#Thread : #BJPFoundationDay भाजपाचा इतिहास थोडक्यात

राष्ट्रवादी( Nationalist ) विचारधारेची परंपरा आपल्या देशामध्ये जरी जुनी असली तरी त्याला राजकीय वळण देऊन मुख्यप्रवत आणण्याचे कार्य १९५१ मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने केले.
(1/28)
संघावर वारंवार लागत चाललेय प्रतिबंधांमुळे संघाला सहजपणे काम करणे अवघड झाले होते. कारण त्या वेळेला संघाची बाजू मांडणारा एकही राजकीय पक्ष अस्तित्वात नव्हता. त्यामुळे संघातील लोकांना असे वाटू लागले होते कि आपल्या विचारधारेचा एक राजकीय पक्ष हवा आहे.
झाले असे कि नेहरू कॅबिनेट मध्ये असलेल्या श्यामा प्रसाद मुखर्जी यांनी कॅबिनेट मधून तातडीने राजीनामा दिला. कारण असे होते कि नेहरूंनी दिल्ली कराराचे उल्लंघन केले होते आणि हे मुखर्जीच्या तत्वाबाहेर होते. त्या राजीनाम्याचे अनेकांनी स्वागत केले.
मुखर्जींचे कॅबिनेट मंत्री म्हणून कार्य जबरदस्त होते. त्यांची लोकप्रियता सुद्धा जबरदस्त होती. नोव्हेंबर १९५० मध्ये त्यांनी गुरु गोळवलकर ( तत्कालीन सरसंघचालक ) यांची भेट घेतली. त्यांनी राजकीय पक्ष स्थापन करायचा मानस त्यांच्या समोर ठेवला.
मुखर्जीच्या मनात संघालाच राजकीय पक्ष म्हणून स्थापन करायची इच्छा होती पण गोळवलकर गुरुजींनी तो प्रस्ताव नाकारला, पण त्यांनी स्वयंसेवकांना सांगितले कि मुखर्जी उभा करत असलेल्या पक्षामध्ये जी काही मदत लागेल ती अवश्य करा. २१ ऑक्टोबर १९५१ ला मुखर्जींनी 'भारतीय जनसंघाची ' ची घोषणा केली.
१९५१-५२ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये जनसंघ पहिल्यांदा इलेक्टोरल पॉलिटिक्स मध्ये उतरले. सुरवातीच्या काळापासूनच जनसंघाला प्रचंड कष्ट सहन करावे लागले.

काँग्रेस कडून होणारी बदनामी, संप्रादयकतेचा लागलेला टॅग या सगळ्या गोष्टींमुळे भारतीय जनसंघाची सुरवात म्हणावी तशी सहज झाली नाही.
पण मुखर्जीच्या धोरणामुळे आणि करारी पणा मुळे जनसंघ हळुवार पद्धतीने वाढत गेला. ज्या वेळेला संपूर्ण देशात काँग्रेस ला प्रतिस्पर्धी म्हणून कोणीही उरले नव्हते त्यावेळेला जनसंघ त्याचा प्रतिस्पर्धी म्हणून पुढे आला. पहिल्या निवडणुकीत जनसंघाला केवळ ३ जागांवर विजय मिळाला. पण ते खचले नाहीत
१९५२ मध्ये जनसंघात दिन दयाळ उपाध्याय यांचे आगमन झाले. अत्यंत प्रतिभावान, राष्ट्रवादाने ओतप्रोत भरलेले आणि प्रचंड सध्या स्वभावाच्या उपाध्यायांना भारतीय जनसंघाच्या सरचिटणीस पदी निवडले गेले. श्यामा प्रसाद मुखर्जींचे नेतृत्वाखाली जनसंघ एखाद्या कमळाप्रमाणे हळुवार पणे उमलत होता.
पण २३ जून १९५३ रोजी श्यामा प्रसाद मुखर्जी यांचा गूढ परिस्थिती मध्ये मृत्यू झाला. जनसंघाच्या अध्यक्षपदाची कमान आता उपाध्यायांवर आली होती. १९५७ साली जनसंघ पुन्हा एकदा लोकसभा निवडणुकांमध्ये उतरला. मागच्या निवडणुकीच्या तुलनेत एक जागा वाढली.
आता ४ खासदार संसदेत होते. हळुवार पद्धतीने सुरु असलेला केंद्रातील प्रवास मात्र राज्यातील विधानसभांमध्ये जोरात सुरु होता. अनेक ठिकाणी जनसंघाला भरपूर मत मिळत होती. काँग्रेस ला एक जबरदस्त प्रतिस्पर्धी लाभला आहे हे जाणवत होतं.
उपाध्यायांच्या नेतृत्वाखाली जनसंघाने बरीच प्रगती केली पण १९६७ मध्ये त्यांचा खून झाला. अटल बिहारी वाजपेयी, या तेजस्वी आणि ओजस्वी वक्त्याकडे जनसंघाच्या शीर्ष नेतृत्वाचे दायित्व आले. अटलजींच्या कालखंडात बऱ्याच राजकीय घडामोडी घडल्या. काँग्रेस मध्ये दोन गट पडले.
इंदिरा गांधींच्या हुकूमशाही वृत्तीला कंटाळून काँग्रेस मधील जुन्या नेत्यांनी काँग्रेस सोडले होते. अटलजींनी प्रतिमा हळू हळू करत राजकीय वर्तुळात अजातशत्रू म्हणून होऊ लागली. त्यांच्या कडे देशाचे नेतृत्व करण्याची क्षमता आहे असे अनेकांना वाटू लागले.
१९७१ मध्ये अटलजींच्या नेतृत्वाखालीच बांगलादेश मुक्ती संग्रामासाठी जनसंघाने आंदोलन केले होते. बांगलादेश ला स्वातंत्र्य मिळाले. आणि आपण जे काही कमावले होते ते इंदिरा गांधींनी एका सहीने घालवून टाकले.
शिमला करारावर साह्य झाल्या आणि ९३,००० शरणार्थी पाकिस्तान कडे पुन्हा सुपूर्द करण्यात आले आणि ९००० स्क्वेअर किलोमीटर चा भाग जो भारतीय सैन्याने मिळवला होता तो सुद्धा गमावला. १९७१ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये अटलजींनी युती केली होती.
बहुमत जरी मिळाले नसले तरी त्या युतीच्या नेते पदी अटलजींना निवडले गेले. अटलजींनी स्वतःहून पक्षाची कमान अनुभवी आणि संयमी अश्या लाल कृष्ण अडवाणी यांच्या हातात दिली. हिंदुत्व, देशभक्ती या सोबतच शांत आणि प्रांजळ स्वभावाचे असलेले लाल कृष्ण अडवाणी उत्तम रित्या पक्षाचे काम सांभाळू लागले
इंदिरा गांधी वाट्टेल तसे शासन करू लागल्या होत्या आणि त्यांची राजकीय जागा धोक्यात आहे हे समजताच त्यांनी २५ जून १९७५ ला आणीबाणी जाहीर केली. देशातील सगळ्या पक्षांचे नेते, कार्यकर्ते याना अटक केली गेली. अटलजी, अडवाणीजी हे सगळे जण अनेक महिन्यांसाठी जेल मध्ये होते.
या हुकूमशाही ला मोडण्यासाठी म्हणून जयप्रकाश नारायण ( जे.पी.) यांनी युक्ती लढवली आणि सगळ्या पक्षांच्या नेत्यांना आव्हान केले कि त्यांनी राजकीय विरोध सोडून एका छत्राखाली एकत्र येऊन इंदिरा गांधींना हरवले पाहिजे.
त्यांनी जनता पार्टी हा पक्ष स्थापन करण्याची घोषणा केली. या मध्ये जनसंघाचे नेते सर्वात जास्त होते. अधिकृत रित्या जनता पार्टीत प्रवेश केल्यावर जनसंघ विसर्जित झाला. १९७७ साली ऐतिहासिक निवडणूक लढली गेली. काँग्रेस ला मोठा धक्का बसला.
जनता पार्टीला २७१ जागा मिळाल्या आणि काँग्रेस ला केवळ १५४. जनता पार्टीची सत्ता स्थापन झाली. ज्यात परराष्ट्र मंत्री म्हणून अटलजींना तर माहिती आणि प्रसारण मंत्रालयाची जबाबदारी अडवाणीजींना देण्यात आली.
पण, येत्या काळात जनता पार्टी मध्ये बरेच वाद निर्माण झाल्यामुळे अनेक नेत्यांनी राजीनामा दिला आणि जनता पार्टी कडे बहुमत उरले नाही. याचा फायदा घेत इंदिरा गांधी पुन्हा सत्तेत आल्या. १९८० च्या निवडणुकीत काँग्रेस ला बहुमत मिळाले आणि काँग्रेस ची सत्ता स्थापन झाली.
देशातील वाढती अराजकता पाहून, राष्ट्रवादी विचाराने प्रेरित असलेल्या नेत्यांनी ६ एप्रिल १९८० ला भाजपा ( भारतीय जनता पार्टी ) ची स्थापना केली. सुरवातीला या पक्षामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, जनसंघाचे पूर्व नेते आणि जनता पार्टी मधील काही नेते असे होते.
वाजपेयींना संस्थापक अध्यक्ष म्हणून घोषित केले गेले. कमळ हे भाजपाचे अधिकृत निवडणूक चिन्ह असेल म्हणून ठरले, कारण कमळाला भारतीय इतिहासात अनन्यसाधारण महत्व आहे असे अटलजी म्हणाले होते.
पुनःश्च हरिओम करत भाजपाला १९८४ मध्ये केवळ २ जागा मिळाल्या... असे करत करत पुढच्या निवडणुकीत भाजपाला ८५ जागा मिळाल्या. ९१ मध्ये १२०, ९८ मध्ये १८२ आणि मग भाजपा पहिल्यांदा केंद्र मध्ये सत्ता स्थापन करण्यात यशस्वी ठरली.
२००४ पर्यंत सत्तेत राहिल्यानंतर काँग्रेस ला बहुमत मिळाले आणि २००४ ते २०१४ पर्यंत सलग २ वेळा काँग्रेस ची सत्ता आली. पण २०१४ नंतर मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपाची दिशा पूर्णपणे बदलली. एकेकाळी केवळ २ जागा मिळालेला पक्षाला २८२ जागा स्वबळावर मिळाल्या होत्या.
संपूर्ण बहुमताने सरकार स्थापन झाले होते. देशातील बहुतांश भागात भगवा ध्वज फडकत होता. आणि तसेच २०१९ मध्ये सुद्धा घडले जेव्हा भाजपाला ३०३ जागा मिळाल्या.
आज भाजपा जगातील सगळ्यात मोठा राजकीय पक्ष आहे. १८० मिलियन मेंबर्स असलेला एकमेव पक्ष म्हणजे भाजपा. अनेक वर्षांची तपस्या, राष्ट्रभक्ती, एक संघपणा, कार्यकर्ते आणि देशातील जनतेमुळे आज हे शक्य होऊ शकले आहे.
आज ४१ व्य वर्धापन दिनानिमित्त त्या अगणित कार्यकर्त्यांना नमन ज्यांनी हा पक्ष एवढा मोठा करण्यासाठी मदत केली. येत्या काळात हा पक्ष आजून प्रचंड मोठा होईल आणि भारताची हरवलेली ओळख पुन्हा शोधून देईल यात शंका नाही!
(28/28)

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with Pandeyji Speaks

Pandeyji Speaks Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @malhar_pandey

5 Apr
#Thread : #FreeHinduTemples म्हणजे नेमकं काय ?
बरेच दिवस झाले आपण ट्विटर वर #FreeHinduTemples हा ट्रेंड पाहत आहोत. या मागे नेमकं तथ्य काय आहे ? एवढे लोक हा ट्रेंड का चालवत आहेत ? या चळवळीची नेमकी आवश्यकता काय या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण या थ्रेड मधून शोधण्याचा प्रयत्न करूया.
अगदी स्वातंत्र्य काळापासून अनेक साधू, संत, महंत यांनी हिंदू मंदिरावरील सरकारचे नियंत्रण संपावे या साठी मागणी केली.
स्वामी दयानंद सरस्वती ( अर्श विद्या गुरुकुलम )यांनी सुद्धा या मागणीला पूर्णपणे पाठिंबा दिला. १९४९ मध्ये संविधानात आर्टिकल २५ ( २ ) ( B ) चा समावेश केला गेला.
(2/16)
या कलमात संस्थानांची जी काही पुंजी आहे त्याचा वापर हा समाज कल्याणासाठी व्हावा असे नमूद केले गेले आहे. उद्देश जरी योग्य असला तरी हे आर्टिकल देशाच्या ' SECULAR ' विचारधारेच्या विरोधात आहेत, कारण असा कोणताही नियम इस्लामिक किंवा अन्य धर्माच्या संस्थांबद्दल लागू होत नाही.
(3/16)
Read 16 tweets
3 Apr
#Thread : Fort AjinkyaTara.
There are many cities in Maharashtra which have immense historical importance,one of them which was once the capital of the Maratha empire has a special place in the heart of every true Maratha. The city Satara.
(1/17)
Right in the middle of the city, stands Ajinkyatara,
the fort which is witness to many important historical events. It's about 120 km from Pune. As we cross the beautiful Khandala Ghat, we enter Satara. The fort is standing tall, with bhagwa Dhwaj at its top.
(2/17)
Lets explore the history of this fort first. It is said that this fort was built by the Bhoj Shilahara. In time, Islamic sultanates began to grow and the fort passed from Hindu kings to these dynasties.
(3/17)
Read 16 tweets
2 Apr
#Thread
Let's get some things cleared. Recently I have seen many RWs or so-called RWs mocking PM Modi the same way as Ravish Kumar and other reporters who have made their career by hurling abuses at him.
(1/13)
Now, as many nationalist supporters of BJP pointed out, initially these people use the tag of RW, Modi Supporter, Sangh etc, to attract followers and once they gain a substantial fan base they think they have gained moral right to mock the party and PM Modi .
(2/13)
I repeat I am using the word ' MOCK '. They retort to the classic ways to take a jibe against Modiji against whatever he does, without checking the background. This man is active in electoral politics for a period more than your age.
(3/13)
Read 13 tweets
1 Apr
#Thread : Dr. Hedgewar Jayanti.

' Keshav Baliram Hedgewar ' the person who brought a revolution to the present Hindu society as he formed RSS on 27th Sept 1925. Today is his 132nd Birth Anniversary. Lets, take a look at his life briefly in this thread.
(1/20)
Dr.Keshav Hedgewar was born on 1st April 1889 in Nagpur.He was a staunch nationalist since his childhood.Even as a child of eight years of age, he threw away in disgust the sweets given to him in his school on Queen Victoria’s birthday, saying that it was a sign of slavery.
‘How is it that these Englishmen coming from thousands of miles away have become our rulers?’ a question he asked to his elders when he was a student. He was rusticated from the school for lighting the flame of Vandemataram Movement among the students.
Read 20 tweets
31 Mar
|| शिवजन्म ||

वाद्ये कडाडू लागली, संबळ झांझा झणाणु लागल्या. गडावरच्या नगारखान्यात सनई चौघडा झड़ू लागला.नौबत सहस्रशः दणाणु लागली. तो दिवस सोन्याच्या ! तो दिवस रत्नांचा ! तो दिवस कौस्तुभाचा, अमृताचा !! छे: छे:, त्या दिवसाला उपमाच नाही !

(1/4)
तीनशे वर्षानंतर ! तीनशे वर्षानंतर ! कोणत्या शब्दात त्या सुवर्णक्षणाचे मोल सांगू ? अहो ते अशक्य, केवळ अशक्य ! केवळ शतका शतकांनीच नव्हे, युगायुगांनीच असा शुभ क्षण निर्माण होतो. त्याचे मोल अमोल !!

(2/4)
शालिवाहन शकाच्या १५५१ व्या वर्षी, शुक्लनाम संवत्सरात, उत्तरायणात,फाल्गुन महिन्यात, वद्य तृतीयेला, शिशिर ऋतुत, हस्त नक्षत्रावर सिंह लग्नावर, शुक्रवारी सूर्यास्तानंतर पूर्ण अंधार पडल्यावर शुभ क्षणी,
(3/4)
Read 5 tweets
30 Mar
#Thread : The Silence of Liberals

With so many things happening in our nation, from changing political equations to MLA being stripped in public by the so-called peaceful farmers to the 100 Crore scam, one thing we can see in common is the silence of the liberals!
(1/12)
A few days ago, an MLA, an elected representative of people, which happens to be a constitutional post, was stripped naked in public by the so-called ' Peaceful farmers ' in Punjab, but did we see any self-proclaimed human rights warrior raise voice against this?
No, we haven't! Now, this obnoxious behaviour of liberals is becoming pretty predictable. They didn't raise their voice because the MLA was from BJP, he was a Hindu and the state in which this happened is not ruled by BJP !
Read 12 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!

Follow Us on Twitter!