बाळासाहेब ठाकरेंनी जाहीर सभेत सांगितले होते.. उद्धवला सांभाळा.. !! हे जर चालत असेल आणि सचिन तेंडुलकरने स्वतःच्या मुलासाठी शब्द खर्च केले असतील तर चूक काय? एक पित्याने आपल्या मुलाच्या भविष्याची चिंता करणे व त्यासाठी त्याला मदत करणे हे स्वाभाविक आहे..
राजकारणात जवाहरलाल नेहरू नंतर इंदिरा गांधी, इंदिरा गांधी नंतर राजीव गांधी पुढे सोनिया व नंतर राहुल व प्रियंकाही चालत असतील तर खेळात अर्जुन तेंडुलकर का नाही? आणि त्याला आता केवळ मुंबई संघात घेतलाय ना? की भारतीय संघात घेतलाय? तिकडे त्याला स्वतःचा खेळ करायचाय.
मैदानात स्वतःला सिद्ध करायचे आहे. बापजाद्यांनी कार्यकर्त्यांनी नियंत्रित केलेल्या मतदारसंघात 'xxxxx तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है' अश्या घोषणात निवडणूक नाही लढवायचिये. त्याला क्रिकेट खेळावे लागणार आहे. अंपायरने आऊट सांगितले की आऊट. क्रिज सोडून जावे लागणार आहे.
इकडे राजकारणात तर गुन्हेही नोंदवले जात नाही. आणि नोंदवलेच तर छातीत कळ आल्याची नाटकं केली की बाहेरही पडता येतं.. नाही का?

पुत्रमोह सर्वानाच असतो. पुत्रमोह कोणाला सुटलाय? मग तो धृतराष्ट्र असो वा राजा दशरथ असो. प्रत्येक पिता आपल्या मुलासाठी पित्याचे कर्तव्य पार पाडत असतोच.
मग ते पवार असो वा ठाकरे, शिंदे असो वा राणे, विखे असो वा पाटील. बच्चन असो वा सिन्हा, कुमार असो वा कपूर.. जर हे सर्व स्वीकारले जात असतील तर अर्जुन तेंडुलकरची निवड का स्वीकारू नये? अर्जुन ला विरोध करण्याआधी त्या सर्व पित्यांच्या पुत्र प्रेमाचा विरोध करा.. मग अर्जुनला विरोध करा.
राजकीय वारसा असल्यास राजकारणात मुलांना लगेच सहज सेट होता येतं. निवडणूक जिंकण्यासाठी स्वतःला सिद्ध करावं लागत नाही. कर्तृत्व सिद्ध केले नसतानाही एकदा का निवडणूक जिंकली की पुढे पाच वर्षे असतात सेट व्हायला. मात्र खेळात आणि कलेत बापाचा किंवा अन्य कोणाचा कितीही वशिला असू देत
सिद्ध करावंच लागतं. पहिल्या चेंडुपासूनच सेट होण्यासाठी स्वतःची क्षमता पणाला लावायची असते. इकडे तुम्हाला जागा मिळू शकेल कदाचित. पण स्थान मात्र स्वतःच निर्माण करायचे असते.. पटत नसेल तर विचारा रोहन गावस्करला आणि अभिषेक बच्चनलाही..

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with पप्पु (The BoogyMan)

पप्पु (The BoogyMan) Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @PappuPm1947

23 Feb
सावरकरांनी मार्सेलिसची ऐतिहासिक उडी मारून साहस तर केले मात्र क्षुल्लक चुकामुकीमुळे पदरी अपयश आले.

भारतात खटला चालवला गेला आणि आपल्याला गंमत वाटेल मात्र भारतात नव्हे तर अवघ्या विश्वाच्या क्रांतिकारी इतिहासात
अंमलबजावणी तर सोडाच , मात्र जाहीरही न झालेली सर्वात मोठी शिक्षा सावरकरांना झालेली आहे , दहा नव्हे वीस नव्हे तर तब्बल पन्नास वर्षे काळ्यापाण्याची शिक्षा ऐकून सामान्य व्यक्तीच्या पायाखालील जमीन सरकली असती ,
पण सावरकर मात्र शांत पणे तुरुंगाच्या पायरीशी न्यायाधीशाला म्हणाले ,

"Are you sure that you will rule India for 50 more years ? "

अश्या कठोर प्रसंगी हा आत्मविश्वास असणारे सावरकर हे वादळ होते .
इकडे सावरकर कुटुंबावर बंदी आणली गेली ,
Read 11 tweets
22 Feb
साधारण १९६५ सालचा शिवसेनेचा जन्म. तेव्हां मराठी माणूस मुंबई मध्ये ६८ टक्के होता आणि ठाकरे घराणे शिवाजी पार्क ला छोट्याशा वन रुम किचनमध्ये रहात होते. मार्मिक साप्ताहिकाचे प्रभादेवीचे कार्यालय सुद्धा भाड्याच्या जागेत होते.
आता मराठी माणूस मुंबई मध्ये १५ टक्क्यावर आलाय आणि ठाकरेंची मालमत्ता शेकडो कदाचित हजार कोटींची आहे. प्रथम मराठी मराठी केलं. मग हिंदूत्व हिंदूत्व केलं आणि आता सगळ्या मराठी माणसांच्या तोंडाला पाने पुसुन सोनिया बाईंचे आणि पवार साहेबांचे मांडलिकत्व स्विकारले.
सत्ता, पैसा आणि पुत्रमोहापायी हे सर्व घडत आहे. मराठी माणसांच्या आता लक्षात आले आहे की ह्या लोकांनी आपल्याला गेली ५५ वर्षे नुसतं फसवलं. शिवसेना प्रमुखांच्या आदेशा खातर आपल्या घरादाराला पणाला लावून किती तरुण आणि त्यांची कुटूंबे उध्वस्त झालेली मी स्वत: बघितली आहेत.
Read 4 tweets
19 Feb
'रणजीत देसाई' यांच्या 'श्रीमान योगी' या ऐतिहासिक कादंबरीत याचे खूप छान उदाहरण सापडते.

राजांची छावणी तिरुवन्नमलईला पडली होती...

सकाळची वेळ होती. राजे हंबीरराव, जनार्दनपंत यांच्यासह छावणीची पाहणी करत होते.....

राजे म्हणाले, 'गाव किती सुरेख आहे !'
'एके काळी हे गाव हिंदूंचे तीर्थ क्षेत्र होते.' जनार्दनपंतांनी सांगितले.

'एके काळी ?'

'हो. येथे श्रीशिव आणि समेत्तिपेरुमल दैवतांची सुरेख मंदिरे होती.'

'मग त्याचं काय झालं ?'

'विजयनगर-साम्राज्याच्या विध्वंसाबरोबर ती मंदिरे मुसल मानी आक्रमणाखाली पाडली गेली.'
'अरेरे ! आता त्या ठिकाणी काहीही नाही ?' राजांनी विचारले.

'त्या पुरातन मंदिरांच्या जागेवर
मुसलमानांनी मशिदी बांधल्या आहेत.' .....

राजांची पावले थांबली. एका खड्ड्यात काळभोर नंदी उखळून विरुपावस्थेत पडला होता. त्याच्या पासून थोड्याच अंतरावर सुंदर पाषाणात कोरलेले भ्रष्ट शिवलिंग
Read 18 tweets
19 Feb
कृषी विधेयके संसदेच्या दोन्ही सभागृहामध्ये बहुमताने पारित झाल्यावर त्या विधैयकांवर राष्ट्रपतिंंनी सही करून ती संविधानानुसार संमत झालेली आहेत.

सध्या किसान आंदोलनाच्या नावाने जी झुंडशाही चालली आहे, ती संविधान आणि लोकशाही मुल्यांच्या विरोधी आहे. आम्ही विधेयकामध्ये काय चुक आहे,
हे सांगणार नाही, सर्वोच्च न्यायालयाचा आदेश मानणार नाही, सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त समिती मानणार नाही, आम्ही चर्चेस तैयार आहोत, पण तिन्ही विधेयके मागे घेणे हीच आमची अट आहे अशा प्रकारच्या सणकी हट्टामुळे ह्या आंदोलनाच्या उद्देश्यावरच शंका येते.
सरकार कायदे दिडदोन वर्षे प्रलंबित ठेवण्यास तयार आहे, चर्चेस तयार आहे, पण ह्यांचा हेका एकच…

हे झुंडशाही आंदोलन यशस्वी झाले तर देशात संसदेने संमत केलेला एक ही कायदा लागू होणार नाही. या तथाकथित शेतकऱ्यांनी फक्त दिल्ली ठप्प केलेय, पण हे आंदोलन यशस्वी होऊन कायदे मागे घेतले,
Read 4 tweets
18 Feb
सध्या सरकारचा उत्पन्नाचा स्त्रोत आटला आहे.. आंतरराष्ट्रीय बाजारात करोनामुळे कच्च्या तेलाच्या किंमती खूप वाढल्या आहेत.. (त्या जाणूनबुजून वाढविल्या जात आहेत) तरी पण आपल्या कडे गाड्यांची रेकाॅर्डतोड विक्री होत आहे.. त्यामुळे इंधनाची गरज वाढत चालली आहे..
शहरांमध्ये सीनजीचा पर्याय असल्याने तितकी झळ जाणवत नाही पण गावागावात झळ खूप बसते. महाराष्ट्र राज्य सरकारचा कर लिटरमागे ३९ रुपये आहे जो सर्वात जास्त आहे..

शहरातील लोकांनी पर्यायी ईंधनाचा वापर करावा जेणे करून इंधनाची बचत होईल ईंधनाचा कमी वापर हा एकच पर्याय इंधनाच्या
किमती कमी करू शकतो..

टाटा इलेक्ट्रिक कारची विक्री खूप वाढली आहे.. आपण ८ लाख कोटी रुपयांचे कच्चे तेल आयात करतो.. ८ लाख कोटी आपण लिहू पण शकणार नाही..

असो सध्या किंमती कमी होणार नाही.. राज्य सरकारने कर कमी करावा.. केंद्र सरकारचा कर १९ रुपये लिटर मागे आहे
Read 4 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!

Follow Us on Twitter!