एका गाढवाला झाडाला बांधले होते. एका रात्री भुताने दोरी कापून गाढव सोडले. गाढवाने जाऊन शेतातील पिके नष्ट केली. चिडलेल्या शेतकऱ्याच्या बायकोने गाढवाला दगड घालून ठार केले.
या गाढवाचा मालक नुकसानीमुळे उध्वस्त झाला. प्रत्युत्तरादाखल त्याने शेतकऱ्याच्या बायकोला (१/५)
दगड घालून ठार केले. पत्नीच्या मृत्यूमुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांने विळा घेऊन गाढवाच्या मालकाची हत्या केली. गाढवाच्या मालकाच्या पत्नीला राग आला तिने आणि तिच्या मुलांने शेतकऱ्याच्या घराला आग लावली.
शेतकऱ्याने आपल्या घराची राख बघून पुढे जाऊन त्या गाढवाच्या मालकाच्या (२/५)
बायकोला आणि मुलाला दोघांना ठार मारले.
शेवटी जेव्हा शेतकऱ्याला वाईट वाटले, तेव्हा तो त्या भुताला म्हणाला "तुझ्यामुळे हे सगळे मेले, असं का केलं?"
त्या भूताने उत्तर दिलं "मी कुणाला ठार मारले नाही, मी नुसतेच दोरीने बांधलेले गाढव सोडले."
तात्पर्य-👇 (३/५)
आज माध्यमं भुतासारखी झाली आहेत. ते दररोज गाढवं सोडत राहतात. लोकं प्रतिक्रिया देतात आणि एकमेकांशी भांडतात, एकमेकांना दुखावतात. अगदी कसलाही विचार न करता सरतेशेवटी माध्यमांद्वारे सोडलेल्या प्रत्येक गाढवावर प्रतिक्रिया न ठेवण्याची आणि आपले मित्र आणि नातेवाईक यांच्याशी
(४/४)
असलेले आपले संबंध जपण्याची आपली जबाबदारी आहे.
माध्यमं (चॅनेल) तमाशा घडवून आणतात, आणि पैसा कमावतात धन्यवाद.