांनी बागलाण प्रांतात धुमाकूळ मांडला. मनसोक्त लूट करून पुन्हा दोन्ही सैन्याने एकत्र येत फतुल्लाखानाकडून साल्हेरचा किल्ला हस्तगत केला. पुढे १६७१ चा पावसाळा संपताच शिवाजी महाराज शिवापट्टणला विश्रांतीसाठी गेले होते.
Read 8 tweets
26 Oct
#इतिहास_शिवरायांचा
#शिवकालीन_दिनविशेष

🚩२६ ऑक्टोबर १२७०🚩
संत नामदेव यांचा जन्म.
(मृत्यू: ३ जुलै १३५०)

🚩२६ ऑक्टोबर १६७२🚩
महाराज केव्हाही गुजरातचे मालक बनतील अशी भीती मुंबईकर इंग्रज व्यक्त करताना दिसतात. आधीच धास्तावलेले सुरत कर यामुळे अधिकच भेदरून गेले. Image
त्यातच प्रतापराव गुजरांकडून पुन्हा सुरतेच्या सुभेदारकडे व प्रजैकडे चौथाईची मागणी करणारे कडक पत्र आले. पाठोपाठ महाराजांचे सैन्य रामनगर पर्यंत येऊन धडकले. त्यामुळे सुरत करांच्या तोंडाचे पाणी पळाले नसते तरच नवल ! महाराजांच्या संभाव्य आक्रमणाला आवर घालण्यासाठी मोगलांनी जंजिरेकर
सिद्धीला महाराजांवर हल्ला करण्यासाठी प्रोत्साहित केले.सुरतेहून 20 गलबतांचे आरमार त्यांच्या मदतीसाठी व किनारपट्टीवरील महाराजांचा मुलुख झोडपून काढण्यासाठी रवाना झाले.दिलेरखान ही सुरतेच्या आसपासच वावरत होता त्यामुळे गणदेवी पर्यंत येऊन ठेपलेले मराठी खानदेश, वराड,तेलंगणा भागाकडे वळले.
Read 16 tweets
25 Oct
#इतिहास_शिवरायांचा
#शिवकालीन_दिनविशेष

अश्विन शु. १० हा दिवस "दसरा" म्हणून साजरा केला जातो. भारतीयांच्या मूर्तिमंत पराक्रमाचा इतिहासच यात दिसून येतो. हिंदू समाजातील चारही वर्णाच्या दृष्टीने या दिवसाला महत्त्व आहे. आपल्या अद्वितीय बाहुबलाने पराक्रम करणारे विर Image
विजयादशमीला च आपल्या शस्रास्रांचे पूजन करून देश रक्षणासाठी, शत्रूंचा निःपात करण्यासाठी सिमोलंघन करीत असत. शत्रुपक्षाचा पराभव करून आणलेली धनदौलत स्वकियाना या दिवशी वाटण्याची प्रथा आहे. अशा प्रकारे हा दिवस पराक्रमाचा, विद्यार्जनाचा म्हणून भारतीयांना अधिक उत्साहदायक वाटतो.
तीन चार महिने पावसाळ्यात विश्रांती घेतल्या नंतर मराठ्यांच्या फौजा याच दिवशी शत्रूंचा पराभव करण्यासाठी "सीमोलंघण" करीत असत. दसऱ्याच्या सर्व बांधवाना हार्दिक शुभेच्छा!

शिवराय दिनविशेष खालील प्रमाणे 👇
Read 25 tweets
5 Oct
#चिपळूणच्या_गोविंदगडावरची #चित्तथरारक_ऐतिहासिक_घनघोर_लढाई
#सरनोबत_नरवीर_पिलाजी_गोळे

🚩५ ऑक्टोबर १७३३🚩

शब्दांकन: सरनौबत नरवीर पिलाजी गोळे यांचा वंशज,
आग्रावीर अँड मारुती बबन गोळे

सर्व दुर्ग मित्रांना, दुर्ग अभ्यासकांना, दुर्ग भटक्यांना नमस्कार
मित्रांनो इतिहासाची पाने जेवढी उलगडून पहिली जातात, वाचली जातात तेवढा इतिहास हा जगासमोर आणता येतो,
इतिहासाचा अभ्यास करत असताना, नवनवीन संशोधन करताना कधी कधी आपल्याच घराण्याचे जर मूळ पत्र सापडले तर जो आनंद मिळतो त्याला जोड नाही,
इतिहासात छत्रपती शिवराय, यांनी जवळपास 350 गड, दुर्ग स्वराज्यत समाविष्ट केले, काही नवीन बांधले, अन त्याच गडांमुळे नंतरच्या कालखंडात हिंदवी स्वराज्य हे अटकेपार झेंडा लावण्यात यशस्वी झाले, प्रत्येक गडावर रणसंग्राम झाला आहे, प्रत्येक दुर्गावर घनघोर युद्ध झाले आहे,
Read 39 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!

Follow Us on Twitter!