त्यांच्या लेखणीने त्यांना काय नाही दिलं?
नाव,पैसा,प्रसिद्धी,इभ्रत...
पण नशिबाचे चक्र असे फिरले की ना पैसा उरला ना इभ्रत आणि महत्वाचं म्हणजे ना एकुलता एक मुलगा उरला,ना सून!
एकाकी आयुष्य आलं वाट्याला
इश्वरी कृपा म्हणून त्यांची नात तेवढी सोबत आहे!
"संतोष आनंद" हे ते दुर्दैवी कलाकार!
इक प्यार का नगमा है...
मेघा रे मेघा रे...
तेरा साथ है जो मुझे क्या कमी है...
मोहब्बत है क्या चीज...
सारखी कितीतरी अर्थपूर्ण आणि सुपरहिट गाणी लिहिणारा,त्याकाळी नावाजलेला, दोन फिल्मफेअर आणि प्रतिष्ठित यश भारती अवॉर्ड्स जिंकणारा...
एकेकाळी प्रसिद्धीच्या, आप्त मित्रांच्या वलयात रहाणारा गीतकार..! सगळं ठीक होतं.. एकुलता एक मुलगा, सून आणि एक गोड नात.. पण मुलगा कसल्याशा फ्रॉडमध्ये अडकला की अडकवला गेला आणि अडकतच गेला.
फ्रॉड वाढत वाढत २५० करोडपर्यंत गेला, खूप प्रयत्न केले वर निघायचे पण त्या दलदलीत अधिकच रुतत गेला!
एक दिवस निर्णय घेतला आणि पत्नी व ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलीसमवेत एका भरधाव आगगाडीखाली झोकून दिलं. तो आणि त्याची पत्नी तर गेले पण अंगावर गंभीर जखमा झालेली मुलगी सुदैवाने वाचली. कदाचित संतोष आनंद यांना आधार द्यायलाच! मुलाने मृत्यूपूर्वी १० पानांची सुसाईड नोट लिहून ठेवली..
मोठमोठ्या पदाधिकाऱ्यांवर आरोप केले पण त्यावर अजूनपर्यंत तरी काही झालं नाही,झालं तरी सून-मुल परत येणार नाहीत,ते दिवस फिरून येणार नाहीत!
जो बीत गया वो दौर अब फिर न आएगा
मेरे दिल में तेरे सिवा कोई और न आएगा
घर फुक दिया हमने,अब राख उठानी है
जिंदगी और कुछ भी नहीं,तेरी मेरी कहानी है
आजोबा आणि नात दोघंच उरले एकमेकांसाठी पण दुर्दैवाचा फेरा अजूनही सुटलेला नाही.. गीतकार संतोष आनंद अपंग झाले.. ३-४ वेळा पायाचं ऑपरेशन झालं, व्हील चेअरवर आले.. हातपाय प्रचंड थरथरतात... आवाज कापतो.. जगायला पैसा नसला तरी लेखणीत दम मात्र पाहिल्यासारखाच आहे..!
कुछ पाकर खोना है, कुछ खोकर पाना है
जीवन का मतलब तो, आना और जाना है
दो पल के जीवन से, इक उम्र चुरानी है
जिंदगी और कुछ भी नहीं, तेरी मेरी कहानी है...
रविवारी इंडियन आयडॉल कार्यक्रमात संतोष आनंद यांची कथा ऐकून अगदी भडभडून आलं. कौतुक वाटलं ते नेहा कक्करचं.
त्यांना पाहून ती अगदी हमसून हमसून रडली. त्यांच्या गळ्यात पडून रडली. त्यांच्या डोक्यावर प्रेमाने हात ठेवला. त्यांना भावनिक धीर दिला. मुख्य म्हणजे ५ लाखांची आर्थिक मदत केली! स्वाभिमानी संतोष आनंद यांनी ती त्याही परिस्थितीत नम्रपणे नाकारली.. 'मी अजूनही काम करतो..इकडे तिकडे जातो..'
हे सांगताना त्यांना आवाज भरून आला आणि ऐकताना आमचे डोळे! नेहाने त्यांना ती भेट तितक्याच स्नेहाने स्वीकारायला भाग पाडलं. १० वर्षांपूर्वी इंडियन आयडॉलमधूनच नेहा वर आली आहे, गरिबी तिने पाहिलेली आहे.वयाने लहान आहे...पण दानत असायला सामाजिक जाण असावी लागते, जी तिच्यात ठासून भरलेली आहे.
नुसता पैसा असुन उपयोगाचे नाही.,
पैसा असला तरी दानत असतेच असंही नाही!
रविवारचा इंडियन आयडॉल कार्यक्रम फारच सुंदर झाला.. हृदयस्पर्शी झाला...अगदी पुन्हा पहावा असा!.. संगीतकार लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांची अवीट गाणी.. आणि त्याच तोडीचे स्पर्धक..
सर्वात महत्वाचं म्हणजे काळाआड गेलेल्या एका अशा असामान्य गीतकाराची ओळख ज्याबद्दल आपण कधी ऐकलं नाही आणि तशी शक्यताही नाही! .. तसेही आपण गाणी ऐकतो पण त्यामागील गीतकार संगीतकार यांच्याबद्दल फार कधी जाणूनही घेत नाही! संतोष आनंद यांना जगासमोर आणल्याबद्दल इंडियन आयडॉलचे खूप खूप आभार!..
त्यांचे 'किसी ने तो याद किया..' हे शब्द काळजाला घर करून गेले..!
ते सर्वच रडले असतील ज्यांनी हा कार्यक्रम पाहिला असेल.
आँखों में समंदर है,आशाओं का पानी है
ज़िंदगी और कुछ भी नहीं,तेरी मेरी कहानी है.
असामान्य शब्दांचे धनी गीतकार संतोष आनंद यांना ईश्वर सुदृढ आयुष्य देवो ही मनापासून इच्छा...!!
केवळ उपदेश करून समाजात बदलाची अपेक्षा करणार्या संतांपेक्षा मला कृतीतून समाजातील अज्ञानाचा अंधार दुर करणारे जोतिबा आणि सावित्रीबाई फुले नेहमीच उजवे भासतात....
जोतिबा फुलेंच्या आयुष्यावर बख्खळ लिखाण झालं परंतु तुलनेने सावित्रीबाईंचे कार्य मात्र थोडेसे उपेक्षित राहिले.
कॉ.गोविंद पानसरेंनी इच्छा दर्शवली होती कि, सावित्रीबाईंचे चरित्र सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी त्यांच्या जीवनावर अगदी ८आणे किमतीची छोटीशी पुस्तिका प्रकाशित करावी, ज्यास मान देऊन लेखिका शांता रानडे यांनी निव्वळ १५-२०पानी पुस्तिका लिहून काढली.
ज्यात सावित्रीबाईंच्या जीवनातील प्रमुख घडामोडींचा समावेश आपल्या ओघवत्या शैलीत मांडला आणि खरोखरच हा उपक्रम त्यावेळी प्रचंड यशस्वी ठरला.
आज या पुस्तिकेचे बाजारमूल्य काहीतरी ८-१०रुपयांच्या दरम्यान असावे, परंतु यामधील ठेवा तेव्हाही अनमोल होता आणि तो आजही अमुल्यच आहे.
"अय आम्या....आरं ते डिजेवालं ऐकंचना ना लेका.... " संत्या धावत आला अन् धापा टाकतच सांगू लागला...
काय म्हणतोय काय सुक्कळीचा..?? तोंडातील माव्याची पिंक टाकत आम्या जणू डाफरलाच....
"ते म्हणतंय, आर्डर हाय दुसरी, जमणार न्हाई म्हून" इती संत्या...
आता मात्र आम्याचा पारा जाम चढला, स्वगतच बोलत असल्यासारखा म्हणतो, "च्यायची गां... आपल्या दैवताची जयंती हाय बोल्ला न्हाईस व्हय तु तेला.?"
"बोल्लो ना दादा पण औंदा लै भाव खायलंय ते बेणं, म्हाराज म्हणून कव्हर फुकट वाजवू म्हणतंय, लोकं पैसं द्यायलेत, तुम्ही बी देवा, मंग येतू म्हणतंय."
चौकातल्या छ.शिवाजी महाराज पुतळ्यासमोर चाललेला हा संवाद तिथंच चहाच्या टपरी समोर बसलेले एक गृहस्थ कान लावून ऐकत होते.
वर पुतळ्याच्या चौथर्यावर एक पोरगं फतकल मारून बसलं होतं आणि वर्षभरापासून कपडा न लागलेला महाराजांचा पुतळ्यावरील पक्ष्यांनी केलेली घाण साफ करण्याचा प्रयत्न करत होतं.
याविषयी एक किस्सा ऐकून होतो मागे जो सत्यघटनेवर आधारित होता...
वणी दिंडोरी येथील सप्तश्रृंगी मंदिराच्या अगदी गाभार्यासमोर एका महिलेने हे असलंच काहीतरी सोंग आणलं, उभ्या उभ्या घुमू लागली, वर हात करून, केस मोकळे सोडून, गिरक्या घेत धापा टाकू लागली.....
बस मग त्यानंतर काय, "देवी आली, देवी आली" म्हणत लोकांची रिघ लागली तिला समस्या सांगण्यासाठी, जो तो प्रश्न विचारे आणि बाई त्यास समाधानकारक उत्तरं देई.
एका गृहस्थास दुसर्याने सांगितले, "साहेब तुम्ही पण विचारा की तुमच्या शंका, देवी लै जागरूक हाय, नक्कीच समाधानकारक उत्तर देईल..."
बस, मग झाले हे गृहस्थ पुढे आणि टाकला पहिला प्रश्न, "भारताचे विद्यमान राष्ट्रपती कोण??" बाईच्या धापा वाढल्या पण उत्तर काय मिळेना, मग हेच गृहस्थ परत, "नाही माहीत, बरं मग पंतप्रधान कोण ते तरी...??"
पुन्हा तेच, बाई जोरजोरात घुमू लागली, पण उत्तर नाही, मग हे गृहस्थच पुढे म्हणाले.,
मित्रांनो,एक पोस्ट वाचण्यात आली,आवडली, नव्हे अक्षरशः भावली मनाला.
पण, मुळ लेखकाचं नाव माहीत नसल्याने सहज गुगल केली तर अनेक मालक समोर आले, क्रेडिट द्यावं तर द्यावं कुणाला हा प्रश्न सतावतोय.
विचार आला शेअरच करू नये पण राहवेचना, म्हणून काही लिंक्स-सह शेअर करत आहे, बघा आवडते का...??
कुणीतरी प्रचंड विश्वासघात केला पाहिजे, कुठेतरी फसवणूक झाली पाहिजे, जवळची माणसे तिऱ्हाईतासारखी वागली पाहिजेत, गरज असताना सोडून गेली पाहिजेत, कुठल्यातरी क्षणी भीतीने गाळण व्हावी,
सगळ्यांच्यात असून एकटेपणाची भावना यावी, एकाचवेळी सगळी संकटे यावीत आणि इतकी की त्या क्षणी असं वाटावं की आता सगळंच संपलं!
परिस्थितीसमोर गुडघे टेकायची वेळ यावी, कधीतरी घोर अपमान व्हावा, कुठेतरी स्वाभिमान दुखावला जावा, काही ठिकाणी तर स्वताला गहाण टाकण्याची वेळ यावी,