Prof. Varsha Eknath Gaikwad Profile picture
May 28, 2021 9 tweets 6 min read Read on X
कोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे राज्य मंडळाच्या इ. १० वी च्या परीक्षा रद्द केल्याने राज्य शासनाने सर्व विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे सरसकट उत्तीर्ण करण्याबाबत राज्य मंडळास परवानगी दिली आहे.
#ssc #sscexam #InternalAssessment
संबंधित सर्व घटकांशी सखोल चर्चा करून इ. १० वीच्या विद्यार्थ्यांना गुणदान करण्याबाबतचे धोरण निश्चित केले आहे. सदर मूल्यमापन धोरणानुसार विद्यार्थ्यांचे प्रत्येक विषयाचे १०० गुणांचे मूल्यमापन करण्यात येईल.
खालील निकषांच्या आधारे विद्यार्थ्यांचे अंतिम निकाल निश्चित करण्यात येईल
* इ. १०वीच्या वर्षभरातील अंतर्गत लेखी मूल्यमापन : ३०गुण
* इ. १०वीचे गृहपाठ / तोंडी परीक्षा / प्रात्यक्षिक परीक्षा यांच्या आधारे अंतर्गत मूल्यमापन : २०गुण.
* इ. ९वी चा विषयनिहाय अंतिम निकाल : ५०गुण.
सदर मूल्यमापन धोरण करताना विद्यार्थ्यांची कोविड-१९ पूर्व काळातील (सामान्य परिस्थितीमधील) संपादणूक पातळीही विचारात घेतली गेली आहे. सध्या इ.१० वीत असलेल्या विद्यार्थ्यांच्या मागील वर्षीचा (इ.९वीचा) निकाल कोविडपूर्व मूल्यमापनावर आधारित आहे. 'सरल' प्रणालीवर या निकालाची नोंद आहे.
जे विद्यार्थी ह्या निकालाने असमाधानी असतील, त्यांना कोविड १९ ची परिस्थिती सामान्य झाल्यानंतर मंडळाच्या प्रचलित पद्धतीनुसार श्रेणीसुधार योजनेअंतर्गत यापुढील लगतच्या दोन परीक्षांमध्ये प्रविष्ट होण्याची संधी उपलब्ध असेल.
विद्यार्थ्यांचे निकाल अंतिम करण्यासाठी शाळा स्तरावर मुख्याध्यापकांच्या अध्यक्षतेखाली ७ सदस्यांची निकाल समिती असेल. निकालपत्रांच्या अभिलेखांची पडताळणी विभागीय स्तरावर शालेय शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांकडून करण्यात येईल.
मंडळामार्फत जून २०२१ अखेर निकाल घोषित करण्याचे नियोजन आहे. त्याकरिता विद्यार्थ्यांची मूल्यमापन प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. सर्व शाळांनी या वेळापत्रकाचे तंतोतंत पालन करावे.
पुनर्परीक्षार्थी,खाजगी,तुरळक विषय घेऊन बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र मूल्यमापन धोरण निश्चित केले आहे. श्रेणीसुधार योजनेंतर्गत बसलेल्या विद्यार्थ्यांना लागू पुढील १ किंवा २ संधी अबाधित राहतील. सर्व शाळा,विद्यार्थी,पालकांनी मूल्यमापनाबाबतच्या सूचना काळजीपूर्वक समजून घ्याव्यात
हे काम आव्हानात्मक आहे पण मला खात्री आहे की शाळा, मुख्याध्यापक व शिक्षक हे आव्हान स्वीकारून ते यशस्वीपणे पार पाडतील.
#ssc #sscexam

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with Prof. Varsha Eknath Gaikwad

Prof. Varsha Eknath Gaikwad Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @VarshaEGaikwad

Jun 16, 2022
मराठवाडा मुक्तिसंग्रामाचे अमृतमहोत्सवी वर्ष येत्या १७ सप्टेंबर पासून सुरू होत आहे. निजामाच्या अत्याचारातून मराठवाडा मुक्त करण्यासाठी शौर्य गाजवून हौतात्म्य पत्करलेल्या सर्व शूरवीरांना वंदन!यानिमित्त वर्षभर विविध कार्यक्रम व उपक्रमांच्या आयोजनाचा निर्णय महाविकास आघाडीने घेतला आहे. ImageImage
आज याबाबत उद्योग मंत्री @Subhash_Desai जी यांच्या अध्यक्षतेखाली गठीत मंत्रिमंडळ उपसमितीची ऑनलाईन बैठक झाली.यावेळी @AshokChavanINC साहेब, @AmitDeshmukh जी,@rajeshtope जी  उपस्थित होते. या कार्यक्रमांसाठी राज्य शासनाने  रू. ७५ कोटी अनुदान मंजूर केले आहे.
या निधीत अजून वाढ करावी, अशी सूचना मी यावेळी केली. राजमाता जिजाऊ शैक्षणिक गुणवत्ता विकास अभियानाअंतर्गत मराठवाड्यातील निजामकालीन शाळांची दुरुस्ती,पुनर्बांधणी केली जात आहे.या प्रकल्पाला चालना देण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून १०% निधी देण्यास प्राधान्य द्यावे,अशा सूचना केल्या.
Read 4 tweets
Jun 16, 2022
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च-एप्रिल २०२२ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र (इ.१० वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार उद्या दि. १७ जून,२०२२ रोजी दु. १:०० वा.ऑनलाईन  जाहीर होईल.
#SSC #results
@CMOMaharashtra
पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय शिक्षण मंडळांमार्फत परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण पुढील अधिकृत संकेतस्थळांवर उद्या दुपारी १ नंतर उपलब्ध होतील. 
@msbshse @MahaDGIPR
Read 5 tweets
Jun 15, 2022
Processions, bullock cart rides, a traditional aarti to welcome, first steps made etched in memories - the enthusiasm and colour visible during our #पहिले_पाऊल melavas and the first day of school today was unparalleled. Here are some of the moments that stood out
Read 5 tweets
Dec 16, 2021
Dear students & parents, 
Based on feedback & consultations with diverse stakeholders,we're hereby announcing the examination schedule for Higher Secondary School Certificate (HSC) & the Secondary School Certificate (SSC) board exams. #Exams @msbshse @CMOMaharashtra @MahaDGIPR
Written exams of Std 12th (HSC) will be held offline from March 4,2022 to April 07,2022, & those of Std 10th (SSC) will be held offline from March 15, 2022 to April 18, 2022. Due to COVID-19,the curriculum was earlier cut by 25%.Questions will only be from this reduced syllabus
Practicals,grade/orals & internal assessment(as per established protocol) for HSC & SSC will be held from Feb 14-March 3,2022, & February 25-March 14, 2022, respectively.The Maharashtra State Board of Secondary & Higher Secondary Education will release a detailed exam timetable.
Read 6 tweets
Dec 16, 2021
नमस्कार विद्यार्थी व पालक हो,
सर्व संबंधित घटकांशी, शिक्षणतज्ज्ञांशी विचारविनिमय केल्यानंतर उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र (HSC) व माध्यमिक शाळा प्रमाणपत्र (SSC) बोर्ड परीक्षांचे वेळापत्रक आम्ही जाहीर करत आहोत.
#SSCexams #HSCexams @msbshse @CMOMaharashtra @MahaDGIPR
इ.१२वी लेखीपरीक्षा ४ मार्च ते ७ एप्रिल २०२२ यादरम्यान तर,इ.१०वी लेखीपरीक्षा १५ मार्च ते १८ एप्रिल २०२२ याकालावधीत प्रचलित पद्धतीने(ऑफलाईन) होतील.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यापूर्वीच अभ्यासक्रमात २५ % कपात करण्यात आली आहे.उर्वरित अभ्यासक्रमावर आधारित प्रश्नच परीक्षेत विचारले जातील.
प्रात्यक्षिक,श्रेणी व तोंडी/अंतर्गत गुणांची परीक्षा (प्रचलित पद्धतीनुसार) बारावी,दहावीसाठी अनुक्रमे १४ फेब्रुवारी ते ३ मार्च २०२२ आणि २५ फेब्रुवारी ते १४ मार्च २०२२ याकालावधीत पार पडेल.महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणमंडळ परीक्षांचे तपशीलवार वेळापत्रक जाहीर करेल.
Read 6 tweets
Nov 29, 2021
We are happy to welcome students from Std 1 onwards #BackToSchool on Dec 1. Safe resumption of schools is being considered to ensure all students have equal access to education amidst the pandemic. @CMOMaharashtra @AjitPawarSpeaks @scertmaha @MahaDGIPR @msbshse @Balbharati_MSBT
Usage of masks will be mandatory for children at all times. Teachers and school staff to ensure strict compliance to masking up. #BackToSchool #maskmandate @bb_thorat @INCIndia @IYCMaha
For the safety of the staff & students, vaccination has been made mandatory for teachers/staff. Only fully vaccinated staff will be allowed in premises. School transport operators also must be fully vaccinated. #SafeSchools #VaccineMandate
Read 9 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Don't want to be a Premium member but still want to support us?

Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal

Or Donate anonymously using crypto!

Ethereum

0xfe58350B80634f60Fa6Dc149a72b4DFbc17D341E copy

Bitcoin

3ATGMxNzCUFzxpMCHL5sWSt4DVtS8UqXpi copy

Thank you for your support!

Follow Us!

:(