#भुताटकी एक अनुभव...
पहिलाच प्रयत्न,सत्य की असत्य..??
ज्याने सांगितली त्यालाच ठाउक पण सांगताना त्याचे पाहिलेलं शहारे म्हणून सांगावी वाटली.

साधारण 2013 ची घटना असेल.

प्रतिष्ठानच्या एका कार्यक्रमा दरम्यान अनिरुद्ध भेटला.विषय किल्ल्यावर नाईटट्रेक चा सुरू झाला णि त्याने त्याचा एक+
अनुभव व्यक्त केला .त्याचाच अनुभव त्याच्याच भाषेत मांडण्याचा प्रयत्न..

अनिरुद्ध :-
"आरे माझा अनुभव नाईट ट्रेक चा भारी आणि थोडा भीतीदायक आहे. कॉलेज मधील आम्ही मुलं-मुली वासोट्याला जाण्याचे ठरवले. तसे ह्या किल्ल्यावर रात्री जाऊनच देत नाहीत पण किल्ल्यावर जाण्या आधीच आम्हाला +
धक्का बसला होता.
मस्त ट्रॅक्स गाडी करून सातारा मार्गे वासोटा किल्याला साधारण दुपारी पुण्यातून निघालो होतो. सातारा पार करेपर्यंत संध्याकाळ झाली होती.पण थेट वासोट्या जवळील गावात रात्र काढण्याचे ठरवले होते म्हणून अंधार पडूनही प्रवास सुरु ठेवला.सताऱ्या पलीकडे वासोटा जवळ कसबे बामनोली+ Image
घाटातून जात असताना बराच अंधार झालेला. तसे फार वाजले नव्हते. शहरातील वेळेप्रमाणे 7 साडे सात म्हणजे काहीच उशीर नाही. आमच्या अंदाजाने आम्ही अजून अर्ध्या पाऊण तासात ठरलेल्या जागी पोहोचणार होतो त्यामुळे निश्चिन्त होतो. पण घाटात माथ्याजवळ अचानक एक पांढरा सदरा, डोक्यावर गोल थंडीत + Image
घालतो तशी टोपी, खाकी रंगाची हाल्फ चड्डी, शाळेत असते तशी, शर्ट बाहेर लटकत होता, पाय अनवाणी आणि डोळे पुसत एका लहान मुलाने गाडीला हात दाखवला. आम्ही मुलं थांबायला तयार नव्हतो पण गाडीतल्या मुलींना त्याचे वाईट वाटले. ड्राइवर ला थांबण्यास सांगितले. गाडी थांबली तसं ते पोर गाडीजवळ +
लगबगीने आले. आणि काही बोलण्या अगोदर रडायला लागले. काय झाले विचारले असता काही बोलेना त्याला हुंदकेच आवरेना. न राहवता आम्ही सगळे खाली उतरलो.मुलींनी त्याला जवळ घ्यायला गेले असता पोरग लांब गेले थोडे.पाणी विचारले तर नाही म्हणाला.मग जरा हुंदके आवरत तो त्याचे रडण्याचे कारण सांगू लागला + Image
त्याच्या म्हणण्यानुसार तो शाळेतून सुटून गुर घेऊन रानात आला होता पण अंधार होईपर्यंत गुरांना गोळा करू शकला नाही आणि त्याला आता गुर सापडत नव्हते. त्याला आम्ही म्हणालो की राहूदे तू आमच्या सोबत तुझ्या घरी चल तर म्हणाला नको बा मारल लयी. अरे बाबा समजावतो आम्ही त्यांना तू चल.
म्हणाला +
नाही तुम्ही मला मदत करा. माझ्यासोबत रानात चला गुर शोधाय मदत करा मी जाईल आपला त्यांना घेऊन घरी. बराच वेळ समजवण्याचा प्रयत्न केला. पण तो ऐकेनाच. मग मी म्हणालो चला पुढच्या प्रवासाला तो ऐकत नाहीये तर आपण काही करू शकत नाही. पण खरंच मुली हळव्या असतात. त्यांनी मदतीची तयारी दाखवली + Image
पण ड्राइवर ने संकोच व्यक्त केला आणि घाटात मी थांबणार नाही रात्रीचा आणि रानात तर मुळीच येणार नाही. मग आम्ही ठरवले की निदान त्याचा पत्ता घेऊ आणि त्याच्या घरी तरी सांगू. त्याने आधी भरपूर टाळले पण शेवटी कचरत कचरत त्याने त्याच्या गावातील पत्ता दिला. आम्ही त्याला निरोप देऊन त्या +
गावाकडे निघालो.
गावात पोहोचल्यावर बराच उशीर झाला होता पण काही वेळाने आम्हाला ते घर सापडले. दार ठोठावले असता हातात कंदील घेऊन एक वयस्कर, पांढरे केस आणि दाढी असलेल्या बाबांनी दरवाजा उघडला. आम्ही लगेचच घडला प्रकार सांगितला. पण त्यांच्या चेहऱ्यावरील एक रेष हलली नाही. + Image
अर्थातच आम्हाला आश्चर्य वाटले पण बाबांनी आम्हाला रात्र जास्त झालीये ह्या कारणाने आत बोलावले, घोंगडी जमिनीवर हंतरली, बसवले पाणी पाजले. आम्ही पुन्हा सांगण्याचा प्रयत्न केला तर म्हणाले एक काम करा कोणाचेही तिथे जाणे शक्य नाही आपण सकाळी लवकर बघू काय करता येईल तुम्ही इथे झोपा + Image
पुढे जाण्याचा विचार करू नका सोबत पोरी आहेत आणि रस्ता बी काय चांगला न्हाय. सकाळी बघू. आणि ते आतल्या खोलीत जाऊन झोपले. आतून एका म्हातारीचा आवाज येत होता. आम्ही विचार करत होतो की एवढ्या लहान मुलांचे इतके म्हातारे आईवडील कसे असू शकतात बहुदा आजीआजोबा असतील. मग आईवडील कुठे असतील +
ह्याच विचारात आणि चर्चेत रात्र काशी ओसरली कळले नाही. तरी प्रवासाच्या क्षीण मुळे पहाटे जरा डोळा लागतोय न लागतोय तोच बाबा हातात पाणी घेऊन समोर आले.
'पोराहो तोंड धुवा अन वाईस च्या घ्या मंग आपुन पुढल बघू'
आम्ही चहा घेतला. तरी बाबा काय विषय काढेनात..विचारले असता त्यांनी आमच्यातल्या +
फक्त मुलांना आतल्या खोलीत बोलावले.

त्या अंधाऱ्या खोलीत कोपऱ्यात एक रॉकेल चा दिवा जळत होता, चुलीतून धूर सुरू होता, तो धूर ज्या छोट्याश्या झुळकेतून जात होता तिथून थोडा फार प्रकाश येत होता, त्या चुलीसमोर एक म्हातारी काही तरी करीत होती. आत प्रवेश करताच बाबा म्हणाले घाबरू नका, + Image
पण हिमतीने घ्या पोराहो..आणि मागे वळून पहा...

तिथे एक धुरकट काच असलेला फोटो होता, त्याला चंदनाचा वाळलेला हार घातला होता, स्पष्ट दिसत नव्हता पण जसे जसे ते बाबा कंदील घेऊन त्या फोटोजवळ येत होते तशी तशी हृदयाची धडधड वाढत चालली होती...
मुलींना नाही राहवले म्हणून त्या आत आल्या +
त्यांनीही तो फोटो पहिला आणि एक किंचाळली तर एक बेशुद्ध झाली पण तिला सावरावे इतके भान नव्हते माझ्यात...
बाबा म्हणाले असे लयी जण फसून गायब झालेत रानात तुम्ही नशीबवान इथवर पोहोचलात...भानावर येत आम्ही तिला उचलले गाडीत टाकले आणि ड्राइवर ला कारण न सांगता पुण्याला घे लवकर अशी ताकीद दिली+
तो रात्री गाडीत झोपल्याने त्याला काही माहीत नव्हते. परतीच्या प्रवासात बेशुद्ध झालेली भानावर आली आणि मग भयाण शांततेत आम्ही पुण्याला आलो. आमची तोंड बघून ड्राइवर ची पण आम्हाला काही विचारण्याची हिम्मत झाली नाही. पुण्यात घरी येऊन काही जण 2 दिवस तर काही जण 4 दिवस तापाने फनफणले होते + Image
दोन दिवसाने उरलेले पैसे द्यायला ड्राइवर ला भेटलो तेव्हा त्याने विचारले साहेब झाले काय होते नक्की. तेव्हा मी त्याला सांगितले की,
+
+ Image
आतल्या खोलीत आम्ही हार टांगलेला जो फोटो पहिला तो दुसऱ्या तिसऱ्या कोणाचा नाही तर त्या बाबांच्या 15 वर्ष अगोदर जंगलात मेलेल्या पोराचा होता."
ड्राइवर :- मग, त्यात काय एवढे..???😏
मी 🙄:-तोच मुलगा आपल्याला आदल्या रात्री घाटात भेटला होता...."
👽👽👽👽👽👽👽👽👽👽👽👽👽
(फोटोज सौ गुगल)

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with Abhi

Abhi Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @abhi_hinduwagh1

9 Apr
#भुताटकी
रात्री दोनवाजता पुण्यात चांदणी चौकात लक्झरी बसमधून तो उतरला.त्याला पुण्यात कसबापेठेत जायचं होत. पण रस्त्यावर काळाकुट्ट अंधार होता.सुनसान रस्त्यावर चिटपाखरू दिसत नव्हतं.रिक्षा मिळणार कशी तो चालत राहिला. दुर्दैव असं की त्याच वेळी पाऊस सुरु झाला रस्त्यावरचे लाईट गेले पण +
एक रिक्षा हळूहळू येताना दिसली. तिला हात केला रिक्षा थांबायच्या आत तो पटकन रिक्षात बसला. रिक्षा पाऊस जोरात पडायला लागला रिक्षा हळू हळू चालत होती. रिक्षा प्रवासात तो नशिबावर खुश झाला. भुसारी कॉलनी जवळ आल्याचं त्याच्या काळोखातही लक्षात आल. आपण मनुष्य वस्तीत आलोया विचाराने +
त्याला सुरक्षित वाटू लागल. समोरून एक वेगात कार आली कारच्या प्रकाशात त्याला जे दिसलं ते पाहून त्याला थंडीतही घाम फुटला रिक्षा चालत होती पण ड्रायव्हर सिटवर कोणी नव्हतं. त्याने उसने अवसान आणून रिक्षातून उडी मारली आणि एका देवळात जाऊन बसला. पाऊस संपला सकाळचे सहा वाजले तो देवळा +
Read 6 tweets
8 Apr
श्रीराम समजणे सोपे नव्हे.
श्रीराम एक राजा होते, वनवास भोगून राज्यात परतुन प्रजेच्या सहमतीने राज्य करावे लागणार होते आणि त्यासाठी आपल्या पत्नी वर अपार प्रेम आणि विश्वास असून देखील आणि इच्छा नसून देखील तिला अग्निपरीक्षा देण्याचा आदेश दिला. तेव्हाही समाजात असे घटक होते जे स्त्री +
चारित्र्यावर शिंतोडे उडवतील आणि ह्याचा परिणाम अर्थातच राज्यावर झाला असता. प्रजेचा विश्वास जिंकणे आणि पत्नीवर पुन्हा कोणीही कसलाही आरोप करू नये ह्यासाठी अग्निपरिक्षेचा निर्णय मनावर दगड ठेऊन श्रीरामांनी घेतला होता. विचार करण्यासारखी गोष्ट आहे जर सीता मातेवर प्रेम आणि विश्वास +
नसता तर अथक प्रयत्न, प्रवास आणि युद्ध करून परत मिळविण्याचा अट्टाहास का केला असता..??? त्याग करून सरळ अयोध्येत का नसते परतले..?? परंतु श्रीराम हे पुरुषोत्तम होते. एक राज्य, एक लक्ष्य आणि एक पत्नी ह्या धोरणांवर अंमल करणारे. पत्नीच्या स्वाभिमानासाठी तिला कष्ट पोहोचवणे प्रत्येकाच्या+
Read 5 tweets
7 Apr
नमस्कार,
सकाळी मी एक ट्विट केले होते की RSS तर्फे कर्वेनगर, पुणे येथे कोविड केअर सेंटर उभारले आहे. बऱ्याच जणांनी ही माहिती खोटी असल्याचा दावा केला त्यांचे आभार. त्या ट्विट मधील संपर्क क्रमांक बहुतेक चुकीच्या व्यक्तीचा असावा.असो पण सदरील ट्विट हे पूर्णतः पडताळून करत आहे आणि +
ओळखीतल्या एक ताई सुद्धा तिथे निःस्वार्थ सेवा देत आहेत. अधिक तपशील माहिती साठी खाली दिलेल्या क्रमांकावर अथवा संकेत स्थळावर आपण संपर्क करू शकता. मी स्वतः आत्ता संपर्क केला होता. साधारण एका युनिट साठी जवळपास 20 सेवाकांची गरज आहे असे कळाले. निःस्वार्थ सेवेसाठी आपण ह्या मोहीम +
मध्ये सहभागी होऊ शकता. गुगल वरील फॉर्म भरून आपण नावनोंदणी करू शकता. आणि समाजाप्रती आपली जवाबदारी पार पाडू शकता. सत्कार्य करण्याची सुवर्णसंधी आहे ही.
@malhar_pandey @PunekarVoice @SunainaHoley @ShefVaidya @MH12_PUNE @That_Pune_Guy2 @akku_kohale @BJP4PuneCity @patilji_speaks
Read 7 tweets
26 Mar
"तुम्हाला मला ज्या काही हिंदू नावाने ओळखलं जातंय आणि भारतात जे काही हिंदुत्व टिकून आहे ते फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुळे.." हे काही कुठला महाराष्ट्रातला खासदार बोलत नाहीये ते खासदार आहेत कर्नाटक मधील बेंगलोर येथील "तेजस्वी सुर्या". शिवाजी महाराजांच्या नावाने +
महाराष्ट्रात राजकारण करणारी बरेच खासदार-आमदार आहेत. पण ते हे वाक्य उघडपणे बोलू शकत नाही तर ती फक्त शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर राजकारणासाठी एवढंच करू शकतात. इथल्या कुठल्याही राजकारण्याने हे उघडपणे बोलून दाखवावे एवढी हिम्मत त्यांच्यात नाही. कारण फक्त मताच्या राजकारणासाठी. +
आणि काही विशिष्ट धर्माच्या भावनांसाठी तेही शिवछत्रपतींच्या महाराष्ट्रात... दुर्दैव...दुसरं काय.
@SunainaHoley @ShefVaidya @PadmakarTillu @malhar_pandey @HearMeRoar21 @PunekarVoice @lostsoul2507 @Amruta_sv @LakhobaLokhande
Read 4 tweets
25 Mar
#थ्रेड
KBC यानी कौन बनेगा करोडपती की promotinal activity के दौरान उत्तर भारत के UP, MP, झारखंड, छत्तीसगढ़ और बंगाल घूमने का अवसर मिला. छतरपुर यानी बुंदेलखंड में जब था तब मलेरिया हुआ और बाद में वो टाफॉइड में परिवर्तित हुआ. कैसे तैसे मैने बालाघाट में एक हजार लोगों के सामने +
अमिताभ बच्चन @SrBachchan जी को रिप्रेजेंट किया पर तबियत ज्यादा खराब होने की वजह से वापिस घर आना पड़ा.9 दिन घर मे रहने के बाद अगले शोज के लिए वापिस छत्तीसगढ़ के रायगढ़ शहर में मुझे जाना था. मैने पुणे से निकलनेवाली दुरन्तो ट्रेन पकड़ी. ट्रेन में पहलीबार मुझे निचली बर्थ मिली थी.पर +
साथ वाले प्रवासी में एक विवाहित जोड़ी थी जिसमे औरत गर्भ से थी और पति का पेर का प्लास्टर हुआ था तो उनके बिना बताए में समझ गया कि मुझे ऊपरी बर्थ पे सोना पड़ेगा. रात का खाना होने के बाद हम सब एक दूजे से वर्तालाभ करने लगे. बंगाल के बनगाँव के रहिवासी मोहिंदर दास मेरे साथ उसी ट्रेन +
Read 15 tweets
22 Feb
कालचा दिवस नेहमी नेहमीचे फेसबुक लाईव्ह पाहण्यापेक्षा मी श्री गजानन भाऊ मेहंदळे ह्यांचे लाईव्ह भाषण ऐकले..
त्यापैकी दोन महत्वाचे मुद्दे
1) जगात असणारे 3 प्रकारचे खोटे इतिहासकार
2) महाराजांच्या सेनेतील 3% मुसलमान आणि त्यातलेही अर्धा टक्के म्हणजे 2 च तांत्रिक कारणाशिवाय होते. +
पहिल्या मुद्द्यातील प्रकार एकचे खोटे इतिहासकार जे खरच वाचन करून लिहितात पण हेतू पुरस्सर लिहितात.
प्रकार दोनचे संधीसाधू खोटे इतिहासकार.
परदेशी फिरायला मिळावे म्हणून तिकडच्या काही प्रोफेसर ला विद्यापीठाच्या खर्चाने बोलावणे म्हणजे ते ही ह्यांना बोलवतात आणि ह्या कारणाने परदेश भ्रमण +
होते.
आणि प्रकार तीन चे म्हणजे त्यांना मूर्ख नाही म्हणायचे पण भोळे, निर्मळ असतात ही अगदी वयस्कर झाले तरी बुद्धीने लहान राहिलेले. जे वाचन करत नाहीत फक्त ऐकलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवून वाचाळ बडबड करणारे.

मुद्दा दुसरा.
जेव्हा गजानन भाऊंनी समाज माध्यमावर हे वाचले की शिवरायांच्या +
Read 6 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!

Follow Us on Twitter!