श्रीकांत जिचकर
कदाचित फारच कमी जणांना ठावूक असेल की भारतामध्ये एक असा महाराष्ट्राचा सुपुत्र होऊन गेला ज्याच्या नावावर भारतातील सर्वात जास्त शिकलेली व्यक्ती म्हणून Limca Book of Records मध्ये नोंद झाली होती.
सन १९७२पासून १९९० पर्यंत त्यांनी प्रत्येक वर्षी दोनदा,असे मिळून एकूण४२विद्यापीठांच्या परीक्षा दिल्या.
•जिचकार यांनी आपल्या करीयरची सुरुवात एका डॉक्टरच्या रुपात केली.त्यासाठी MBBS,MD ची पदवी घेतली
•नंतर त्यांनी कायद्याच्या शिक्षणासाठी LL.B.पोस्ट ग्रॅज्युएशन LL.M.ची पदवी घेतली
•मास्टर्स इन बिझनेस अॅडमिनीस्ट्रेशन (प्रशासन) DBM,MBA ची पदवी घेतली.

पत्रकारीता क्षेत्रात B.Journ ची पदवी घेतली.

श्रीकांत जिचकर यांनी १० विषयांमध्ये मास्टर्सची पदवी मिळवली आहे-

M.A. (लोक प्रशासन)

M.A. (अर्थ शास्त्र)

M.A. (समाजशास्त्र)

M.A. (संस्कृत)

M.A. (इतिहास)
M.A. (इंग्लिश साहित्य);

M.A. (दर्शन साहित्य);

M.A. (राजनीती शास्त्र);

M.A. (प्राचीन भारतीय इतिहास,संस्कृती आणि पुरातत्व);

M.A. (मनोविज्ञान)
नंतर
संस्कृत मध्ये D.Litt (डॉक्टर ऑफ लेटर्स) ची पदवी घेतली.
डॉ श्रीकांत जिचकर यांनी १९७८ मध्ये सिविल सर्विसेस परीक्षा दिली. ज्यामध्ये त्यांना IPS (इंडिअन पोलीस सेवा) विभाग मिळाले.

परंतु ते IPS मध्ये रुजू झाले नाहीत आणि पुन्हा त्यांनी १९८० मध्ये सिविल सर्विसेसची परीक्षा दिली. यावेळी त्यांना IAS (Indian Administrative Service) मिळाले.
डॉ जिचकर यांचे या नोकरी मध्येही जास्त काळ मन रमले नाही आणि ४ महिन्यानंतर त्यांनी या पदावरून राजीनामा देऊन निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला.

सन १९८० मध्ये डॉ श्रीकांत जिचकर यांनी वयाच्या केवळ २५ व्या वर्षी MLA (आमदार) बनून सर्वात कमी वयाचा MLA बनण्याचा रेकॉर्ड बनवला.
पुढे जाऊन डॉ जिचकर सरकारी मंत्री सुद्धा बनले. मंत्री असताना १४पेक्षा जास्त विभागांचे काम पाहत असत.

डॉ श्रीकांत यांना शिकण्याचा खूप छंद होता. त्यांच्याकडे जवळ ५२०००पेक्षा जास्त पुस्तकांची लायब्ररी होती. डॉ.श्रीकांत यांना गीता,उपनिषद वेद-पुराण इ ग्रंथांचे खूप खोल ज्ञान होते.
श्रीकांत जिचकर केवळ एक पुस्तकी किडा होते असे नाही. अष्टपैलू प्रतिभेचे धनी असलेले डॉ.जिचकर एक पेंटर, प्रोफेशनल फोटोग्राफर, स्टेज एक्टर आणि शिक्षणतज्ज्ञ पण होते.

आज संपूर्ण भारताला त्यांचा गर्व आहे
इतका ज्ञानी आणि प्रतिभावान व्यक्ती असून सुद्धा डॉ श्रीकांत जिचकर यांनी भारतालाच आपली कर्मभूमी बनवली आणि देशवासीयांची सेवा करण्याचा निर्णय घेतला होता.

Article Source: Inmarathi

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with 𝐘𝐔𝐕𝐑𝐀𝐉 𝐏𝐀𝐓𝐈𝐋🌾

𝐘𝐔𝐕𝐑𝐀𝐉 𝐏𝐀𝐓𝐈𝐋🌾 Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @YUVRAJ_speaks_

14 Feb
भाग -२ नरसिंह राव सरकारने केलेले आर्थिक बदल:
कोणत्याही राजकीय नेत्याला अर्थमंत्री न बनवता त्यांनी मनमोहन सिंह या सारख्या अर्थ तज्ञ ल मंत्री केले आणि त्यांनी देशाचा मार्ग सुकर केला. नरसिंह राव यांनी मनमोहन सिंह यांना मुक्त हस्ते कामकाज करू दिले.
त्यावेळी त्यांना प्रचंड विरोध होत असला तरी नरसिंह राव यांनी त्यांना प्रत्येक वेळीस पाठराखण केली.
मुळात हा बदल सहज झाला नाही. जर जागतिक बँक आणि इतर जगातली वित्तीय संस्थांनी भारताची अडवणूक केली नसती तर नरसिंह रावांनी तशीच जुनी पद्धती चालू ठेवली असती.
नरसिंहराव पंतप्रधान बनले तेव्हा देशाची आर्थिक स्थिती नाजूक होती.फक्त ७दिवस पुरेल इतकीच विदेशी मुद्रा रि.बँकेकडे होती.लवकर योग्य ती पावले उचलली नाहीत तर कर्जबाजारी होऊ अख्खा देश कोसळून पडेल.याच कारणामुळे नरसिंहराव यांनी डॉ.मनमोहनसिंग ना अर्थमंत्रालय सांभाळण्याची विनंती केली होती.
Read 15 tweets
14 Feb
नरसिंह राव सरकारने केलेले आर्थिक बदल:
स्वतंत्र भारतात अनेक संकटे आली 1962 चीन युद्ध, 1971 पाकिस्तान युद्ध , 1975 आणीबाणी पण बऱ्याच वेळा अमेरिका आणि रशिया यांच्या पाठिंब्यावर आपण तरलो. पण 1989 नंतर आपली आर्थिक स्थिती खराब होऊ लागली, राजीव गांधी चे सरकार हरले,
त्यांनी शहाबनो सारखे अनेक गंभीर चुका केल्या त्यामुळे हिंदु मध्ये चीड निर्माण झाली. त्यात भाजप ने अयोध्या सारखे प्रकरण लावून धरले. आणि त्यात 1989 आणि 1990 मध्ये देशात राजकीय स्थैर्य ढासळले. 1989 ला मंडल आयोग ची घोषणा झाली आणि इतर मागासवर्गीयांना 27% आरक्षण लागू झाले.
अनेक पातळीवर देशाची अवस्था खराब झाली अंतर्गत अराजकता आणि इतकी वर्ष भारताचा आर्थिक वाढीचा वेग हा कसाबसा 4% होता.100 कोटी आसपास लोकसंख्या मुलखाचे दारिद्र्य यास भारताची आर्थिक संरचना जबाबदार होती. सोव्हिएत युनियन पण फुटला.भारताचा मित्र नाहीसा झाला.
Read 6 tweets
13 Feb
महात्मा गांधी
गांधीमुळे भारतीय स्वातंत्र्यलढ्य मध्ये काय फरक पडला

वास्तविक भारतीय बहुतांश "अरे ला कारे" करणारे आहे

तिथं हा "कुणी मुस्कट फोडलं तरी शांत रहा" अस सांगणारा म्हातारा कुठं आवडणार. आमचे आजोबा गांधी बदल बोलताना भर भरून बोलतात. म्हणून जरा गांधीबाबा वाचावा म्हंटला.
थोड वाचलं पण मन नाही भरलं म्हणून थोडं आणखीन वाचलं त्यातून एक गोष्ट समजली गांधीजी नसते तर काय फरक पडला माहीत नाही पण गांधीजींच्या असण्याने काही फरक नक्की पडला
पहिल्यांदा स्वातंत्र्याची चळवळ क्रांती नसून उत्क्रांती होती हे लक्षात घेतलं.
१.गांधी मुळे पूर्वार्धात केवळ उच्च वर्गाची मक्तेदारी असणारी चळवळ तळागाळात गेली केवळ कार्यकर्तेच नाही तर नेतृत्व देखील उदयास आले

२.गांधीच सर्वात मोठं यश म्हणजे "ब्रिटिशांची भीती त्यांनी लोकांच्या मनातून घालवली, तुरुंग म्हणजे दुसरं घर झालं होतं
Read 8 tweets
9 Feb
शरद पवार यांचे महाराष्ट्र साठी चे कार्य :-
● युनेस्कोच्या फूड फॉर हंगर ऐवजी कामाच्या मोबदल्यात राशन देण्याचं श्रेय साहेबांना. त्यातून रोजगार हमी उभी राहिली.
● यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या माध्यमातून अनेक शेती, सहकार, शिक्षण, पर्यावरण अशा अनेक क्षेत्रात उपयुक्त कार्य .
● दिल्लीतील सेंटर फॉर इंटरनॅशनल ट्रोड इन अॅग्रीकल्चर अॅन्ड अॅग्रो बेस्ड इंडस्ट्रीज संस्थेच्या उभारणीत पुढाकार
● दिल्लीतील सेंटर फॉर इंटरनॅशनल ट्रोड इन अॅग्रीकल्चर अॅन्ड अॅग्रो बेस्ड इंडस्ट्रीज(सीटा) संस्थेच्या उभारणीत पुढाकार
●शिकत काम करणाऱ्यांसाठी यशवंतराव चव्हाण वि.स्थापना
● पवार अध्यक्ष झाल्यानंतर रयत शिक्षण संस्थेच्या शाळा, महाविद्यालये, आश्रमशाळांमध्ये मोठी भर. आणि त्यातून अनेक विद्यार्थी मोठमोठ्या हुद्द्यावर रुजू आहेत.
● विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टी रुजावी, संशोधक तयार व्हावेत, यासाठी रयत विज्ञान परिषदेची स्थापना केली.
Read 31 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!

Follow Us on Twitter!