Malhar Profile picture
22 Nov, 13 tweets, 3 min read
अमृता फडणवीस यांनी गाणं म्हटलं. त्या एक 'प्रायव्हेट सिटीझन' आहेत. त्या काही भाजप नेत्या नाहीत की पदाधिकारी. जर त्यांच्यावर टिका करणाऱ्यांची भाषा आक्षेपार्ह असेल तर त्या सायबर क्राईम विभागात किंवा महिला आयोगात किंवा जवळच्या पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार करू शकतात.
अमृता फडणवीस पक्षाच्या पदाधिकारी किंवा नेत्या नसल्या तरीही त्यांचे मिस्टर देवेंद्र फडणवीस नक्कीच एवढी ताकत आणि दबदबा ठेवतात की पोलिसांना त्या तक्रारीची दखल घ्यावी लागेल. पाच-पंचवीस लोकांना आत टाकून त्यांचे शिक्षण, करियर, नोकरी-धंदा, पासपोर्ट सगळीकडून बुच मारणं त्यांना सहजशक्य आहे
. जर त्यांनी असं केलं तर ज्यांना हे भोगावं लागेल, त्यांचे भोग बघून इतर विकृत लोकं सुधारतील. जर नाही सुधारले तर कायद्याच्या चौकटीत राहून त्यांनाही धंद्याला लावता येईल. एवढ्यावरच न थांबता, 'नेम अँड शेम' पॉलिसी वापरत अशा विकृत मानसिकतेच्या लोकांच्या घरच्या-दारच्या लोकांनाही
फेमस करावं, जेणेकरून नातेवाईक आणि समाजही अशा लोकांना व त्यांच्या घरच्यांना वाळीत टाकेल. त्याचा अजून एक फायदा हा होईल की त्यांना आणि इतरांनाही कळेल की त्यांचे पक्ष आणि नेते त्यांच्या किती मदतीला येतात. त्यातून ह्या फालतू लोकांच्या डोक्यातले अजून काही भ्रम कमी होतील..
पण, मिस्टर अँड मिसेस फडणवीस यातलं काहीही करत नाहीत आणि करणारही नाहीत. त्यांना एक आजार आहे - सद्गुण विकृती. त्यातून ते बरे होणार नाहीत असा मला तरी पूर्ण विश्वास आहे. तेंव्हा, त्यांना ह्या विषयातून बाजूला ठेवतो. पोस्टचा विषय अमृता फडणवीस, देवेंद्र फडणवीस किंवा टीकाकार नाहीत,
तुम्ही आहात.

आता मित्रांनो, तुम्ही सांगा की तुम्ही कशाला तुमचं रक्त आटवताय? बरं तुमची स्वतःचं रक्त आटवताय ते पण ठीक आहे, ज्यांना कोणी झाट ओळखत नाही त्यांच्याशी डोकं लावून त्या लोकांना का फेमस करताय? जर त्यांची कुवत असती तर ते त्यांच्या कलेमुळे किंवा एखाद्या क्षेत्रातील त्यांच्या
कार्याच्या जोरावर फेमस झाले नसते का? जर फेमस होण्या एवढी लायकी असती, तर असली थेरं करावीच लागली नसती त्यांना. ना त्यांच्यात कुवत आहे ना कर्तृत्व. पण ते हुशार आहेत. त्यांनी फुकट फेमस होण्याची आयडिया शोधली आहे! तुम्हाला उचकवलं की तुम्ही इमानेइतबारे कामाला लागता आणि जो पर्यंत
त्यांना संपूर्ण महाराष्ट्र ओळखत नाही तोपर्यंत तुमची वायझेडगिरी सुरूच राहते, हे त्यांना चांगलंच माहीत आहे. गेल्या काही दिवसात (पुन्हा एकदा) हेच बघायला मिळालं आहे. तुमचे (पुन्हा एकदा) अभिनंदन!

याआधीही तुम्ही सोशल मीडियावरील काही लोकांना त्यांचे स्क्रिनशॉट फिरवून मोठं केलंत. एक तर
असे 'सिलेब्रिटी' आहेत की ज्यांच्या ७००००+ फॉलोवर्स मध्ये भाजपचेच ५५००० फॉलोवर्स आहेत! म्हणजे, हलके विचार असलेल्या टुकार लोकांना तुम्ही जबरदस्ती सिलेब्रिटी बनवता. वाईट नका वाटून घेऊ मित्रांनो, मी कौतुक करतोय तुमचं - की अशी कला फक्त आणि फक्त तुमच्याकडेच आहे. ट्रोल करण्याच्या नादात
तुम्ही अशा थर्ड-क्लास लोकांनाही मोठं करता ज्यांना त्यांच्या विचारसरणीच्या लोकांच्या सर्कल मध्येही काडीची किंमत नसते! मी अशी किमान डजनभर उदाहरणं देऊ शकतो, पण ही पोस्ट त्यांच्यावर नसून तुमच्यासाठी असल्याने त्या भिकारचोट लोकांच्या नावाचा उल्लेख करत नाही..
असो! एक विनंती आहे मित्रांनो. आता बास करा ना प्लिज ही फ्रिफंड मध्ये पब्लिसिटी द्यायची कामं. फालतू लोकांना जरा इग्नोर करायला शिका. त्यांचं काय, ते बोलतील, लिहितील, आरडाओरड करतील, काही काळ बोटं घालतील, मग वेडे-पिसे होतील, स्वतःचे केस उपटून घेतील आणि कोणी कुत्रं विचारत नाही हे बघून
आणि त्यांचंच चारचौघात हसं झालं की डिप्रेशन मध्ये कुठेतरी लायकीप्रमाणे आयोडेक्स-पाव खाऊन झोपतील..

बघा, पटतंय का! मी स्वतः असल्या लोकांच्या नादाला आजपर्यंत लागलो नाही आणि तुम्हीही लागू नका हा सल्ला आज पहिली आणि शेवटची वेळ देतोय. न मागता सल्ला दिला, त्याबद्दल सॉरी.

- वेद कुमार
आणि त्यांचंच चारचौघात हसं झालं की डिप्रेशन मध्ये कुठेतरी लायकीप्रमाणे आयोडेक्स-पाव खाऊन झोपतील
बघा, पटतंय का ! मी स्वतः असल्या लोकांच्या नादाला आजपर्यंत लागलो नाही आणि तुम्हीही लागू नका हा सल्ला आज पहिली आणि शेवटची वेळ देतोय. न मागता सल्ला दिला, त्याबद्दल सॉरी.
-VK @malhar4you

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with Malhar

Malhar Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @malhar4you

20 Nov
मानवी जीवनातील प्रत्येक प्रसंग काल्पनिक असो व वास्तविक एक 'गोष्ट' बनून जाते.
गोष्टी, आत्मकथन, अनुभव, प्रवासवर्णन ऐकणे हे प्रत्येकालाच आवडते. हे आवडत नाही असा मनुष्य सापडणे कठीण मात्र त्या गोष्टी समजून घेण्याची वाचनाची जी प्रक्रिया आहे तिथे 'आळस' मध्ये येतो.
@LetsReadIndia #म
गोष्ट समजून घेण्याचा झटपट आनंद हवा असल्याने वाचन होत नाही. परंतु वाचनामुळे संयम वाढीस लागतो व त्या संयमातून जी फलप्राप्ती ती खरंच आनंददायी असते. वाचनातून आपण आपल्या मनाला समजून सांगू लागतो. आकलन क्षमता, एकाग्रता वाढते.
@LetsReadIndia #मराठी
बरेच लोक या प्रक्रियेलाच कंटाळतात त्यामुळे तिकडे दुर्लक्ष करतात. कारण त्यांना तो आनंद झटपट हवा असतो; जो मोबाईल फोनमध्ये मिळतो. Scroll केल्याने झटपट गोष्टी डोळ्यासमोरून येत, जातात. विनाविलंब हवे ते पाहता येते.
@LetsReadIndia #मराठी
Read 5 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!

Follow Us on Twitter!