काल पर्वा टीव्ही वर समजणारा आणि कॉलर tune ने ओळख करून दिलेला कोरोना आता घरा दारात येऊन पोहोचला आहे.
कोणी अनावश्यक भीतीने जास्तीचे काढे पिऊन उगीचच काळजी पोटी पोट खराब करून घेतले तर कोणी कोरोना वैगेरे पैसे कमवायचे नाटक आहे असे म्हणून बिनधास्त गावभर फिरत राहीलं.
माझ्या मुलाच्या लग्नालाच बरा कोरोना म्हणून काहींनी हजारोंच्या पंक्ती उठवल्या तर खूप जवळचा आहे म्हणत काहींनी कार्यक्रमांत हजेऱ्या लावल्या.
जेव्हा फक्त दोन अंकी संख्या असायची तेव्हा कुत्री सुद्धा रस्त्यावर दिसत नव्हती आणि आता हजारो रुग्ण रोज येतात तरी कोणीच मागे हटायला तयार नाही.
जेव्हा काहीच नव्हते तेव्हा मोबाईल, टीव्ही, वृत्तपत्रे, डोक्यात, मनात सगळीकडे कोरोना होता, आता सगळीकडे खरच कोरोना आहे पण वरीलपैकी कुठेच फारसा जाणवत नाही...
आर्थिक भार नको म्हणून सरकार ही कडक निर्बंध लावायला मागेपुढे पाहत आहे..
पण प्रशासन आणि सरकार ही काय काय करणार,
आपली जबाबदारी सरळ सरकार वर झटकून मोकळ व्हायचं, डॉक्टरांना आणि हॉस्पिटल ला दोषी ठरवून उपदेश पाजायचे आणि स्वतः साधा मास्क सुद्धा नीट लावायचा नाही.
सध्याची परिस्थिती माहिती नसेल तर नीट लक्षात घ्या, कधीही न पाहिलेले तांडव सध्या सुरू आहे, पैशाचा आणि पदाचा माज असेल तर विसरून जा,
खूप मोठ्या पदाच्या आणि खूप गडगंज संपत्ती असलेल्यांना रस्त्यावर बेड साठी, ऑक्सिजन साठी, इंजेक्शन साठी भिक मागताना आम्ही पाहिलेलं आहे, बघवत नाही..
एवढ्या लोकांना पुरेल अशी कोणतीच यंत्रणा आपल्याकडे ह्या घडीला नाही..
कोरोना वर इलाज नाही मग हॉस्पिटल बिल कसले घेतात म्हणणारे आणि
वॉट्स अप वर पोस्ट फिरवणारे स्वतः वर बितते तेव्हा बेड देता का बेड म्हणत विनवण्या करत आहेत. कोरोना वर योग्य वेळी, सौम्य लक्षण असताना इलाज केला तर नक्कीच विजय मिळवता येतो, एका लिमिट बाहेर गेल्यावर आम्हीही हतबल होतो.
ह्या लाटेत बरेच लोक सौम्य लक्षणात सावरत आहेत हीच काय ती जमेची बाजू,
पण त्यातही काही लोक ह्याच गोष्टीचा बाऊ करून काहीच होत नाही म्हणत खूप लोकांना प्रसाद वाटप करतात, त्यातील काही सीरियस होवून जमा होतात आणि बरेचसे आधी हॉस्पिटल ला बेड मिळण्याच्या रांगेत आणि नंतर स्मशान भूमीत नंबर लागे पर्यंत ताटकळत राहतात, परिस्थिती भयावह आहे..
हॉस्पिटल मधील नर्स, डॉक्टर, कर्मचारी स्वतः कोरोना शी दोन हात करत रात्रंदिवस राबत आहेत पण आता सगळे थकले आहेत, वस्तूंचा प्रचंड तुटवडा आहे, कधी Remdesevir नाही मिळत तर कधी ऑक्सिजन,कधी बेड खाली नसतो तर कधी व्हेंटिलेटर...
तारेवरची कसरत चालू आहे.
माझी तमाम जनतेला हात जोडून विनंती आहे, तुम्हाला तुमच्या जीवाची पर्वा नसेल तर सरळ बॉर्डर वर जा तिथे तुमच्या जिवाचं नक्कीच चीज होईल, देशोपायोगी ठरेल परंतू स्वतः निष्काळजी पणाने वागून अख्या घरादाराला आणि संपूर्ण राष्ट्राला बरबाद करू नका..
संपर्कात येणारी प्रत्येक व्यक्ती मग ती बायको,नवरा,आई, वडील,भाऊ कोणीही असो, +ve आहे असे समजूनच व्यवहार करा,कारण सगळ्याच रुग्णांना लक्षणे नसतात.
सर्व पार्ट्या,एकत्र बसणे बंद करा
गरज नसताना बाहेर पडू नका आणि जावंच लागलं तर मास्क(नाक आणि तोंड पूर्णपणे झाकेल असाच) पूर्णवेळ लावून ठेवा.
अंतर ठेवा, गर्दी करू नका आणि गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका.
कुठलेही औषध,गोळ्या,काढे डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्या..
घरात वयोवृद्ध लोक असतील किंवा पूर्वीचे आजार असतील तर तुम्ही स्वतः जास्त काळजी घ्या.
ब्रेक द चेन तेव्हाच शक्य आहे जेव्हा एकूण एक व्यक्ती जबाबदारीने वागेल...
पोलिस सांगतील किंवा प्रशासन दंड करेल याची वाट बघत बसण्यापेक्षा प्रत्येक बिना मास्क च्या व्यक्तीला किंवा मास्क व्यवस्थित नसलेल्या व्यक्तीला समज द्या,वेळ आली तर कडक शब्दात समजवा असे केल्याने कोणाचा तरी जीव वाचवण्याचे पुण्य तुम्हाला नक्कीच मिळेल.
मित्रांनो कोरोना कधी आणि कसा जाईल माहिती नाही,संभ्रम आम्हालाही आहे,जीव आम्हालाही आहे,कुटुंब आम्हालाही आहे परंतु सध्या ज्या गोष्टी आपल्या हातात आहेत किमान तेव्हढ्या तरी आपण केल्याचं पाहिजेत, नाहीतर येणाऱ्या काळात फक्त आणि फक्त मृत्यू तांडव पहावं लागेल.
सर्वांना कळकळीची विनंती आहे, लग्न समारंभ, मुंज, अंतिम क्रिया, दशक्रिया असल्या कार्यक्रमात दिसुच नका!
आज आपण सर्वांनी ठरवले तरच कोरोना पासून मुक्त होवू शकू, एकट्या दुकट्या ने किंवा आरोग्य विभागाने किंवा प्रशासनाने ठरवून काहीच होणार नाही.
तुम्हाला लॉक डाऊन लावून घरात कोंडून ठेवणे हे तुमच्याच निष्काळजी पणाच फळ असणार आहे आणि यात अनेक कष्टकरी, मजूर भरडले जाणार आहेत.
सर्वांनी काळजी घ्या आणि कोरोना कसा थांबवता येईल, वैयक्तिक पातळीवर कसा दूर ठेवता येईल याची वेळोवेळी खबरदारी घ्या.
येणारा काळ आपलाच असणार आहे. जय हिंद!
( टीप -ज्या लोकांना हा लेख वाचून ही काहीच गांभीर्य नसेल त्यांनी एक दिवस जवळील कोरोना रुग्णालयाच्या बाहेर उभ राहून दिवसभर घडणाऱ्या घटना पहाव्यात किंवा सहज जमेल त्या वेळेत स्मशानभूमीत फेरफटका मारून यावा,सगळे भ्रम दूर होतील)
साभार:
-डॉ.सचिन कौतिकराव देवरे
जनरल सर्जन, नाशिक.
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
त्यांच्या लेखणीने त्यांना काय नाही दिलं?
नाव,पैसा,प्रसिद्धी,इभ्रत...
पण नशिबाचे चक्र असे फिरले की ना पैसा उरला ना इभ्रत आणि महत्वाचं म्हणजे ना एकुलता एक मुलगा उरला,ना सून!
एकाकी आयुष्य आलं वाट्याला
इश्वरी कृपा म्हणून त्यांची नात तेवढी सोबत आहे!
"संतोष आनंद" हे ते दुर्दैवी कलाकार!
इक प्यार का नगमा है...
मेघा रे मेघा रे...
तेरा साथ है जो मुझे क्या कमी है...
मोहब्बत है क्या चीज...
सारखी कितीतरी अर्थपूर्ण आणि सुपरहिट गाणी लिहिणारा,त्याकाळी नावाजलेला, दोन फिल्मफेअर आणि प्रतिष्ठित यश भारती अवॉर्ड्स जिंकणारा...
एकेकाळी प्रसिद्धीच्या, आप्त मित्रांच्या वलयात रहाणारा गीतकार..! सगळं ठीक होतं.. एकुलता एक मुलगा, सून आणि एक गोड नात.. पण मुलगा कसल्याशा फ्रॉडमध्ये अडकला की अडकवला गेला आणि अडकतच गेला.
फ्रॉड वाढत वाढत २५० करोडपर्यंत गेला, खूप प्रयत्न केले वर निघायचे पण त्या दलदलीत अधिकच रुतत गेला!
केवळ उपदेश करून समाजात बदलाची अपेक्षा करणार्या संतांपेक्षा मला कृतीतून समाजातील अज्ञानाचा अंधार दुर करणारे जोतिबा आणि सावित्रीबाई फुले नेहमीच उजवे भासतात....
जोतिबा फुलेंच्या आयुष्यावर बख्खळ लिखाण झालं परंतु तुलनेने सावित्रीबाईंचे कार्य मात्र थोडेसे उपेक्षित राहिले.
कॉ.गोविंद पानसरेंनी इच्छा दर्शवली होती कि, सावित्रीबाईंचे चरित्र सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी त्यांच्या जीवनावर अगदी ८आणे किमतीची छोटीशी पुस्तिका प्रकाशित करावी, ज्यास मान देऊन लेखिका शांता रानडे यांनी निव्वळ १५-२०पानी पुस्तिका लिहून काढली.
ज्यात सावित्रीबाईंच्या जीवनातील प्रमुख घडामोडींचा समावेश आपल्या ओघवत्या शैलीत मांडला आणि खरोखरच हा उपक्रम त्यावेळी प्रचंड यशस्वी ठरला.
आज या पुस्तिकेचे बाजारमूल्य काहीतरी ८-१०रुपयांच्या दरम्यान असावे, परंतु यामधील ठेवा तेव्हाही अनमोल होता आणि तो आजही अमुल्यच आहे.
"अय आम्या....आरं ते डिजेवालं ऐकंचना ना लेका.... " संत्या धावत आला अन् धापा टाकतच सांगू लागला...
काय म्हणतोय काय सुक्कळीचा..?? तोंडातील माव्याची पिंक टाकत आम्या जणू डाफरलाच....
"ते म्हणतंय, आर्डर हाय दुसरी, जमणार न्हाई म्हून" इती संत्या...
आता मात्र आम्याचा पारा जाम चढला, स्वगतच बोलत असल्यासारखा म्हणतो, "च्यायची गां... आपल्या दैवताची जयंती हाय बोल्ला न्हाईस व्हय तु तेला.?"
"बोल्लो ना दादा पण औंदा लै भाव खायलंय ते बेणं, म्हाराज म्हणून कव्हर फुकट वाजवू म्हणतंय, लोकं पैसं द्यायलेत, तुम्ही बी देवा, मंग येतू म्हणतंय."
चौकातल्या छ.शिवाजी महाराज पुतळ्यासमोर चाललेला हा संवाद तिथंच चहाच्या टपरी समोर बसलेले एक गृहस्थ कान लावून ऐकत होते.
वर पुतळ्याच्या चौथर्यावर एक पोरगं फतकल मारून बसलं होतं आणि वर्षभरापासून कपडा न लागलेला महाराजांचा पुतळ्यावरील पक्ष्यांनी केलेली घाण साफ करण्याचा प्रयत्न करत होतं.
याविषयी एक किस्सा ऐकून होतो मागे जो सत्यघटनेवर आधारित होता...
वणी दिंडोरी येथील सप्तश्रृंगी मंदिराच्या अगदी गाभार्यासमोर एका महिलेने हे असलंच काहीतरी सोंग आणलं, उभ्या उभ्या घुमू लागली, वर हात करून, केस मोकळे सोडून, गिरक्या घेत धापा टाकू लागली.....
बस मग त्यानंतर काय, "देवी आली, देवी आली" म्हणत लोकांची रिघ लागली तिला समस्या सांगण्यासाठी, जो तो प्रश्न विचारे आणि बाई त्यास समाधानकारक उत्तरं देई.
एका गृहस्थास दुसर्याने सांगितले, "साहेब तुम्ही पण विचारा की तुमच्या शंका, देवी लै जागरूक हाय, नक्कीच समाधानकारक उत्तर देईल..."
बस, मग झाले हे गृहस्थ पुढे आणि टाकला पहिला प्रश्न, "भारताचे विद्यमान राष्ट्रपती कोण??" बाईच्या धापा वाढल्या पण उत्तर काय मिळेना, मग हेच गृहस्थ परत, "नाही माहीत, बरं मग पंतप्रधान कोण ते तरी...??"
पुन्हा तेच, बाई जोरजोरात घुमू लागली, पण उत्तर नाही, मग हे गृहस्थच पुढे म्हणाले.,
मित्रांनो,एक पोस्ट वाचण्यात आली,आवडली, नव्हे अक्षरशः भावली मनाला.
पण, मुळ लेखकाचं नाव माहीत नसल्याने सहज गुगल केली तर अनेक मालक समोर आले, क्रेडिट द्यावं तर द्यावं कुणाला हा प्रश्न सतावतोय.
विचार आला शेअरच करू नये पण राहवेचना, म्हणून काही लिंक्स-सह शेअर करत आहे, बघा आवडते का...??
कुणीतरी प्रचंड विश्वासघात केला पाहिजे, कुठेतरी फसवणूक झाली पाहिजे, जवळची माणसे तिऱ्हाईतासारखी वागली पाहिजेत, गरज असताना सोडून गेली पाहिजेत, कुठल्यातरी क्षणी भीतीने गाळण व्हावी,
सगळ्यांच्यात असून एकटेपणाची भावना यावी, एकाचवेळी सगळी संकटे यावीत आणि इतकी की त्या क्षणी असं वाटावं की आता सगळंच संपलं!
परिस्थितीसमोर गुडघे टेकायची वेळ यावी, कधीतरी घोर अपमान व्हावा, कुठेतरी स्वाभिमान दुखावला जावा, काही ठिकाणी तर स्वताला गहाण टाकण्याची वेळ यावी,