Rajveer Profile picture
8 Apr, 10 tweets, 3 min read
#Live_Updates :- मैत्रीण जराशी चिडलेली होती. कारण आज तिची नाईट शिप होती. ते सुद्धा कोव्हिडं word ला.

रागाने मला फोन करून सोडायला चल असा आदेश देऊन माझी वाट पाहू लागली.
कसाबसा तिच्या घरापाशी गेलो.

उशीर झालेला त्यामुळे तिला गाडीवर बसण्याची नम्र विनंती करून गाडी स्टार्ट केली.
नेहमी च्या रस्त्याने जाताना पोलिसांनी अडवले पण तिचे हॉस्पिटलचे id card पाहून आम्हाला लगेच सोडले.
तिथून पुढे माझ्या निरागस अशा बालमैत्रीणीने सरकार च्या नावाने ज्या ओव्या गायल्या 🎧
त्या ऐकून माझे तर कानच तृप्त झाले.
मी फक्त hmm असा रिप्लाय करत गाडी चालवत होतो. . . .
शेवटी तिचे हॉस्पिटल आले. आणि त्या वेताळबाईला तिथे सोडून मी गाडी घराकडे वळवली.
येताना तोच मार्ग निवडला. पण वाटेत पोलिसांनी पुन्हा अडवले. 😕
मग मी पुन्हा नम्र विनंती, घरी फोन वगैरे प्रयत्न करून तिथून घरी आलो..
(हुश्श सुटलो बाबा एकदाचा)
#COVIDSecondWave
आज सहजच मनात एक प्रश्न आला
जनतेची काळजी म्हणून लॉकडावून लावणाऱ्या सरकार ला सर्वसामान्य कोव्हिडं योद्ध्यांची काळजी वाटत नाही का ?

कितीतरी सर्वसामान्य कोव्हिडं योद्धे असतील.
नर्स, आया, मावश्या,मामा,वॉर्डबॉय हा झाला फक्त हॉस्पिटल स्टाफ.
अजूनही भरपूर कोव्हिडं योद्धे आहेत. थोडस निरीक्षण केल्यावर लक्षात येईल.
पण त्यासाठी सर्वसामान्य माणसाची नजर लागते. हे कोरोनाच्या नावाखाली लपलेलं भयानक वास्तव आहे.

बससेवा बंद, पुन्हा रात्रीची संचारबंदी, कधी नाईट शिप,
रोज12ते 18 तास काम, तिथून चालत घरी यायचं,
थोडावेळ आराम आणि पुन्हा #COVID योद्धा, युद्धासाठी तयार. पुन्हा चालत जायचं परत तीच दगदग, तोच त्रास किती सहन करणार हे योद्धे,

आता सरकार चे काही सेवक म्हणतील खाजगी वाहनांचा वापर करायला बंदी नाही वगैरे.
पण इथे अगदी सर्वसामान्य म्हणजे ज्यांच्याकडे वाहनच नाही अशा योध्यांचा
कोणीही विचार करणार नाही. काही प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये असेल सोय बस ची पण प्रत्येक ठिकाणी नाही ना अशी सुविधा.

डोकं शांत ठेवून विचार करा. कोव्हिडं आणि लॉकडाऊन याचा वापर राजकारणासाठी होतोय हे भयाण वास्तव समोर येईल.
#Politics
सरकार ने खुशाल लॉकडाऊन करावं पण जनतेला त्रास होईल असा लॉकडाऊन काय कामाचा ??

कोरोनाचा बागुलबुवा केल्यासारख वातावरण आहे सध्या.
जो येतो तो फक्त कोरोना पासून वाचण्याचा सल्ला देतोय.
पण नक्की कोरोना झालाय कोणाला ??
याचा तरी विचार करावा.
जनताजनार्दन फक्त मत गोळा करण्यासाठी असते. ही धारणा राज्यकर्त्यांनी सोडावी.
असेल तो कोरोना भयंकर पण त्यापेक्षा भयंकर जनतेला होणारा त्रास आहे.

दुकान बंद - वस्तूंचे दाम दुप्पट
मार्केट बंद - भाज्यांचे दाम दुप्पट
प्रत्येक गोष्टीला डबल किंमत मोजायची. याला काय अर्थ आहे ??
कोरोना आला मागच्या वर्षी, वर्षा अखेरीस लस सुद्धा आली.
अजूनही लसीकरणच सुरू आहे, एवढा विलंब कशाला ??
कोरोना चा प्रादुर्भाव वाढतोय का तर नागरिक नियम पाळत नाहीत. ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे

सर्व नियमांची अंमलबजावणी कोणी केली पाहिजे ??

#lockdown2021
#Maharashtra

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with Rajveer

Rajveer Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @Rajveer_O

27 Mar
GOOD AFTERNOON @SunderChavan

तुला एक चांगला सल्ला देतो. त्याआधी तुला एक समजावून सांगतो.
.@Shona__RS सोनल ताई हि मला मोठया बहिणी समान आहे
तिच्या मैत्रिणी :- वेदश्री, तृप्ती, इत्यादी या सर्वच मुली मला बहिणीसमानच आहेत.
या सर्व बहिणींच्या ट्विट पासून तू दूरच राहा, अगदी दुसऱ्या अकाउंट वरून पण ट्रोल वगैरे करायचे नाही.
कारण तुझी भाषा अगदीच गलिच्छ आणि अश्लिल स्वरूपाची आहे,

तू स्वतः राष्ट्रवादी पक्षाचा कार्यकर्ता म्हणून मिरवतोय, आणि हे असले घाणेरडे चाळे करतोय,
बदनामी तुझी नाही तुझ्या पक्षाची होते.
आणि स्क्रिनशॉट वगैरे ते तुझ्याकडे असतील तर तू जास्त पावरफुल वगैरे ते गैरसमज सोड,

ते दादा, भाई , गुंड, पक्षाचा कार्यकर्ता, ती दहशद तिकडं गल्लीत दाखवायची, इकडं

आमच्या बहिणींना त्रास अजिबात द्यायचा नाही. रिट्विट वगैरे अजिबात नाही,
Read 7 tweets
25 Mar
Image
पांडवांनी खांडववन जाळले व त्या भूमीवर इंद्रप्रस्थ वसविले.युधिष्ठिर राजा झाला. पराक्रमी पांडवांनी चारी दिशांच्या राजांना जिंकून त्यांना मांडलिक बनविले. जरासंधासारख्या बलाढय राजालाही शिताफीने ठार मारले. त्यानंतर युधिष्ठिराने राजसूय यज्ञ केला. त्या महान सोहळ्याला विविध देशांचे राजे,
दुर्योधन, शिशुपाल, ऋषिगण, व्यास वगैरे आले होते. भीष्मांनी राजमंडळात श्रेष्ठ अशा कृष्णाला अग्रपूजेचा मान दिला. कृष्णाच्या आतेभावाला दुष्ट शिशुपालाला ते रुचले नाही. त्याने भीष्मांची व कृष्णाची खूप निंदा केली. शिशुपालाच्या लहानपणच्या एका प्रसंगातून त्याच्या मातेला कळले होते की
Read 7 tweets
18 Mar
*त्रासांचं ओझं; सुखी राहण्याचा मार्ग*🌷🌷

तथागत गौतम बुद्ध आपल्याकडे येणाऱ्या प्रत्येकाचे शंका निरसन करत असत. समस्येतून उपाय सांगत असत. त्यांच्याकडे आलेला कोणीही विन्मुख होऊन परतत नसे. त्यामुळे प्रत्येक जण आपल्या दुःखाची उकल करण्यासाठी तथागत बुध्दांकडे येत असे..
एक दिवस एक व्यक्ती एक प्रश्न घेऊन भगवान बुद्धांच्या भेटीस आली. भगवान बुद्धांच्या नुसत्या दर्शनाने त्या व्यक्तीचे मन शांत झाले.

ही मनःशांती सातत्याने अनुभवता यावी, म्हणून त्या व्यक्तीने भगवान बुद्धांना प्रश्न विचारला, 'भगवान,आम्ही संसारी माणसं छोट्या गोष्टींनी त्रासून जातो.
Read 12 tweets
17 Mar
सेक्युलर हिंदू बनून sorryAsif असले ट्विट टाकण्या पेक्षा

गुंड हिंदू बनून माझ्या हिंदूधर्माच्या पवित्र देवस्थानाच रक्षण केलेलं माझ्या मनालाही पटेल, आणि धर्मालाही पटेल

वो फिर आयेगा तो फिरसे मार खायेगा, संपला विषय

धर्मनिरपेक्ष (secular)हिंदूंनी आम्हाला हिंदुधर्म शिकवूच नये, 🙏🚩
तुमच्या मस्जिद मध्ये आम्हाला प्रवेश नाही,
आमच्या मंदिरात तुम्हलाही प्रवेश नाही,

आम्ही दर्ग्याचा अपमान करत नाही ,
तसा तुम्ही आमच्या देवळांचा अपमान करू नका,
#सर्वधर्म_समभाव 🙏🚩
हिंदू- सर्व धर्माचा आदर करणारा, शांततापूर्ण

हिंदुत्व- "भले तर देऊ कासेची लंगोटी, नाथळाचे माथी हाणू काठी" 🚩
'संत तुकाराम महाराज' 🙏

धर्मांध - औरंगजेब बादशहा ने कट्टरपणा दाखवला, कत्तली केल्या, मंदिर पाडली, वगैरे वगैरे, हा इतिहास झाला, अजून खूप काही आहे
Read 6 tweets
17 Mar
तुमचे विचार चांगले असतील तर तुम्हाला चांगल्या व्यक्तींची साथ सुद्धा मिळते,

LW किंवा RW करत बसण्यात काहीच अर्थ नसतो,
खेकड्यासारखं एकमेकांचे पाय ओढत बसून हिंदुत्वाचे विचार मांडताच येत नाही,
जातीपाती, राजकारण, याच्या दलदलीत अडकण्यापेक्षा हिंदुत्ववादी बनून विचार मांडले तरच योग्य व्यक्तींची साथ मिळते,

आपण राजकारनाच्या नादी लागून हिंदुद्वेष तर पसरवत नाही ना ?
हा प्रश्न स्वतःच्या मनाला विचारा आधी,

बाकी जय शिवराय 🙏🚩
हे वरच सर्व त्या लोकांसाठी होत ज्यांचा #Secularism धर्मनिरपेक्षता, नास्तिकता
#सर्वधम_समभाव या शब्दावर त्यांचा अधिक विश्वास आहे,

"जेवढे लोक टॅग केलेत त्यांचे विचार मला जास्त पटतात, म्हणून मी त्यांची साथ देणारच"

बाकी गुलाम, चमचे वगैरे लोकांनी मला आत्ता unfollow करावं 🙏
Read 6 tweets
29 Jan
नेटवर्क मार्केटिंग (तुचिया बनाने की निन्जा टेक्निक)

कोणे एके काळी मी बेरोजगार झालो होतो,
दाढी वाढवून डायरेक्ट हिमालयात जाऊन राहण्याचा घरच्यांचा टोमणा ऐकून त्रासलेलो,
असेच एके दिवशी टोमणे ऐकून
बसलेलो असताना अचानक
इन्स्टाग्रामवर एका अप्सरेसमान सुंदर आशा मुलीचा Hi असा मॅसेज आला ,
मग तिला रिप्लाय न दयावा असे पाप कोण करेल, मी पण Hii असा रिप्लाय करून टाकला
तिथून बोलणे सुरू झाले, ते जॉबवर येऊन थांबले,
(घरी किंवा ऑफिस मध्ये आठवड्यातील फक्त 2-3 दिवस काम करून महिना 15 ते 20 हजार कमवा)
आशा टाइप ची ऑफर आली,
मी बेरोजगार होतो लगेच हो बोललो,
तिकडून सुंदरीचा मॅसेज
आला की तुम्हाला ट्रेनिंगला यावं लागेल,
त्यासाठी तुमची अपॉइंटमेंट फिक्स करते तुम्ही उद्या सकाळी 10 ला पाठवलेल्या पत्त्यावर या
मी ठीक आहे असं बोलून चॅट संपवली, घरी येऊन खुशखबर देऊन टाकली,
त्या दिवशी मी जमिनीपासून 4 बोट उंच हवेत चालत होतो,
Read 26 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!

Follow Us on Twitter!