नक्की वाचा #Thread

😜आमच्या येथे शुद्ध फल्ली तेलातील भगवा मिळेल!😜

राजकारणात विरोधी पक्षाकडे भरपूर निवांत वेळ असतो, परंतु सत्तेत असूनही प्रचंड रिकामपण असलेला शिवसेना हा एकमात्र रिकामटेकडा पक्ष आहे.
१)
कारण शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसशी युती करताच महाराष्ट्र रातोरात सुजलाम सुफलाम बनला आहे, त्यामुळे सत्ताधाऱ्यांकडे करायला कुठले कामच उरलेले नाही. त्यात मुख्यमंत्री घरात बसून बसून कंटाळलेले आहेत.
२)
त्यामुळे रिकामा वेळ कसा घालवायचा यासाठी सरकारने एक कॉमन टाईमपास प्रोग्रॅमच तयार केला आहे. या कार्यक्रमाअंतर्गत मुख्यमंत्री महिन्यातून एक-दोन वेळा फेसबुकवर लाईव्ह येतात आणि जनतेला पकवतात.
३)
शिवसेनेचे राणीच्या बागेत जाऊन लाडक्या भावोजींसोबत आमचं हिंदुत्व की तुमचं हिंदुत्व म्हणत झिम्मा फुगडी खेळतात.

नॉटी संजय राऊत बरणीत चिठ्ठ्या टाकून एखाद्या नेत्याच्या/पत्रकाराच्या/नटीच्या नावाची चिठ्ठी काढतात आणि मग त्या व्यक्तीबद्दल वाट्टेल ते बरळतात
४)
आणि महाराष्ट्रातील अत्यल्प दरात विकल्या जाणारे स्वस्त, चाय-बिस्कृट पत्रकार राऊतांच्या वाफांचे बाष्पीभवन करून "अमक्याला दणका, तमक्याला इशारा" म्हणत वर्तमानपत्राचे रकाने रंगवतात, वेब पोर्टलच्या भिंती सजवतात. हाच शिवसेनेचा "ओन्ली लेफ्ट प्रोग्रॅम" सुरू असतो.
५)
त्यातूनच महाराष्ट्राचे स्वस्त दराचे चाणक्य संजय राऊत यांनी भगव्या झेंड्याच्या शुद्धतेचे परिमार्जन करणारे एक नवे यंत्र विकसीत केले आहे. चाय-बिस्कृट पत्रकारांच्या अभ्यासू विश्लेषणानुसार हा भाजपला आणखी दणका असणार आहे.
६)
तर संजय राऊतांच्या नव्या आविष्कारानुसार शिवसेनेचा भगवा २३.९९% कॅरेट शुद्ध असून त्याने भाजपच्या भगव्याला ०.००९२% एवढ्या प्रचंड तफावतीने धोबीपछाड दिला आहे.
७)
कारण सत्तेसाठी राम मंदिराच्या मुद्दापासून फारकत घेणे, सेक्युलॅरिझमचा बुरखा पांघरणे, पालघर व संभाजीनगर येथील साधूंवर झालेल्या अमानुष हल्ल्याचा अमर्याद काळासाठी मौन बाळगून प्रखर निषेध करणे,
८)
स्वर्गीय बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवत भगव्याला "आतंकवादी" संबोधणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून मंदिरांना टाळे ठोकणे आणि वक्फ बोर्डाचे अनुदान कैक पटीने वाढवणे, या साऱ्या प्रयत्नांमुळे शिवसेनेचा भगवा अत्यंत शुद्ध, निर्मळ आणि २४ कॅरेट पावन झाला आहे.
९)
त्यामुळे जनता आगामी निवडणुकीत या शुद्ध फल्ली तेलात तळून पावन झालेल्या फ-शिवसेनेचे थडगे, आय मीन मंदिर बांधून त्यात संजय राऊतांची प्रतिमा स्थापन करून बिहारममधील जनतेने सेनेला जसे "नोटांनी" मढवले,
१०)
त्याचप्रमाणे महाराष्ट्रातली जनताही शिवसेनेच्या उमेदवारांच्या शुद्ध फल्ली तेलातील अनामत रक्कम प्रसाद म्हणून ग्रहण करणार आहे!
११)

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with 🌷 फडणवीस समर्थक 🌷 महाराष्ट्र सेवक 🌷

🌷 फडणवीस समर्थक 🌷 महाराष्ट्र सेवक 🌷 Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @D_F_Samarthak

19 Nov
#Thread कोरोनानंतरचे देवेंद्र!

राज्यात कोरोना महामारी पसरली असताना अख्खा महाराष्ट्र पिंजून काढत कोविड योद्ध्यांना धीर देणाऱ्या व शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांचे अश्रू पुसणार्या देवेंद्र फडणवीसांना अखेर कोरोनाने गाठलेच.

१.
पण बिहार निवडणुकीचे प्रभारी म्हणून आपली जबाबदारी चोखपणे बजावणाऱ्या देवेंद्रजींचा बिहार दिग्विजयानंतर सारा थकवा, आजारपणाचा शिणवा दूर झाला आणि त्यांनी पुन्हा एकदा मैदानात शड्डू ठोकला.

२.
नितीश कुमारांच्या शपथविधीला त्यांच्या मांडीला मांडी लावून बसलेले देवेंद्रजी पूर्वीपेक्षाही अधिक मोठे,आत्मविश्वासाने ओतप्रोत वाटत होते,त्याचीच प्रचिती काल मुंबई भाजप तर्फे आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकीत बोलणाऱ्या देवेंद्रजींच्या भाषणातून येत होती.

३.
Read 10 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!

Follow Us on Twitter!