सीआयए, भारतातील डिजिटल मीडिया आणि मोदींना खाली खेचण्याचे कारस्थान !!!

शीतयुद्धाच्या दरम्यान (कोल्डवॉर) 'प्रोजेक्ट मोकिंगबर्ड' नावाचा एक प्रपोगंडा पसरविणारा कार्यक्रम (नकारात्मक प्रचाराचे तंत्र) सीआयए ने चालविला होता.

#PawanWrites
ज्यामध्ये त्यांनी 400 पेक्षा जास्त पत्रकार, वृत्त संस्था (न्यूज एजन्सीज) आणि अभिप्राय देणारे लेखक (ओपिनियन रायटर) यांना आपल्याकडे कामावर ठेवलेले होते. सीआयए आणि मीडिया यांच्या संबंधबाबत 'चर्च कमिटीने' त्यांच्या अहवालात काय सांगितलेले आहे, ते वाचा.
यूएसए मधले जवळपास सर्वच मोठे मीडिया हाऊसेस यामध्ये गुंतलेले आहेत. वॉशिंग्टन पोस्ट, टाईम मॅगझीन, द न्यूयॉर्क टाईम्स आणि मोठ-मोठे पत्रकार यात सामील आहेत. आत्ताच काही दिवसांपूर्वी तुम्ही न्यूयॉर्क टाईम्स मध्ये जाहिरात बघितली असेल, ज्यामध्ये त्यांना "भारत विरोधी पत्रकार नियुक्त
करायचे आहेत" असे संगीतलेले होते. अशाप्रकारे ते सीआयए सोबत मिळून खोट्या बातम्या बनविणे, खोटा प्रचार (प्रपोगंडा) असलेले लेख पसरविणे आणि भारत विरोधी असलेल्या पत्रकारांना नोकरी देणे, ज्यातून ते त्यांचे एजंट म्हणून काम करतील.
सोबतच तुम्ही हे सुद्धा यामध्ये बघू शकता की, जे तथाकथित सामाजिक कार्यकर्ते (एक्टिविस्ट) आहेत ते या डिजिटल मीडिया हाऊस मध्ये भारताच्या विरुद्ध लिहितात आणि त्यासाठी मोबदला (पैसे) सुद्धा मिळतात, हेही तुम्हाला दिसून येईल. उदाहरणार्थ हर्ष मंदार हे स्क्रोल मध्ये लिहितात.
तुम्हाला वाचून धक्का बसेल की, हे सर्व डिजिटल मीडिया हाऊस जे नेहमीच भारताच्या विरुद्ध काम करतात त्यांना युएसए मधल्या कंपन्यांकडून निधी (फंड) मिळतो किंवा त्यांच्यासोबत त्यांची भागीदारी (पार्टनरशिप) असते किंवा त्यांनी युएस मध्ये नोंदणी केलेली आहे.

आता आपण एक एक करुन बुरखा फाडूया.
स्क्रोल : ही कंपनी यूएसए मध्ये रजिस्टर झालेली आहे आणि याला यूएसए स्थित असलेल्या एमडीआयएफ आणि ओमिडियार नेटवर्कद्वारे वित्तपुरवठा केल्या जातो. अमेरिकेच्या सरकारी एजन्सीच्या कामांमध्ये असलेल्या अमेरिकन अटलांटिक मीडियासोबत समीर पाटील यांची भागीदारी आहे.
न्यूज क्लिक : ही कंपनी आत्ताच काही दिवसापूर्वी बातम्यांमध्ये होती. जेव्हा त्यांच्यावर ईडीने धाडी टाकल्या होत्या. त्यांना युएसए स्थित असलेल्या कंपनीकडून खूप मोठ्या प्रमाणावर निधी मिळालेला आहे. ही केस अजूनही कोर्टात आहे आणि अभिसार शर्मा नावाचा दलाल याच न्यूजक्लिक साठी काम करतो.
न्यूज लॉन्ड्री : या कंपनीला सुद्धा यूएसए स्थित ओमिडियार नेटवर्क द्वारा वित्तपुरवठा केला जातो. आपण आताच वरती वाचले की, ओमिडियार नेटवर्कने स्क्रोलसाठी सुद्धा वित्तपुरवठा केलेला आहे. यात एक मजेशीर गोष्ट अशी आहे की, त्यांची ओमिडियार नेटवर्कच्या मॉरिशस शाखेसोबत
(मॉरिशसमध्ये असलेल्या) भागीदारीसुद्धा आहे आणि हे तेच नेटवर्क ज्यांचं नाव हे पनामा पेपर लिकमध्ये सुद्धा आलेल आहे.
द क्विंट : याचा भारतीय मालक राघव बहल आणि रितू कपूर आहे. ज्यांची पार्टनरशिप यूएस कंपनी ब्लूमबर्ग सोबत आहे आणि ब्लूमबर्गची मालकी ही युएसमधील राजकारणी मायकल ब्लूमबर्ग यांच्याकडे आहे.
युकेमध्ये बी.के. मीडिया (युके) लिमिटेड नावाची एक कंपनी आहे. ज्याचे संचालक राघव बहल, रितू कपूर (राघवची पत्नी) आणि मोहनलाल जैन हे आहेत. या कंपनीच्या प्रोफाइलमध्ये कुठेही कंपांनीच्या व्यवसायाच्या प्रकाराचा उल्लेख नाही (नेचर ऑफ बिझनेस) आणि ही कंपनी दोन वर्षात विलीनसुद्धा करण्यात आली.
द न्यूज मिनीट : रितू कपूर, जी द क्विंटमध्ये सुद्धा आहे तीच द न्यूज मिनीट याचीसुद्धा मालक आहे आणि तिच्या सोबतीला विघ्नेश वेल्लोर आणि धन्या राजेंद्रन सुद्धा आहेत.
द न्यूज मिनीट ला सुद्धा सर्व प्रकारचे सहाय्य हे एमडीआयएफ कडून मिळतं. हीच एमडीआयएफ स्क्रोलला सुद्धा मदत करते आणि या सोबतच एमडीआयएफ हे फॅक्ट चेकर बुम लाईव्ह ल सुद्धा मदत करते.
आता एमडीआयएफला फंडिंग कोण करतो? ते बघूया. ते दुसरे तिसरे कोणी नसून ओपन सोसायटी असलेली "सोरोस फाउंडेशन" आहे. तुम्ही बिलकुल बरोबर ऐकलं आहे. इतकंच नाही तर सोरोस फाऊंडेशन, ओमिडयार आणि ब्लूमबर्ग हे यूएसए आणि इतर ठिकाणी बर्‍याच वेगवेगळ्या प्रोजेक्टवर एकत्रितपणे काम करतात.
एमडीआयएफला रशियामध्ये बंदी घालण्यात आलेली आहे.
आता या सर्व भारतीय डिजिटल मीडिया हाऊसेसनी एक "डिजीपब" नावाची संस्था बनविलेली आहे. ज्यामध्ये द न्यूज मिनटची धन्या राजेंद्रन ही अध्यक्ष आहे तर न्यूज क्लिकचा प्रबीर पूरकायस्थ हा उपाध्यक्ष आहे आणि सरचिटणीस म्हणून द क्विंटची रितू कपूर आणि न्यूज लॉंड्रीचा अभिनंदन सेखरी आहे.
तुम्ही याच्या संस्थापक सदस्य आणि इतर सदस्यांची यादी बघा. आता हीच नवीन असलेली संघटना आपल्या इथे नवीन आलेल्या आयटी रुल्सना विरोध करत आहे. ते त्या नियमांचे पालन करू इच्छित नाहीत.
विचार करा की, किती मोठ्या प्रमाणात या मीडिया हाऊसेसच्या माध्यमातून आपल्या देशात खोटा प्रचार (प्रपोगंडा)
पसरविल्या त्यात आहे. ज्यांच्यासाठी वित्तपुरवठा हा यूएसस्थित असलेल्या काही वित्तीय संस्थांच्या माध्यमातून केल्या जात आहे. भारताविरुद्ध हे एक प्रकारचे प्रचारयुद्धच आहे. हे सर्व म्हणजे भारतासाठी मोकिंगबर्ड प्रकल्पासारखेच नाही का?

बर्‍याचशा मत लेखकांची (ओपिनियन रायटर्स) नावे घ्यायला
इथे विसरलेलो आहे. जे युएस मीडिया हाऊसकरिता पगारावर काम करतात. मला असं वाटतं की, त्यांचे नाव लिहायची इथे गरजही नाही. कारण तुम्हा सर्वांना ती नावे बर्‍यापैकी माहिती आहेतच.
ही सर्व डिजिटल मीडिया हाऊसेस नेहमीच भारताविरुद्ध असलेल्या चळवळींना सहकार्य करतात. जसे सीएए किंवा शेतकरी आंदोलन. इतकेच कशाला या आंदोलनांना वित्तपुरवठा सुद्धा विदेशात बसलेल्या एनजीओच्या माध्यमातून केल्या जातो. ते सगळे एकमेकांशी जोडलेले आहेत.
त्यांना काहीही करून मोदींना खुर्चीवरून खाली खेचायचं आहे आणि भारताची पुन्हा एकदा लूट सुरू करायची, हाच त्यांचा मोठा उद्देश आहे.

धन्यवाद!!

पवन✍️

सर्व संदर्भ आणि पुरावे श्री विजय गजेरा @vijaygajera यांचे आहेत.

ब्लॉग लिंक : pbspeaks123.blogspot.com/2021/07/blog-p…

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with पवन🇮🇳

पवन🇮🇳 Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @PB_SPEAKS123

20 Jul
Chef Kelvin Cheung, originally for whom we all went to Bastian restaurant at Bandra, was entangled in a legal battle and cheating case after his differences with actress Shilpa Shetty (wife of Raj Kundra) were in the open; in fact Kelvin had to return to Canada leaving his
flourishing career, name and fame. All the top celebrities including Tiger Shroff, Janhvi Kapoor and many more were regulars at this restaurant. Our very own Aditya Thackeray once went for a lunch date with actress Disha Pattani at this restaurant only where they both were
clicked and had set tongues wagging. All of us went for this chef Kelvin and not for the restaurant. Unfortunately Bastian had to be closed down when Kelvin quit and restaurant suffered losses, and celebrities never came after he quit am told.
Read 6 tweets
19 Jul
पेट्रोल-डिझेल सरकारी नियंत्रणातून बाहेर:
आता ऑईल बॉण्डचे नाटक बंद झालेले होते ज्यातून आज दिलेल्या सबसिडीचे पैसे नंतर आलेल्या सरकारांना परतफेड करावे लागणार होते. आता आजच्या सबसिडीचे पैसे रोखीने आजच द्यावे लागणार होते आणि त्यामुळे तो भार आपल्यावर येऊ नये म्हणून सन 2010 मध्ये Image
तत्कालीन केंद्र सरकारने पेट्रोलवरचे नियंत्रण सोडले. म्हणजेच सरकारने सांगितले की, बाजारात कच्च्या तेलाचा जो भाव असेल त्या हिशोबाने भारतातही दरामध्ये वाढ किंवा घट होईल. ऑक्टोबर 2014 मध्ये डिझेल बाबतही हेच लागू झाले. पण हे करताना त्यांनी पुन्हा एकदा चलाखी केली आणि पेट्रोल-डिझेलचे
भाव हे दर 15 दिवसाला बदलतील असे धोरण ठरविले. त्यातून ऑइल कंपन्यांचा फायदा आणि जनतेच्या हातात निराशा यायला लागली. कारण जर पहिल्या चौदा दिवसात दरांमध्ये जागतिक स्तरावर काही बदल झाले तरीही त्याचा फायदा ग्राहकाला मिळायचा नाही आणि पंधराव्या दिवशी जर जागतिक बाजारात किंमत वाढलेली असली
Read 11 tweets
18 Jul
#Thread

मनमोहन सिंहांचे पाप, मोदींच्या माथी!!

आज पेट्रोल पंपवर पेट्रोल टाकत असताना जेव्हा 108 रुपये देऊन पेट्रोल टाकावं लागलं तेव्हा जीवाचा तिळपापड झाला आणि आपण या सरकारला निवडून देऊन चूक तर केली नाही ना ? हा विचारही मनात आला.

#PawanWrites
पण मनात आणखी एक विचारही आला की, मोदी जेव्हा जनतेचे जीवन सुखकर व्हावे म्हणून अनेक गोष्टी राबवतात तर मग पेट्रोल किंवा पेट्रोलियम पदार्थ ही दैनंदिन जीवनातील गरज असतानाही मोदी यासाठी काहीच का करीत नाहीत? मोदींना कळत नसेल की जनता रोज आपल्या नावाने बोटं मोडते आहे म्हणून?
आणि म्हणूनच सत्य जाणून घेण्यासाठी वाचन सुरू केले असता, मनातल्या शंका दूर झाल्या आणि माझ्यासारख्या अनेकांच्या मनात या शंका असतील म्हणून मिळालेली माहिती मिळाली आपल्यासमोर ठेवतो आहे.

राज्य आणि केंद्राचा टॅक्स:
काही दिवसापूर्वी जेव्हा पेट्रोलची किंमत 100 रुपये होती तेव्हा जवळपास
Read 26 tweets
16 Jul
सीआयए, महेश भट्ट, परवीन बाबी, अमिताभ, संजय दत्त !!
भाग-2

सन 1953 मध्ये CIA ने माईंड कंट्रोल प्रोग्राम MKULTRA सुरू केला. ज्यामध्ये LSD सारख्या इतरही ड्रग्सचा वापर करून मानवी शरीरावर काही प्रयोग केले गेले, ज्यातून मानवाच्या मेंदूवर प्रभाव टाकता येईल.
सोबतच कुत्र्यांमध्ये, मानवी शरीरात मायक्रोचीप लावणे, असेही प्रकार केले गेले.
त्याचे असलेले सर्व दस्तऐवज नष्ट करण्यात आले पण जवळपास वीस हजार कागदपत्रे परत मिळवण्यात यश आलेे आहे.

MKUltra प्रोग्राममध्ये 149 सब-प्रोजेक्ट होते. 'मोनार्क माईंड कंट्रोल' हा त्यातीलच एक सब प्रोजेक्ट होत Image
MKUltra प्रोग्राम काय होता? याबद्दल जाणून घेण्यासाठी खालील स्क्रीनशॉट मधील माहिती वाचा. या प्रोग्रामच्या माध्यमातून 'मंचूरियन कॅंडिडेट निर्मिती' सुद्धा सुरू होती. मंचूरियन कॅंडिडेट म्हणजे काय? हे समजून घेण्यासाठी खालील स्क्रीनशॉट मधली माहिती वाचा. ImageImage
Read 25 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!

Follow Us on Twitter!

:(